कचरा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
6 Apr 2014 - 10:02 am

कचरा आम्हाला आवडतो
आमच्या घरात कचरा
गल्लीत कचरा
रस्त्यावर कचरा
नाक्यावर कचरा
अड्यावर कचरा
स्टेशन वर कचरा

जिथे पहा तिथे
कचराच कचरा.

विदेशी कचरा
जास्तस आवडतो
कचऱ्याची दलाली
आम्ही आनंदी घेतो.

पडणारी विमाने असो
कि जंग लागलेली जहाजे
किंवा बुडणाऱ्या डुब्या
देशाची सुरक्षा सुद्धा
करतो विदेशी कचरा .

सडलेल्या द्राक्षांचा
सुवास दरवळला
झिंगून डुक्कर
कचऱ्यात पहुडला
परमानंदी टाळी
तयासी लागली.
कचऱ्याचा जयघोष
आकाशी दुमदुमला.

शांतरससमाज

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

6 Apr 2014 - 11:48 am | यसवायजी

कि जंग लागलेली जहाजे??
यह मराठी हय क्या??

परत एक हिंदाळलेला प्रयोग :) हिंदी मधे जंग लागतो, मराठी मधे गंज चढतो.

यसवायजी's picture

6 Apr 2014 - 12:17 pm | यसवायजी

:)
नाही म्हटलं, त्या धाग्यावर मराठी भाषा, मराठी शब्दांसाठी 'जंग' चाललीय, आणी इकडे आमच्या शब्दांना 'गंज' चढतोय. ;)

विवेकपटाईत's picture

6 Apr 2014 - 12:35 pm | विवेकपटाईत

आपली मराठी हिंदी मिश्रित आहे, त्या बद्धल कसली ही खंत वाटत नाही, तिला वाटेल तर खानदेशी, कोकणी तसे दिल्ली-मराठी नाव दिले तरी चालेल. बाकी गंज लागलेली गहाजे लिहणे ही अशक्य. * ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*

उगाच लगान मधला कचरा आठवला !

(कचरे कचरे पे लिखा हौ उसे उठानेवाले का नाम) ;)

वेल्लाभट's picture

8 Apr 2014 - 5:39 pm | वेल्लाभट

का म्हणजे ही कविता का लिहीली, कशी सुचली?
कचरा खरंच आवडतो का?

माफ करा मला कळली नाही, त्यामुळे रुचली नाही.

आत्मशून्य's picture

10 Apr 2014 - 3:05 pm | आत्मशून्य

झिंगून डुक्कर

+
श्यी.