पौरुषी...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
8 Mar 2014 - 3:27 pm

मुक्त मोहिनी श्यामल नयनी
सुंदर साधी पवित्र तू ही
तुझ्या उदरीचे पवित्र फल मी
बीजानेही तुझाच मी ही

कधि भासिशी सुंदर शीला
कधि मोहिनी तू मधुशाला
तुझ्याच साठी आसुसलेला
मी ही येथे रिताच प्याला

धाक तुझाही हवा वाटतो
पत्नी म्हणूनी माता म्हणूनी
प्रेम तुझेही हवे वाटते
कधि सखी तू कधी कामिनी

धर्माचेही तुटले बंधन
संस्कृतिचेही सुटले कोंदण
अंगण झाले कधि नभी ते
नभही झाले कधी..च अंगण

आता आहे पुढेच सारे
जिंकायाचे...चाखायाचे
स्वातंत्र्याचे मिळता सोने
जपून ते हि राखायाचे.

सांगायाचे इतुके सांगून
मी ही येथे जरा थांबतो
मज बुद्धिने दिली-पौरुषी
कशी वाटते तुला पहातो.
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
:) सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. :)
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
https://lh5.googleusercontent.com/-g5qPtOTt8WY/UxrmX3TlnxI/AAAAAAAACqs/O8miJzym_Fw/w526-h312-no/kamal+rangoli.jpg

शांतरससंस्कृती

प्रतिक्रिया

जेपी's picture

8 Mar 2014 - 3:56 pm | जेपी

आवडल .

प्रचेतस's picture

8 Mar 2014 - 4:14 pm | प्रचेतस

सुरेख कविता.

धन्या's picture

8 Mar 2014 - 4:51 pm | धन्या

सुंदर कविता !!!

किसन शिंदे's picture

8 Mar 2014 - 8:28 pm | किसन शिंदे

असेच बोलतो.

पैसा's picture

8 Mar 2014 - 4:55 pm | पैसा

महिला दिनानिमित्त सगळ्या स्त्रीवर्गाला समर्पित कविता आवडली!

मृगनयनी's picture

8 Mar 2014 - 7:32 pm | मृगनयनी

खूप सुन्दर!!!

स्पंदना's picture

8 Mar 2014 - 4:55 pm | स्पंदना

व्वा आत्मुस!
मस्त!

आत्मशून्य's picture

8 Mar 2014 - 6:23 pm | आत्मशून्य

म्हणजे नक्की काय ?

म्हणजे "पुरुषापासून झालेली".

(असा एक आपला अंदाज)

--
अ.आ - कविता झ्याक आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2014 - 9:20 pm | अत्रुप्त आत्मा

@ पौरुषी... म्हणजे नक्की काय ? >>> "पुरुषापासून झालेली" >>> हा आदूबाळनी सांगितलेला केवळ शब्दार्थ झाला.. मला या कवितेपुरता किंबहुना कवितेसाठी अपेक्षित मतितार्थ म्हणजे... पुरुषाकडुन व्यक्त झालेली स्त्रीयांबद्दलची कविता! पुरुषाच्या विचाराने झालेली- ती पौरुषी. :)

आत्मशून्य's picture

8 Mar 2014 - 9:35 pm | आत्मशून्य

महिला दिनाच्या शुभेच्छा!(सर्वांना).

प्यारे१'s picture

8 Mar 2014 - 8:07 pm | प्यारे१

मस्त हो 'अतृप्त'. ;)

मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त! आवडली

इन्दुसुता's picture

9 Mar 2014 - 9:44 am | इन्दुसुता

सुंदर रांगोळी आणि तेव्ह्ढीच किंवा कांकणभर जास्तच सरस कविता.
दोन्ही आवडल्या.

लीलाधर's picture

9 Mar 2014 - 10:34 am | लीलाधर

आणि मनाला भिडली बुवा सुंदर ...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2014 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा

सर्व वाचक,प्रतिसादकांना धन्यवाद! :)

पक पक पक's picture

13 Apr 2014 - 11:25 pm | पक पक पक

झक्क्कास.. :) खुप मस्स्त

शैलेन्द्र's picture

10 Mar 2014 - 12:12 pm | शैलेन्द्र

मस्तं आत्मू , आवडली..

चाणक्य's picture

13 Apr 2014 - 1:59 pm | चाणक्य

गुरुजी...मस्त कविता. आवडली खूप

शुचि's picture

13 Apr 2014 - 8:43 pm | शुचि

:) Too good!!!!!! Sundar sundar sundar!!!

स्पंदना's picture

14 Apr 2014 - 3:19 am | स्पंदना

आज पुन्हा वाचली. आज पुन्हा आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2015 - 9:33 am | अत्रुप्त आत्मा

सांगायाचे इतुके सांगून
मी ही येथे जरा थांबतो
मज बुद्धिने दिली- पौरुषी
कशी वाटते तुला पहातो.
=================

सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. :)
==================
स्वयंलेखनोत्खनक:- ( :-D ) अतृप्त !