दिनांक १५.१२.२०१३ ला ही कविता भावी मुख्य मंत्री साठी लिहली होती. दिनांक २८.१२.२०१३ ला श्री केजरीवाल मुख्य मंत्री बनले. त्यांचे मुख्य मंत्री बनण्याचे आणि वनवासी होण्याचे भाकीत खरे ठरले. च्यायला आपण बी जोतिषी झालो.
कसला राव विचार करता
बसा की एकदा खुर्ची वरती
तोडा आकाशीचे तारे
पूर्वा हौस जनतेची.
विजेची बिल कमी करा
मुफ्त मध्ये पाणी द्या
दाखविलेले स्वप्न जनतेला
तोडू नका हो राव तुम्ही.
पुकारते ही खुर्ची कसी
होऊ नका हो वनवासी
औलीयाची श्रापित वाणी
करू नका हो पुन्हा खरी.
औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला. तेंव्हा पासून ही म्हण प्रचलित आहे.
प्रतिक्रिया
17 Feb 2014 - 9:25 pm | आयुर्हित
अजून एक म्हण आठवली
"जो गरजते है वो बरसते नही"
केजरीवाल एक फुसका बार निघाला!
दिल्लीकरांच्या अपेक्षाभंगावर नुकताच राष्ट्रपतीं राजवटीचा वरवंटा फिरलेला आहे!