प्राचीन भारतः पाताळेश्वर लेणी

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
12 Dec 2011 - 10:49 pm

पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच.
पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत. पुरातत्व खात्याने एक छोटीशी बागच त्याठिकाणी निर्माण केली आहे.
बागेतून थोड्याफार पायर्‍या उतरून आपला प्रवेश होतो ते थेट लेण्यांच्या प्रांगणात. आजूबाजूचा सर्व एकसंध कातळ छिनून हा लेणीमंदीराचा विशाल देखावा इथे निर्माण केला गेला आहे. पायर्‍या उतरताच डावीकडे एक नंदीची जीर्णावस्थेतील एक प्रतिमा ठेवलेली आहे. त्यानंतर लागतो तो गोलाकार खोदलेला नंदीमंडप. १२ स्तंभांनी फेर धरलेल्या या नंदीमंडपात आतमध्ये अजून चार स्तंभ आहेत व त्यामध्ये विराजमान आहे महादेवाचे वाहन नंदी. गळ्यातल्या माळा. माळांमध्ये गुंफलेल्या घंटा हे सर्वच अगदी खुबीने कोरलेले आहे.

१. अखंड कातळात कोरलेली लेणी व नंदीमंडप

२. नंदीमंडप

२. नंदी

४. नंदीचे जवळून दर्शन

५. नंदीमंडप

नंदीमंडप पाहून पुढे जाताच डावीकडे खडकात एक ओसरी खोदलेली दिसते. मध्ये दोन स्तंभ, आतमध्ये खोली आणि शेजारीच पाण्याचे टाके अशी याची रचना. हे पाहून येतो आपण ते मुख्य प्रवेशद्वारापाशी. तिथेच उजव्या बाजूला देवनागरीतील एक अस्पष्टचा शिलालेख दिसतो. श्री मारूती प्रसन्न, यादव असे काही शब्द ओळखू येतात त्यावरून हा शिलालेख यादवकालीन असावा हे स्पष्टच होते. पण ही लेणी खोदली गेली आहेत ती राष्ट्रकूट कालखंडात. इ.स. सातव्या ते आठव्या शतकात. यादवकाळात ही लेण्यांची कला लुप्तच झाली होती. ही लेणी आहेत ब्राह्मणी शैलीची. बौद्ध आणि ब्राह्मणी शैलीतील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची रचना. बौद्धलेण्यांत विहार व चैत्य दिसतात तर ब्राह्मणी शैलीतील लेण्यांत सभामंडप व गर्भगृह. येथे विहार अजिबात दिसत नाहीत कारण विहार हे भिक्खू संघाच्या निवासासाठी असत व ही शैवलेणी म्हणजे निव्वळ प्रार्थनामंदिरे.

५. डावीकडच्या कोपर्‍यात असलेली ओसरी.

६. देवनागरी लिपीतला शिलालेख

लेण्यांमध्ये प्रवेश करायच्या आधी ५० फक्त यांनी त्यांची पोतडी उघडली व तिथून बाहेर काढले ते नागपूरचे प्रसिद्ध संत्रारसगुल्ले. संत्रा स्वादाच्या रसगुल्ल्यामध्ये आत अस्सल संत्रे असा हा जबरदस्त स्वादिष्ट प्रकार. सोबतीला केक, त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा हा कार्यक्रम लगेच उरकून घेतला गेला.

आता आम्ही लेण्यांमधे शिरलो. सभामंडप, तीन गर्भगृहे व बाजूने प्रदक्षिणामार्ग अशी याची रचना. सभामंडप तर अतिशय प्रेक्षणीय. भव्य अशा १०/१० स्तंभांच्या तीन ओळींवर याचे छत तोललेले आहे. लेण्यांच्या दोन्ही बाजूंना काही अर्धवट देखावे कोरलेले दिसतात तर काही भग्न देखावे दिसतात. डावीकडच्या एका कोपर्‍यात राक्षसवधासारखा कुठलातरी देखावा कोरलेला दिसतो. आता आम्ही गर्भगृहांमध्ये शिरलो. इथेही गर्भगृहाच्या बाहेर नंदीची मूर्ती कोरलेली आहेच. आत गर्भगृहामध्ये महादेवाची सुबक अशी पिंड कोरलेली आहे, तोच हा पाताळेश्वर. जमिनीच्या खालच्या पातळीत-पाताळात कोरलेला. पाताळेश्वर नाव अगदी यथार्थ योजिले आहे. डावीकडच्या गर्भगृहात गणपती व उजवीकडच्या गर्भगृहात पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. दरवाजांरील नक्षीकाम सुरेखच आहे. प्रदक्षिणामार्गात राम, सीता आणि लक्ष्मणाच्या हल्लीच कोरलेल्या संगमरवरी मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. प्रदक्षिणामार्गात पाठीमागच्या उजव्या कोपर्‍यात अर्धवट खोदलेला खडक दिसतो. हे लेणे का अर्धवट राहिले हे काही कळत नाही कदाचित धनाची कमतरता हेच कारण असावे.

७. सभामंडपातील स्तंभांची अतिशय सुरेख रचना

८. सभामंडपातील स्तंभांची अतिशय सुरेख रचना व भिंतीतील अर्धवट देखावा

९. राक्षसवधासारखे कसलेसे कोरीव काम

१०. पाताळेश्वर महादेव

११. पाताळेश्वर महादेव

१२. गणपती व पार्वतीच्या मूर्ती

१३. अर्धवट खोदलेला दगड

पाताळेश्वराचे दर्शन घेउन बाहेर आलो व मिपाकरांच्या गप्पांना एकदम बहार आला. विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारण्यात आल्या. गप्पा मारता मारता अंधार कधी होत गेला ते कळलेच नाही, अचानक वरच्या कड्यावर दोन जळते डोळे दिसले आणि स्पाच्या ग्रहणातल्या मांजराची आठवण झाली. पण इथे मात्र मांजर नव्हते.

१४. जळते डोळे

मिपाकरांचा कुठलाही कट्टा खादाडीशिवाय संपन्न होतच नाही. यावेळची खादाडी झाली ती बालगंधर्व रंगमंदिराशेजारील गंधर्व हॉटेलात. खादाडीच्या कट्ट्याला मनोबा यांच्या रूपाने अजून एका मिपाकराची भर पडली व गप्पा अधिकाधिक रंगतच गेल्या. मध्येच सोकाजीरांवाचा कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी व येऊ न शकल्याबद्दल खंत व्यक्त करण्यासाठी फोन येऊन गेला. मनसोक्त जेवण झाल्यावर तिथे जवळच नॅचरल्सचे स्ट्रॉबेरी, मलई, चिकू, फणस अशा विविध स्वादांची आईस्क्रीम्स चापल्या गेली व एका मिपाकट्ट्याची सुरेख सांगता झाली.
घरी पोहोचलो ते ९.३० वाजेपर्यंत. चंद्रग्रहण सुटतच आले होते. गच्चीवर जाउन हा खगोलाविष्कार डोळे भरून पाहिला मग रात्री 'द प्रीस्ट' हा टुकार चित्रपट बघून निद्राधीन झालो.

१५. चंद्रग्रहण

संस्कृतीछायाचित्रण

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

12 Dec 2011 - 10:56 pm | सुहास झेले

मस्त आहेत लेणी.... एकदम भर वस्तीत दिसतायत

धनाजीरावांच्या ख.व.त उचकपाचक करताना साडेचारच्या पाताळेश्वराच्या मोहिमेची गंधवार्ता लागलेलीच होती आणि म्हणूनच वल्लीशेठांच्या कलादालनातील कलेची प्रतिक्षा या धाग्यान्वये आता पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही.

पुण्यात फारसं फिरणं झालेलंच नाही तेव्हा या भागाबद्दलही आम्ही चांगल्यापैकी अनभिज्ञ होतो. वल्ली आणि मिपाकर मित्रांनी या जागेची उत्तम ओळख करून दिली आहे. फोटो मस्तच आले आहेत. फोटोतले मिपाकर दिसले असते तर बहार आली असती.

गंधर्व हॉटेल आणि नॅचरल्समधील पदार्थांचे फोटो नसल्याने इनोचे २ चमचे वाचले आहेत हे इथे नमूद करतो.

वल्लीशेठ, पुण्यनगरीत आलो की तुमच्या संगत अशा ठीकाणी जाण्याचे योजत आहे. मदत करावी ही विनंती.

जय पाताळेश्वर!

:-)

अन्या दातार's picture

12 Dec 2011 - 11:02 pm | अन्या दातार

पुण्यात असताना निरुद्देश्य भटकंतीत या लेणी बघितल्या होत्या. आज व्यवस्थित माहितीही मिळाली. पुन्हा पुण्यात आल्यावर या लेणी बघण्यास अवश्य जाईन.
मस्त वृत्तांत तसेच गंधर्वमधील खादाडीचे फोटो न टाकल्याबद्दल वल्ली यांचे अभिनंदन ;)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2011 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

झ्याक लिवलाय हो वृत्तांत.... :-)

अवांतर-कुत्तोबा आला...चांदोबा पण आला...मग (मधल्या पारावर्चा) नागोबा गेला कुठे...? :-(

सोत्रि's picture

13 Dec 2011 - 12:36 am | सोत्रि

पुण्यातल्या अतिशय वर्दळीच्या आणि गजबजलेल्या भागात इतके सुंदर आणि प्राचीन ठिकाण असेल असे वाटतही नाही.
पण त्यामुळेच 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण सार्थ होते म्हणा :)

वल्ली, मस्त फोटोज आणि माहिती.
अन्याशी सहमत, ते फोटो आले असते तर पंचाइत होती, इनो संपला आहे सध्या वापरून वापरून ;)

- (जाज्वल्य 'पुणेरी' अभिमान असलेला) सोकाजी

पुण्यातल्या अतिशय वर्दळीच्या आणि गजबजलेल्या भागात इतके सुंदर आणि प्राचीन ठिकाण असेल असे वाटतही नाही.
पण त्यामुळेच 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण सार्थ होते म्हणा Smile

अगदी मनातल बोललास रे सोक्या.

बाकी कट्ट्याचे फोटो याच धाग्यात न टाकल्या बद्दल विषेश धन्यवाद.
( हवंतर दुसरा धागा टाका त्यासाठी.)

मृगनयनी's picture

13 Dec 2011 - 2:20 pm | मृगनयनी

वल्ली'जी ....सुन्दर माहिती आणि फोटो.. :)

पण एक गोष्ट नमूद कराविशी वाटते... ती म्हणजे जे. एम. रोडवरची ही "पाताळेश्वर लेणी" पान्डवकालीन आहेत. पान्डव द्यूत्/जुगारात हरल्यानन्तर १२ वर्षे वनवासी होते. तेव्हा काही दिवस ते पुण्यातही होते... द्रौपदीने पूजा केलेले शिवलिन्ग म्हणजेच "पाताळेश्वर"!
आत्ता त्यावर पितळेचे आवरण घातलेले आहे. :)

पुण्यातील सर्वांत पुरातन शिवलिन्ग असल्यामुळे श्रावणी सोमवारी, प्रदोषाच्या दिवशी येथे प्रचन्ड गर्दी असते.
तसे पांडवाच्या अस्तित्वाचे पुरावे पुण्याजवळच्या "भोसरी" उर्फ "भोजपूर" या गावी देखील मिळतात. बकासुराचा वध भीमाने "भोसरी" या गावीच केला होता. तिथले ग्रामस्थ आपल्याला याचे पुरावेही दाखवतात... ऐक्चुली 'भीमा' मुळेच येथील लोक आणि एरिया "कुस्ती"साठी प्रसिद्ध आहे.

"पाताळॅश्वर" मन्दिराचा जीर्णोद्धार पहिल्या बाजीराव पेशव्यान्नी केला. अर्थात मन्दिराच्या मन्डपातही त्याचा उल्लेख केलेला आढळतो. त्याचबरोबर शिवगाभार्‍याच्या डावीकडे रामभक्त हनुमानाची हात जोडलेली मूर्ती आहे. आणि त्याच्या बरोबर समोर २० फुटांवर राम लक्ष्मण सीता यान्च्या साधारण २ ते अडीच फूटांच्या सुन्डर मूर्ती आहेत. ढळढळीत दुपारी कडक उन्हाच्या वेळी देखील या मूर्तींच्या आसपास अन्धारच असतो. त्यामुळे त्या अन्धारात मूर्ती खूपच शान्त आणि आश्वासक वाटतात. :)

बाकी गणपती, देवी, शिवलिन्ग यान्च्या गाभार्‍यात बर्‍यापैकी प्रकाश पडेल इतपत ट्यूबलाईट मिणमिणत असते. ओव्हरऑल मन्दिरात गेल्यावर खूपच शान्त आणि प्रसन्न वाटते.

