मोरूचा मिपासंन्यास...!

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
19 Mar 2015 - 9:03 am

गुढीपाडवा आला. सकाळ झाली .

पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे ''

लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही .

पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …''

'' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.

समोर पत्नी शुभा आणि तिच्या हातात चहा पाहून त्याच्या डोक्यात लख्ख उजेड पडला.

मागच्या आठवड्यात शुभाबरोबर त्याचं एक डील झालं होतं. मोरूनं गुढीपाडव्याला मिसळपाव वरून संन्यास घ्यायचा अन चिकूच्या अभ्यासाकडं लक्ष्य द्यायचं.त्या बदल्यात ती अगदी चहा, ब्रेकफास्ट वगैरे तयार करून त्याला आयते देणार होती. त्यानं घरातलं बाकी कसलंच काम दळण, किराणा, भाजी आणणे वगैरे करण्याची गरज नव्हती. फक्त लेकाचा अभ्यास घ्यायचा ! ती महत्वाकांक्षी असली तरीही स्वतः तिसरीचा अभ्यास नीट घेऊ शकणार नाही असं तिचं ठाम मत होतं. तिची सर्वच मतं ठाम असत . शिवाय तिच्या सगळ्या हिंदी-मराठी मालिका आता महत्वाच्या टप्प्यावर होत्या. त्या पहाण्यामुळे संध्याकाळी सात ते साडेदहा तिला वेळ मिळणार नव्हता. मग त्यानंतर चिकूची झोपेची वेळ! .

शुभा आणि मोरूचा मुलगा चिकू आता तिसरीत होता. तिसरी म्हणजे चौथीचा पायाच!त्याला चौथीची स्कॉलरशिप मिळणे हे शुभाचं पुढचं स्वप्न होतं. त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही तर शुभाची सोसायटीत किंमत रहाणार नाही. शाळेत असताना मोरूला अन तिलाही स्कॉलरशिप मिळाली होती, म्हणजे आमच्या मुलालाही मिळेलच असे ती महिला मंडळात मोठ्या आत्मविश्वासाने सांगत असते.

मोरू मात्र तिला म्हणाला - ''आता पूर्वीसारखं स्कॉलरशिपचं महत्व राहिलं नाहीय. स्कॉलरशिप आणि मार्क्स मिळवण्यापेक्षा पेक्षा इतर बाबी - म्हणजे कुठलीतरी कला, खेळ -आत्मविश्वास वाढवणे, वक्तृत्व, अवांतर वाचन वगैरे गोष्टी महत्वाच्या. अजून तो फक्त नऊच तर वर्षांचा आहे ''

''असं कसं - असं कसं ?'' म्हणून तिने त्याला खोडून काढले. ''तुझी जबाबदारी टाळू नकोस. मुलाचं ध्येय आत्ता बालवयातच निश्चित करावं लागतं . चौथी अन सातवीची स्कॉलरशिप, दहावीला शाळेत पहिल्या तीनात नंबर , बारावी नंतर सी ई टी - त्याला कशी यशाची नुसती धुंदी चढायला हवी. त्याशिवाय का तो आय आय टी ला जाईल?''

''आय आयायाय …. किती पुढचा विचार करशील? आज, आत्ताचा विचार कर बये- वर्तमानात ये !'' मोरू ओरडलाच.

''हापिसातल्या ट्रेनिंगमध्ये सांगतात तसं मला नको शिकवू- म्हणे वर्तमानात जगा !'' मुलाच्या भविष्याचा पण विचार करा'' हे त्यांनी सांगायला हवं. आणि आज तो नऊ वर्षाचा असला तरी अजून नऊच वर्षांनी बारावी होईल - मग करणार का अभ्यास? ते काही नाही - मिसळपाववर जाऊन जे एकटंच खिदळत बसतोस ते कमी कर, आणि आता चिकुकडे बघ.''

चर्चा कुठे सरकतेय याचं भान मोरूला फार लवकर येई. त्यानं पांढरं निशाण फडकावलं !

म्हणाला , ''ठीकाय. मग मी पण आता संन्यास घेतो !'' - शुभानं चमकून त्याच्याकडे पाहिलं.

'' आय मीन मिपासंन्यास !''

'' क्यांय ? हे काय नवीन फ्याड?''

'' अगं - मिपावर सध्या खूप चालू आहे . कित्येकांनी सांगून अन त्याहून जास्त जणांनी न सांगता संन्यास घेतलाय.''

