बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
15 Dec 2014 - 2:39 pm

काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं).

.
(फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते.

तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात :

.

त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.

जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.

त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!

तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.

मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).

साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.

वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स.

(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)

(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Jan 2016 - 3:45 pm | पैसा

मी हायपोथेटिकली लिहिलंय. असं असू शकतं. पण दर वेळी असेलच असं नव्हे. एकदा त्याना चांगला अनुभव आला. समजा, त्या दिवशी जेवण बिघडलेलं असतं, किंवा वेटर दुर्लक्ष करणारा मिळाला असता, किंवा जाता जाता त्यांचं डोकं दुखायला लागलं असतं तरी असाच आणि एवढाच आनंद आला असता का इतका साधा प्रश्न आहे. जर त्यांना प्रश्न विचारायचे नसतील तर एखाद्याने किल्ल्यावर किंवा बर्फात मुक्काम टाकला म्हणून त्यालाही हसू नये. "त्यानी लिहिलंय, तुम्ही प्रश्न का विचारता" असं म्हटलं तर कोणाच्याही कोणत्याही लेखावर एकही प्रतिक्रिया लिहू नये कोणीच.

अगम्य's picture

20 Jan 2016 - 7:34 pm | अगम्य

प्रतिसाद देण्याचे स्वातन्त्र्य तर आहेच. परंतु त्यांनी "पत्नीच्या आग्रहाखातर" इतके स्पष्ट लिहिले असून सुद्धा असा हाय्पोथेटिकल प्रतिसाद ही ओढून ताणून आणलेली नकारात्मकता वाटते हे माझे मत. आता इथे गोव्याच्या इतिहासावर एक सुंदर लेखमालिका आहे. त्यावर मग "फक्त गोव्याचा इतिहासच रोचक आहे असे थोडेच आहे? केरळचा इतिहास तुम्हाला रोचक वाटत नाही का? काही वेळा दाखवले असेल शौर्य पण समजा ते घाबरले असते तर ?" किंवा डॉक्टर खरे साहेबांच्या वाचनीय लेखांवर "फक्त नौदल देशाचे रक्षण करते असे थोडेच आहे? खरे साहेब जर उंदीर मारायचा विभागात कारकून असते तर त्यांना असेच थरारक अनुभव लिहिता आले असते का?" असे अनेक प्रश्न विचारता येतील. अगदी तुमचेच लाईट, gas, नोकर हे उदाहरण आणखी ताणून "मग समजा अतिरेक्यांनी तुमचे अपहरण करून कोंडून ठेवले तरीही आनंद वाटेल का?" असेही विचारता येईल. इथे बरेच लोक आपल्या प्रवासाची वर्णने लिहितात, फोटो टाकतात. बहुसंख्य मिपाकर (त्यांना त्या ठिकाणची ट्रिप परवडत असो वा नसो) स्वागतपर प्रतिसाद देतात. बहुतेक लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला घरबसल्या त्या ठिकाणची सफर घडवलीत. कोणी असे म्हणत नाही कि "एवढा खर्च करून युरोपला जायची काय गरज? तुम्हाला खर्च करून ट्रिप केल्याशिवाय आनंद मिळत नाही का? घरबसल्या डिस्कवरी चानल वर युरोप फुकट बघता येतो". अशा पार्श्वभूमीवर एका सुखद अनुभवाच्या सरळ वर्णनावरचे असे हाय्पोथेटिकल प्रतिसाद म्हणजे क्रिकेटच्या सामन्यांच्या वेळेला देशी खेळांचा जाज्ज्वल्य अभिमान थाटाचे वाटले. असो. तुम्हाला आणि इतर कुणालाही प्रतिसाद द्यायचे स्वातंत्र्य तर आहेच. पण एखादी गोष्ट खटकली तर ती नोंदवायचे स्वातंत्र्य मलाही असावे असे वाटले म्हणून हा प्रपंच.

विवेक ठाकूर's picture

20 Jan 2016 - 8:27 pm | विवेक ठाकूर

"पत्नीच्या आग्रहाखातर" इतके स्पष्ट लिहिले असून सुद्धा असा हाय्पोथेटिकल प्रतिसाद ही ओढून ताणून आणलेली नकारात्मकता वाटते

आणि दाखले तर असे एकसोएक दिलेत की वाचून नकारात्मकता दूर होईल अशी आशा करु.

अगम्य's picture

21 Jan 2016 - 12:09 pm | अगम्य

ठाकूर साहेब, तुम्हीच श्री क्षीरसागर आहात ह्याची मला जवळजवळ खात्रीच आहे. तुम्हाला श्री किसन शिंदे साहेबांनी दिलेला सल्ला परत देऊ इच्छितो. तुम्ही लेख चांगला लिहिला आहे, पण प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देण्याचा फंदात पडू नका. प्रतिवाद करण्याचा अभिनिवेशात एक शब्दही वावगा जाणार नाही ह्याची तुम्ही खात्री देऊ शकत नाही. आणि मग त्याचेच भांडवल होऊन धाग्याला अप्रिय असे वळण लागते. ह्याउप्पर आपली मर्जी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

20 Jan 2016 - 8:57 pm | पैसा

म्हणजे संजय क्षीरसागर हेच विवेक ठाकूर हे तुम्हाला पक्के माहीत आहे तर! त्या दोघांच्या मनात काय आहे हे तुम्ही इतके ठामपणे कसे सांगताय पण?

http://www.misalpav.com/comment/793434#comment-793434 इथे

मला व्यक्तिशः लोकांच्या पैश्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं कायम नवल वाटत आलं आहे. बर्फाच्या घरात झोपण्यासारख्या विक्षिप्त कल्पनेसासाठी एखादा लाखो रुपये खर्च करतो आणि लोकांना ते ग्रेट वाटतं. हजारो मैलांचा प्रवास, कमालीचं विपरित हवामान, अत्यंत काँप्लिकेटेड व्यवस्था, त्यात कुठे काही चुकलं तर नाहक जीवावर बेतण्याची शक्यता, खाण्यापिण्याच्या गैरसोयी ... आणि मजा म्हणजे शेवटी आनंद तोच ! पण असं म्हटलं की लोक म्हणतात वडापाव आणि कटींग चहामधे आम्हाला मजा येते कशाला हवा तो बीबीक्यू ! लोकांची विचारसरणी एक्स्ट्रीम वाटते.

असाच अनुभव मला स्प्लेंडर कंट्रीच्या लेखावर आला. लोक पर्यटनासाठी किंवा दुर्गम तिर्थक्षेत्री जायला, कितीही हजार खर्च करतील, काहीही खातील, अशक्य वणवण करतील पण एखाद्या जवळच्या लोकेशनला, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन-चार दिवस रमायचं म्हटलं तर हॉटेलचं टॅरीफ बघतील !

हे सगळं ठाकूर यांनी लिहिलं, आणखी कुठे कुठे सुख आणि आनंद काय हे आपल्याला समजलंय असं ते आत्मविश्वासाने सांगत आहेत म्हणून प्रश्न विचारायची वेळ आली. (त्या प्रश्नाचं सरळ उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही.) नाहीतर या धाग्यावर लोकांच्या अकला काढणारे क्षीरसागर यांचे इतके प्रतिसाद पडले आहेत की या धाग्यावर यायला पण नको वाटतं. राहिला प्रश्न लोकानी मला किंवा डॉ खरे यांना असले प्रश्न विचारायचा. ते विचारले गेले आहेत आणि आम्ही त्यांना कोणाच्याही अकला न काढता शांतपणे उत्तरे दिली आहेत.

आधी तुम्ही या संस्थळावर कार्यक्षम (अ‍ॅक्टिव्ह) नसतानाही संक्षींना काय म्हणायचं होतं हे तुम्हाला कळावं, हे नवल आहे.

तुला अज्जून नवल वाटते याचे नवल आहे.

सतिश गावडे's picture

20 Jan 2016 - 10:59 pm | सतिश गावडे

आपण धन्याला उद्देशुन लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्या मत मांडेलच पण धन्या त्याच्या मतावर ठाम आहे. मित्रांसाठी आणि मित्रांच्या आनंदासाठी धन्या बार बे क्यु नेशनला आला होता एवढेच सांगू इच्छितो. :)

अगदी हेच लिहीणार होतो मी. मित्रांसाठी कायपन. कालपन आजपन आनि उदयापन.

गेल्या वर्षीच्या जानेवारीतील गोष्ट. आमच्या एका मित्राचा ह्याप्पी बड्डे होता. त्याला आम्ही पार्टी द्यायची ठरवलं. कुणी म्हटलं बारबेक्यू नेशन. त्यावर कुणी म्हटलं सिगरी. बारबेक्यू नेशनपेक्षा भारी आणि महागही. या "भारी" हाटेलांचं गणित आम्हाला चांगलंच माहिती होतं. पण म्हटलं होऊ दे खर्च. दोस्तासाठी कायपन. हितं आनि तितं पन.

मात्र मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे, "संजय क्षीरसागर" या सदस्याची बाजू "विवेक ठाकूर" हे सदस्य इतक्या हिरीरीने का मांडत आहेत? काय असावे बरे यातले गुपित?

-आपलाच
सगा/धन्या/फटू

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 11:53 pm | यशोधरा

सगा/धन्या/फटू, विठापण मित्रांसाठी कायपन. कालपन आजपन आनि उदयापन अणि हितं आनि तितं पन,करताहेत बहुतेक. त्याशिवाय का इतक्या हिरीरीने मतं मांडतील?

ह्म्म...तोडणे सोपे जोडणे अवघड....

दुर्दैवी घटनाक्रम!

मालोजीराव's picture

18 Jan 2016 - 12:10 pm | मालोजीराव

किमतीच्या मानाने स्टार्टर्स सर्वसमावेशक नाहीत सी फूड मध्ये फक्त बास्सा देतात पापलेट,सुरमई,क्रॅब,लॉबस्टर,टायगर प्रॉन्स कधी दिसले नाहीत. मटण मध्ये सुद्धा सिक कबाब, मटण पॅटी आहेत चॉप्स, रान, बफेलो चिप्स,टुनडे कबाब वगैरे काहीही उपलब्ध नाही. 1000 रुपयात याचा समावेश व्हायला काही हरकत नाही.

अभिजीत अवलिया's picture

18 Jan 2016 - 7:33 pm | अभिजीत अवलिया

डॉ. खरेंशी सहमत. बार-बे-क्यू नेशन खूपच महाग झाले आहे. आमच्या कंपनीत पण बर्याचदा काही पार्टी वगैरे असल्यास बार-बे-क्यू नेशनला जाणे होते. पण वैयक्तिकरित्या इतके पैसे एका जेवणाला घालवणे मनाला पटत नाही. कदाचित लहानपणीचे आयुष्य थोडे कठीण, तडजोडीने घालवलेले असल्याने असे होत असेल.
दुसरे म्हणजे दुपारपासून कमी खायचे किंवा दुपारी उपाशी राहायचे आणी रात्री तिथे जाऊन फक्त पैसे वसूल करण्यासाठी बकासुरासारखे खायचे वगैरे स्वभावात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी गेलो तरी मला १५-२० मी. पुरतात जेवायला. जेव्हा अन्य सर्वांचे तिथेच जायचे असे मत होते तेव्हा मात्र नाइलाज होतो. आपण एकटेच सर्वांच्या विरुध्ध बोलणे ठीक वाटत नाही.

मोगा's picture

19 Jan 2016 - 11:39 am | मोगा

स्वस्त दुसरे ऑप्शन आहेत का?

प्राची अश्विनी's picture

19 Jan 2016 - 12:26 pm | प्राची अश्विनी

टेंझो टेंपल एक जरा स्वस्त आॅप्शन आहे.

होबासराव's picture

19 Jan 2016 - 12:26 pm | होबासराव

जन्नत दरबार लजिझ खाने का मरकझ
फुलारि गल्लि,मोमिन पुरा अकोला.

अपना नाम बोलना उधर तेरे लिये सब गोश्त बडे का रहेगा
उधर थोडा बाजु मैच बडे के गोश्त के समोसे बि मिल्ते १० रु मे तिन.
नोश फर्मा..ऐश कर

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2016 - 12:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

जन्नत दरबार नाही हो गाववाले,

होटल अल मन्नान, लज़ीज़ खानो का मरकज़ आहे ते, आमच्या मित्राच्या काका ऍम सासऱ्याचे हॉटेल आहे :D :D

बाकी लै ख़ास आठवणी जाग्या केल्या, अस्सल मुगलाई पद्धतीची कोंबड़ी अन बकरा (पार शोरवा ते पाया निहारी) खायचे असेल तर हॉटेल अल फ़ारुख़ उत्तम आहे , गारंटीड बोकड़ किंवा कोंबड़ीच मिळेल बड़ा किंवा कौवा बिरयानी नाही :D

होबासराव's picture

19 Jan 2016 - 1:17 pm | होबासराव

आता हे मले माहित हाय ना..पन मोगा ले आता सस्तात ल काय सांगाव आन जे त्याली बि आवडल्..म्ह्नुन मंग ते अंडा मस्जिद जौळ (अमरसिंग च्या दुकाना पुढ) एक लंगडा बसत जाय बडे के गोश्त के समोसे घेउन, आपला दोस्त फिरोझ (राहणार भांडपुरा बैल जोडि) बम्म सहा सहा समोसे हानत जाय...

मोगा's picture

19 Jan 2016 - 1:42 pm | मोगा

आम्ही शाकाहारी आहोत

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2016 - 2:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

मग इथे सगळ्यांची डोकी कश्याला खाता मोगा :D

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 12:09 am | संदीप डांगे

गेल्या दोन वर्षात खास हॉटेलला जाऊन जेवणे झाले नव्हते. पंधरा दिवसांआधी बायकोला म्हटलं चल बारबेक्यूनेशनला जाऊ, नाशिकमधेही आलंय. तीने नको नको म्हणत शेवटी होकार दिला. गाडी मुंबई-नाक्यावरून वळवली आणि लक्षात आलं जवळंच एसएसके सॉलिटेयर नावाचं नवं लग्जरी हॉटेल आहे, त्यांच्याही सातव्यामाळ्यावरच्या टेरेसवर बारबेक्यु सदृश्य काहीतरी आहे. म्हटलं बाने दूर आहे सिटीसेंटरला, जाइस्तोवर, पार्किन्ग मिळेस्तोवर उशिर होईल. चल इकडेच ट्राय करू. इथे वॅले पार्किंग आहे. गाडी वॅलेवाल्याकडे सोडून आम्ही वर टेरेसवर पोचलो. तर तिथे कुणीच नव्हते. कसे असणार. सोमवार संध्याकाळचे आठ वाजले. कॅप्टन पुढे आला. सगळे टोपी घातलेले शेफ काम करत होते. आम्हाला कुठे टेबलावर बारबेक्यूचे खण दिसले नाही. म्हटले आपली फसगत नाही ना झाली. कॅप्टन बोलला, नाही असे काही नाही, या बसा.

मग आम्ही बसलो. वर मोकळे आकाश, वरून छान दिसणारे नाशिक-सिटी-लाइट्स. गुलाबी थंडी. आणि आम्ही चौघंच. मी, बायको, दोन्ही मुलं. बाकी कोणी कस्टमर आले नव्हते. मी कॅप्टनला विचारले, काय रे बाबा, कुणी येते की नाय इकडे खायला. तो म्हणाला साहेब सोमवारी कोण येणार या वेळेला जरा उशिराने येतील लोक.