इथला एरिया बर्‍यापैकी मोठा आणि शान्त असल्याने कॉलेजची मुले-मुली जर्नल कम्प्लीट करायला, किन्वा कुणाशी तरी "गुप्त" काही तरी बोलायला येत असतात.

पाताळेश्वराच्या वरच्या साईडला "जन्गली महाराज" मन्दिर आहे. व त्यान्ची समाधी पण आहे. अनेक लिन्गायत लोकांची येथे वर्दळ असते. सम्पूर्ण मंदिराला जे. एम. रोडवरच २ एन्टरन्स असल्यामुळे भाविकांना बरे पडते. तसेच इथे मन्दिराच्या आवरात देवचाफ्याची पण सुन्दर झाडे असल्याने त्यान्च्या सुवासामुळे वातावरणात एक प्रकारची पवित्रता येते....

मन्दिराच्या आवारातच नन्दी मन्डपाशेजारी एक अश्वत्थ वृक्ष देखील आहे. तिथे हनुमानाची एक मूळ मूर्ती आणि नागांच्या जोडीचीही एक मूर्ती आहे. त्याचा "पार" साडेतीन फूट उन्च असून झाडाजवळ जायला पायर्‍यादेखील आहेत.

कॉलेजात असताना आम्हीही या मन्दिरातच पडीक असायचो.. तसे लहानपणी पण आजी आणि आईबरोबर श्रावण-भाद्रपदात येणं व्हायचं.. पण कॉलेजमध्ये अस्ताना बराच वेळ आम्हाला "पाताळेश्वरा"साठी देता यायचा...

पुणे महानगरपालिकेने मन्दिराची योग्य ती निगराणी राखली.. तर अजून कही वर्षान्नी देखील बाहेरगावच्या लोकान्ना, पाहुण्यान्ना दाखवण्यासाठी पण "पाताळेश्वर" हे एक उत्तम धार्मिक लेणं बनण्यास हरकत नाही.

:)

प्रचेतस's picture

13 Dec 2011 - 6:36 pm | प्रचेतस

ती म्हणजे जे. एम. रोडवरची ही "पाताळेश्वर लेणी" पान्डवकालीन आहेत.

नाही हो.
आपल्याकडे काहीही भव्यदिव्य अशा निर्मितीला पांडवकालीन म्हणण्याची प्रथाच पडली आहे. सामान्य माणूस करूच श़कणार नाही म्हणून हे पांडवांनी निर्माण केले असे म्हटले जाते. ही लेणी सातव्या ते आठव्या शतकातली राष्ट्रकूटकालीन आहेत. वेरूळ, घारापुरीची लेणी ही याच्या समकालीनच. मात्र पुण्यातील सर्वात पुरातन शिवलिंग हे नक्कीच असावे.

पांडवाच्या अस्तित्वाचे पुरावे पुण्याजवळच्या "भोसरी" उर्फ "भोजपूर" या गावी देखील मिळतात.बकासुराचा वध भीमाने "भोसरी" या गावीच केला होता.

हे पण शक्य नाही. बकासूराचा वध एकचक्रा नगरीच्या बाहेर झाला होता. एकचक्रा नगरी पांचालप्रदेशाच्या बाजूला, म्हणजे गंगा यमुना या दोघांच्या मधील प्रदेशातला हा भाग. आजच्या उत्तरप्रदेशातला. तथापी भोसरी हे प्राचीन आहे हे मान्यच आहे.
वनवासात असताना पांडव उत्तरेतच फिरत होते. द्वैतवन, हिमालय, मत्स्यदेश इ. ते दक्षिणेत आल्याचे महाभारतात कोठेही लिहिलेले नाही. अर्थात राजसूय यज्ञाच्या वेळी पांडवांनी जो दिग्विजय केला तेव्हा ते द़क्षिणेत आल्याचे दाखले मिळतात पण तेव्हा ते राज्यकर्ते होते.

हे दोन मुद्दे सोडून बाकी सर्व मुद्द्यांशी सहमत.

कानडाऊ योगेशु's picture

13 Dec 2011 - 7:52 pm | कानडाऊ योगेशु

बकासुर वधाच्या ठिकाणाबाबत थोडी असंदिग्धता वाटतेय.
माझ्या माहीतीनुसार पंढरपुर जवळील वेळापूर ह्या गावी भीमाने बकासुराला मारले.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2011 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

या वरुन बकासुर किमान तीन होते,हे मात्र नक्की सिद्ध होइल... ;-)

प्यारे१'s picture

14 Dec 2011 - 11:43 am | प्यारे१

अरे तीन तीन बकासुर म्हणजे सगळा आजूबाजूचा प्रदेश उपाशीच की...

अवांतरः भोसलेंनी जसे अफजलखानाला गुदगुल्या करुन मारल्याचा इतिहास 'रचलेला' तसं ...
भीमानं पैसे खाणार्‍या भ्रष्ट बकासुराला विलेक्शन मध्ये हरवलं असं 'पुराण' कोणी रचेल काय?

मृगनयनी's picture

14 Dec 2011 - 9:39 am | मृगनयनी

वल्ली'जी... पाताळेश्वर लेणी पाडवकालीन असल्याबद्दल आणि भीमाने भोसरी येथे बकासुराचा वध केल्यबद्दल मी एका इतिहासकाराच्या बखरीत वाचलेले होते.... असो... प्रत्येकाचा "शोध" वेगवेगळा असू शकतो... त्यामुळे तुम्ही म्हणता त्यातही तथ्य असू शकते... :)

___________

बाकी वरच्या फोटोन्मध्ये सगळ्यात भारी तो श्वानपुत्राच्या डोळ्यान्चा फोटो आहे..सुपर्ब!!!.. :)

मी-सौरभ's picture

14 Dec 2011 - 11:57 am | मी-सौरभ

रामायण आणि महाभारत हे खरेच घडले होते कशावरुन????
ती तर महाकाव्ये आहेत ना???

प्रचेतस's picture

14 Dec 2011 - 12:18 pm | प्रचेतस

रामायण आणि महाभारत हे खरेच घडले होते कशावरुन????
ती तर महाकाव्ये आहेत ना???

रामायण तर महाकाव्य आहेच. पण महाभारतात मात्र हा 'जय नावाचा इतिहास आहे' असे लिहिलेले आहे.

मी-सौरभ's picture

14 Dec 2011 - 11:59 am | मी-सौरभ

शोध लावणे या प्रकाराबद्दलच शोध घेण्याची गरज आहे हे मी नमूद करू ईच्छीतो...

किसन शिंदे's picture

14 Dec 2011 - 12:05 pm | किसन शिंदे

काय रे, आता तु पण सुरूवात केली म्हणजे दोन दोन प्रतिसाद द्यायची.

चिंतामणी's picture

13 Dec 2011 - 12:47 am | चिंतामणी

फटु आणि वर्णन मस्त रे.

पण ठरल्याप्रमाणे तु किंवा ५०फक्तने फोन न केल्याचा जाहीर निषेढ. J) J-) :crazy:

स्पा's picture

13 Dec 2011 - 8:16 am | स्पा

चायला भर वस्तीत अशा लेण्या एकदम विचित्रच वाटतात

किंवा अशा लेण्यांभोवती भर वस्ती कै च्या कै वाटते

असो ठिकाण सुंदरच आहे
खादाडीचे फोटो न टाकल्याबद्दल वल्ली महाराजांचा णिशेध

अन्या दातार's picture

13 Dec 2011 - 9:01 am | अन्या दातार

खादाडीचे फोटो न टाकल्याबद्दल वल्ली महाराजांचा णिशेध

इकडे मी आणि सोकाजी त्याचे अभिनंदन करतोय, खादाडीचे फोटो न टाकल्याबद्दल. आणि हा स्पावड्या निषेध करतोय???

स्पा, इनोचा प्लँट ठाकुर्लीत काढलाय का बे? की तुझ्या हापिसाजवळ?

