अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
6 Dec 2014 - 7:23 pm

नमस्कार मंडळी.
पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या. नंतर 'एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला, आणि त्याची पहिली पायरी म्हणून लगेचच ताज्या फळांचा रस प्राशन करते झालो.
मंडळींनी यावर आणखी लिहावे, असे सुचवतो....
काही फोटो:

.

.

.

.

वावरसंस्कृतीऔषधोपचारमौजमजाबातमीअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

पोटातनं बाहेर निघालेल्या कालसर्पानं की काय? असा प्रश्न पडलायं!

एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला

यसवायजी's picture

6 Dec 2014 - 8:46 pm | यसवायजी

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2014 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, फोटो लै स्टाईलने काढले आवडले.
-दिलीप बिरुटे

मस्त! एकदम फिल्मी स्टाईलने अ‍ॅक्शन फोटो काढले आहेत!

आता पात्रपरिचयाचे सब-टायटल्सही येऊ द्यात. (आणि पाताळेश्वराच्या माहितीचा वल्ली किंवा इतर कुणाचा लेख असेल तर तोही दुवा द्या, असा लेख नसला तर या धाग्यातच ती माहिती टाका.)

प्रचेतस's picture

6 Dec 2014 - 10:46 pm | प्रचेतस

पाताळेश्वर लेखाचा दुवा.

http://misalpav.com/node/20069

पाताळेश्वराच्या नंतरच्या फेऱ्यांमध्ये ह्या अपूर्ण शिल्पपटांमधले सप्तमातृकापट, गजासुरवध, गजांतलक्ष्मी, नटराज शिव असे प्रसंग ओळखता आलेत.

बहुगुणी's picture

7 Dec 2014 - 10:18 pm | बहुगुणी

आठवणीने दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! अन्यथा एक वाचनीय लेख राहून गेला असता.

श्रीरंग_जोशी's picture

6 Dec 2014 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी

अरे वाह, खासंच झालेला दिसतोय हा कट्टा. फटु तर एकदम ऐटबाज आहे.

बाकी 'अचानक जमुन आलेला' याबद्दल जरा कुतूहल आहे.

विलासराव's picture

6 Dec 2014 - 10:16 pm | विलासराव

फोटो नं २ मधे डाव्या बाजुने :
१) समीर (अंदाज)
२) चित्रगुप्त.
३) धनाजीराव
४) वल्लीश्री
५) प्रशांत
६) यसवायजी ( अंदाज)
७) चौकटराजा
८) सुड
९) ई. एक्का

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 11:00 pm | मुक्त विहारि

फोटो तर खासच

खटपट्या's picture

7 Dec 2014 - 12:01 am | खटपट्या

मस्त आलेत फोटो !!

चित्रगुप्त's picture

7 Dec 2014 - 8:36 am | चित्रगुप्त

'पोटातला कालसर्प' याविषयी कट्टेकरांपैकी कुणी लिहिणार आहेत का ?

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2014 - 2:44 pm | संजय क्षीरसागर

बाय द वे, काल हाच जर भास आहे तर हा सर्प आणि कुठून आला?

प्रचेतस's picture

7 Dec 2014 - 9:07 am | प्रचेतस

बरोबर १० वाजता पाताळेश्वर लेणीपुढ्यातल्या बागेत पोहोचलो. चौराकाका, चित्रगुप्त आणि त्यांचे एक स्नेही, एक्काश्री अगोदरच आले होते. बागेतच गप्पाष्टक मांडून बसलो. थोड्याच वेळात यसवायजी आणि प्रशांत आले. त्यापाठोपाठ नेहमीप्रमाणेच चुकत माकत ठिकाण शोधत सूड आणि सतीश गावडे ही जोडी अवतरली व नंतर समीर शेलार आल्यामुळे गप्पांना रंग भरला. चित्रगुप्तकाकांनी काळसर्पायोगाची कहाणी सांगून त्याचा समूळ नाश कसा करावा ह्याचा उपाय सांगितला जो हा कट्टा संपल्यानंतर लगेच अंमलातही आणल्या गेला.

नंतर सर्व मंडळी पाताळेश्वराच्या प्रांगणात उतरली. मी. एक्काश्री, सूड आणि यसवायजी असे फक्त चौघेच लेणीत गेलो बाकी मंडळी बाहेरच गजाली करत राहिली. लेणी दर्शन घेऊन बाहेर आल्यावर चित्रगुप्तांनी कलाकारी दृष्टीकोनातून फोटोसेशन केले व कट्टा सुफळ संपूर्ण करुन आम्ही निघालो.

नाखु's picture

7 Dec 2014 - 9:35 am | नाखु

चिल्लर बातमीवर (मोजून आठ ओळीत) बोळवल्याबद्दल अगोबांचा निशेढ.
गजाली बाबत(चौराकाका,सूड आणि सतीश गावडे ) यांनी स्वतंत्र वार्तांकन द्यावे.

चौकटराजा's picture

7 Dec 2014 - 3:48 pm | चौकटराजा

दोनेक महिन्यापूर्वी चित्रगुप्त यांचा व्यनि आला की मी १ डिसेंबर ला पुण्याला येतोय. श्रीमान चित्रगुप्त हे चित्रकार असल्याने
सातारा जिल्ह्यातील औध संस्थान मधील पंतप्रतिनिधी यांचे संग्रहालय पहाण्याच्या आयडियेची कल्पना मी काढली.त्यानुसार दोघा चौघानी ३०० किमी ची ही सहल काढण्याची कल्पना मान्य असल्याचे सांगितले पण प्रशांत यांचे प्यारिसगमन, बुवा यांचे यजमानगमन यामुळे बेत होणार की नाही या विषयी साशंक झालो. ( अरे यांच्या गाडीत गाडी परागची गाडी , तिच्या परिस वरचढ प्रशांतची गाडी मिळाली असती ना हे आले असते तर ! ) .या सहलीत पुण्यात असतील तर इस्पिक एक्का याना ही आवर्जून ( आणि अर्जवूनही ) न्यायचे ठरले होते. पण योग नव्हता. एरवी ओ पी ची गाणी , कुमार गंधर्वांच्या गायकीची उलीशीक नक्क्क्ल चित्रगुप्त याना ऐकविता आली असती. बुवा आले असते तर सहलीत वात्रटपणाला उत आला असता. असो.
.
वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) यसवायजी ( आईनस्टाईन), चित्रगुप्त साहेब,( रेम्ब्रां) चित्रगुप्त यांचे बालमैतर , इस्पिक एक्का ( युवान च्वांग) . वचने किं दरिद्रता या स्टाईलवर एकाच फोटोत.

मग जरा बेत बदलून वल्ली यांचेबरोबर चर्चा करून पुल देशपांडे उद्यान किंवा इतर कोणते तरी जवळचे ,सोयीचे स्थळ
यातून वल्ली यांचे दगडप्रेम दाटून आले व पाताळेश्वर नक्की झाले. हे शंकराचे मंदिर बर्यापकी मोठे आहे. आजूबाजूला वस्ती.एकाबाजूला जंगली महाराज यांचे देऊळ. पाताळेश्वर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने झाडी, हिरवळ
हे सारे तिथे होतेच. मंदिरासमोरचा चौकोनी परिसर एका पाषाणातून खोदलेला आहे. पत्तडकल, तंजाउर ई ठिकाणी भव्य नंदीमंडप आहेत पण ते प्लानमधे चौरस वा आयताकार आहेत. येथील मंडप मात्र वर्तुळाकार आहे.
.
चित्रगुप्त जी वजन कमी करण्याची थेअरी बहुदा शेलार मामा व सतीश गावडे शेट याना समजावताना
मी पावणेदहाच्या सुमारास माझ्या दुचाकीवरून पोहोचलो. तेवढ्यात कट्ट्याची खात्री करून घेणारा इस्पिक एक्का यांचा भ्रमणध्वनी आला. 'मी पोहोचले आहे. तुम्ही या' असे सांगून मी पाताळेश्वराच्या आवारात शिरलो. एका कोपर्‍यात दोन व्यक्ती पायरीवर गप्पा मारीत बसलेले दिसल्या. मला पाहताच त्यातील गोरटेले गृहस्थ स्टाईल मधे आपल्या चित्पावनी घार्‍या डोळ्यासह , चित्रकार स्पेशल कोरलेल्या दाढीसह पुढे झाले. ओळख आधीच पटलेली होती. हस्तांदोलन झाल्यावर हिरवळीवर मांडी घालून गप्पा करूयात असे ठरले.
.
सुड्राव , वल्ली दा व यसवायची यांचा हास्यविनोद
चित्रगुप्त यानी आपल्या बालमित्राची माझ्याशी ओळख करून दिली. मग प्रथमच मी फॉनेटेनब्लो हे पॅरिसजवळचे शाही ठिकाण पाहयला मिळाल्याबाद्द्ल चित्रगुप्त यांचा उघड उघड हेवा व्यक्त केला. तेवढ्यात वल्ली साहेब व इस्पिक एक्का साहेब येऊन मिळाले. मग जरा ग्रूप फटू झाले. परत खाली बसून गप्पा सुरू झाल्या एकेक करून शेलार मामा, सुड्राव, सतिश गावडे शेट, यसवाय जी, ( यानी सुयोग वे यसवायजे कसे झाले हे विस्कटून सांगितले.) लांबूनच गोरा फ्रेंच माणूस येताना दिसला. त्याचे मायबोलीतील नाव प्रशांत . मग फ्रेंच मधील उच्चार व त्यांचे लिखाण हे कसे अजब आहेत वगैरे खल झाला. एवढ्यात ( चुकून ) वल्ली यानी आपण एकेकाळी फार वजन कमी केले होते असा "गौप्यस्फोट" केला. झाले. चित्रगुप्त यांनी माझा फॉर्म्यला नंतर सांगतो पण तुम्ही त्यावेळी कसे काय बुवा वजन कमी केले अशी वल्ली यांच्याकडे पृच्छा केली.मग खाण्यावर कंट्रोल व भरपूर व्यायाम असे खरे उत्तर वल्ली यानी दिले. त्यावर आत पुन्हा का वजन वाढले म्हटल्यावर चौरा यानीच खादाड मित्र व विकांत हे त्याचे उत्तर आहे असे मधेच सांगितले.
.
वल्ली, गावडे सेठ, शेलार मामा, चित्रगुप्त ,इए पुण्याचिए नगरी वाले, व बदलापूरकर सुड राव सगळे " थिअरी" प्रॅक्टीस मधे आणताना' हसमुख राय की हसमुख चाय' मूड मधे .
पाताळेश्वर म्हणजे व्यापारी ( श्रमण) लोकांचे क्वार्टर्स प्लस देवस्थान अशी काहीशी माहिती वल्ली यानी दिली. शिलालेखावर आपलीच मर्दुमकी हा विषय कसा राहील याची काळजी राजे लोक कशी घेत असत याची ही उदाहरणे वल्ली यानी दिली. मग प्रशांत मेरू नावाच्या गावी फ्रान्समधे जाणार आहेत अशी बातमी आली. मग मेरू पर्वत, अग्नेय आशिया, तेथील दरवाजांच्या प्रोफाईल्स वगैरे विषय पकडून चर्चेत रंग भरला इस्पिक एक्का यानी. आता पाळी होती चित्रगुप्त यांच्या थेअरीची. आपले वजन कसे कमी केले. त्यात विविध फलारसांचे , पाल्याच्या रसाचे सेवन करून वजन कमी करता येतेच पण पोटात साठलेला मळ काही काळाने काळ्या सर्पासारखा बाहेर पडून मनातील नैराश्य देखील दूर होते असा अनुभवाअंती दावा त्यानी केला. माणसाने कलाकृतीची बुद्द्धीने परिभाषा न मांडता तिच्या तील कलात्मकतेचा आस्वाद घ्यावा मग मोनालिसा हिचे चित्र मूळ चित्र आहे की नाही याची चिकित्सा मागे पडते. असे चित्रगुप्त यानी वल्ली यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सव्वा अकराचे सुमारास पाताळेश्वराला मिपाकरांचे दर्शन व्हावे असा ठराव करून हिरवळीवरचा ठहराव आटपण्यात आला. सगळे खोदलेल्या चौकोनी अवकाशात घुसले.मधोमध गोलाकार नंदी मंडप, बाजूला चारी बाजूस कातळ खाली कातळ व हवेत काहीशी ठंडक .अशा वातावरणात ग्रूपने गप्पा. काहीनी मंदिरात प्रवेश करून देवाचे रीतसर दर्शन ही घेतले. मग शेवटच्या गाप्पांचा फड रंगला. काही सिनेमे, रंगेल पॅरिस अशी वात्रट पण प्रबोधक चर्चा ही रंगली. चित्रकार चित्रगुप्त याना
अचानक कंपोझिशन करण्याची कल्पना सुचली. काळ्या बेसाल्टच्या पार्श्वभूवर मानवी आकारांची रचना करण्याचा एक जलद प्रयत्न करण्यात आला. इस्पिक एक्का यानी सर्वानी शीर्षासन करून आता कंपोझिशन करा असा " वैद्यकीय" सल्ला देणारी मल्लीनाथी केली. एकूण फार मजा आली यावर सर्वांचे एकमत झाले. चित्रगुप्त यांच्या थिअरीस अनुसरून जवळच ज्यूस पिंंण्याचे ठरले. संत्रा मोसंबी यांच्या रसाची एक राउंड व फोडीसकट कलिंगड रसाची एक राउंड होऊन कट्टा समाप्तीची
घोषणा झाली. या रस प्राशन कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून चित्रगुप्त व इस्पिक एक्का यानी काम पाहिले या बद्द्ल मिपाकर कट्टा मंडळ त्याचे आभारी राहील.