मग ताटात एक एक जबरदस्त वेज-नॉनवेज नमुना यायला सुर्वात झाली. पोट भरेस्तोवर. वेटर आणून अदबीने वाढत होते. मग बुफे झाला. त्यानंतर स्वीट्स टेबलवर सर्व झाले तेही अनलिमिटेड. आइस्क्रिम, मुगाचा हलवा, गुलाबजाम. सगळे जेवण निव्वळ अप्रतिम. मागे बर्‍याच मोठमोठ्या हॉटेल्समधे महागड्या डिशेसच्या नावाखाली गचाळ खाणं खायला लागल्याने आम्ही हॉटेल्स टाळणेच सुरु केले होते. बारबेक्यू नेशन नेहमीचे म्हणून आज ट्राय करायचे ठरवले पण त्याहीपेक्षा हे सरप्राईज मस्तच वाटले. बारबेक्यूपेक्षा कैक पटीने चांगले जेवण होते.

संपूर्ण डीनर बाकी कोण कस्टमर आलेच नाही. सगळा क्रू आमच्यासाठी खास बुक केल्यासारखा हजर होता. ते दोन तास अविस्मरणीय राहतील. कारण असे कधी ठरवून घडवून आणायचे तर बरेच पैसे मोजावे लागतील. त्यादिवशी किती लागले?

फक्त ५४९ रुपये प्रतिमाणशी. त्यात दोन्ही मुले फ्री.. ते जास्त आवडले. हॉटेल बघता टिपसह ११५० रुपये काहीच नाही. त्यादिवशी हॉटेलचे 'एकासोबत-एक-मोफत' कुपन सोबत नव्हते ही एकमेव (मध्यमवर्गीय) बोच.

घरी येतांना दोन मगई मसाला घेतले. ती अचानक ठरलेली डिनर नाइट इतक्या कमी पैशात इतकी जबरदस्त झाली की बस...

--वेगळा धागा काढायचा नव्हता पण अनुभव टंकायचा होता----

संक्षी, डॉ. खरे, विठा, डांगे यांचे प्रतिसाद आवडले.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Jan 2016 - 1:29 pm | ईश्वरसर्वसाक्षी

इथे एकदाच गेलोय, व्हेज खाणार्‍यांसाठि फार काहि पर्याय नाहियेत आणि मांस जळण्याच्या वासाने त्रास हि झालाय.

पुण्यात गेला असाल तर कुठल्या बाने मध्ये जाता त्यावर पण हा फरक पडतो. डेक्कन च्या बाने मध्ये सयाजीवाल्या बाने पेक्षा जास्त पर्याय आहेत. तुम्ही त्यांना सांगु देखील शकता काही भाज्या नसतील तर. डेक्कन वाले तत्परतेने तुमच्यासाठी का होईना देतात आणुन.

नगर रोड वर देखील पर्याय बरेच आहेत.

हम्म.डेक्कन नदीच्या अलीकडच्या पुण्यातले!बाने पण तो सवतासुभा पाळून आहेत म्हणजे ;)

पुण्यात डेक्कन नदी आहे ही नवी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

एक काॅमा काय राह्यला आलीच पुणेकरीण.

स्रुजा's picture

20 Jan 2016 - 7:01 pm | स्रुजा

लोल

द्विशतकाबद्दल धागाकर्त्याचा हेवनातल्या अप्सरांकडून पुस्प्गुच आणि बानेचं मेनुकार्ड देऊन सत्कार करण्यात येत आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 6:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा दर का काहीतरी स्कीम चालु होती म्हणे. १०व्या अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त.

प्रचेतस's picture

20 Jan 2016 - 6:45 pm | प्रचेतस

हो.
४५० रूपये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 6:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१० वर्षांपुर्वी लैचं हुच्चं आणि महाग होतं की.

कपिलमुनी's picture

21 Jan 2016 - 9:22 pm | कपिलमुनी

असा दर होता

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 7:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

२०० झाले? वा. सत्कार.

हेलाकाकांना बोलवा. आणखी २०० होतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 7:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

विषय काय ठेवावा? कोळसा फुंकुन देशाचं भलं होणारे का?