प्रसन्न शौचे's picture

13 Dec 2011 - 9:04 am | प्रसन्न शौचे

लेख खुपच छान आहे

पाषाणभेद's picture

13 Dec 2011 - 8:41 am | पाषाणभेद

पहिला फोटो कुठल्यातरी अंतरिक्षस्थानाचा किंवा एटीसी चा वाटतो. वर्णन छान. कट्य्याचेही फोटो हवे होते.

प्यारे१'s picture

13 Dec 2011 - 9:46 am | प्यारे१

मस्त रे वल्ली...
अतिशय सुरेख लेणी आहेत.
(हे प्रेमिकांसाठी तीर्थ क्षेत्र असेल असे वाटते आहे. आपल्याला काय 'अनुभव' आला?)
आम्ही यायचं जमवत होतो. नवीन आघाडी उघडण्याचे प्रयत्न ;) सुरु असल्याने दुपारी ३ ची वेळ घेण्याचा प्रयत्न केला. पण हाय रे कर्मा! आम्हाला अम्मळ लवकरच म्हणजे ११.३० ला डेक्कन भागात बोलावले गेले. १२.१५ ला कार्यक्रम आटोपला.
आता ४.३० पर्यंत काय करावे अशा विचारात तज्ज्ञ व्यक्तींशी सल्लामसलत करावी अशा उद्देशाने ५० फक्त यांना फोनवले असता ते 'बिझ्झी' असल्याचे समजले. आम्ही पामर काय बोलणार यावर?
जवळपास ४-५ शनिवार हापिसात यावे लागत असल्याने (काम करावे लागते असे म्हणालो का? म्हणालो?) मिळालेला शनिवार घरी विश्रांती करावी असा उदात्त विचार केल्या गेला आणि आज आपण काय 'मिस'लो हे समजून अम्मळ भरुन आलेले आहे. ड्वाळे पाणावले आहेत. :(

बाकी गंधर्व विषयी आम्ही काहीही वाचलेले नाही. ;)

वल्ली काका पुन्हा कदी जानार तुमी पाताळेश्वराला? आमी येनाल म्हन्जे येनाल.

चिंतामणी's picture

13 Dec 2011 - 6:27 pm | चिंतामणी

>>(हे प्रेमिकांसाठी तीर्थ क्षेत्र असेल असे वाटते आहे. आपल्याला काय 'अनुभव' आला?)

काय विचार आहे?????????? ;) ;-) :wink:

प्यारे१'s picture

14 Dec 2011 - 12:11 pm | प्यारे१

विचार तर एकदम 'नेक' आहे.... ;)

ऐला.. पुण्याच्या मधोमध अशी उत्तम लेणी?

माहीतसुद्धा नव्हतं.

खूप मस्त ओळख करुन दिली आहे. धन्यवाद...

उदय के'सागर's picture

13 Dec 2011 - 10:22 am | उदय के'सागर

खरचं पाताळेश्वर एक अदभुत जागा आहे. जे.एम. रोड सारख्या गजबजलेल्या आणि "डेव्हलपड" ठिकाणी असे प्राचिन स्थळ असेल ह्यावर विश्वासच बसत नाहि. पाताळेश्वरात बसल्यावर पुन्हा त्या गर्दि-गजबजाटात जायचि इच्छाच होत नाहि.

पावसाळ्यात हि लेणी विशेष दिसते, पावसाच्या पाण्यामुळे लेणी छान धुवुन निघतात आणि मस्त गर्द काळ्या दिसतात. (म्हणजे इतर वेळेस प्रदुषणामुळे त्या धुळिने माखलेल्या असतात आणि म्हणुन जरा भुरकटलेल्या असतात. ) जोराचा वा खुप पाऊस आला कि त्या संपुर्ण पाण्याखालीहि येतात :)

तेथिल जंगली महाराजांच मंदिर हि छान आहे, जुन्या पद्धतीचं.

धन्यवाद वल्ली!

jaypal's picture

13 Dec 2011 - 10:48 am | jaypal

फोतो आवडले. फोटो नं ७ व ८ ब्लेक एन्ड व्हाईट मधे करुन पहा बर.

