मन हे माझे
सभोवती आसपास कुठंच नसताना तू, माझं मन हे असं तुजभोवती रेखलेलं, उमजेल का कधितरी तुला माझं असं सतत तुझ्या सहवासासाठी घुटमळणं, एका शब्दासाठी, कटा़क्शासाठी तासन तास आसुसणं, परवाच चिडवत होत्या मैत्रिणी, आमच्या खळाळत्या धबधब्याला द्रुष्ट कुणाची लागली? काय त्यांना सांगू तुझं नाव?, छे ! छे !! काहीतरीच काय? स्वतःशीच बोलायच तर होतय बावरायला, खर सांगू ka ? आजकाल हसावसंसुध्दा नाही वाटत.कुणाशी बोलावसंच नाही वाटत, सतत असावं आपल तुझ्या चिंतनात , सुटतात मग आपोआप खोल नि:श्वास, वाटत कधी याबरोबरच जाईल श्वास, खुळी वाटतेय ना कल्पना? आहेच मी अशी वेडी खुळी , तुझ्या विशाल व्यक्तिमत्वापुढे अगदीच बावळी.