'' म्हणजे काय केलंय?''

'' म्हणजे असं बघ, अगदी एक आठवड्यापासून ते तीन-तीन वर्षे संन्यास घेतलेत कुणी कुणी! आता एव्हढी मोठी मोठी लोकं घेतायत म्हणजे संन्यासाचा फायदा असणारच नाही का?''

''पण मिपाचा संन्यास घ्यायचा म्हणजे नक्की करायचं काय?''

''अगं, काही दिवस मिपावर फिरकायचं नाही. किंवा फारतर नुसतं वाचायचं. पण लेखन, गप्पा- टाईमपास नाही करायचा. जसं जमेल तसं आणि तितकाच संन्यास . थोडक्यात काय-मोह टाळायचा ! पण मिपा संन्यासाच्या काळात माणसाचा बराच वेळ वाचतो म्हणतात!'' मोरु.

''अरे वा ! हे तर उपवासासारखं आहे- जमेल तसं. कुणी निर्जळी करतात तर कुणी धान्यफराळ, कुणी संध्याकाळी उपास सोडतात- तर कुणी अजून काय. अकौंटला पुण्य जमा झालं म्हणजे बास. मस्त आहे रे - चल घेच तू सन्यास ''

शुभालाही मिपा संन्यासाची कल्पना फार आवडली. नवरा आयताच हाताशी येणार म्हणून तिने ही कल्पना एकदम उचलून धरली.

खरं तर मोरूला मिपासंन्यास वगरे मुळीच नको होता. मिपावर हजर राहून चोवीस तास आनंदात वेळ जात होता. भरपूर हसायला मिळे अन सख्खे मित्रही मिळाले होते. मिसळपाव म्हणजे संसारात राहूनही विद्यार्थी जीवनाचा आनंद घेण्याचे साधन झाले होते. खऱ्या संन्याशाला काय मिळेल इतके आत्मिक समाधान मिपावर येउन मिळत होते. पण शुभाने त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक काय केलं आणि एका बेसावध क्षणी बायकोला खूष करण्याच्या प्रयत्नात मोरू तिला 'हो' म्हणून बसला. शब्द मागे घेतलेला शुभाला मुळीच चालत नसे. तिला न चालणाऱ्या गोष्टी करणे मोरूला शक्यच नसे.

****

तर असा पाडव्याच्या मुहूर्ताला मोरूचा मिपा सन्यास सुरु झाला. बघता बघता दोन आठवडे निघून गेले. चिकुचा अभ्यास हळूहळू सुरु झाला. बायको खूष असल्याने सगळा आनंदीआनंद होता. पण ….

'तो' सोमवार आला.

आज मोरूला कुणीच उठवलं नाही. उन्हं वर आल्याने आपोआप जाग आली. चहा नाही अन ब्रेकफास्ट नाही. किचनमधे काहीच हलचाल दिसेना. मोरूची धडधड वाढली. हे वातावरण शुभाचा पारा चढल्याचं होतं. .

भिंतीवरच्या घड्याळात बघून तो उडालाच! सव्वादहा !

दोन लांब ढांगा टाकून तो थेट बाथरूममधे पोहोचला. बाहेर येउन पाहातो तर जेवणाचा डबा भरून ठेवून ती हापिसात निघून गेलेली.

''आता सगळा घोटाळा होणार राव.'' मोरू स्वतःशीच बोलला.

ऑफिसला उशीर- वैतागलेला ऑनसाइटचा लीड- संध्याकाळचा कॉल- ट्राफीक - घरी यायला उशीर असं सगळं डोळ्यासमोर तरळून गेलं. म्हणजे चिकूचा अभ्यास आज घेता येणार नाही हेही मोरू समजून चुकला.

इंडियन इन्सटिट्युट ऑफ टेकनॉलॉजी ऐवजी कमी मार्क्स मिळाल्याने चिकू घरामागेच असलेल्या बापूसाहेब मुंगळे इन्सटिट्युट ऑफ टेकनॉलॉजी मध्ये जाऊ लागल्याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो हादरलाच. डोकं झटकलं- स्वतःशीच 'नाही-नाही' म्हणाला, आणि डबा उचलून हापिसला पळाला.

अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी घरी यायला मोरूला उशीर झाला. शुभा मालिकांमध्ये व्यस्त असल्याने तिला डिस्टर्ब न करता कीचनमध्ये घुसला . टेबलावर दिसले ते त्याने गपचूप खाऊन घेतले. पिल्लू कधीच झोपी गेलेलं.

टीव्ही बंद होताच शुभा बोलायला आली.

त्याआधीच मोरूनं विचारलं , '' आज सकाळी उठवलं का नाहीस गं ?''

'' कां म्हणजे? तू मला फसवायचा प्रयत्न केलास- म्हणजे काय फसवलंसच '' वैतागून ती म्हणाली.

'' काय झालं ते तरी सांग?'' मोरूला टोटल लागेना.

'' तू मिपा संन्यास घेतो म्हणालास अन घेतला नाहीस !''

'' अगं असं काय करतेस? पाडव्याच्या दोन दिवस आधी, तुझ्यासमोरच नै का खरडफळ्यावर जाहीर करून मी मिपा संन्यास घेतला? गेले दोन आठवडे मी मस्तपैकी चिकुचा अभ्यास घेतोय- मिपावर लॉगीन तर झालो नाहीच पण वाचनमात्र देखील नाही !''

'' आहाहा - म्हणे वाचनमात्र पण नव्हतो ! मला ठाऊक आहे ना - मस्त

पैकी खरडी लिहीत होतास आणि चांगला काथ्यां पण कुटलास आठवडाभर …. ''

तिच्या तोंडी मिपाकराची भाषा ऐकून मोरूला त्या अवस्थेतही अंमळ मौज वाटली .

'' हे हे - वेडीच आहेस. मिपावर गेलोच नै तर काथ्या कसा आणि कुठे कुटेन? खलबत्त्यात ?'' मोरूनं विनोदाचा क्षीण प्रयत्न केला .

'' तू नसशील गेलास रे, पण तो बोकड - तुझा डू आयडी तिथेच तर बसला होता नं आठवडाभर !'' या यॉर्करने तर मिडल स्टंप उखडली होती.

तरी उसने अवसान आणून तो म्हणाला,

'' मी- आणि डू आयडीने - आणि लिहित होतो?''

'' हो- हो तू आणि डू आयडीने - आणि लिहीत होतास !''

'' कशावरून?'' मोरूनं आवंढा गिळला.

'' आठव ते सगळे शतकी धागे … डाॅक्टरांचा म्हणू नकोस पुणेकरांचा धागा म्हणू नकोस ,की आरक्षण म्हणू नकोस. नुसता प्रतिभेला फुलोरा आला होता तुझ्या!''

'' पण तुला कसं काय माहीत ?'' आश्चर्याने मोरूची बोबडीच वळायची बाकी होती.

'' अरे वेड्या, तू हा सगळा वाद माझ्याशीच तर घालत होतास. गेल्या आठवड्यात मी पण मिपावर आलेय. तुझ्याच भाषेत सांगायचं तर मी ठरवून तुझ्या सगळ्या लेखांवरील प्रत्येक प्रतिसादागणिक तुला नडत होते अन तू वाद अजून वाढवत होतास. मग माझी खात्रीच पटली. हा तुझाच डू आयडी ! तू तुझ्या अन मी माझ्या हापिसातून आठवडाभर काकू-काकू खेळलो!

एकेका धाग्यावर पन्नास साठ प्रतिसाद तर आपलेच दोघांचे आहेत. शिवाय तुझ्या कंपूतल्या लोकांच्या खरडी पण बघितल्यात. कन्फर्म करूनच बोलतेय - उगीच नाही !

शेवटी जालावर असो की प्रत्यक्ष जीवनात असो- एखाद्याचा मूळ स्वभाव बदलत नसतो. तीच आर्ग्युमेंटस करायची पद्धत, तोच आक्रस्ताळेपणा. आणि सर्वकाळ माझंच खरं - वा रे वा !'' आता शुभाचा राग आवरत नव्हता.

मोरूला हे कळत नव्हतं की शुभा मिपावर आलीच कशी काय- आणि विविध धाग्यांवर तिचा प्रतिवाद केल्यानं ती चिडली की तिला गंडवल्यामुळे ? की दोन्हीमुळे ?

आता मात्र मोरूची बोलती बंद झाली होती. तरीही धीर धरून त्यानं विचारलं ,

'' पण हे-हे कसं शक्य आहे?''

'' तेही सांगते -''

'' मागे तू कट्ट्याला गेला होतास?''

'' हो!''

'' तिथला वृत्तांत तू मीठमसाला लावून मला सांगितला होतास.''

'' बरोबर, आठवतंय !''

'' तिथे कट्ट्याला डू-आयडीवर चर्चा झाली होती म्हणालास - तेव्हा तू मला डू आयडी म्हणजे काय हेही समजावून सांगितलं होतंस. एव्हढच नाही- तर तुझा 'बोकड' हा डू आयडी आहे हे पण ह्या-ह्या करत मला सांगितलं होतंस. हे सगळं तू विसरलास तरी मी विसरले नव्हते रे '.

''जेव्हां तू मिपासंन्यास घ्यायला तयार झालास तेव्हां आधी मला आश्चर्य वाटलं. तू काही मिपा शिवाय राहू शकत नाहीस हे पक्कं ठाऊक होतं. संन्यासानंतर दोन दिवसांनीही तू तेव्हढाच फ्रेश आणि मजेत दिसत होतास तेव्हांच मला संशय आला - तू नक्कीच मिपावर वावरत असणार!

मग मला आयडीया सुचली - म्हणलं आपणही जावं मिपावर. क्युं नही?

म्हटलं बोकडाच्या मागे लागायचं तर खाटिक हेच नाव बरं! पण तिथेही मेला एक खाटिक आधीच होता बहुतेक. मग मागच्या बुधवारी मला पण एक आयडी मिळाला 'खाटिक१२१' म्हणून - आणि मी बोकडाच्या म्हणजे तुझ्या आयडीमागे हात धुवून लागले. आणि तुला पकडलंच. आता पुढची नऊ वर्षे हे सगळे प्रकार अगदी बंद! ''

''सॉरी शुभा! माझी चूक तर मला मान्यच आहे. आता असं पुन्हा नाही करणार! पण मला वाचनमात्र तरी राहुदे गं ! मिपाशिवाय मी नाही राहू शकत!'' मोरू वदला .

''म्हणजे? अजून एक तिसरा पण आयडी आहे वाटतं तुझा? ते काहीही चालणार नाही. आता मिपा संन्यास वगैरे सांगून किंवा इतर काहीच सांगून तू मला फसवू शकणार नाहीस. मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट. एकदा का चिकूची बारावी झाली- त्याला अेडमिशन मिळाली ना, की मग खुश्शाल अजून चार संस्थळांवर फीर. पण तोपर्यंत नाही मंजे ना--ही !'' ठामपणे शुभा म्हणाली.

'' हो, आणि आता तुझ्यावर लक्ष ठेवायला मीच मराठीतल्या जवळपास सहा संस्थळांवर वावरणार आहे. आता माझं मालिका वगैरे बघणं बंद! काय करणार बिचारी ! ''

मधमाश्याचं मोहोळ उठावं तसे विचार मोरूच्या डोक्यात घोंगावू लागले.
विविध आयडी डोक्याभोवती फिरतायत अन शतकी धागे अंगाला गुंडाळले जातायत असं त्याला वाटू लागलं. काय होतंय आणि काय होणार हेच त्याला कळेनासं झालं. घट्ट डोकं धरून मोरू सोफ्यावर बसून राहिला . कितीतरी वेळ . ..

शुभाने मोरूला सुतासारखा सरळ करण्याची ही फक्त सुरुवात होती!

हल्ली मोरू कुठल्याच संस्थळावर दिसत नाही !

***

(डिस्क्लेमर : सदर कथेचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा अथवा 'घघमाचु' म्हणून सोडून द्यावे ! खऱ्या आयुष्यात हे प्रयोग आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर करायला सदर लेखकाची हरकत असणार नाही! )

संस्कृतीनाट्यकथामौजमजाप्रकटनविचारआस्वादमाध्यमवेध

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2015 - 9:14 am | श्रीरंग_जोशी

सुरुवातीला मिपासंन्यास हा विषय घेऊन एक फर्मास अन समयोचित रुपककथा आहे असे वाटले.

पण त्यातच सर्वकालिन डू आयडीच्या विषयावर यशस्वीपणे भाष्य केलंय. आज वि. स. खांडेकर हयात असते तर खेडूत हा त्यांचाच डू आयडी आहे असा दावा केला असता.

मूकवाचक's picture

19 Mar 2015 - 10:57 am | मूकवाचक

+१

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Mar 2015 - 9:23 am | लॉरी टांगटूंगकर

==))

कंजूस's picture

19 Mar 2015 - 9:42 am | कंजूस

चिकूपण धिंगाणा घालणार.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Mar 2015 - 9:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

क ह र लिहिलयं.........बाकी एका मित्रपत्नीस मिपाचं सदस्यत्व मिळालय असं ऐकुन आहे....!!!!!!!!!!!!!!!!!!!

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

नुकत्याचं गुढीपाडव्याच्या निमित्ताने संन्यासाला गेलेल्या एका सत्कारी मित्राची, तसचं गेले २१ दिवस मौन पाळुन नुस्तं वाचनमात्र असणार्‍या एका टवाळ मित्राची, मिपारुपी संसारातुन मुक्त होउन जगभर विहार करणार्‍या एका मित्राची अश्या आठवणींनी ड्वॉळे डबडबले.....अश्रुंची कारंजी उडाली....!!!

huh!!

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2015 - 12:01 am | टवाळ कार्टा

आलो आलो आलो =))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2015 - 12:43 am | अत्रुप्त आत्मा

@अश्रुंची कारंजी उडाली....!!!>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

पैसा's picture

19 Mar 2015 - 9:51 am | पैसा

*LOL*
*LOL*
*LOL*
*LOL*
*LOL*

अजया's picture

19 Mar 2015 - 10:37 am | अजया

मस्त लिहिलंय =))
गेले दोन तीन दिवस कोणी संन्यासच घेत नव्हतं.फार वाईट वाटत होतं.पण पाडव्याच्या निमित्ताने एक संन्यास झाला.बरं वाटलं.संंन्यस्त खङग सारखा संन्यस्त डु आयडीची अायड्या बरी आहे ^_~

चित्रगुप्त's picture

19 Mar 2015 - 10:48 am | चित्रगुप्त

वाहवा, अगदी धमाल.
बाकी भार्या मंडळी नवरोबाने मिपाविन्मुख व्हावे, म्हणून काही न काही उपाय शोधून काढण्यात पटाईत असतात. आमची भार्या 'आता उर्वरित आयुष्यात डोळे चांगले/शाबूत रहायला हवे' म्हणून मिपासंन्यास घ्यावा, असे सुचवत असते. "पतिमिपासन्यासाकांक्षिणी"

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2015 - 11:16 am | अत्रुप्त आत्मा

@"पतिमिपासन्यासाकांक्षिणी" >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif जब्बरदस्स्स्स्स्स्स्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif
======================================================

@ बापूसाहेब मुंगळे इन्सटिट्युट ऑफ टेकनॉलॉजी>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

@ती महत्वाकांक्षी असली तरीही स्वतः तिसरीचा अभ्यास नीट घेऊ शकणार नाही असं तिचं ठाम मत होतं. तिची सर्वच मतं ठाम असत . शिवाय तिच्या सगळ्या हिंदी-मराठी मालिका आता महत्वाच्या टप्प्यावर होत्या. त्या पहाण्यामुळे संध्याकाळी सात ते साडेदहा तिला वेळ मिळणार नव्हता.>>http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif
@चर्चा कुठे सरकतेय याचं भान मोरूला फार लवकर येई.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif
@म्हणजे असं बघ, अगदी एक आठवड्यापासून ते तीन-तीन वर्षे संन्यास घेतलेत कुणी कुणी! आता एव्हढी मोठी मोठी लोकं घेतायत म्हणजे संन्यासाचा फायदा असणारच नाही का?'' http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif
@शब्द मागे घेतलेला शुभाला मुळीच चालत नसे. तिला न चालणाऱ्या गोष्टी करणे मोरूला शक्यच नसे. >> :D
@तिच्या तोंडी मिपाकराची भाषा ऐकून मोरूला त्या अवस्थेतही अंमळ मौज वाटली . >> :D
@म्हटलं बोकडाच्या मागे लागायचं तर खाटिक हेच नाव बरं! >>> =)))))

मृत्युन्जय's picture

19 Mar 2015 - 11:29 am | मृत्युन्जय

ख तर नाक लिहिले आहे. झक्कास.

कवितानागेश's picture

19 Mar 2015 - 11:55 am | कवितानागेश

मस्त!

काय लिहिलंय, काय लिहिलंय! या बात!

बंडू आणि स्नेहलताची आठवण झाली. जबरदस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2015 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2015 - 12:33 pm | स्वाती दिनेश

धमाल लेख!
स्वाती

मोरूचा हा संन्यास खराच आहे ? की
आचार्यं बाबा बर्वेंच्या मौनव्रता सारखा (संदर्भ : बटाट्याची चाळ - पु. ल.) नैष्ठीक ?

सिद्धार्थ ४'s picture

19 Mar 2015 - 3:16 pm | सिद्धार्थ ४

मस्त !!!! :)

हाडक्या's picture

19 Mar 2015 - 4:31 pm | हाडक्या

दणडणीत्त लेख आहे हो.. सद्यस्थितीवर परखड भाष्य करतो.
आमची बायको मिपावर नव्हती, नवीन लग्न झालेले असल्याने आम्हाला अणुभव पण कमीच.. भावनेच्या भरात तिला मिपावर आणले. अनाहितात प्रवेश करु दिला. आता फळे अक्षरशः भोगतोय.. *SORRY*

माझे डु-आयडीदेखील यातून सुटले नाही हो (त्या सगळ्यांची संन्यास घेतलाय आता तसा). अल्पावधीत ती माझ्यापेक्षा जास्त कट्टर मिपाकर झालीय आणि माझी भलतीच गोची झालीय.

(पुरुष विभाग काढा राव, अजाबात अश्लील लिव्हनार नाय, आय-बाबा न सायबाबांची शप्पत.. )

हाडक्या's picture

19 Mar 2015 - 4:45 pm | हाडक्या

भावनेच्या भरात तिला मिपावर आणले. अनाहितात प्रवेश करु दिला.

म्हणजे तिला मिपाशी ओळख करून दिली, आयडी बनवण्यास प्रवृत्त केले, मदत केली. त्या अर्थाने ही वाक्ये आहेत.
(एकदा मिपाचे व्यसन लागल्यावर माझे थोडीच काही चालणार होते तसेही.) ;)

(बायकोने आणि तिच्या अनाहितांनी वाचले तर) गैरसमज नकोत हो.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2015 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))

पैसा's picture

19 Mar 2015 - 5:40 pm | पैसा

हा प्रतिसाद तरी तिच्या परवानगीने लिहिलात का?

हाडक्या's picture

19 Mar 2015 - 9:20 pm | हाडक्या

अर्थातच.. :)
(पण तीच तर गोची आहे ना हो. ;) )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Mar 2015 - 9:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हा प्रतिसाद हाडुकरावांनी प्रचंड मानसिक दबावाखाली लिहिल्याचं स्पष्ट जाणवत आहे. नेहेमीच्या धाटणीतला प्रतिसाद नाही. =))

हाडक्या's picture

20 Mar 2015 - 3:49 pm | हाडक्या

गप्राव, वशाड मेलो.. !! :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Mar 2015 - 4:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

ब़जरबट्टू's picture

19 Mar 2015 - 4:58 pm | ब़जरबट्टू

जबरदस्त...काय लिव्हलय.. काय लिव्हलय.. आवडला आहे..

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2015 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर, खुसखुशीत, खुमासदार, चुरचुरीत, चाबूक आणि काय काय असे झाले आहे लेखन. अगदी 'तहे दिलसे' उचंबळून आलेला अनुभवसंपन्न लेख. आवडला.

पुणेकर भामटा's picture

19 Mar 2015 - 6:26 pm | पुणेकर भामटा

बायको बघतेय म्हणून छोटासाच प्रतिसाद देतोय … ;)
लेख फार आवडला बरका !!!

तिमा's picture

19 Mar 2015 - 7:14 pm | तिमा

भन्नाट कल्पना! आता माईसाहेब आणि नानासाहेब यांच्यावरही एक जबरी लेख येऊन द्या.

रामपुरी's picture

19 Mar 2015 - 7:57 pm | रामपुरी

एक डु आयडी घेऊन ठेवावा म्हणतो आता. वेळ काय सांगून येते नाही

हाडक्या's picture

19 Mar 2015 - 9:23 pm | हाडक्या

अगदी अगदी.. मी तर म्हणेन भात्यात दोन-चार असूच द्यावेत.

रेवती's picture

19 Mar 2015 - 8:30 pm | रेवती

लेख मजेदार आहे. आवडला.
@हाडक्या, तुमच्या सौंचा मिपा आयडी काय आहे? कुतुहल म्हणून प्रश्न विचारतीये.

