बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
15 Dec 2014 - 2:39 pm

काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं).

.
(फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते.

तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात :

.

त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.

जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.

त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!

तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.

मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).

साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.

वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स.

(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)

(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 2:42 pm | टवाळ कार्टा

व्यंजनांचा हा शब्द खटकला

संजय क्षीरसागर's picture

15 Dec 2014 - 2:53 pm | संजय क्षीरसागर

लिहिणाच्या ओघात मला अचूक मराठी (खरं तर तितका तरल) शब्द सुचला नाही.

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 3:41 pm | टवाळ कार्टा

सामिष पदार्थ :)

संक्षी, व्यंजनं हा तरल शब्द आहे काय? बरं झालं, समजलं!

कंजूस's picture

15 Dec 2014 - 3:06 pm | कंजूस

फारच आवडलंय .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Dec 2014 - 3:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच रे संजय."तरूणांनी चांगले दोनशे जोर बैठका माराव्यात, एक दिवस उपाशी रहावे व मग येथे भेट द्यावी" असे हे म्हणतात.

सुनील's picture

15 Dec 2014 - 3:11 pm | सुनील

ठाण्याच्या दुकानात गेलोय. तब्येतीने खाणारे असाल तर पैसे वसूल अन्यथा पैसे फुकट!!

ठाण्याच्या दुकानात गेलोय. तब्येतीने खाणारे असाल तर पैसे वसूल अन्यथा पैसे फुकट!!
अगदी ! माझ्या मनात इथे जाण्याचा विचार आहे, पण प्रति माणशी ७६४ रु खर्च करुन किती चरणार ? शिवाय शाकाहारी मंडळींना जास्त काही चॉइस दिसत नाही ! जास्तीत जास्त पनीर मी चरु शकीन ! पण मग फक्त पनीर ,टॅमॅटो इं चरण्यासाठी आकारण्यात आलेला दर फारच जास्त वाटतो. थाळी जेवण घेतले { राजधानीची थाळी मला सर्वात जास्त आवडली, मध्यंतरी विष्णुजीकी रसोई मधे सुद्धा जाउन आलो होतो पण जास्त आवड्या नयं } तरी प्रति माणशी ४५०- ते ५५० च्या वर दर नाहीत...यात सुद्धा हवे तितके घ्या आहेच.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

बॅटमॅन's picture

15 Dec 2014 - 4:04 pm | बॅटमॅन

मदनबाण साहेब,

शाकाहारी लोकांना एकदम खुंदल खुंदल के खाण्यासाठी ही अनलिमिटेड थाळीवाली हाटेले एक नंबर. बार्बेक्यू अथवा तत्सम हाटिलांमध्ये तुमच्यासाठी डेझर्ट सोडल्यास काहीच खास नाही.

मदनबाण's picture

15 Dec 2014 - 4:06 pm | मदनबाण

बार्बेक्यू अथवा तत्सम हाटिलांमध्ये तुमच्यासाठी डेझर्ट सोडल्यास काहीच खास नाही.
थान्क्स... चला पैसे वाचले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

पद्मश्री चित्रे's picture

15 Dec 2014 - 4:50 pm | पद्मश्री चित्रे

खरं आहे.. ग्रील मधे चीज़ , बटाटे आणि पनीर खूप असतं.. त्यानेच पोट भरतं.. मग मेन कोर्स बघुनच समाधान मानावं लागतं.. एवढं 764/- ला न्याय देणारं जेवणं कठीण आहे..

कपिलमुनी's picture

15 Dec 2014 - 3:41 pm | कपिलमुनी

पैल्यापास्न मिपावर फेमस !

आवडता ठिकाण !

बार्बेक्यू नेशन खरंच छान आहे. २/३ मिपाकट्टेही सयाजीमध्ये झालेत. आता परवाच सिंहगड रोडच्या तसल्याच ऑन टेबल ग्रिल वाल्या शोरबात मिपाकरांसोबतच जाणे झाले.

बाळ सप्रे's picture

15 Dec 2014 - 4:36 pm | बाळ सप्रे

बारबेक्यु नेशनपेक्षा सिगरीच्या (मेन लँड चायना) लाईव्ह ग्रिलमध्ये पदार्थांचे वैविध्य जास्त आहे..

पिलीयन रायडर's picture

15 Dec 2014 - 4:59 pm | पिलीयन रायडर

इथे बहुदा बुधवारी ७.३० च्या आधीचे बुकिंग केले असल्यास "अर्ली बर्ड ऑफर मिळायची" - ५५०/- मध्ये शाकाहारी लोकांना चांगली ऑफर होती..

अर्थात न्याय देण्यासाठी तशी भुक असणारे लोक हवेत हे नक्की..

डेक्कनच्या BBQ मध्ये मागच्या नाताळात गेलो होतो.. डान्स करत होता एक ग्रुप.. टिपीकल गोवन गाणे.. काय नाचलो आम्ही.. जबरदस्त मजा आली..
तसंच कल्याणीनगरला आफ्रिकन जंगल थीम होती.. तशा टोप्या घालुन जेवायलाही मजा आली होती..!!

स्मिता श्रीपाद's picture

15 Dec 2014 - 5:20 pm | स्मिता श्रीपाद

बार्बेक्यु ला शाकाहार्यांची अगदीच उपासमार होत नाही....
पनीर, सोया, ब्रोकोली, कॉर्न...ई ई ग्रील असतंच..पण त्यासोबत कॅजुन स्पाईस्ड पोटॅटो....क्रिस्पी कॉर्न...कसले तरी कबाब ई असतातच...चाट न पास्ता चं लाईव्ह काउंटर...
बाकी मेन कोर्स, भरपुर गोड असतातच...

निवांत गप्पा मारायच्या असतील तर एकदा नक्की जा...
कोठ्ल्याही थाळी वाल्या होटेल मधे आरामत २-३ तास नक्कीच बसु देणार नाहीत.. :-)

निवांत गप्पा मारायच्या असतील तर एकदा नक्की जा...
कोठ्ल्याही थाळी वाल्या होटेल मधे आरामत २-३ तास नक्कीच बसु देणार नाहीत..

हे बाकी खरं हां!

दिपक.कुवेत's picture

15 Dec 2014 - 5:21 pm | दिपक.कुवेत

ईथे....

शाकाहारींसाठी एकच उपाय इंदूर ट्रीप करणे, चरणे, फिरणे आणि गंमत बघणे.

इंदूर खरंच इतकं भारी आहे का हो?

शाकाहारींचा विचार हो आमचा आणि खांडव्याची /ओंकारेश्वरची थंडी खाणे हा एक अनुभव. फक्त शाकाहारींसाठी हॉटेल कोण काढेल हो एवढे भारी आणि सुसज्ज.
@संक्षि तुमच्या रिपोर्टिँगला(महत्त्वाचे आहे) अगोदरच + दिले आहे.

टीपीके's picture

16 Dec 2014 - 7:13 pm | टीपीके

हो

गवि's picture

15 Dec 2014 - 6:21 pm | गवि

नकोतच आता ते इंदूर कट्ट्याचे प्लॅन्स.

आणि तो एका मर्यादेपर्यंत योग्य सुद्धा असतो. पण एकतर पत्नीची खास फर्माईश होती आणि (इथले काही सदस्य/(सदस्या) पुन्हा नाराज होतील, तरीही), वी लव्ह इच-अदर्स कंपनी. आम्ही घरातनं बाराच्या सुमारास निघालो असू आणि जेवणानंतर अर्धा-पाऊण तास पूल-साइड, लॉबीत बसणं असा रम्य टाईमपास करुन घरी आलो तेंव्हा पाच वाजले होते. सो इट वॉज नॉट अ क्वेस्ट्शन ऑफ मनी. इतक्या सुरेख जेवण प्लस टाइमपाससाठी पंधराशे रुपये काहीच नाहीत (खरं तर अशी कंपॅरिजनच (मी सीए असलो तरी) करु शकत नाही.

तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही फक्त खाणं हा दृष्टीकोन ठेवलात तर नॉन-वेजवाले आम्हाला लै मजा येते (फिश-बार्बेक्यूमुळे) असं म्हणतात. पण इट इज नॉट ओन्ली मनी वर्सेस फूड; तिथलं बेतहाशा वातावरण, तिचा सहवास, आणि अर्थात तिथली अप्रतिम फूड क्वालिटी या सगळ्यांचा मेळ जमत असेल तर नक्की जावं असं ते रेस्टॉरंट आहे.

तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कधीही घेऊन जा, तुम्हाला हमखास मजा येईल आणि ते सांगण्यासाठीच केवळ ही पोस्ट लिहिलीये. ती केव्हांही म्हणाली तर मी पुन्हा जाईन हे निश्चित.

माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा मात्र योग्य आहे. यू नीड इन्टेंस हंगर टू जस्टीफाय द फूड आणि ती अट मी पूर्ण केली होती. सकाळी साडेपाचला उठून एक तास योगा प्लस प्राणायाम आणि नंतर दोन तास टेबल टेनीस अँड ऑफकोर्स नो ब्रेकफस्ट!

वातावरण वैगैरे सगळ भ्रम आहे,
मुळ उद्देश पोट भरणे आहे.
(ह घ्या) *biggrin*

वातावरण वैगैरे सगळ भ्रम आहे,
मुळ उद्देश पोट भरणे आहे.
काय जेपी बोगद्यात जाउन आलास वाट्ट... :D

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

पैसा's picture

15 Dec 2014 - 8:28 pm | पैसा

१) भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा

२) जेवीन तर तुपाशी नायतर राहीन उपाशी

या दोन म्हणी आठवल्या. तुम्ही कोणत्या क्याटेगरीत बसता बाणभट्टा?

तुम्ही कोणत्या क्याटेगरीत बसता बाणभट्टा?
पहिल्या... फक्त धोंड्या च्या जागी उशी असा बदल केल्यास जरा सोय होइल ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

धागा आवडला. व्हेजवाल्यांसाठी ग्रिल्ड गोष्टींचे कमी पर्याय असतील पण मुख्य जेवण तरी (म्हणजे व्हेज) चांगले असते का? फक्त पैशांचा विचार करत नाही पण तरीही अ‍ॅम्बिअन्स आणि खाणे मिळून हे बरे दिसतेय. भरपूर भूक असल्यास ठीक आहे. उगीच हाताओठावर जेवणार्‍यांसाठी उपयोगाचे नाही.

सुबोध खरे's picture

15 Dec 2014 - 7:54 pm | सुबोध खरे

कोणत्याही हाटेलात गेलात तरी त्याच्या पेक्षा घरी गोष्टी नेहमी स्वस्तच पडतात.
दोन महिन्यांपूर्वी आम्ही चर्चगेटच्या सम्राट हाटेलात जाऊन थाळी खाल्ली. ३७५ रुपये ची थाळी यात पुरणपोळी( हवी तितकी) आणि दोन पक्वान्ने एक एक वाटी. यात आम्ही दोन वाट्या फ्रुट सलाड, एक वाटी गुलाब जम आणी एक वाटी श्रीखंड असे घेतले. पहिल्यांदा जेवढे वाढले ते खाऊनच आमचे पोट भरले. म्हणजे आमच्या सारखी बारीक माणसे हाटेलात जाऊन पैसे "वसूल" करू शकत नाहीत.
मग मी हाटेलात का जातो?
१) एवढ्या तर्हेचे पदार्थ आपण घरी एकदम कधीच करत नाही.
२) आपले एवढे आदरातिथ्य फक्त सासरी होऊ शकते (ते सुद्धा लग्न ठरल्या पासून ते फार तर वर्ष सण होई पर्यंत) अन्यथा वातानुकुलीत खोलीत सुग्रास भोजन छान पैकी मांडणी हि सणासुदीला सोडून आपल्या घरांमध्ये होत नाही
३) घरी स्वयंपाक करा किंवा बाहेरून अन्न मागवा जेवण पूर्ण झाल्यावर मागचे सर्व बायकांनाच आवरायला लागते. घरी स्वयंपाक करताना सारखा तो जेवणाचा वास घेतल्याने बायकांची भूक थोडीशी कमी होते. त्यामुळे त्या तितक्या आनंदाला मुकतात. यास्तव हाटेलात जेवणाचा आनंद बायकांना जास्त होतो.
४) बायको आनंदात असेल तर घर दार सुद्धा आनंदी राहते.

भाते's picture

15 Dec 2014 - 8:18 pm | भाते

इथे आपण रोज थोडेच जाणार आहोत? फारतर वर्षातुन एकदोनदा! मग या सर्व सुखांसाठी काही पैसे मोजावे लागणारचं ना!

यावर माझ्याकडे एक पर्याय आहे.
ऊसगावातुन/राणीच्या (आणि इतर) देशातुन ऊत्सवमुर्ती आला/आली कि 'आपला मिपा कट्टा' तिकडे करायचा! मस्त आपल्याला निवांत गप्पा मारायला मिळतील.
'ऊत्सवमुर्ती' याला नक्कीच नकार देणार नाही. :)

ऊत्सवमुर्ती, ह. घ्या. :)

पिंपातला उंदीर's picture

15 Dec 2014 - 8:38 pm | पिंपातला उंदीर

आवडल

इडली डोसा's picture

15 Dec 2014 - 10:02 pm | इडली डोसा

आम्ही पुण्यातल्या सयाजीला गेलो होतो... फार काही विशेष नव्हते आवडले तेंव्हा... कदाचित विमान नगर पासुन ड्राईव करत गेल्यामुळे असेल..

विअर्ड विक्स's picture

15 Dec 2014 - 11:34 pm | विअर्ड विक्स

मुंबईकर असूनसुद्धा सयाजीला गेलेलो आहे. buffet चांगला आहे. सिगरी म्हणा वा baebequ nation अशी हॉटेल हि जेवणापेक्षा starter नी desert चीच पेटपूजा करण्यासाठी प्रसिद्ध असतात. सयाजीत झेंडा पाडायची तर सिगारीमध्ये striker ठेवायची पद्धत आहे. ती का व कशासाठी हे तिथे गेल्यावर अनुभवा.

केकवर आईस्क्रीम , अननस ग्रील असे अचाट पदार्थ घरी करण्यापेक्षा अश्या ठिकाणीच चांगले लागतात.

सयाजीत म्हणे व airport पिक अप साठी ऑडी आहे. ऑडी गाड्यांची रांग बघून माझे डोळे खरेच दिपले होते. रात्रीवेळेस highway पलीकडील परिसर मस्त दिसतो.

खटपट्या's picture

15 Dec 2014 - 11:46 pm | खटपट्या

दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८

रेट वाढलाय वाटतं

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2014 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

आमचा (याच) बारबे क्यु नेशन'चा रणसंग्राम आठवला. :D

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 1:00 am | मुक्त विहारि

मस्त लेख...

आवडला.....

श्रीरंग_जोशी's picture

16 Dec 2014 - 1:44 am | श्रीरंग_जोशी

या उपहारगृहाचे नावच केवळ ऐकले होते. या लेखामुळे त्याची उत्तम ओळख झाली.

पुढील भारत वारीत येथे नक्की जाईन.

वेल्लाभट's picture

16 Dec 2014 - 11:33 am | वेल्लाभट

पवईला असलेल्या या उत्तम हॉटेलात जाऊन बघा. बारबेक्यू नेशनचाच कॉन्सेप्ट आहे. परंतु जबर क्वालिटी आहे. टेस्ट सुस्साट ! आणि व्हेज ना व्हरायटीही चांगली आहे माझ्यामते. जाम धमाल आली होती मी गेलेलो तेंव्हा. फुल आडवा हात !

वेल्लाभट's picture

16 Dec 2014 - 11:37 am | वेल्लाभट

सिगडी मधे बख़लावा खायला विसरू नका. काहींना तुपाच्या वासामुळे हा पदार्थ आवडत नाही. मिपावर याची कृतीही पोस्ट झालेली असं कळलं गुगलताना. www.misalpav.com/node/8376

पण हा आउट्ट ऑप्फ द वर्ल्ड लागतो ब्वा. लई फेवरेट.

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 12:01 pm | मुक्त विहारि
मदनबाण's picture

16 Dec 2014 - 11:56 am | मदनबाण

मध्यंतरी माझे रमाडा { Ramada } मधे जाणे होते...मस्त जेवण आणि पोटभर चरणे झाले. वेगवेगळे मॉकटेल सुद्धा यावेळी प्यायला घेतले... खाणे आणि मोजतो ते याचा संबंध असावाच असे माझे स्पष्ट मत आहे.
Ramada
http://www.ramadanavimumbai.com/

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

खाणे आणि मोजतो ते पैसे याचा संबंध असावाच असे माझे स्पष्ट मत आहे.

असे वरील वाक्य आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 12:02 pm | मुक्त विहारि

असे वाटायला लागते...

मी पण मध्यंतरी अशीच गंमत केली होती...

ऐनवेळी संपादकांनी सांभाळून घेतले...

एखादा कान्हा, मात्रा, वेलांटी चुकली की अनर्थ....

हाडक्या's picture

16 Dec 2014 - 5:52 pm | हाडक्या

कान्हा नाई हो .. काना .. अर्थाचा अनर्थ करतेत पोट्टे.. ;)

योगी९००'s picture

16 Dec 2014 - 12:41 pm | योगी९००

मस्त वर्णन केले आहे... परत एकदा जायचा मोह होतोय पण खिश्याकडे नजर गेल्यावर मान खालतीच राहीली.

ठाण्याच्या या या उपहारगृहात जाण्याचा दोन वेळा योग आला होता (कोणाची ना कोणाची पार्टी होती). स्टार्टर्स इतके खाल्ले गेले की मला चालवत सुद्धा नव्हते...पण एकदम मोहात पाडणारे उपहारगृह आहे.

ही नवी माहिती मिळाली.
.

(अर्थात, ज्याचा त्याचा विचार आहे पण) रविवारसोडून केव्हाही लंचला गेलो तर आणखी ३०० रुपये कमी!
_______________________

(आणि वार मग तो कोणताही असो, (असा एखादा सुरेख प्लान मिळायचा फक्त आवकाश की) त्याचा फुल `रविवार' करणं जमून गेलंय ! .)

च्यॅ!! जाऊन आलोय आधी सगळ्या मिपाकरांसोबत. नवीन ते काय ह्यात !! *SCRATCH*

संजय क्षीरसागर's picture

16 Dec 2014 - 2:25 pm | संजय क्षीरसागर

फक्त `पैसे वर्सेस खाणं' असं न बघण्याचा नवा नज़रीया !

>>फक्त `पैसे वर्सेस खाणं' असं न बघण्याचा नवा नज़रीया !

त्याचं अप्रूप `पैसे वर्सेस खाणं' असं बघणार्‍यांना!!

सौंदाळा's picture

16 Dec 2014 - 2:44 pm | सौंदाळा

वाह,
बार्बेक्यु नेशन स्टाईलने प्रतिसादांचे स्टार्टर्स चालु झाले
(चिंचवड बार्बेक्यु नेशनच्या उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला) सौंदाळा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Dec 2014 - 2:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नवी माहीती मिळाली. सगळ्यांना एकत्र जायला मिळालं की नक्की जाउ.

पिंपातला उंदीर's picture

16 Dec 2014 - 3:00 pm | पिंपातला उंदीर

(इथले काही सदस्य/(सदस्या) पुन्हा नाराज होतील, तरीही)

सन्दर्भ समजला नाहि.

सतिश गावडे's picture

16 Dec 2014 - 3:05 pm | सतिश गावडे

हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली.

हेवन वगैरे काही नाही. खिशाला परवडणार असेल तर एकदा जेवण्यासाठी ठीक ठाक असे हॉटेल आहे हे. अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत.

क्या बात है! किमान तीन नांव सांगा नक्की ट्राय करायला आवडेल.

सतिश गावडे's picture

16 Dec 2014 - 3:18 pm | सतिश गावडे
सतिश गावडे's picture

16 Dec 2014 - 7:34 pm | सतिश गावडे

केलेलं जेवण (जे बहुदा ऑफिसच्या वेळात आणि ऑफिसच्या खर्चानं असण्याची शक्यता आहे)...

त्यात गैर काय आहे?

आणि स्वतःच्या प्रिय व्यक्तीबरोबर (स्वतःच्या पैश्यानं, मनमुराद आणि निवांतपणे केलेलं) सहभोजन, यातला फरकच तर स्वर्ग आहे!

जगाच्या पाठीवर फक्त तुम्हाला एकटयालाच

स्वतःच्या प्रिय व्यक्ती

आहेत आणि बाकीचे सारे अनाथ आहेत असं म्हणणं आहे का तुमचं. या मिपावरच आमचे जीव ओवाळून टाकावेत असे जीवाभावाचे मित्र आहेत आणि तुमच्या या तथाकथित हेवनला आणि तत्सम हॉटेल्समध्ये निवांत आणि स्वतःच्या खर्चाने जेवलो आहोत.

अनुभव असेल तर तो शब्दातून सहजपणे व्यक्त होतो, त्याला अभिव्यक्ती म्हणतात. जर आडातच नसेल तर पोहोर्‍यात येत नाही. अर्थात, दुसर्‍याच्या अनुभवाला कमी लेखायला प्रतिभा कशाला हवी? पुरेशी जळजळ असली की झालं!

जगाकडे पाहण्याचा चष्मा बदला. तुम्हाला आलेला अनुभव जसा तुम्ही "हेवन" म्हणून लिहिलात तसं मी माझे मत प्रतिसादात लिहिले. तुमचे शब्दबंबाळ टंकन ही सहज शब्दातील अभिव्यक्ती आणि आमचे मोजक्या शब्दातील टंकणे प्रतिभाहीन. असे का?

कवितानागेश's picture

16 Dec 2014 - 7:39 pm | कवितानागेश

कारण तू वेडायस!! =))

vikramaditya's picture

16 Dec 2014 - 10:56 pm | vikramaditya

बरोबर बोललात.

ह्याच न्यायाने, जरा कोणी पैश्याचा विषय काढला तर तो "पैसा वर्सेस काय ते स्वर्गीय सहभोजन वगैरे" मुद्दा होतो.

पण स्वतः मात्र फिक्स्ड पैशात अनलिमिटेड खायला मिळणार म्हणुन सकाळपासुन उपासमार करुन ३ तास खात बसले, तर त्याला "डुईंग जस्टीस टु फुड" वगैरे भारदस्त नाव द्यायचे!!!

जावु दे... त्यांचे सगळेच स्वर्गीय, दिव्य वगैरे असते, इतर मर्त्य मानवांना हे कसे कळणार? आपलेच नशीब थोर कि असे ज्ञान मिळत राहते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Dec 2014 - 1:27 am | विश्वनाथ मेहेंदळे

हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली

मग 99% पुस्तक परिक्षणे, सिनेमा परीक्षणे, हॉटेल्स चे reviews बाद की.

____संपादित____

मी पापी पुण्य नगरी त कधी जाणार
कधी हेवन इनसाइड हेवन मध्ये मला हि संधी मिळ्णार ?
पण आता जेव्हा कधी आयुष्यात पुण्यात येईल तेव्हा नक्की ट्राय करणारच
योगायोगाने प्रिय फार च प्रिय व्यक्ती आहेच पुण्यात
तोपर्यंत एक दिर्घ उसासा.................................................................

आज दोन लग्नाला हजेरी लावायचा योग आला. त्यामुळे जेवणाला बर्यापैकी चॉईस व्हता.
फुकटात गिळायला मिळाल्यामुळे I WAS/IS (काय असेल ते) in HEAVEN.

सौंदाळा's picture

16 Dec 2014 - 5:53 pm | सौंदाळा

संक्षीसर वर सगाने म्हटल्याप्रमाणे अशी बरीच हॉटेल्स पुण्यात आहेत.
सिगरी (ढोले पाटील रोड) : इथे बारबेक्यु आणि अल-कार्ते दोन्ही ओप्शन्स आहेत. बार्बेक्युपेक्षा ओर्डर करुन पंजाबी जेवण मागविण्याचा अनुभव जास्त चांगला आहे.
येलो चिलीज - कोरेगाव पार्क
रॉयल ओर्किड - विमाननगर
परत बारबेक्यु नेशनला जाण्यापेक्षा वरील पर्यायांचा विचार जरुर करा

संजय क्षीरसागर's picture

16 Dec 2014 - 8:50 pm | संजय क्षीरसागर

पुढल्या वेळी या पर्यायांचा नक्की विचार करेन, धन्यवाद!

प्रचेतस's picture

16 Dec 2014 - 9:05 pm | प्रचेतस

लिटल इटली ब्येष्ट.
७५० रू. प्रत्येकी अमर्यादित औथेंटीक इटालियन.
पण हे फ़क्त रविवारी लंचलाच. प्रचंड व्हरायटी असते. इतर वेळी म्हणजे सोम ते शनि बुफे लंच ला पदार्थ कमी असतात आणि डिनर ला अ ला कार्ते जे अति प्रचंड महाग असते

क्याफे मेझुना नामक हाटिल हाही चांगला ऑप्शन आहे अमर्याद इटालियन खायला. बिना दारू माणशी ८००. त्यात अमर्याद मॉकटेल्सही. बोट क्लब रोडावर आहे.

प्रचेतस's picture

16 Dec 2014 - 9:58 pm | प्रचेतस

जायलाच हवे तिकडे

माझ पुण्यातील आवडत ठिकाण MP garden .
लै बिल नाही .थाळी टैप व्हेज,नॉन चापयच.
मजेत राहायच.

दर वेळी सयाजीतल्या त्या बार्बेक्यू नेशनच्या वेटरांना आणि मॅनेजरला झाडल्याशिवाय तिथले जेवण पचतच नाही. स्टार्टर्स बरे असतात. पण तिथल्या ग्रिल्ड फिश कबाबांची चव पूर्वीसारखी राहिलेली नाही. क्रॅब करी तर इतकी फालतू मिळाली की आता आहुप्याला डोंगरयात्रेला गेल्यावरही खेकड्यांच्या वाटेला जात नाही. ओपन अँबियंसची एका धुवाधार पावसाळी संध्याकाळी गळून गळून वाट लागलेली. नेमके आमच्या टेबलाशेजारचे कूलर एका उन्हाळ्यातल्या दुपारी चक्क बिघडले होते. मेन कोर्स तिथले कधीच धड नसते. नॉट अप टू माय टेस्ट. डेझर्ट ठीकठाक. त्यापेक्षा जास्त चांगले स्टार्टर्स 'कॅफे पॅपरिका' हॉट रॉक इथे, तर चांगले मेन कोर्स 'आउट ऑफ ब्लू' इथे मिळतात.

बंगळूर आणि मुंबईतील काही बीबीक्यूज् मात्र अपेक्षेपेक्षा चांगले निघाले. असो. ह्या अ‍ॅव्हरेज हॉटेलचे एवढे गुणगाण पाहून त्याची दुसरी बाजूही मांडाविशी वाटली. उगाच पैसे खर्च करण्यात अर्थ नाही, विशेषतः स्वतःचे काबाडकष्टाचे असतील तर नाहीच नाही.

सतिश गावडे's picture

16 Dec 2014 - 10:35 pm | सतिश गावडे

>> ह्या अ‍ॅव्हरेज हॉटेलचे एवढे गुणगाण पाहून त्याची दुसरी बाजूही मांडाविशी वाटली. उगाच पैसे खर्च करण्यात अर्थ नाही, विशेषतः स्वतःचे काबाडकष्टाचे असतील तर नाहीच नाही.

मी ही दोन वाक्यात हेच लिहिले होते तर संक्षीनी मुळ मुद्दा सोडून "प्रिय व्यक्ती" चा भलताच मुद्दा लावून धरला आहे. :)

मला वाटतं तुम्ही चूकताय संक्षी. इथे समोरचा काय म्हणतोय यापेक्षा तुम्हाला तिथे मिळालेला अनूभव कसा होता हे महत्वाचं आहे, आणि मला वाटतं तुम्ही तो व्यवस्थित मांडलाय.

थांबायचं कि नाही हे मी सांगू शकत नाही, पण धाग्यावर चाललेल्या चर्चेतून तुम्हाला जे सांगायचंय तो उद्देश बाजूलाच राहीलेला दिसतोय. बाकी याउप्पर तुमची मर्जी!!

संजय क्षीरसागर's picture

17 Dec 2014 - 12:06 am | संजय क्षीरसागर

आय स्टॉप.... अँड ऑफकोर्स थँक्स!

राजस्थानातले उंट आता बंगलोरला जातात.यावर वीसएक वर्षांपूर्वी इंडिआटुडे मासीकात लेख आला होता.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2014 - 5:10 am | निनाद मुक्काम प...

येथे पाहिजे जातीचे खवय्ये
हे काम नव्हे येर्या गबाळ्याचे

पैसा's picture

17 Dec 2014 - 3:12 pm | पैसा

जास्त पैसे टाकले तरच हेवन मिळतो असं थोडंच आहे! कॉलेजात खिशात ५/१० रुपये असायचे तेव्हा कॉलेजात मैत्रिणीबरोबत एक वडा आणि कटिंग चहा डिसेंबरात सकाळी साडेसात वाजता मिळणे म्हणजे साक्षात स्वर्गप्राप्तीच की! तसंच नवरा किंवा एखाद्या मित्रासोबत एखाद्या चांगल्या पुस्तकाबद्दल, लेखाबद्दल डोकं चालायला लागेपर्यंत चर्चा करणे म्हणजे स्वर्ग. एखाद्या संध्याकाळी एकट्यानेच घराच्या गॅलरीत कसलाही विचार न करता निवांतपणे केवळ पाऊस बघणे किंवा बाकीबाब अथवा कुसुमाग्रजांचे पुस्तक वाचणे म्हणजे स्वर्ग. आईच्या हातचा गरमागरम तूपमेतकूटभात म्हणजे स्वर्ग. तसंच निष्कारण हिंदी/ऊर्दू/इंग्रजी शब्द न घुसडता शुद्ध मराठीत लिहिलेले एखादे सुंदर स्फुट वाचायला मिळणे म्हणजे स्वर्ग. असे कितीतरी लहान सहान स्वर्ग आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतात. त्यासाठी ना कोणाच्या सहवासाची गरज असते ना पैशांची. समजायची दृष्टी हवी.

शलभ's picture

17 Dec 2014 - 3:21 pm | शलभ

+१ सुरेख

प्रवचन देण्याची ऊर्मी दाबल्या गेली आहे. ;)

बाकी झेंडा खाली पाडला गेला आहे की काय? गाडी आता सगळे स्टार्टर संपून आता मेन कोर्स वर आलेली दिसते. :)
(१५८ चे ७६ म्हणजे सगळे डेड बॉल झाले की!)

पैसा's picture

17 Dec 2014 - 4:31 pm | पैसा

अवांतरः ते तुमचं इंग्लिस विंग्लिस आपल्याला कळत नै ओ प्यारे काका! सहसा असे लेखाशी सहमती नसलेले प्रतिसाद धागालेखकांना एकूणच आवडत नैत असा पूर्वानुभव असल्याने एवढा वेळ लिहायचे टाळत होते.

असे कितीतरी लहान सहान स्वर्ग आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतात. त्यासाठी ना कोणाच्या सहवासाची गरज असते ना पैशांची. समजायची दृष्टी हवी.

हे वाक्य फेसबूक स्टेटस ठेवण्याची परवानगी द्या. :)

पैसा's picture

17 Dec 2014 - 4:14 pm | पैसा

धन्यवाद रे सुड! बिनधास्त घे.

खरंतर सगळाच प्रतिसाद छान आहे, पण सगळाच टाकला तर माताय चेपुवरल्या लोकांना रेफेरेन्चे लागणार नाही. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Dec 2014 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

स्वधर्म's picture

17 Dec 2014 - 11:45 pm | स्वधर्म

एकदम पटलंय.

जयंत कुलकर्णी's picture

17 Dec 2014 - 5:34 pm | जयंत कुलकर्णी

खालील फोटो पाहिलयावर हा कसा करावा याची कल्पना येईलच. फक्त जाळी अशा व्यासाची घ्यायची की आग (मंद विस्तव) हा पदार्थाच्या खाली ४ इंच राहिली पाहिजे. जाळी कुठल्याही हार्डवेरच्या दुकानात मिळते. घमेले पण....उरल्या सळया...त्याला मात्र लाकडी मुठी बसवून घ्याव्यात म्हणजे हाताला चटके बसत नाहीत....अर्थात आधी हाताला चटके मग मिळती कबाब असा अनुभव हवा असल्यास त्याची आवश्यकता नाही.... :-)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यातच भाजलेले मटन/चिकन कबाब....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एस's picture

17 Dec 2014 - 6:21 pm | एस

अहाहा! स्वर्गनिर्वाणप्राप्त्यरोमांच वगैरे वगैरे!...

खटपट्या's picture

17 Dec 2014 - 11:32 pm | खटपट्या

वा घरच्या घरी बार्बेक्यू !! (पण वासाने बाजुचा गुजराती भडकेल)

मुक्त विहारि's picture

18 Dec 2014 - 8:24 am | मुक्त विहारि

साहजीकच आहे....

हा असा पदार्थ एकटा खाल्ला तर कुणीही भडकणारच...

खटपट्या's picture

18 Dec 2014 - 9:42 am | खटपट्या

अहो तो शाकाहारी आहे. त्याची बायको माझ्या बायकोला विचारत होती की तुम्ही मच्छी सोडू शकत नाही का?

त्यावर माझ्या बायकोचे बाणेदार उत्तर - "नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"

तुम्ही पण बाणेदार पणा दाखवा.. आणी बार्बेक्यु करुन खावा..

(ह घ्या.)

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 11:29 am | सतिश गावडे

नवरा सोडून देइन वगैरे बोलण्याची गोष्ट झाली. जर कुणी असा बाणेदारपणा दाखवला तर त्याची "प्रिय व्यक्ती" त्याला ग्रिलवर भाजून खाण्याची शक्यता जास्त आहे.