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 7:54 pm | यशोधरा

कोळसा फुंकणे देशाच्या संस्कृतीत बसते का

हेमंत लाटकर's picture

20 Jan 2016 - 9:50 pm | हेमंत लाटकर

बायको बरोबर निवांत बोलण्यासाठी व खुष करण्यासाठी मानसी ₹ 750 जास्तच आहे. त्यापेक्षा लाँग डाईव्ह करत लोणावळ्याला पावसात भिजत कांदे भजी व गरमागरम चहा घेतल्यास मिळणारा आनंद जास्त स्वर्गीय असेल.

आदूबाळ's picture

20 Jan 2016 - 9:56 pm | आदूबाळ

कोण मानसी?

अजया's picture

20 Jan 2016 - 10:19 pm | अजया

लोल =))

गामा पैलवान's picture

20 Jan 2016 - 10:07 pm | गामा पैलवान

हेला,

लोणावळ्याचं एक बरंय. ते म्हणजे जर स्वर्गीय आनंद मिळाला नाही तर प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन आनंदाचा अनुभव घेण्यासाठी वाट सुधरण्यास असंख्य दरीखोरी तिथे सहज उपलब्ध आहेत. ;-)

आ.न.,
-गा.पै.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 11:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बायको असताना मानसीपण? शोभत नाही भारतीय संस्कृतीला. लग्नं नं टिकायच्या कारणांमधलं हे एक.

प्रसाद१९७१'s picture

22 Jan 2016 - 4:15 pm | प्रसाद१९७१

७५० रुपयात तुम्हाला "मानसी" मिळतीय आणि तरी तुम्हाला ती महाग वाटतीय हेलाकाका?

ईश्वरसर्वसाक्षी's picture

22 Jan 2016 - 4:19 pm | ईश्वरसर्वसाक्षी

कि नेक्श्ट अणु हल्ल्याचि तयारि करताहेत ?

मितभाषी's picture

20 Jan 2016 - 11:03 pm | मितभाषी

विठा म्हणतात 'तो'आत्मानंद स्थळकाळ विरहित चिरस्थायी असताना, मग बाह्यपरिस्थिती, व्यक्ती याची गरज काय?

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 11:18 pm | संदीप डांगे

बैलाच्या डोळ्याच्या बुबुळाच्या अगदी सेंटरच्या मध्यावरच! दाण्ण्ण!

उगा काहितरीच's picture

20 Jan 2016 - 11:31 pm | उगा काहितरीच

इतका वेळ बारबेक्यु नेशन चा धागा चघळल्या गेल्याबद्दल सदर हॉटेल चालकाने मिपाकरांना खास सवलत दिली पाहिजे . किंबहुना एखादा मोठ्ठा कट्टा स्पॉन्सर तरी केला पाहिजे .

पिलीयन रायडर's picture

21 Jan 2016 - 12:59 pm | पिलीयन रायडर

प्रिय व्यक्ति सोबतचा आनंद वगैरे ठिक आहे.. प्रेम असेल तर घरात दोडक्याची भाजी आणि सकाळची थंड पोळी खाताना सुद्धा तो मिळु शकतो..

पण BBQ खरंच अतिमहाग आहे. शाकाहारी लोकांसाठी तर अतिच. मुळात माझ्या कष्टाच्या पैशातुन मी अजिबात वर्थ नसलेले पदार्थ का खावेत? तेच तेच स्टार्टर्स.. आणि मुख्य जेवणही अगदीच सुमार. ह्या लोकांना त्याचा सगळा फोकस केवळ पहिल्या कोर्सवर दिलाय. मग पुढे सुप, भाज्या, रोट्या किंवा अजुन जे काही असेल तर अगदीच सामान्य असतं. मी अगदी आनंदाच्या डोहात जरी असले तरी चार भाज्या बार्बेक्यु करुन खायला १०००/- मी मोजु शकत नाही..

