कसं जमतं तुला
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण
गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?
फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं