आठवण...
आठवणींनी जीव माझा
बेचैन किती जाहला?
सखये तुझा कुठे तो...
माझाही न राहिला.
दूर किती दूर जाशी
लागे मज हुरंहूरं
शांत आहे ही तृप्तता
की भावनांचे काहूरं?
वेड असे भीत आहे
हाक कशी देऊ मी?
का तुझिया स्मरणाने
फक्त तृप्त होऊ मी???
आसवांचे नजराणे
का मागे प्रीत ही?
सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?
दु:ख्ख असे आज नाही
जरी न तुझा राहिलो
देवालयी पुष्पांसम
निर्माल्य अता जाहलो.
वेड्या त्या उद्यानी
तार कुणी छेडिली?
कृष्ण नव्हे कृष्ण अन्
राधा हि न राधा राहिली...