अमृत's picture

13 Dec 2011 - 2:02 pm | अमृत

बर्‍याच वर्षान्पूर्वी गेलो होतो . . . पण इतके निरीक्शण मात्र केले नाहि.... छायाचित्रे छान आली आहेत आणि वर्णन पण झकास.....

उत्सुकता : : हे संत्रारसगुल्ले नागपूरला कूठे मिळतात ? मी तर कधिच ऐकले किन्वा बघितले नाहित... अम्हास्नी फकस्त सन्त्राबर्फि ठाउक आहे... ती पण आनन्द भन्डारची... एकदम बेस्ट...

मी-सौरभ's picture

13 Dec 2011 - 8:03 pm | मी-सौरभ

पुण्यात हे ठिकाण आधी बांधले गेले आणि मग त्याच्या आजूबाजूला शहर झाल्यने ते मधोमध आले हे नमूद करु ईच्छीतो :)

नेहमी प्रमाणेच सुंदर फोटु आणि माहिती... :)
शंकराच्या त्रिशुळा प्रमाणेच त्याचे धनुष्य ही तितकेच महत्वपुर्ण आहे,त्या धनुष्याचे नाव पिनाक आणि म्हणुन त्याला (शंकराला) पिनाकपाणी या नावाने ओळखले जाते. रामाने शंकाराचे असेच एक शिवधनुष्य मोडल्याचा रामायणात उल्लेख आहे.

चार फोटो माझ्याकडुन,

मला तर पाताळेश्वर लेणी ही त्याकाळच्या वास्तुविशारदमहाविद्यालयाची लॅब किंवा ट्रेंनिंग सेंटर वाटली, बरेच प्रकार एकाच ठिकाणी वेगवेगळ्या लेव्हलचे करुन ठेवलेले आहेत अगदी पार भिंतितल्या कोनाड्यापासुन ते ह्या खालच्या पायांपर्यंत.

ही अखिल भारतातल्या लेण्यांमधलं लेटेस्ट आणि सरकारी पद्धतीनं झालेलं कोरीव काम.

आणि कामाच्या ठिकाणी मौजमजेची सोय ही काय आजच्या आयटि कंपन्यांची आयड्या नाय, इथं लेण्यात पण ही सोय होती केलेली.,

एकुण काय कामाच्या ठिकाणी मौजमजा करणे हा माणसाचा अस्तित्वसिद्ध हक्क आहे हे सिद्ध झालेले आहे.

पन्नासराव,

फोटो नि त्यावरील भाष्य मस्त!

:-)

लीलाधर's picture

14 Dec 2011 - 8:35 am | लीलाधर

वल्ली फारच छान आणि संकलीत करून ठेवावी अशी माहीती. पूण्यात आलो की वेळात वेळ काढून जायचंच अशी खूणगाठ आत्ताच शेंडीला बांधून ठेवतो. आणि फारच उद्बोधक अशी माहीती आहे. धन्यवाद हो वल्लीशेठ :)

अमोल केळकर's picture

14 Dec 2011 - 11:33 am | अमोल केळकर

सुंदर ठिकाण. माहित नव्हते. आता पुण्य नगरीत गेलो की नक्की पाहिन

धन्यवाद

अमोल केळकर

sneharani's picture

14 Dec 2011 - 12:20 pm | sneharani

मस्त ठिकाण, पाहिलय! माहिती बाकी आता कळाली!
:)

हा ड्यांबिसपणा आहे. हल्कटपणा आहे.
हर्षद राव ती संत्रा मिठाई आणली हे आताच समजते आहे. आम्ही येण्यापूर्वीच ती संपवली गेली हेही समजले .
त्या पातालेश्वराला भेट देणार्‍या सर्व भुतावळिचा निषेध.

