डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत
काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत.