शांतरस

राधेचा कन्हैया -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
28 Aug 2013 - 2:31 pm

इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी
झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी ..

फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी
इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी ..

पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी
हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी ..

लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी
पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी ..

मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी
जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी ..

पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी
उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी ..

शांतरसकविता

मोर पंखी कावळा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
28 Aug 2013 - 12:49 pm

एक काळा कावळा, मोरांच्या देशी गेला.
मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला.

‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली.
पोरांसाठी वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली.
जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली.

पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती.
‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी.

सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट
आवडत होते त्याला, त्याचेच शिवाम्बू
कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले?
मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली?

शांतरससमाज

शोध माझ्यातला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
22 Aug 2013 - 5:47 am

शोध माझ्यातला

मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

शांतरसकविता

पाऊस एक चिंतन

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
3 Aug 2013 - 4:29 am

थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही. बघा तुम्हाला काय सांगतायत ते.

पाऊस - १

करुणशांतरसकवितामुक्तक

वाटते मजला भिती - (गझल)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
27 Jul 2013 - 3:12 pm

जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती
ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती

सागरावर का उसळती जीवघेणी वादळे
हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती

ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा
देवळातिल शांततेची वाटते मजला भिती

वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी
वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती

माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती
ओळखेना आरसाही वाटते मजला भिती

जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला
जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती
.

शांतरसकवितागझल

काही अठवणी...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
26 Jul 2013 - 10:17 pm

काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या

काही आनंदी...सुखाच्या
काही त्रासिक...दु:खाच्या
काही केवळ..जनातल्या
कित्येकांच्या..मनातल्या!

काही..हसर्‍या मुलांच्या
काही..गळल्या फुलांच्या
देठांनाही सोडून गेल्या..
उमलणार्‍या कळ्यांच्या!

काही माझ्या गावाच्या
काहि..तर,नुसत्या नावाच्या
काही...दूरं देशांच्या
तळहातांवरिल..रेशांच्या!

काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!

शांतरसकविता

" आरती कंत्राटदाराची - "

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Jul 2013 - 10:16 am

'
जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा
थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||

साटे लोटे तुमचे जमले असेल
आगाऊ रक्कम घेतली असेल
लाज शर्म थोडी शिल्लक असेल
नैतिकता काही ध्यानीमनी धरा ||

पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे
सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे
विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे
खाल्लेल्या पैशावर उपकार करा ||

अपचन अजीर्ण होऊ देऊ नका
डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका
आयकरवाले पहा घालतील डाका
घरच्या लक्ष्मीची आठवण करा ||
.

शांतरसकविताराजकारणमौजमजा

हायकू -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
20 Jul 2013 - 10:31 am

१) लहरी वारा
पानांची सळसळ
सशाचा छळ

२) ढगांची हूल
पावसाची चाहूल
भुई निष्प्राण

३) वाऱ्याची गती
निसर्गाची संगती
मन बेभान

४ ) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
ऐकते बीज

५) कावळा पाही
चिमणीचं सदन
खुनशी मन

.

शांतरसकवितामुक्तक

कधीतरी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 6:33 pm

धुसफूस भावनांची विसरू कधीतरी
जरी आठवून ढाळू अश्रू कधीतरी

आणू कुठून सांगा शोधून एक मित्र
जो ना म्हणेल कधीही 'भेटू कधीतरी'

मग मोट अनुभवांची बांधू कधीतरी
संधी पुढे आम्हीही साधू कधीतरी

जैसे तुम्ही करावे, तैसेच भरावेही
होईल हे तुम्हाला, लागू कधीतरी

आम्हासही कधी, पुसतील लोक सारे
आम्हीही मग अलिप्त, राहू कधीतरी

कक्षा जरी स्वतःच्या जाणू सदा तरी
आकाश बंधनांचे भेदू कधीतरी

आहोत तेच आपण, जाणू कधीतरी
'तो' मी कधीतरी, 'तो' तू कधीतरी

मागू आम्हास आम्ही काहीच ना अपूर्व
कुण्या चेह-यास हासू मागू कधीतरी

मराठी गझलशांतरसकवितागझल

कृष्ण तो आतला ...

आतिवास's picture
आतिवास in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 4:49 pm

रोजचाच त्याने
धावा हा घेतला
गूढ डोहाच्या तळात
उभा अंगार पेटला.

युद्धे घमासानी
हळू प्राण हा बेतला
श्वासामागे श्वास
कसा, न कळे रेटला.

निसटून गेले, त्याचे
भय ना मातीला
उणे काही नाही
भेद जागत्या वातीला.

प्रपंच देहाचा
उन्मळे रातीला
पावसाची लय
अशी अखंड साथीला.

अदूर सुदूर
घन कधीचा मातला
झोपाळला आहे
परी कृष्ण तो आतला.
**

शांतरसकविता