प्रचेतस's picture

7 Dec 2014 - 4:13 pm | प्रचेतस

मस्त उपवृत्तांत.

बाकी पाताळेश्वर हे व्यापारी/ श्रमणांचे वसतीस्थान कम देवस्थान असे नाही म्हणालो ओ :(

पाताळेश्वर सारखे ब्राह्मणी लेणी व इतर बौद्धलेणी यातील फरक सांगत होतो. बौद्ध लेणी ही सुरुवातीला व्यापारी, भिख्खू यांचे वर्षावासासाठी निर्मिली गेली. कालांतराने बौद्धांना प्रार्थनेसाठी प्रतिकाची गरज भासू लागल्याने महायान मूर्तीकलेचा आरंभ झाला. याउप्पर पाताळेश्वरासारखी ब्राह्मणी लेणी ही श्रमणांसाठीचे निवासस्थान म्हणून न कोरवता निव्वळ राजकीय फायदा तसेच देवस्थान म्हणूनच निर्मिली गेली असा मतितार्थ होता.

पैसा's picture

7 Dec 2014 - 4:17 pm | पैसा

मी फटु पाह्यले नाहीत. मी वृत्तांत अजिबात वाचला नाही. माझी अजिबात जळजळ झाली नाही. महिला सदस्यांना कट्ट्यात सामील करून न घेतल्याबद्दल तीव्र णिशेध. इस्का बदला जरूर लिया जाएंगा. येच महिने में अनाहिता पुणे रहिवाशी कट्टे के साथ, इ हमरा वादा रहा.

(आता कसं बरं वाटलं. =)) )

[अतिअवांतरः चौरा आणि चित्रगुप्त यांचे वृत्तांत आणि फटु आवडले. बाकी लोक काय करत आहेत? आणि शेलारमामा फक्त कट्टा टु कट्टा तोंड दाखवता काय? कधीतरी लॉग इन करून एखादी प्रतिक्रिया द्या ब्वा.]

अत्रुप्त आत्मा's picture

7 Dec 2014 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

@(आता कसं बरं वाटलं. )>>> =)) दू दू दू ... =))

खटपट्या's picture

7 Dec 2014 - 11:58 pm | खटपट्या

व्रुत्तांत आणि फोटो मेन बोर्डावर टाका म्हणजे झालं !!

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 1:01 am | मुक्त विहारि

सहमत

चित्रगुप्त's picture

8 Dec 2014 - 4:59 am | चित्रगुप्त

व्वा. वल्ली आणि चौराकाकांनी एकदमच डीटेललवार वर्णन देऊन कट्ट्याची इत्थंभूत माहिती दिल्याबद्दल त्रिवार मुजरा. या दोघांमुळे हा कट्टा प्रत्यक्षात उतरू शकला.
कालसर्प हे आपले गमतीने दिलेले नाव आहे, त्यात 'कालसर्प योग' वगैरेचा संबंध नाही.
नेटफ्लिक्स वर 'Fat Sick and Nearly Dead' नामक फिल्लम आहे, त्यात ताज्या फळांच्या, भाज्यांच्या रसाने पोट, वजन कमी कसे करावे वगैरे सर्व छान सांगितलेले आहे. ज्यूस पिणे सुरु केल्यावर पाचव्या दिवशी माझ्या आतड्यातून एक किलो वजनाची काळी रबरासारखी गुंडाळीच्या गुंडाळी बाहेर निघाली, तिला मी 'कालसर्प' असे नाव दिले आहे. ती निघाल्यावर एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटू लागले, ते आजतागायत. यावर वाटल्यास आणखी एक धागा काढता येईल. कट्ट्याबद्दल सर्वांचे अनेक आभार.

colon mucoid plaque:
, .

विजुभाऊ's picture

8 Dec 2014 - 10:50 am | विजुभाऊ

चित्रप्तगुप्त काका.
कालसर्प या वर अजून माहिती दिलीत तर बरे होईल

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 11:31 am | मुक्त विहारि

सहमत

एक काका डॉलबी सराउंड साउंडात 'कायतरी' सांगत होते की आसपासच्या पोरी आमच्याकडेच बघायला लागल्या. एकदम रसिक आजोबा काका. ;)
"कायतरी" म्हणजे काय हे सांगण्याची जबाबदारी सूडने घ्यावी अशी इनंती करतो.

सतिश गावडे's picture

8 Dec 2014 - 9:42 pm | सतिश गावडे

सूड सविस्तर लिहिलंच म्हणा. मात्र काही "राजा" माणसांना समाजमान्य नियमांच्या "चौकटीत" बसवता येत नाही असे नम्रपणाने नमुद करू इच्छितो.

सूड's picture

8 Dec 2014 - 9:49 pm | सूड

मी ऐकलंच नाही!! ;)

सतिश गावडे's picture

8 Dec 2014 - 9:59 pm | सतिश गावडे

किती तो साल"सूड"पणाचा आव आणावा माणसाने.

हा हा !! ठीकाय, सगळं तपशीलवार सांगतो. माझा प्रतिसाद आणि आयडी दोन्ही शाबूत राहील याची जबाबदारी घे.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 3:13 pm | टवाळ कार्टा

अशा वेळेस व्यनी करावा...मी पयला ;)

यसवायजी's picture

9 Dec 2014 - 3:15 pm | यसवायजी

हां ते बाकी खरं हां.. प्रतिसाद आणि आयडी दोन्ही शाबूत राहील याची काळजी घ्या. काका एका 'भल्या' संपादकाच्या गल्लीतच र्‍हात्यात. :))))

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2014 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा

@काका एका 'भल्या' संपादकाच्या गल्लीतच र्‍हात्यात. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

सतिश गावडे's picture

9 Dec 2014 - 10:53 pm | सतिश गावडे

भल्या की भल्या मोठ्या?

