न झालेला पुरुषांचा कट्टा- औरंगाबाद.
खुप दिवसांपासुन नुसत्या पुरुषांचा कट्टा करायचे ठरले होते. सर्वांनी जवळ जवळ पंचवीस डिसेंबरच्या कट्ट्याला होकार कळवला होता. पुरुष म्हणजे या भुतलावर अवतरलेला पहिला सजीव. काही अदिमानव पुण्याहुन, काही ठाणे, आणि काही मुंबैवरुन येणार होते. जगप्रसिद्ध बीबीका मकब-याला ठीक अकरा वाजता यायचं आमचं सर्वांचं ठरलं होतं. पुण्याहुन धन्या, सुड, वल्ली, प्रशांत, बॅटमन, आणि इस्पिक एक्का. ठाण्यातून मुवि, डॉ.सुबोध खरे, किसन शिंदे, आणि गवि, मुंबैतुन आणि दुबैवरुन थेट कुंदन येणार होता. सध्या मुंबैत आलो तर येतोच बोलला. जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते.