NDE बद्दलच्या किरकोळ शंका

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
18 May 2014 - 3:28 am

एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.

सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते. थोडा वेळ लागतो पण शेवटी ते प्रेत आपलेच प्रेत आहे हे या व्यक्तीच्या ध्यानात येते.

शंका १- हवेत तरंगणे इतके सहज का गृहीत धरले जाते? म्हणजे normal आयुष्यात तर आपण सहसा असे अचानक तरंगायला लागत नाही. (आजकाल काहीही घडू शकते म्हणून लिहीले आहे - सहसा :)) मग मृत्युपश्चात NDEer ना मृत्यूचे भान यायला इतका वेळ का लागतो?

शंका २- बरं स्वत:चं शरीर त्रिमितीमध्ये पाहून अनेकाना ही जाणीव होते की आपण स्वत:ला समाजत होतो तितके देखणे नाही. किंवा तितके बारीक नाही, सुडौल नाही यंव न त्यंव. मग परत आल्यानंतर किती NDEers स्वत:चा appearance सुधारण्याचा प्रयत्न करतात? निदान तसे खुले आम सांगतात? शून्य. बहुसंख्य NDEers मानवतावादी व अध्यात्मिक मूल्यांबाबतच बोलतात.

मृत झाल्याची एकदा व्यक्तीची खात्री पटली की लगेच एका काळ्या टनेल अर्थात बोगद्यातून तिचा प्रवास सुरु होतो.काहीजणांनी असे म्हटले आहे की अन्य जीव या बोगद्यातून प्रवास करत असल्याचे त्यांना जाणवले.

शंका ३- मग इतक्या गर्दीत या बोगद्यात धक्काबुक्की होते का? बरे सर्वच जण चुपचाप मार्गाक्रमण का करतात? कोणी शीळ घालत नाही की वेळ जायला गाणे म्हणत नाही. मृत्युपश्चात परलोकात विनोदाचे वावडे असते का?असो.

पुढे थोड्या टिवल्याबावल्या झाल्यानंतर, प्रकाश दिसतो/ लक्षात येतो. आणि मग व्यक्ती एका BRILLIANT फार प्रखर नाही अशा तेजोमय प्रकाशाकडे आकर्षित होते.

यावर शंका ४- मला जर प्रकाश आवडत नसेल जर मला कुंद पावसाळी ढगाळ हवा आवडत असेल तरी मी प्रकाशाकडेच आकर्षित व्हायचे का? कोणीही प्रकाशाव्यातीरीक्त अन्य सुंदर मेलो तेजाबद्दल बोलत नाही.

या प्रकाशाचे वर्णन करताना तर सर्व NDEers च्या जिभेवर साक्षात सरस्वतीच नृत्य करू लागते. तो प्रकाश किती दयाळू, समजूतदार, नॉन-जजमेण्टल आहे ते सांगायचे अहमहमिका सुरु होते .मग हाच प्रकाश या व्यक्तीला तिचाच जीवनपट दाखवतो व NDEer ने अन्य जीवांना दिलेले दु:ख , वेदना, यातना तो उलगडून दाखवतो इतकेच नव्हे तर NDEer त्या दुसर्या व्यक्तीच्या नजरेतून तेच दु:ख स्वत: भोगतात. मग NDEer ना जाणवते की ते किती आत्मकेंद्रॆत, स्वार्थी आयुष्य आजवर जगत आले वगैरे वगैरे. उपरतीच होते म्हणा ना.

शंका ५- जर हा प्रकाश इतका दयाळू आहे तर क्षमा करून why does it not move on?????????

मग पुढे NDEers ना त्यांचे जन्मजन्मान्तरीचे सुहुद, मित्र भेटतात. व हे मित्र त्यांना ज्ञानामृत पाजतात.

शंका ६- जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते? कोणीही NDEer ने परत आल्यावर या ज्ञानाच्या जोरावर एखादा गणिती सिद्धांत सोडवला आहे किंवा फार splendid नाही तर नको पण एखादा बारीकसा का होईना शोध लावला आहे असेही काही दिसत नाही.

सरतेशेवटी NDEer ना २ पर्याय दिले जातात परलोकातच रहाणे अथवा पृथ्वीवर परत जाणे. नाही जायचे म्हटले तरी त्याना "कार्य अपुरे आहे" या सबबीखाली सक्तीने पाठविले जाते. व परत आल्यावर "विशिष्ठ ध्येयाने झपाटून" ती व्यक्ती जीवन जगते वगैरे.

शंका ७ - इतकं ध्येय आदि सापडल्यावरही हे NDEers पुस्तक वगैरे का लिहितात बरे स्वत:ची स्टोरी म्हणून लिहीले तरी मग त्या पुस्तकाचे उत्पन्न charity ला जायला हवे कारण इतकी उच्च व अजोड अध्यात्मिक उंचीची माणसे स्वत: कशाला उपभोग घेतील? पण ते उत्पन्न charity ला जाते असे एकाही NDEer ने लिहिल्याचे ऐकिवात नाही.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

18 May 2014 - 8:01 am | आत्मशून्य

प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न विचारला होता मी पास होणार का ? असे काही बाही सांगणारे भेटले की हेच म्हणावे वाटते, माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ?

मग मी विचार करतो... नको. यावर लेख पाडायला नको. इतर कोणी येइलच...

माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ?

हाहाहा अगदी अगदी. अन त्यात ते नेहरू म्हणून आलेले कोणी बिनधास्त त्या टुकार प्रश्नांना उत्तर देतात. हे अजून वरताण.

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 9:29 am | मुक्त विहारि

जय गांधी....

आत्मशून्य's picture

18 May 2014 - 10:12 am | आत्मशून्य

कोलिंग संजय सर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 May 2014 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार

ती हत्ती आणि पाच आंधळ्यांची गोष्ट माहित आहे का? त्यातला प्रत्येक आंधळा त्या हत्तीचे वर्णन वेगवेगळे करतो. तसेच काहीसे आपले सगळ्यांचे आहे. डोळे दाखवतील तेवढेच आपण पाहु शकतो, कान ऐकवतील तेवढेच ऐकु शकतो. पण त्या पलिकडेही काहीतरी आहे. ज्याची तुलना कदाचीच या जगात आपल्याला येणार्‍या अनुभवांशी करता येत नसेल. त्याच मुळे त्याचे वर्णन करायलाही खुपच मर्यादा येत असतील.

जसे वेदना, सुगंध इत्यादिंचे वर्णन करता येत नाही. पण त्यांचा अनुभव मात्र सगळ्यांनाच येतो. तसेच काहीसे या निअर डेथ अनुभवाचे असावे.

पण हा अनुभव घेतल्यावर या जगातले अनुभव फारच क्षुद्र वगेरे वाटत असावे. म्हणुन मग तो मनुष्य जरा हाय लेव्हलचे बोलायला लागत असावा. समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे.

किंवा हे अनुभव खरोखरचे नियर डेथ एक्सपीरीअन्स नसतीलही कदाचीत.

खोर्शेद भावनगरी यांचे जिवात्म जगाचे कायदे या नावाचे असेच एक मजेदार पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचले होते. त्यात एका मेलेल्या माणसाने त्याचा आईशी संपर्क केलेला असतो आणि मग तिकडे काय चालते, स्वर्गात जाण्यासाठी आपण इकडे काय काळजी घेतली पाहिजे याचे तपशीलवार वर्णन होते.

अर्थात मला काही असला निअर डेथ अनुभव आलेला नाही किंवा माझा त्या विषयावरचा अभ्यास देखील नाही. त्यामुळे सगळेच तर्क आणि सगळ्याच गप्पा. जेव्हा मला त्याचा अनुभव येईल तेव्हा पाहु.

समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे.

उपमा आवडली.

आतिवास's picture

18 May 2014 - 10:01 am | आतिवास

चुकून NDA वाचलं म्हणून धागा उघडला ;-)

मी नुकतंच स्वामी अभेदानंद यांचं "Life Beyond Death" वाचलं. तेव्हा मला पुन्हा एकदा लक्षात आलं की: मरण अटळ आहे , ते येईल तेव्हा येईल - पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.

हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं"

प्रचंड सहमत...

आत्मशून्य's picture

20 May 2014 - 1:27 am | आत्मशून्य

मध्यवर्ती ठिकाण तुम्ही आहात की डॉंबोली ? ;)

पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.

सहमत आहे.

सारेच प्रश्न अगदी स्वाभाविक पण हा प्रश्न आवडला.

जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?

जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?

कारण याच प्रांतातल्या ज्ञानाबद्दल भप्पार्‍या मारता येतात, पुड्या सोडता येतात. 'अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्याचा खरा मार्ग कोणता' किंवा 'न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर कसा चालवावा' किंवा गेलाबाजार एखादा सी प्रोग्रॅम कसा ल्याहावा याची माहिती नीट असली तरच सांगता येते. या प्रांताचं तसं नै, कैपण बरळलं तरी गोलगोल बोलून सावरता येतं. शिवाञ चेक करायचा संबंधच नस्तो, सबब सेफच सेफ.

आत्मशून्य's picture

19 May 2014 - 9:11 am | आत्मशून्य

म्हणजे सी प्रोग्रामिंग न्यूक्लिअर रिएक्टर वगैरे प्योर एनर्जी लेव्ल्वर अप्रस्तुत ठरतात. बाकी प्र्तिसादाशी सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 May 2014 - 12:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मेनी लाईव्स मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक वाचा. लै भारीये.

बाकी एन.डी.ई. हा अ‍ॅड्रानालिन रश चा एक भाग असावा असं मला वाटतय. डिसेंबर २०१३ ला मी जवळ जवळ १८-२० फुट उंचीवरुन जमिनीवर कोसळलो होतो. (टी-१२ ला बर्स्ट फ्रॅकचर आणि पाठीला टेलर्स ब्रेस आहे अजुन ३-४ महीने वापरायला :( ). त्यावेळी मला माझ्या २२ वर्षांपुर्वी गेलेल्या आज्जीचं आणि काही वर्षांपुर्वी गेलेल्या कुत्र्याचं अस्तित्व जाणवलं होतं. पण भानावर आल्यावर सगळं नॉर्मलला होतं. बाकी एन.डी.ई. हे एक्स्ट्रिम अनुभव असतात त्यामुळे कदाचित लोकांचे मेंदु बेशुद्धावस्थेत किंवा हायपरअ‍ॅक्टीव्ह स्टेज मधे जात असावेत असा अंदाज आहे. मी बेशुद्ध झालो नव्हतो एवढं नक्की.

शुचि's picture

18 May 2014 - 6:44 pm | शुचि

बरेच NDEers त्यांच्या तात्पुरत्या मृत्युसमयी लोकं काय बोलत होते त्याचे Actual डिटेल्स देउ शकतात. यावरून ही फक्त मेंदूशी संबंधित घटना वाटत नाही.
आपला अनुभवही रोचक आहे.

कॉनी विलीस नावाच्या लेखिकेची या विषयावर एक मस्त विज्ञान कादंबरी आहे. नक्की वाचणे.

वाचेन. मिळवण्याचा प्रयत्न करीन..

यावर काथ्याकुटला गेल्या पाहिज्ये.

प्यारे१'s picture

18 May 2014 - 2:00 pm | प्यारे१

शुचि मामी,

जरा कायतरी चांगलं चुंगलं वाच, उड्या मार, खेळ. उगा का नको त्या फंदात पडायली?
आज ना उद्या मरायचंय की सगळ्यांनाच.
ठीके, समजा तरंगलीस तू, फुडं?
(संपादित)

कवितानागेश's picture

18 May 2014 - 9:19 pm | कवितानागेश

पण हे असं झाल्यावर छान वाटतं की भिती वाटते? :)

:) माऊ, एन डी ई वाचायला तर फार मजा येते.

कवितानागेश's picture

19 May 2014 - 1:06 pm | कवितानागेश

हेहे. अगं आपल्याला मजाच येणार. तो अनुभव घेणार्‍याबद्दल विचारतेय. आपण तर युद्ध्कथा पण वाचतो चवीनी..
तो अनुभव लोकांना भितीदायक वाटतो की आनंददायक?

तुमचा अभिषेक's picture

18 May 2014 - 10:49 pm | तुमचा अभिषेक

शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास ठेवा वा नका ठेऊ ..
आजचाच अनुभव नाही तर गेले ५-६ वर्षांत अधूनमधून येणारा ..

