मी परदेशी
कुणास मी का केले अवघड ?
प्रेमच अनगड काय करू ?
कुणास मी का केले अवघड ?
प्रेमच अनगड काय करू ?
मुक्त मोहिनी श्यामल नयनी
सुंदर साधी पवित्र तू ही
तुझ्या उदरीचे पवित्र फल मी
बीजानेही तुझाच मी ही
कधि भासिशी सुंदर शीला
कधि मोहिनी तू मधुशाला
तुझ्याच साठी आसुसलेला
मी ही येथे रिताच प्याला
धाक तुझाही हवा वाटतो
पत्नी म्हणूनी माता म्हणूनी
प्रेम तुझेही हवे वाटते
कधि सखी तू कधी कामिनी
धर्माचेही तुटले बंधन
संस्कृतिचेही सुटले कोंदण
अंगण झाले कधि नभी ते
नभही झाले कधी..च अंगण
आता आहे पुढेच सारे
जिंकायाचे...चाखायाचे
स्वातंत्र्याचे मिळता सोने
जपून ते हि राखायाचे.
गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता...
आज अचानक हाती आली....
माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला....
उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक.....
नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार,
संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!!
आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर,
माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!!
आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती,
उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!!
चालणे प्रवाह जीवनाचा
थांबणे मरण यातना
पर्याय नाही दुसरा
शिवाय चालण्याचा.
चालता चालता भेटले
वाटेत जे सगे-सोयरे
अनोखळी वाटसरू निघाले.
क्षणभराची साथ तयांची
देऊन गेली अनेक जखमा
कवटाळूनी त्या जखमांना
एकटाच मी चालत राहणार.
दमलेल्या शरीरानी
थकलेल्या मनांनी
निरुदेश्य मी
भटकत राहणार.
चालत राहणार, चालत राहणार.
तुझे मुलायम मउ दोन्ही हात
आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी..
कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर
शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण!
माहित असतं नंतर ..
पुन्हा तोच एकाकीपणा मला
छळायला येणार आहे...
आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर!
कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?
दिनांक १५.१२.२०१३ ला ही कविता भावी मुख्य मंत्री साठी लिहली होती. दिनांक २८.१२.२०१३ ला श्री केजरीवाल मुख्य मंत्री बनले. त्यांचे मुख्य मंत्री बनण्याचे आणि वनवासी होण्याचे भाकीत खरे ठरले. च्यायला आपण बी जोतिषी झालो.
कसला राव विचार करता
बसा की एकदा खुर्ची वरती
तोडा आकाशीचे तारे
पूर्वा हौस जनतेची.
विजेची बिल कमी करा
मुफ्त मध्ये पाणी द्या
दाखविलेले स्वप्न जनतेला
तोडू नका हो राव तुम्ही.
पुकारते ही खुर्ची कसी
होऊ नका हो वनवासी
औलीयाची श्रापित वाणी
करू नका हो पुन्हा खरी.
राख नदीत अर्पिली
वाहत शेतात गेली
तेथे बीज अंकुरले
ऐसेच जीवन जगते.
रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने
श्वास त्याचा कोंडला
गुदमरून जीव गेला.
मन रे धाव रोखुनी घे
सरती मागे सोस वयाचे
निजलेले ना अजुनी जागे
रोज सकाळी सायंकाळी
काळ सरकतो मागे
मन रे धाव रोखुनी घे…….
असलेले ओंजळीतले जग
श्वास तयास लगडलेले बघ
घे पिउनी अमृत भरलेले
ते जितके तितकेच पुरेसे
जगण्या अधिक न लागे
मन रे धाव रोखुनी घे…….
मरण अखेरी शून्य सोबती
झुळुक वादळे येती जाती
वातीविण तेवे ना पणती
धर छाया कळवळते ज्योती
व्यर्थ मानवी दंगे
मन रे धाव रोखुनी घे…….
……………. अज्ञात
काट्यांत हरवली वाट
संदिग्ध पावले माझी
वळणावर एका अवचित
अबोल होऊनी गेली....
वस्ती ही आता दूर
वळ्ण्याचा नाही धीर
एकाकी निर्जन रानी
हे श्वास ही होती तीर....
जगण्याचे वादळ शमले
मृत्युची ओढ न उरली
निस्तब्ध शांत या रात्री
ओझेच सावली होई....
भिरभिरतो रानी आता
दिशाहीन जणू रावा
जगण्याच्या आवर्ताला
मरणाचा चांदणचकवा...
पद्मश्री चित्रे (फुलवा)
आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती.