संत मीराबाईची विराणी
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही||
पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग|
चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग||
पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला |
कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला||
जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको|
विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको||
अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा|
बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा||
राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो|
विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||