५० फक्त's picture

14 Dec 2011 - 1:21 pm | ५० फक्त

येस धिस इज हलकटपणा, तुम्ही करा पुढच्या विकांताला मुगाचा हलवा अन या घेउन आणि नका देउ आम्हाला,

सध्या स्वाक्षरी बदलावी म्हणतोय -

आंतरजालीय संस्थळं म्हणजे कंपुबाजी कंपुबाजी अन कंपुबाजी आणि मी कंपुबाज आहे. ( एक यादी करा इथल्या किती आयडिंना ही स्वाक्षरी शोभुन दिसेल याची )

अवांतर - मनोबा माफी करा, पुढच्या वेळी नक्की आणेन, तुम्ही येणार आहात हे माहित असते तर काय बिशाद होती आमची संपवायची, मागच्या वेळी उत्तमकडची सोनपापडी ठेवली होती किनई, दिली होती किनई तुम्हाला आल्या आल्या मग. ( चला आता ही मागची वेळ कोणती, कुठं हा दंगा घालायला मोकळे आपण)

पुष्करिणी's picture

14 Dec 2011 - 4:05 pm | पुष्करिणी

मस्त फोटो आहेत. इकडे बसून खूपदा सबमिशन केलय, कधी कधी अभ्यास (करायचा प्रयत्न ) केला आहे.
आत मस्त गार आणि शांत वाटतं, मस्त चाफ्याचं झाड आहे. मॉडर्न कॅफे, पांचाली, सुरभी जवळ आहेत :)

1

2

3

4

5

हल्लीच पाताळेश्वरला जाऊन आले. तेव्हा मोबाईलवर संध्याकाळी ६.३० नंतर फ्लॅश न वापरता फोटो काढले आहेत त्यामुळे क्वालिटी इ काही बघायचं नाही.

आता वल्लीशी बोलताना हा धागा आहे म्हणाला. २०११ मधे मी आतासारखी "मिपा पीडित" नसल्याने हा धागा वाचला नव्हता. मात्र आता वाचला. जास्त माहिती हवी आहे. संध्याकाळी उशीरा गेल्यामुळे आतील अर्धवट कोरीवकाम पण नीट दिसले नव्हतेच. ५० ने दिलेला फोटो फाशांच्या खेळाच्या पटासारखा दिसतो आहे. ते काम जुने आहे की आता कोणी केलेले?

प्रचेतस's picture

30 Mar 2014 - 10:19 pm | प्रचेतस

फाशांचा खेळाचा पट बर्‍याच ठिकाणच्या लेण्यांमध्ये दिसतो. त्याचा काल प्राचीन की उत्तरमध्ययुगीन ते सांगता येणार नाही. पण लोकांचा फावल्या वेळातील हा खेळ असावा.

सस्नेह's picture

30 Mar 2014 - 12:00 pm | सस्नेह

पुण्यात भर वस्तीत असे नयनरम्य ठिकाण आहे तर !

माहितगार's picture

30 Mar 2014 - 9:45 pm | माहितगार

वार्तापत्र आवडले.

प्राचीन पुण्यातील मंदीरांबद्दल चर्चा चालू आहेच तर खालील चित्रातील देवते बद्दल कुणाला अधीक माहिती देता येईल ?

zakoba temple

खालील रचना हेमाडपंती शैलीतच मोडते का ? पुणे जिल्ह्यात हेमाडपंती शैलीची मंदीरे कोणकोणती आहेत ?
Hemadpanti

छायाचित्र संदर्भ विकिमीडिया कॉमन्स

प्रचेतस's picture

30 Mar 2014 - 10:28 pm | प्रचेतस

पहिला फोटो बहुधा शंकराचा (काळभैरवाचा) असावा. वाहन बहुधा नंदीच आहे. मूर्ती साधारण शिवकालीन असावी.
खालचे फोटोतील मंदिररचना नक्की सांगता येत नाही. माझ्या मते गाभार्‍याचा भाग आहे तो. हेमाडपंती शैली जरी हेमाद्री पंडिताने सुरु केली असे म्हटले जाते तरी मंदिर बनवण्याची ती शैली त्यापेक्षा प्राचीन आहे. एकावर एक मजल्यांप्रमाणे बांधकाम करत जाणार्‍या ह्या शैलीला भूमिज शैली म्हणतात. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारची मंदिरे बरीच होती. बरीच उद्ध्वस्त झालीत तर काही जीर्णोद्धाराची वाट बघत आहेत. यवतचा भुलेश्वर, खिरेश्वरचा नागेश्वर, पूरचा कुकडेश्वर, सासवडजवळील पूरचा नारायणेश्वर ही यातली काही प्रमुख उदाहरणे.