हेमंत लाटकर's picture

21 Jan 2016 - 1:19 pm | हेमंत लाटकर

लहान लहान गोष्टीतूनही आनंद मिळू शकतो, त्यासाठी इतक्या महाग BBQ मध्ये जाऊन कष्टाचा पैसा उधळणे बरोबर नाही. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने बचतीला जास्तीत जास्त प्राधान्य दिले पाहिजे.

लोल हेलाकाका. एक धागा काढूनच टाका. "हॉटेलांवर पैसे उधळण्याची प्रवृत्ती आणि समाजहित". आकडेवारी मी पुरवतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 3:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुस वशाडी येऊ आदूबाळा!!! :D :D

(कृपया हलके घेणे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2016 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेला काका (लै वेळची संधी शोधत होतो हेला लिहायची) मुद्दा 'बिंदुगामी' (शब्दसौजन्य यनावाला) आहे. सातशे रुपये उधळणे खुपच आहे. एखाद्या देवासाठी पाच पन्नास रुपयांचं नारळ घेऊन ते फोडुन त्यातलं तीर्थ म्हणुन प्राशन करण्यातला आनंद सोबत खोबरंही प्रसाद म्हणुन खातांना कसला भन्नाट आनंद मिळतो. बार बे क्यु मधे हा आनंद मिळणार नाही. संक्रातीला एखाद्या आजीला नमस्कार केल्यानंतर अचानक त्यांनी मस्त तीळगुळाच्या पापड्यां हातात ठेवल्यावर त्या पापड्या खातांनाचा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. सच्याचा पुढे येऊन फटकावलेला चेंडु जेव्हा सिमारेषेबाहेर जातो त्याचा मिळणारा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. दहा रुपयांच्या रस्त्यावरच्या गाडीवरील पाणी पुरीचा आनंद बार बे क्यु मधे नाही. मैत्रीणीने मस्त डाळिंब, काकडी आणि मस्त फोडणी देऊन आणलेल्या कोशींबिरीचा आनंद बार बे क्यु मधे मिळणार नाही. पाचशे रुपयांचा आवडता फसक्लास फुल बाह्यांचा टीशर्ट अंगावर घातल्यानंतर स्वतःकडे पाहात होणार्‍या आनंदाची तुलना बार बे क्यु मधल्या जेवणाला नाही. दीडशे रुपयातली मस्त थाळीतले मेनु पाहुन भरपेट जेवण झाल्यानंतरचा आस्वाद कदाचित बार बे क्यु नेशन मधे नसेल. आनंदाच्या एक नाही हजारो जागा आहेत म्हणुन बार मे क्यु मधे जेवून तृप्त झालेल्याच्या आनंदाची तुलना उगाच याच्या त्याच्याशी करण्यात आणि खुप महागडं आहे असं म्हणन्यात काय मतलब आहे. बार बे क्यु नेशन मधे जेवणार्‍याला ते व्हर्जन आनंदायी वाटत असेल, आणि तो आनंद समजून घेता येत नसेल तर त्या आनंदाची चिरफाड कशाला काय म्हणता.

शेर अर्ज है.

अभी कदम रखाही था मयखाने मे की आवाज आयी
चला जा वापस क्युकी तुझे शराब की नही किसीके दीदार की जरुरत है.

-दिलीप बिरुटे
(टाईमपासचा मुड असलेला)

मालोजीराव's picture

21 Jan 2016 - 5:22 pm | मालोजीराव

.

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 5:36 pm | प्रसाद१९७१

तुम्ही अजुनही "हेला" चा अर्थ विस्कटुन सांगितला नाहीत.

आम्हालाही "हेला" लिहीताना मजा घेऊ द्या की!!!

हेमंत लाटकर's picture

21 Jan 2016 - 5:55 pm | हेमंत लाटकर

चिरफाड कशाला काय म्हणता.

दिबि, मी तुलना किंवा चिरफाड करत नाही.

