शांतरस

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
4 Mar 2015 - 10:00 pm

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी
सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

काहीच्या काही कविताशांतरसकवितामौजमजा

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Feb 2015 - 8:58 am

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
"चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला ..

आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी
श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला ..

एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला
फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला ..

हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी
क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला

लेउनीया साज आली कामिनी थाटात ती
तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

मराठी गझलशांतरसकवितागझल

अंधार

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
20 Feb 2015 - 7:59 am

एकटाच आहे, असतो आणि राहणार तो
त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब
ना कसला डाग, ना कुठला बट्टा
सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ
.
जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते,
तिथे तो आपले हातपाय पसरतो..
मस्त राहतो..
.
तोच त्याला घेरुन राहतो
अन् तोच त्याच्यात भरुन राहतो
पण शांत शांत,
एकटा जरूर आहे पण एकाकी नाही
तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी
.
तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा
त्याला आमंत्रण नाही लागत
आगत स्वागत नाही लागत
तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा
तोच येतो तुमच्याकडे

भावकविताशांतरसकवितामुक्तक

आत्म"मुक्ति!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
16 Feb 2015 - 10:00 pm

आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी
बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी???

प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा?
मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा.

मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे?
पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे???

तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू.
शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू!

सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का?
जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का?

मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको..
निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको.

वीररसशांतरसकविता

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 2:08 pm

नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..

.

शांतरसकविता

दे दणादण

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
21 Jan 2015 - 6:04 am

बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण
परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण

प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण
समयसारणी हे निकट हे स्तरण

पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण
आकाशग मग कुंडल तंतु भारण

पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण
बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन

प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण
ग्राभित विदरण का विरुप निःशोण

रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण
संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण

विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन
वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन

कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण
अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

काहीच्या काही कविताभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसकविता

सोबती

सुचेता's picture
सुचेता in जे न देखे रवी...
18 Jan 2015 - 3:58 pm

सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात

ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं

हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं

शांतरसकविता

समज..!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 6:10 pm

एक..,दोन.. फुल्ल.. :- एक हाफ..
===========================
ट.क्यानी नेला तांब्या
अन्,कुंथुनं जिलबी-केली.
विडंबन जमले- नाही
आणि बोंबाबोंबंही झाली.

ना तालं नसे ना छंद
ना रचने'चा सं-बंध.
शब्दातं गंडला सांधा
पिशविचा तुटला बंद

भाषेसं अशी-ठेवावी?
रचनेची कशीहि-व्हावी!
वैतागून स्व'रचनेची
मगं कचकून हो मारावी!

शांतरसविडंबनमौजमजा

अगा पांडुरंगा ..

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 12:07 pm

ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
गोड मानून घ्या मंडळी ... _/\_

**************************************************

किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता

नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्‍याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता

पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता

विठ्ठलशांतरसकविता