ऑफिसहून संध्याकाळी उशीराचे परतताना बहुतांश वेळा ट्रेन रिकामीच असते. त्यातून फर्स्टक्लासचा डबा म्हणाल तर खिडकीवर बसावे आणि समोर तंगड्या पसराव्यात असा असतो.
ट्रेनच्या प्रवासात पेपर वाचल्याने माझे डोके गरगरते, आणि मोबाईलवर चाळा डोळ्याना त्रास देतो, त्यामुळे मी झोपणेच पसंद करतो.
अर्थात सकाळी हमखास झोपूनच जातो मात्र संध्याकाळी नेहमीच झोपेल असे नाही, कारण झोपण्यासाठी मुळात ती यावी लागते. त्यामुळे मग लोकांचे निरीक्षण करणे हा छंद जोपासत जातो.
पण उशीरा घरी परतताना शरीर आणि मन दोन्ही थकले असते, काम करून मेंदूलाही विश्रांतीची गरज असते, अश्यावेळी मग डोळे जड होतात आणि आपोआपच मिटतात.
खिडकीची जागा, तितून सुसाटपणे येणारा आणि रिकाम्या डब्यात खेळणारा वारा... ठार बेशुद्ध पडल्यासारखी झोप लागते. कैकदा या झोपेच्या नादात छत्रपती शिवाजी टर्मिनस जाऊन पुन्हा परत आलोय.

असो,
तर अश्या या गाढ झोपेत असताना बरेचदा मला एक वेगळीच स्थिती अनुभवायला मिळते. माझे शरीर हलके झाले आहे आणि त्यातून माझा मीच, कदाचित ज्यालाच आत्मा म्हणत असावेत असा मी, बाहेर पडतो आणि माझ्या समोरच्या वा बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तिथून नेहमीसारखे लोकांचे निरीक्षण करू लागतो. माझ्या त्या आत्म्याचा बाजूला माझे शरीर गाढ झोपेत असते त्यालाही तो माझा आत्मा एकवार न्याहाळून घेतो, तो माझाच आत्मा असल्याने मलाही ते जाणवत असते की मी माझे मलाच बघतोय, पण मी माझी स्वताची झोपमोड न करता बाजूला आपलाच एखादा मित्र झोपलाय या थाटात आजूबाजुंच्या लोकांचे निरीक्षण चालू ठेवतो.

अर्थात हा खेळ थोड्यावेळाने संपतो, माझा आत्मा माझ्यात पुन्हा काय कधी कसा परत येतो हे मला आठवत नाही, पण जाग आल्यावर मी झोपेत असताना माझ्या आत्म्याने केलेले निरीक्षण सारे आठवत राहते.
ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही, कारण आजूबाजुच्या डब्यातील लोकांना मी झोपायच्या आधीही पाहिलेले असतेच, तेव्हाही सवयीनेच त्यांचे निरीक्षण केलेले असतेच, त्यामुळे तेच नजरेसमोर असताना मी झोपेत गेलो आणि तेच दृष्य़ पुढे स्वप्नात घेऊन गेलो की खरेच हे असे काही अदभुत अविश्वसनीय असे काही माझ्याशी घडते देवासच ठाऊक.

शुचि's picture

19 May 2014 - 4:19 am | शुचि

बाप रे खरच???

आत्मशून्य's picture

19 May 2014 - 9:14 am | आत्मशून्य

सुरेख आहे.

आनन्दा's picture

19 May 2014 - 10:29 am | आनन्दा

ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही,

सोप्पय - डब्याच्या त्या कोपर्‍यात जाऊन बघा. नायतर जरा शेजारच्या लेडिज च्या डब्यात जऊन बघा, जाता येतेय का ते. पण तसे तुम्हाला ठरवावे लागेल झोपण्याच्या अगोदर, तरी देखील जमेल का ते माहीत नाही. काही महिने र्रोज ठरवाल, तेव्हा झोपेत आठवण राहील.
बाकी तुम्हाला उठल्यावर अत्यंत ताजेतवाने वाटत असेल. अगदी ४ तास झोप झाल्यासारखे, नाहे का? ते देखील एक व्यवच्छेदक लक्षण आहे.

तुमचा अभिषेक's picture

19 May 2014 - 9:00 pm | तुमचा अभिषेक

खरा अनुभव आहे, काल्पनिकता नाहीये, कदाचित मी नेमका अर्थ काढायला गंडत असेल, हे काही अनैसर्गिक वा अमनवीय नसून मनाचाही खेळ असू शकतो.

मात्र हे नेहमीचे स्वप्नाप्रमाणे नाही आहे. कारण मला आलमोस्ट रोजच रात्री एकापेक्षा जास्त स्वप्ने पडतात त्यातील ९० टक्के स्वप्ने मी विसरून जातो आणि इतर १० टक्केही मला स्वप्नच होते हे जाग आल्याआल्या पटते. अर्थात घाणेरडे असेल तर भिती वाटत राहते मात्र पडले होते ते स्वप्नच होते हे पक्के ठाऊक असते.
तर, यावरून एक सांगता येईल की माझे मन असे इतके कमजोर नाही की एखादे स्वप्न त्याचा ताबा घेईल, वा स्वप्नातून बाहेर आल्यावर देखील ते सत्यच आहे असे भसत राहील.
अपवाद या ट्रेनमध्ये पडणार्‍या विशिष्ट स्वप्नाचा.
आणि हे विशिष्ट स्वप्न संध्याकाळीच पडते, अन्यथा मी रोज सकाळी ट्रेनमध्ये झोपून जातो पण हे काय कुठलेच स्वप्न पडले नाही. फक्त माझे स्टेशन गेले आणि पुढे आलो हे एकच स्वप्न पडते.

@ आनंदा - नाही हो, तो माझा आत्माराम माझ्या बाजूलाच बसून राहतो. आणि शेजारच्या लेडीज डब्यात म्हणजे आत्मा जाळीतून आरपार, ईंटरेस्टींग. पण मला ठरवून मनी वसवून स्वप्नी दिसेल असे नाही करता येत. बरेचदा छान छान स्वप्ने बघायची असे ठरवून झोपलोय पण नाही जमले.

तसेच तुम्ही म्हणता तसे ताजेतवाने असे विषेश काही जाणवले नाही बहुधा, दरवेळी जागे झाल्यावर दचकून खरेखोटेच करत असतो.

मंदार कात्रे's picture

19 May 2014 - 9:40 pm | मंदार कात्रे

अभि जी तुमच्या अनुभवाला "सूक्ष्मदेहीय प्रक्षेपण" अर्थात "ASTRAL PROJECTION" असे म्हणतात .

तुमचा अभिषेक's picture

20 May 2014 - 12:41 am | तुमचा अभिषेक

ओह्ह, म्हणजे असा मान्यताप्राप्त फंडा आहे तर.. ASTRAL PROJECTION ओह्के.. गूगाळून बघतो उद्या हे काय असते.. आणि माझ्या अनुभवाशी कितपत साम्य राखते.

आत्मशून्य's picture

20 May 2014 - 1:25 am | आत्मशून्य

आपला मेंदु शट डाउन व्हायला तयार नाहीये, हे सकृत दर्शनी जाणवते. म्हणुनच बरेच विचारप्रवाह व त्यासोबत हिंदकळत राहणे अथवा झोपच येत नाही म्हणून एखादे पुस्तक वाचत बसावेसे वाटणे हे रोजचे आहे. सुखी माणसाला मेंदुची ही स्थीती अक्षरशः वरदान आहे आनंद द्विगुणीत बनवणारी आहे. चिंताग्रस्त व्यक्तीला मात्र.... नरक!

असो, मुद्दा हा आहे की आपला मेंदु त्वरीत शट ऑफ व्हायची वृत्ती राखत नाही परीणामी तो बरेचदा अर्धवट ग्लानीत जातो, पण पुर्ण झोपी नाही. अशा स्थितीमधे शरीराचे भान देणारी केंद्रे निद्रीस्त आहेत पण "विचार" (अथवा स्वभान) निर्माण करणारी केंद्रे अजुन संपुर्ण निद्रेमधे नाहीत अशावेळी मनाला तरंगणे या स्थीतीचा अनुभव येतो. हा भास होय.

राहीला मुद्दा सुक्ष्म देह संचाराचा. काही दिवस गुगलु नका. एक काम करा हातात/गळ्यात घड्याळ घाला, समोर्च्या व्यक्तीला ते दिसले पाहिजे ही प्रमुख अट आहे. अन झोपुन जा. जर खरच देह संचार होत असेल तर... घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. मला व्यनी करा :)

आनन्दा's picture

20 May 2014 - 2:46 pm | आनन्दा

+१, सही फंडा.

तुमचा अभिषेक's picture

20 May 2014 - 2:53 pm | तुमचा अभिषेक

घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक.
>>>>>>>

बापरे, एवढे कंट्रोल नाहीये माझे माझ्या या अवस्थेवर. किंबहुना माझे कंट्रोलच नाहीये मुळात. म्हणून तर स्वप्न की भास की आणखी काही या गोंधळात आहे. असो, मला वाटते याच कारणास्तव मी यात जास्त खोलात शिरू नये, जोपर्यंत मला याचा काही फायदा नुकसान होत नाही वा दिसत नाही.
तसेही या अनुभवाची वारंवारता साधारण दोनेक महिन्यातून एकदा, आणि आतापर्यंत टोटल १०-१२ वेळा ईतकीच आहे.

तुमचा अभिषेक's picture

20 May 2014 - 2:56 pm | तुमचा अभिषेक

मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही हे मात्र पटते. असा प्रकार असू शकेल.
कारण माझी मुळात मानसिकता अशी आहे की मला काही न करता (म्हणजे अगदी विचारही न करता) गाढ झोपणे म्हणजे आयुष्यातील वेस्ट ऑफ टाईम वाटतो. पण आपल्या शरीराला पुन्हा उर्जा मिळावी म्हणून झोपावे लागते हा आपला नाईलाजच असे वाटते.

असे असण्याची शक्यताच जास्त... मागे एकदा अशा प्रकारा विषयी एका ब्लॉगमधे वाचले होते.
या ब्लॉगवर या विषयी इंटरेस्टींग माहिती आहे. यातल्या काही गोष्टी तुमच्या स्वप्नाच्या प्रकाराशी जुळतात?

तिथे दिलेल्या लाईटचे स्विच चालू बंद करणे किंवा आत्मशून्यनी सांगितलेले टाईम सिंक पहाणे वगैरे प्रयत्नांनी कंफर्म करता येईल. अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन वगैरे काही नाही अर्धवट झोपेत आहात असे माझेही मत... फक्त तुम्ही ते फार पॉजिटीव्हली घेत असल्याने तुम्हाला त्यात आनंद मिळतोय.

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 1:28 am | तुमचा अभिषेक

ब्लॉगवरची माहिती वाचली, छान लेख आहे.
पैकी स्लीप प्यारालिसिस वगऐरे त्यात जे दिले आहे ते मी सुद्धा अनुभवले आहे बरेचदा. छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष.

सध्या बायको माहेरी आहे, त्यामुळे बेडरूममध्ये एकटाच झोपतोय, ते देखील उकाड्याचे दिवस असल्याने खिडक्या छानपैकी सताड उघड्या टाकून समोरच्या बांधकाम चालू असलेल्या रात्रीच्या अंधारात भयाण दिसणार्‍या निर्जन टॉवरकडे बघत... त्यामुळे या विषयावर जास्त बोलावे की नाही या विचारात ;)

टवाळ कार्टा's picture

22 May 2014 - 12:30 pm | टवाळ कार्टा

छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष.

हे सगळे मी सुध्धा अनुभवले आहे... मी बेडवर एकटा झोपलेलो असताना बेडवर कोणीतरी चालत असल्यासारखे वाटणे... अगदी लगतचा गादीचा भाग पाउल टाकून उचलल्यावर होतो तसा खाली वर होणे

llपुण्याचे पेशवेll's picture

22 May 2014 - 2:21 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी असे नाही पण थोडेफार असे मी पण अनुभवले आहे. आणि ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.

टवाळ कार्टा's picture

22 May 2014 - 3:23 pm | टवाळ कार्टा

ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.

येक्झ्याक्टली सेम

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 10:23 pm | तुमचा अभिषेक

कारण यातून जाग आल्यावर आपण स्वप्नातून उठलोय असे वाटत नाही. एखादी अद्रुश्य शक्ती आपल्या आजूबाजुला होती जी आता गेली आणि आपण सुटलो असे जाणवते. किंबहुना ती अवस्था म्हणजे स्वप्न नसतेच, नसावेच.

थॉर माणूस's picture

23 May 2014 - 9:24 am | थॉर माणूस

जागेपणीचे स्वप्न असते असं काहीसं म्हणू शकतो. कारण स्वप्न पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मेंदू मात्र झोपायचं विसरतो.

स्वप्नात जाण्याच्या स्थिती मध्ये आपला जागृत मेंदू आधीच काम बंद करतो, ज्यामुळे त्याला या स्थितीमधे काय काय घडते याची फारशी कल्पना नसते. पण काही कारणाने जर त्याने काम बंद केले नाही तर आपल्याला ही अवस्था अनुभवावी लागते, अर्थातच मेंदूला याविषयी काही माहिती नसल्यामुळे तो याची कारणीमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यातुन असे अनुभव निर्माण होऊ शकतात. जर या स्लिपींग पॅरॅलिसिस ला घाबरण्याची रिअ‍ॅक्शन आली असेल तर नाईटमेअर्स जन्माला येऊ शकतात आणि जर तेच पॉजिटीव्हली घेतलं गेलं असेल तर मग आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरीअन्स वगैरे येऊ शकतात. हे अनुभव व्यक्ती आणि त्याच्या पालनपोषणानुसार वेगवेगळे असु शकतात.

अर्थात एकदा हे लक्षात आलं आणि नीट समजावून घेतलंत तर याची तीव्रता हळूहळू कमी सुद्धा होते. मला सुद्धा काही वेळा असा अनुभव आला होता (हे प्रकार बहुदा कॉमन आहेत, प्राण्यांमधे सुद्धा पहायला मिळतात.) पण स्वप्नांची प्रक्रिया एकूण कशी चालते हे समजल्यावर मला हे कंट्रोल करता आलं आणि आता स्वप्नामधे OME किंवा नाईटमेअर्स येत नाहीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2014 - 9:47 am | llपुण्याचे पेशवेll

हे मेंदूचं फंक्शनिंग वगैरे ठीक. पण एकदा एक भयानक अनुभव आला होता. मी ७ वी मधे असताना झोपेत मला स्वप्न पडले. अर्थात स्वप्न आहे हे कळत नव्हते ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. ते असे की मी सायकलवरून चाललो होतो. संध्याकाळी ७:३०- ८:०० ची वेळ, शाळकरी मुले जशी वेगाने सायकल हाकण्यासाठी उभ्याने पेडल मारतात तसे मी जोराने मारत होतो आणि अचानक धाडकन कोसळलो. म्हणजे अक्षरशः आपटलो पडताना एका बाजूवर पडल्यामुळे उजवी बाजू रस्त्याला घासत होती तसेच उजवा कान देखील रस्त्याला घासला. सायकलचा बार (जेन्टस सायकलची मधली दांडी) दोन पायांच्या मधल्या भागाला लागल्याचे चांगलेच जाणवत होते. वेगात पडल्यामुळे हात देखील रस्त्यावर आपटला होता. खरचटलेल्या कानाची वेदना मान वाकडी करून खांदा त्यावर दाबून आवरण्याचा प्रयत्न त्याही स्थिति मधे मी करत होतो. आणि मान वाकडी केलेली असताना रस्त्याकडेच्या अबोली सोसायटीच्या कोपर्‍यावरची ट्यूब, त्याभोवती घोंगावणारे किडे आणि त्याला खायला आलेली पाल मी स्पष्ट पाहीली. आणि मग भानावर आलो (किंवा जागा झालो)तेव्हा प्रत्यक्षात मी अंथरुणावर झोपलो होतो. डोके उशीवर होते तरीही खांदा कानावर दाबायचा प्रयत्न करत होतो हात अंथरुणाच्या बाहेर फरशीवर थोडासा आपटल्यासारखा हुळहुळत होता. म्हणलं चायला फालतू स्वप्न मला वाटले खरंच पडलो आहे. त्यानंतर त्याच वर्षी या तंतोतत वर्णनाप्रमाणेच पडलो आणि जेव्हा अबोली सोसायटी, त्याची कोपर्‍यावरची ट्यूब, पाल, कीडे पाहीले आणि अक्षरशः फाटली. हेच मी प्रत्यक्षात अनुभवले होते. साधारण ८-१० महीन्यापूर्वी. पण स्वप्नात मला पडल्याचे कारण कळले नव्हते जे प्रत्यक्षात पडल्यावर कळले ते असे की 'उभ्याने सायकल मारताना सायकली चेन पडली आणि त्यामुळे पायडलचा रोध संपला व त्यासरशी जोराने पुढे रेटलेला पाय हिसडा बसून पुढे गेला आणि संपूर्ण तोल जाऊन वेगात उजव्या बाजूला मी पडलो. मनसोक्त खरचटले होते. खिशातल्या किल्लीने खिशातून मांडीला खरवड्याचा पराक्रम केला होता. पण याव्यतिरिक्त मोडतोड किंवा गंभीर काही झाले नव्हते. पण त्यानंतर मी देवास प्रार्थना करू लागलो की असे परत मला आधी दाखवू नको. मला त्याचा ताण घेऊन नाही जगायचे आहे.
यातून ज्याना जे काही अर्थ काढायचे ते काढावे. कोणी देजावू म्हणून सोडून दिले तरी चालेल. पण माझा अनुभव माझ्यासाठि १०० टक्के सत्य आणि १०१ टक्के **फाडू होता.

४-५ वर्षांपूर्वी मिपावर मी एका अन्य धाग्यावरही हा अनुभव नमूद केला होता.

आत्मशून्य's picture

23 May 2014 - 10:25 am | आत्मशून्य

फायनल डेस्टिनेशन होता होता वाचले की ? :)

मला एकदा लोक धडाधड उंचावरन उड्या मारून आत्महत्या करताना दिसत होते. काय कारण कळेना... 6 महिन्यांनी The Invasion रिलीज झाला ध्यानी मणि नसताना मी स्वप्नात पाहिलेले नेमके तेच दृश्य जसे च्या तसे चित्रपटातही चित्रीत झालेले/केलेले होते. गम्मत म्हणजे हे स्वप्न पाहिल्या पाहिल्या ज्या व्यक्तिला प्रथम सांगितले त्या व्यक्ती सोबतच चित्रपट पहात होतो :)

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2014 - 11:48 am | llपुण्याचे पेशवेll

हो कां बरं बरं असेल.

आत्मशून्य's picture

23 May 2014 - 6:04 pm | आत्मशून्य

इट हेपन्स... तुमचा प्रकार मात्र फायनल डेस्टिनेशन च्या थिमची ची आठवण करून देतो.

तुमचा अभिषेक's picture

24 May 2014 - 10:15 pm | तुमचा अभिषेक

ईंटरेस्टींग आहे, पण शक्यतो म्हणजे माझा तरी अनुभव, स्वप्नात जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच त्याक्षणीच दचकून जाग येते, उदाहरणार्थ मला कड्यावरून कोसळल्याचे स्वप्न पडले आहे, तर मी खाली पडून माझा फुटून चेंदामेंदा व्हायच्या आधीच दचकून जागा होतो.
अर्थात आपल्या केसमध्ये नियतीला आपल्याला जे घडणार ते आधी दाखवायचे असल्यास हे असे होऊ शकते, मग याला सामान्य स्वप्न म्हणता येणार नाही. तसेच हे असे खरेच पोसिबल आहे की नाही यावर स्वताला अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणे जडच.

श्रीरंग_जोशी's picture

19 May 2014 - 5:42 am | श्रीरंग_जोशी

गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर नॅशनल जिऑग्राफिकची सायन्स ऑफ डेथ डॉक्युमेंटरी पाहिली होती. सदर धाग्यातल्या बर्‍याच शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.

सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

चौकटराजा's picture

19 May 2014 - 9:27 am | चौकटराजा

एकूणच इमेज फाईल करप्ट असेल किंवा मॉनिटर ची फाईल करप्ट असेल तर मुळातले सत्य चित्र दिसणे कठीणच तसे सर्वच प्रकारच्या आकलनाचे असते .आकलन या शब्दाला जीवसृष्टीपलीकडे काहीही अर्थ नाही.वर जीवसुष्टीपलीकडे खूप मोठे विश्व आहे.
( मला आज प्रत्यक्ष स्वामीनी दर्शन दिले हा एक भ्रम तरी असतो किंवा दुसर्यास न पटवून देता येणारे सत्य ! )

शिरपतराव्_टांगमारे's picture

19 May 2014 - 7:44 pm | शिरपतराव्_टांगमारे

तुमचा अभ्यास जरासा तोकडा पडतोय.
इयान स्टिवन्स न नं केलेल्या अभ्यासानुसार भारतीय लो क आणि पाश्चिमात्य ह्यांच्या अनुभवात फरक असतो.

शिरपतराव्_टांगमारे's picture

19 May 2014 - 7:49 pm | शिरपतराव्_टांगमारे

असतो नव्हे.. दिसला..
http://www.near-death.com/hindu.html

शुचि's picture

19 May 2014 - 10:16 pm | शुचि

धन्यवाद. वाचते.

माझ्या वाचनात आलेल्या एका मानस-शास्त्रावरील पुस्तकात या मृत्यू-नजीक अनुभवांचे असे स्पष्टीकरण आहे. - प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे भ्रम (hallucination)

हवी असेल तर मी त्या पुस्तकाचा आंतरजालावरील दुवा शोधून देवू शकतो .