'कायिक' शेरेबाजी केल्याबद्दल स गा चा जाहीर निषेध. ;)

चित्रगुप्त's picture

8 Dec 2014 - 12:00 pm | चित्रगुप्त

कोन्ते काका, कायतरी म्हंजी काय, कोन्त्या पोरी...सर्वच इसरलो, सूडाने सांगायलाच्च पायजेल.

चित्रगुप्त's picture

8 Dec 2014 - 12:02 pm | चित्रगुप्त

काढतो कालसर्पावर धागा लवकरच.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 7:47 pm | अत्रुप्त आत्मा

@इस्पिक एक्का ( युवान च्वांग) >> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

धाग्यातल्या शेवटच्या फोटुत सगळ्यांचे पाय पत्थरावर टेकलेले आहेत..पण सूडचा मात्र! http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

यसवायजी's picture

8 Dec 2014 - 8:15 pm | यसवायजी

वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) यसवायजी ( आईनस्टाईन), चित्रगुप्त साहेब,( रेम्ब्रां) चित्रगुप्त यांचे बालमैतर , इस्पिक एक्का ( युवान च्वांग) .
हाईंन्न? स्टाईंन्न? आणी सयवायजी??
माझ्यात आणी जो कोण तो 'आईनस्टाईन' आहे त्याच्यात एकच साम्य.
मी त्याला ओळखत नाही आणी तो मला. :))

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2014 - 10:47 pm | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा

@मी त्याला ओळखत नाही आणी तो मला. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बॅटमॅन's picture

9 Dec 2014 - 2:50 pm | बॅटमॅन

हा हा हा =)) =)) =))

(Eisenstein व Einstein दोन्हीही काही काळ एकच मानलेला) बॅटमॅन.

कट्टा खतरनाक झालेला दिसतोय. मज्याच!

चित्रगुप्त's picture

9 Dec 2014 - 8:02 pm | चित्रगुप्त

'कायतरी' काय, ते विसरलो. इकडेच टाका की. इतकं काही 'हे' नसणारच...

सतिश गावडे's picture

9 Dec 2014 - 10:55 pm | सतिश गावडे

अगदी बरोबर काका. एक काका एका वर्दळ असलेल्या प्राचिन शिवमंदीरासमोर बोलून बोलून असं काय बोलणार.

चित्रगुप्त's picture

10 Dec 2014 - 10:31 am | चित्रगुप्त

एक काका एका वर्दळ असलेल्या प्राचिन शिवमंदीरासमोर बोलून बोलून असं काय बोलणार.

आणि कुणासमोर... हे पण बघा की.
तरीपण बोलले काय, हे कोडेच आहे अजून.

चित्रगुप्त's picture

10 Dec 2014 - 10:34 am | चित्रगुप्त

एका मिपाकराने कालसर्प-वियोगाचे मनावर घेऊन तो प्रयोग साग्रसंगीत सुरु केल्याचे समजले आहे. आठवडाभरात बघू काय काय होते ते ...

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 10:12 am | मुक्त विहारि

कालसर्प-वियोगाचे ज्ञान आम्हाला पण द्या...

इथे अरबट-चरबट खावून पोटाचे फार हाल झाले आहेत.

प्यारे१'s picture

11 Dec 2014 - 2:03 pm | प्यारे१

आम्हालाही कृती सांगा.
धागाच का काढत नाही सरजी?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2014 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

+++++++११११११११

मदनबाण's picture

10 Dec 2014 - 11:22 am | मदनबाण

मस्त कट्टा,मस्त वृतांत ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt