चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !!
विचारांची जुळणी गुळाची असावी..
शब्दांत पेरणी साखरेची असावी..
विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी..
तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी..
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥
विचारांची जुळणी गुळाची असावी..
शब्दांत पेरणी साखरेची असावी..
विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी..
तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी..
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे
हे जरा नविनच होते
चिंब होऊनही मी धुंद न होणे
हे जरा नविनच होते
.
हा कुठला नवा खेळ?
.
दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो
'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो
ढग फुटून 'तो' असा काही बरसतो
त्या गंधाने मी आकंठ मोहरतो
.
नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो
सचैल भिजून भान हरपतो
कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात
हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते
मनात वसंत रुंजी घालाया लागतो
मग आजच असे का व्हावे?
.
हा वर्षाव कोरडा का वाटावा
येत्या वर्षात -
रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा
सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा
भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा
नववर्षाच्या शुभेच्छा !!
:-)
अतृप्त असावे सारे
मन तृप्तीतूनच पाही
तृप्ती'ही असते क्षणिका
अतृप्ती चिरंतना'ही
मानवास जन्मी एका
नीज सांगे ति ही काही
मन क्षणात चाखे तिजला
अन् क्षणात काही नाही
सारा हा जन्म तरिही
का धावे तिच्याच पाठी
मरणाही भेटी येता
अतृप्ती उरते गाठी
वळे न माथा दिशा एकली मूक चालणे आता
स्पंदने हरवली आकाशी पार्थिव उरली गाथा
काहुर ब्रह्मानंदी विरले कवेत तुझिया नाथा
भोगुन झाले प्राक्तन आत्मा म्हणे जाहलो जेता
मी-माझेपण, रिक्त-रितेपण व्यथाच नाही दाता
निराकार आकार तुझे परिपूर्ण जाहली गीता
………………… अज्ञात
येतील का
मिपा चाळत असताना एका धाग्याचं नाव वाचलं आणि त्या मक्त्याला धरून विचारांना बरोबर घेत मग काव्य सुचत गेलं...
नाणेघाटच्या अविस्मरणीय ट्रेक मधील एक निवांत क्षण
मंतरलेले दिवस ते, आता परत येतील का
वेळीअवेळी मित्र माझे हाका मारत येतील का
मान्य आहे सगळे येथे गरजेपुरते सखे
गरजेला मी साद घालता तरीही धावत येतील का
भेटलास आनंद झाला, नको म्हणाया कुणी
नाही भेटलो म्हणून साले शिव्या घालत येतील का
पाठमोरी तू
सळसळणारी तू
मनात फडा . .
.
भिंतीला कान
कानात गोळा प्राण
वाद अबोल . .
.
एक मनात
दुसरेच जनात
हेही जिणेच . .
.
पान पिकले
मन हिरवटले
नसती नशा . .
.
गुलाबी गाल
उत्साहाची धमाल
वेळ गेलेली . .
.
नेहमीच असा प्रश्न पडतो मला की मी का नक्की का जगतोय?
असं कोणतं काम करायचंय ज्याची आतुरतेने वाट बघतोय?
हजारो अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना मी जागलो का?
ज्यांना जसे हवे होते तसाच त्यांच्याशी वागलो का?
आजपर्यंतच्या आयुष्यात किती जला णांच्या उपयोगी पडलो?
माझी मदत हवी होती अश्या किती घरांच्या पायऱ्या चढलो?
कितीतरी मनं मी दुखावली असतील… कितीतरीजण मला दुरावले असतील….
माझ्या अश्या वागण्याला तेच लोक काळाच्या ओघात सरावले असतील
आपल्याच धुंदीत जगलो … हवा तसाच वागलो....
कोणी कधी काही समजावले तर त्यालाच टाळू लागलो .....
तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ
मन होते कासावीस लागुनिया वेड
काम करता लक्ष नाही कामामधे चूक
नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक
घर नाही दार नाही विसरतो संसार
जीवनात सार सारे वाटू लागते असार
नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग
डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग
करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे
एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे
नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत
इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . .
.
कधी काळजाला समेचा दिलासा..
मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला!
तसे बंध कुठले-कधी जाणिवेला
ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला!
नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला..
असे काय होते उरी प्राक्तनाच्या..
अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..!
अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले..
मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!!
राघव