तपकिरी डोळे
"काय रे? काय करतोस ईथे?" एका रांगड्या आवाजाने विचारले.
मी हबकलो, घाबरलो. काहीतरी बोलायचं म्हणून, "म्म..म..मी.."
"अरे तू इथे कसा? काही शोधतोयस का? बाबा हा माझ्याच वर्गातला आहे."
रांगडा आवाज "हूं " म्हणून नाहीसा झाला.
हलके कुरळे केस सावरीत तिने पुन्हा विचारले, "काही शोधत होतास का?"
माझ्या तोंडून चटकन निघालं "तूलाच" ती थोडी आश्चर्याने "काय?" "अं.. तूलाच सपना तायडेने ईंग्लीशच्या नोट्स दिल्यात ना! त्या हव्या होत्या" मी कसा बसा हे सगळं बोललो असेन.
ती "हो दिल्यात. हव्या आहेत का?"
मि "हो."
ती "ये ना. ईथेच घर आहे."