उत्तर सापडेना आज?
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे)
कुणी पायदळी तुटवली
एक नाजूक कळी आज?
मध्यान्हन उन्हाळी पसरली
का स्मशान शांतता आज?
ममतेचा कोखात निपजली
का रक्त पिशाचे आज?
माय बहिण भार्या नाती
का निरर्थक झाली आज?
वासनेच्या डोहात तरंगती
का नव तरुणाई आज?
काय जाहली चूक आमची
उत्तर सापडेना आज?