हाडक्या's picture

19 Mar 2015 - 9:22 pm | हाडक्या

चुक्कून पण सांगणार नै.. ;)
(तिला विचारून प्रतिसाद टाकलाय त्यामुळे तुम्ही तशी धमकी पण देऊ शकणार नै हो.. )

तुम्ही कोणाचा डुआयडी आहात? =))))

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2015 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

और ये लगा दनदनाता हुवा सिक्सर! =)))))

हाडक्या's picture

20 Mar 2015 - 4:29 am | हाडक्या

बस क्या सूडभौ.. तसे आम्ही आमचाच डुआयडी आहोत असे म्हणू शकतो कारण इथे आई-बाबांनी आपल्याला न विचारता दिलेला आयडी वापरत नाही आहोत.

@रेवती तै, बायकोची इच्छा नाहीये म्हणून इथे लिहित नाहीये. (ते तिकडे तिला सांगाल अशी धमकी वगैरे असंच गमतीत लिहिले होतं.) पण कधी कट्ट्याला भेटलो तर कळेलच की तुम्हाला पण आणि इतरांना पण.. ;)

काही हरकत नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं असं काही नाही पण मी धमकी का देईन? कोणाला दिलेली बघितलीयेत का?

हल्लीच मिपासंन्यास घेतलेली मंडळी आठवली.

सती जाणारी गावभर बोंबलून "चालल्ये हो" म्हणून सांगत नाही. त्याच न्यायाने, हे संन्यास घेणारे गुपचुप घेऊन मोकळे होतात. सांगणार्‍यांच्यात काय राम नाही. ;)

हाडक्या's picture

20 Mar 2015 - 4:31 am | हाडक्या

अगदी अगदी..

पॉइंट ब्लँक's picture

20 Mar 2015 - 9:37 am | पॉइंट ब्लँक

लई भारी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2015 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास, खुसखुशीत.आवडलं लेखन. मजा आली.
लेखन शैली सुरेख.... :)

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

20 Mar 2015 - 10:44 am | सस्नेह

रच्याकने, मोरू हा एका दोन अक्षरी आयडीचे प्रतिनिधित्व करतो का ? +D

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Mar 2015 - 12:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

हि सत्यकथा नसावी असे गृहीत धरुन खालील प्रतिसाद देत आहे.

काय लिहीलय काय लिहिलय....टांगा पल्टी घोडे फरार

सत्यकथा असली तर कथानायकाबद्दल दाबुन सहानूभूती वाटत आहे.

पैजारबुवा,

सोत्रि's picture

21 Mar 2015 - 10:17 am | सोत्रि

झक्कास!

- (संन्यस्त) सोकाजी

खेडूत's picture

21 Mar 2015 - 8:25 pm | खेडूत

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार !

:)

धम्म्म्म्मम्म्माल लिहीलय. =)) .भविष्यकाळातील धोक्याची जाणीव करुन देणार...प्रतिसाद हि भारी..काही लोकांच फ्रस्टेशन जाणवल... *beee*
इसीबातपे ...
माई मोड ऑनः- अरे,खेडुता सुरेख लिहीलास रे...आमच्या ह्यांना मिपाकरांनी सक्तीचा सन्यास घ्यायला भाग पाडल..
...'हे' ढस्स्स्स्स्स्स्सा रडले मला तर बाई कस्स्स्स्स्स झाल...आता या वयात हे कुठे जाणार..शिरीष पण परदेशात गेला..
तो ह्यांच्या सन्यांसाचा दिवस आठवला आणी डॉळे पाणावले बघ माझे... :- माई मोड ऑफ =))

पैसा's picture

22 Mar 2015 - 2:39 pm | पैसा

कम्पल्सरी रिटायरमेंट म्हणतात त्याला.

आदूबाळ's picture

22 Mar 2015 - 3:20 pm | आदूबाळ

( शिरीष मोड )

अहो काय संपादक! चांगलं म्हातारं मिपामध्ये अडकलं होतं तर तुम्ही ब्यान केलं. आता स्काईप करू करू चळतंय (आपलं ... छळतंय). लवकरात लवकर त्याला घ्या परत...

( / शिरीष मोड )

आतिवास's picture

22 Mar 2015 - 2:58 pm | आतिवास

:-)

मधुरा देशपांडे's picture

22 Mar 2015 - 4:13 pm | मधुरा देशपांडे

भन्नाट लिहिलंय. :)))

मुक्त विहारि's picture

23 Mar 2015 - 6:58 pm | मुक्त विहारि

आवडला....