हेमंत लाटकर's picture

21 Jan 2016 - 6:16 pm | हेमंत लाटकर

स्वत:च्या खिशाला चाट न पडता मित्रांनी दिलेल्या पार्टी मध्ये मिळालेले जेवण तृप्त करणारेच असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2016 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे, देवा... हेही खरं आहे. पण मित्रांनी मला पैसे मागितले असते तरी मला तितकाच आनंद मिळाला असता काका.
तुमची शप्पथ ना काका. लो यु ना काका. आता प्लीज नका ना टाकू गडे उपप्रतिसाद. आपले प्रश्न संपणार नैत हे मला माहिती आहे ना काका.

-दिलीप बिरुटे
(हेलाकाकाचा पुतण्या) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2016 - 6:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं मार्क कापता असं लक्षात आलेलं आहे. हेलाकाकांचे कधी कापणार तुम्ही मार्कं? =))

-जॅक स्पॅरो-
(हेलाकाकांचा लाडका पुतण्या)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2016 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

लो यु ना काका.

हे पाहिलं नाही काय ? त्यात पुतण्या समाविष्ट नाही... त्यासाठी वेगळा आकार पडेल की काय याची विचारणा करून पहा ;)

हेमंत लाटकर's picture

22 Jan 2016 - 4:45 pm | हेमंत लाटकर

(हेलाकाकांचा लाडका पुतण्या)

मी देशस्थ तुम्ही कोकणस्थ जमणार नाही.

' लो यु ना काका '
- आदी काळापासून चालत आलेले 'काका पुतण्या' प्रेम इथेही उतू चाललेले पाहून ..
काय ते.. डोळे.. मन.. भरून.. वगैरे .. वगैरे ..

खेडूत's picture

21 Jan 2016 - 10:24 pm | खेडूत

बार-बे-क्यू ?

क्यूं-बे-बार बार????????

आदूबाळ's picture

22 Jan 2016 - 12:09 am | आदूबाळ

दोनशे (प्रकाशित आणि कैक हेवनवासी) प्रतिसादांनंतर पीएस्पीओ प्रश्नः

Barbeque या शब्दाची फोड बार-बे-क्यू अशी का केली आहे?

पैसा's picture

22 Jan 2016 - 12:48 pm | पैसा

बार आवडतो त्या लोकांच्या सोयीसाठी

यशोधरा's picture

22 Jan 2016 - 12:56 pm | यशोधरा

आकडा लावायचाय का?

पैसा's picture

22 Jan 2016 - 12:59 pm | पैसा

फार ओढाताण होईल. आधीच ५०० पार २/३ धागे आहेत बोर्डावर. हे म्हणजे पाल ताणून डायनॉसोर करण्यासारखे होईल.

कवितानागेश's picture

23 Jan 2016 - 1:37 pm | कवितानागेश

तोच तर धागाविषय आहे!
बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)

बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)

हो गं हो माऊ! अगदी बाडिस.

सतिश गावडे's picture

22 Jan 2016 - 8:34 pm | सतिश गावडे

सारे हॉटेल एक बार, बार्बेक्यू बार बार !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2016 - 9:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण पत्रा मोडलात म्हणे सासंमधे जाउन.

_/\_

सतिश गावडे's picture

22 Jan 2016 - 9:57 pm | सतिश गावडे

ती एक वेगळीच कथा आहे. :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2016 - 10:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बरेचं दिवसांत वेगळी कथा ऐकली नाही आणि मिपावर सद्ध्या विंट्रेस्टिंग काही येत नाहिये. त्यामुळे सांगु शकतोय्स =))
लागलं नाही ना रे बाबा? टी.टी घेउन टाक घेतलं नसशील तर.

सतिश गावडे's picture

22 Jan 2016 - 10:26 pm | सतिश गावडे

थोडक्यात बचावलो. त्याचीच कथा आहे. सप्ताहांतात लिहितो.

नाखु's picture

23 Jan 2016 - 12:52 pm | नाखु

वाट पहातो आहोत.

तेव्हढीच रक्षण-भक्षण धाग्यात थोडा विरंगुळा (याचा पुणे सातारा रस्ता येथील विरंगुळा या महागड्या हाटेलाशी काहीही संबध नाही आणी जोडू नये).

नम्र वाचक नाखु