नविनच

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Jan 2014 - 12:39 pm

पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे
हे जरा नविनच होते
चिंब होऊनही मी धुंद न होणे
हे जरा नविनच होते
.
हा कुठला नवा खेळ?
.
दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो
'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो
ढग फुटून 'तो' असा काही बरसतो
त्या गंधाने मी आकंठ मोहरतो
.
नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो
सचैल भिजून भान हरपतो
कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात
हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते
मनात वसंत रुंजी घालाया लागतो
मग आजच असे का व्हावे?
.
हा वर्षाव कोरडा का वाटावा
कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा
.
.
हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती
तो तुझ्या घराला टाळून आला होता
हे जरा नविनच होते.... नविनच...

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(एक जुनी रचना)

शृंगारशांतरसकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच झकास रे मिका.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2014 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा

:)

michmadhura's picture

7 Jan 2014 - 1:10 pm | michmadhura

छान कविता.

चाणक्य's picture

7 Jan 2014 - 1:16 pm | चाणक्य

नेहमीप्रमाणेच छान रचना

अमेय६३७७'s picture

7 Jan 2014 - 1:20 pm | अमेय६३७७

छानच

प्यारे१'s picture

7 Jan 2014 - 1:43 pm | प्यारे१

मस्तच!

नाखु's picture

7 Jan 2014 - 2:22 pm | नाखु

प्रतीसाद ६ च हे नविनच...
कवीता मात्र "दिल खुश" आहे

मिका.. रचना जुनी आहे हे कळतंय.. !!

ठीकठाक.

इन्दुसुता's picture

8 Jan 2014 - 7:44 am | इन्दुसुता

छान आहे रचना... आवडली.

चित्रगुप्त's picture

8 Jan 2014 - 8:08 am | चित्रगुप्त

हे एक आणखी उदाहरणार्थ नविनच वगैरे. आवडले.

संजय क्षीरसागर's picture

8 Jan 2014 - 10:40 am | संजय क्षीरसागर

काही गोष्टी जुन्या होतच नाहीत. स्मृतीतून जगाकडे पाहायची सवय सोडली तर सगळं नवं असतं. तसा हा पाऊस.

जगजीतची एक गज़ल आहे :

दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है,
मिल जाए तो मिट्टी है, ...खो जाए तो सोना

तुझ्या कवितेच्या आशयाशी संगती सांगणार्‍या, गज़लेतल्या या ओळी आठवल्या:

बरसातका बादल तो दिवाना है क्या जाने
किस छत को भिगोना है,... किस राहसे बचना है
दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है।

चाणक्य's picture

8 Jan 2014 - 11:18 am | चाणक्य

प्रतिसाद आवडला

तिमा's picture

8 Jan 2014 - 11:39 am | तिमा

कवितेचा आशय आवडला. पण नेहमीचे 'फिनिशिंग' वाटले नाही. थोडीशी विस्कळीत वाटली.

आतिवास's picture

8 Jan 2014 - 11:59 am | आतिवास

हेच लिहायला आले होते.

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 4:59 pm | बॅटमॅन

यग्जाक्टली!!

सस्नेह's picture

9 Jan 2014 - 1:31 pm | सस्नेह

a

कवितानागेश's picture

9 Jan 2014 - 4:08 pm | कवितानागेश

:)

पैसा's picture

15 Jan 2014 - 10:54 am | पैसा

कविता आवडली.

फिझा's picture

21 Jan 2014 - 4:05 am | फिझा

मस्त !!