कसाब अजुन जिवंत आहे का ?
२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील .
त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय .
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय .
कसाब अजुन जिवंत आहे का ?
२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील .
त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय .
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय .
कसाब अजुन जिवंत आहे का ?
बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्या मतलई सुरमई वार्यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा.
येत्या शनिवारी (२३ NOV) सायंकाळी सात वाजता(19.00) माझ्या मुलाखतीचा गुंतवणूक आणी अर्थ विषयक कार्यक्रम DSP BLACKROCK प्रायोजित Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - ५ हा CNBC TV -18 प्रसारित होणार आहे. हाच कार्यक्रम रविवारी(२४ NOV) सायंकाळी आठ(20. 00) वाजता पुनः प्रसारित होईल. याची झलक तू नळी वर उपलब्ध आहे. पण त्याच्या दुव्यावर टिचकी मारली तर तो भलतीकडेच जातो. पण वरील इंग्रजी शब्दच दुवा म्हणून तेथे टाकल्यास आपल्याला तो पाहता येईल. हा कार्यक्रम फारसा उपयोगी नाही असे माझे स्वतःचे मत आहे परंतु त्या कार्यक्रमानंतर देण्यात येणाऱ्या टिप्स चांगल्या असतात.
आज ना उद्या
वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल..
तग धरून उभारलेली
अंग चोरून वाळलेली
आज ना उद्या
घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती
काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती
पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या
तुटता तुटणार नाहीत..
नाग-नागिणीसारख्या मिठ्या
सुटता सुटणार नाहीत
खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या
कितीही खणलं तरी पुरून उरतील..
तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!
जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी
अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही..
शेजारी उगवूनही जपलेल्या
विरहाची माती व्हायची नाही
परिस्थिती गंभीर होती
विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या होत्या
बंडखोरांच्या फौजा
वेशीवर येउन थडकल्या होत्या
आटपाट नगरातील राजघराणे
अंतीम घटका मोजत होते
पुनरुत्थानाच्या सर्व शक्यता
अखेरच्या ते शोधत होते
एक गट वेगळा निघाला
विद्रोह्यांना जाउन मिळाला
बंडखोरांच्या मदतीने
सत्तेवर प्रस्थापित झाला
बेदखल गटाने विजनवासात
प्रतिज्ञा बदल्याची केली
असंतुष्ट प्रजेच्या मदतीने
पुनश्च सत्ता काबीज केली
लढाई सतत सुरूच होती
आज विजयश्री ह्याची
उद्या सरशी त्याची
सत्ता डगले बदलत होती
गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती.
त्रास झालाय त्रास.. गेले आठवडाभर ऑफिसमध्ये एवढे मरमरून काम करावे लागतेय जेवढे मी महिन्या महिन्याला मिळून नाही करत. जणू काही यंदा सर्व कर्मचार्यांचा दिवाळी बोनस मला एकट्यालाच काढायचा आहे. जेव्हा दिवसभरात आंतरजालावर (ईंटरनेटवर) एखादी चक्कर टाकायलाही वेळ मिळत नाही तेव्हा जशी जगाशी संपर्क तुटल्याची प्रकर्षाने जाणीव होते, ती गेले काही दिवस मी अनुभवतोय. पंधरा मिनिटांसाठी टॉयलेटला जाऊन हलके होणे आणि तिथेच गपचूप मोबाईल काढून व्हॉटसअपवरचे मेसेज बघणे हा एवढाच मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसभरात उरलाय.
घन निल यांचा लाडू झाला, ३_१४ विक्षिप्त अदिती यांचा झाडू झाला, खटासि खट यांचा खडूसुद्धा झाला.
मा. श्री. विजुभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे साडू आणि भाडू राहीले आहेत. रडू आणि भिडू चे क्वापीराईट मा. श्री. ध्यानस्थ बगळा यांनी घेतले आहेत. च्यायला, गडू कसे काय विसरले सगळे? त्याचा क्वापीराईट कोणीही कसा नाही घेतला? मा. श्री. वटवाघुळ यांनी गडू संबंधी सुतोवाच केलेच आहे. तेव्हा आधी कोणी जिलबी टाकायच्या आधी आपणच बाराखडी पुर्ण करण्याचा प्रयत्न करूयात या सदविचाराने हा धागा काढत आहे.
मला पडलेला प्रश्न म्हणजे सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल?
गावापासून दूर टेकडीवर, एक वास्तू अशी खास होती
जागेसाठी भांडणाऱ्यांनी, देवाला रहायला दिलेली; जागा होती
सताड उघडी मातकट पायवाट, एकटीच दुहेरी पळत होती
काही मोजक्या भक्तांच्या पायात, कधीतरी घुटमळत होती
भिंती ढाचा तसे जुने, ऊन;वादळवारे खात निर्धास्त उभे होते
वेळेला देवघर,क्षणी भक्तांस निवारा, असे त्यांचे काम होते
दाराबाहेर उभ्या वृंदावनात, तुळस वाऱ्यावर डोलत होती
अधूनमधून मिळणाऱ्या पाण्यावर, बहरायला ती शिकली होती
प्रवेश करता देवळात, कासव समोर साष्टांग होते
नजरेनेच पोसतो देव त्यास, हेच ते सुचवीत होते
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.