बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
15 Dec 2014 - 2:39 pm

काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं).

.
(फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते.

तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात :

.

त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.

जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.

त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!

तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.

मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).

साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.

वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स.

(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)

(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

18 Dec 2014 - 11:38 am | खटपट्या

असेलही.

पैसा's picture

18 Dec 2014 - 8:54 am | पैसा

लै भारी!

धर्मराजमुटके's picture

18 Dec 2014 - 12:43 pm | धर्मराजमुटके

"नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"

जवळपास अशीच म्हण गुजराती भाषेत पण आहे. गुजरातच्या काही भागात तरुणांमधे गुटखा आणि वयस्कर व्यक्तीमधे बिडीचे फार व्यसन आहे. कुणी त्यांना बिडी सोडायला सांगीतली की ते म्हणतात "बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे." आणि खरोखर वेळ पडली तर बायडी सोडली पण बिडी न सोडलेली कैक उदाहरणे देखील प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहेत.

खटपट्या's picture

19 Dec 2014 - 8:11 am | खटपट्या

बाप्रे !!!

बॅटमॅन's picture

19 Dec 2014 - 3:01 pm | बॅटमॅन

"बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे."

अगागागागागागा _/\_

hitesh's picture

19 Dec 2014 - 2:55 pm | hitesh

मुंबैत कुठे आहे असले ?

डेक्कनलाही आहे बार्बेक्यू नेशन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2016 - 6:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस, धन्या, आणि प्रशांत बरोबर बार-बे-क्यू नेशनचे सर्व व्हेज पदार्ध इंजॉय करता आले. तृप्त जाहलो. भन्नाट अनुभव होता.
पाहुणचाराबद्द्ल आभार दोस्तहो. फोटो निवांत डकवतो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

17 Jan 2016 - 6:42 am | प्रचेतस

खरंच.
काल अक्षरश: हेवनवासी जाहलो.

विवेक ठाकूर's picture

17 Jan 2016 - 12:35 pm | विवेक ठाकूर

म्हणजे हा प्रतिसाद :
हिंजवडी भागात काम करणार्‍या प्रत्येकाला माहिती असणार्‍या हॉटेलचे कोलंबसाने अमेरिका शोधण्याच्या धर्तीवर केलेले ग्लोरीफिकेशन वाचून अंमळ मौज वाटली. हेवन वगैरे काही नाही. खिशाला परवडणार असेल तर एकदा जेवण्यासाठी ठीक ठाक असे हॉटेल आहे हे. अशा पद्धतीची हॉटेल्स पुण्यात ढीगाने आहेत.

बोगस होता. लोकांची दिशाभूल करून त्यानं स्वतः मात्र तिथे हजेरी लावली! आणि कंपूबाजांच्या मत्सरामुळे संकेतस्थळानं एक आयडी गमावला.

यशोधरा's picture

17 Jan 2016 - 12:39 pm | यशोधरा

हो ना! काय हे कंपूबाजांनो? शोभतं का हे तुम्हांला? हा हंत! हंत! तुमच्यामुळे एक आयडी गमाबला बरं मिपाने! दुत्त कुठले!! आणि जाउद्या हो ठाकूरसाहेब, पुन्हा आलाय ना तोच आयडी! झालं तर.

पैसा's picture

17 Jan 2016 - 1:27 pm | पैसा

नीलकांतला व्यनि केला की झाले. हाकानाका! शिर सलामत तो आयडी पचास!

त्या अहंगंडानं पछाडलेल्या व्यक्तीचं एकमेव गोष्टीसाठी कौतुक वाटायचं - संस्थळावरून हाकलला गेल्यावर परत आला नव्हता डु-आयडी घेऊन. आता तेही नाही राहिलं. मातीचे पाय याचेपण... अरेरे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2016 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी संकेस्थळावरुन कोनाला ब्लॉक केलं म्हणजे त्याला हाकलून दिलं असं म्हनू नये असे वाटते. कोणी संकेतस्थळाचे काही नियम भंग केले म्हणून ती मालकांनी ती केलेली कार्यवाही असते त्यात सदस्यांना फार आनंद होऊ नये असे वाटते आणि त्यामुळे कोणी कोंणाला हिनवू नये असेही वाटते. आज कोणी सदस्य सुपात आहे तर कोणी सदस्य जात्यात आहे. एक सदस्य म्हणून माझं मत व्यक्त केलं आपल्याला अशा गोष्टीचं कौतुक असेल, आनंद होत असेल तर मी आपल्या मताचा आदर करतो. वाटलं ते बोललो कदाचित मी चुकही असेन. :)

-दिलीप बिरुटे

साहित्य संमेलनाचा वृ लिहा बरं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2016 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी समीक्षा किती थिटी ? किती संपन्न. या दुपारी बारा वाजता सुरु झालेल्या परिसंवादास मी उपस्थित होतो. जेष्ठ समीक्षक प्रा. दीगंबर पाध्ये होते तर डॉ.दिलीप धोंडगे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. महेश खरात, डॉ. मिना गोखले, डॉ. रणधीर शिंदे या परिसंवादात सहभागी होते. समीक्षा म्हटली की बा.सी. मर्ढेकर यांच्या नावाची चर्चा होणारच होती. सौंदर्यशास्त्र या विषयावर चर्चा झाली. समीक्षकांनी त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोण अमान्य होता. मर्ढेकरांची भूमिका होती की प्रत्येक कलेला शब्दांचे माध्यम असते, कुठल्याही कला ह्या संवेदनेचे माध्यम वापरतात. ललित वाडःमयात शब्द ही महत्वाची गोष्ट असते, ते रुपवादी कवी कसे होते. मर्ढेकरांनी लयसिद्धांत तपशीलवार कसा मांडला नाही त्यांच्या भूमिकेत अस्पष्टता आहे. नंतर रा.भा.पाटणकर यांची समीक्षा, जीवनवादी, कलावादी समीक्षक, वा.ल.कुलकर्णी, सुधीर रसाळ, बाळकृष्ण कवठेकर, यांच्या समीक्षेवरही चर्चा झाली. प्रसिद्ध लेखकांच्याच लेखनाचीच आजचे समीक्षक समीक्षण करतांना दिसतात. पॉप्युलर लेखक जे आहे त्या मागे समीक्षकांनी जाणे चांगलं नाही. द.भी.कुलकर्णी यांच्या समीक्षेबद्दल विचार मांडण्यात आले. नव लेखक आणि नव समीक्षक यांचा विचार प्रामुख्याने पुढे येत नाही असा सूर जाणवला. लेखक समीक्षक यांचे नात्याच्यापुढे समीक्षा जावी. पुस्तक आणि समकाली लेखन यांचा विचार समीक्षकांनी केला पाहिजे. डॉ. महेश खरात यांचं विवेचन अतिशय सुरेख झालं. ललित वाडःमयाचे मुल्यमापन कसे करावे, तुलना, कसोट्या, साहित्यकृती चांगली आणि श्रेष्ठ, हे ठरवितांना समीक्षक थिटे पडत आहेत ते कसे याबाबतीत सखोल विचार मांडले, सैद्धांतिक समीक्षा, वाड:मय समीक्षा, त्याच्या पाय-या असा मस्त विषय होता. बाकीच्यांनी मात्र परंपरावादी समीक्षकांप्रमाणे आपले विचार मांडले. मजा आली. सुत्र संचलन सो सो होतं.

-दिलीप बिरुटे

एस's picture

17 Jan 2016 - 10:26 pm | एस

कृपया वरील वाक्यात 'संस्थळावरून कारवाई झाल्यामुळे आयडी ब्लॉक झाल्यावर' असे वाचावे. संस्थळावरील औचित्य राखणे एक सदस्य म्हणून आपले कर्तव्यच असते.

कोणत्या आयडी बद्दल चर्चा चालू आहे?

आयला! सतीश गावडे आणि प्रचेतस हे एकमेकांचे डुआयडी आहेत हे माहीतच नव्हतं...

नाखु's picture

18 Jan 2016 - 9:14 am | नाखु

ते दोन वेगवेगळे आहेत असे समजत होतो.

अति अवांतर : नाखु तुम्हाला विस्मरणाचा आजार जडलाय वयामुळे.
अति दूर अवांतर : हा एक मोहमायेचा प्रताप तर नाही !!! बुवांनी खुलासा करावा "मांतीक " नाहीत नाहेतर त्यांनीच केला असता आणि तुडतुडींना विहारून उपयेओग नाही प्रतिसाद नको पण खुलासा आवर अशी वेळ यायची माझ्यावर.
अति दूर (गामी) अवांतर : कोण कुणाचा डु आयडी याची संदर्भ पुस्तीका आहे का साहेत्य संमेलनात , जरा पहायला हवे !!!!

सुबोध खरे's picture

18 Jan 2016 - 9:32 am | सुबोध खरे

बार-बे-क्यू नेशनला पूर्वी भरपूर गर्दी असे. मागच्या आठवड्यात मी सह कुटुंब गेलो तर तेथे फारशी गर्दी होती. मी गाडी पार्क करून येईस्तोवर सौ. ने त्यांचे मेन्यु कार्ड पाहीले आणि त्याच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली. आता त्यांचे दर रुपये ९९९ अधिक कर असे आहेत. आम्ही हिशेब केला चार जणांच्या जेवणाचे साडे चार हजार रुपये पेक्षा जास्त होतील. मुळात आम्ही चौघे( मी, बायको आणि दोन मुले) बारीक कॅटेगरीतील आहोत. आम्ही खाऊन खाऊन किती खाणार. साडे चार हजार रुपये एका जेवणासाठी हे न पटण्यासारखे असल्यामुळे ते सोडून आम्ही "पॉपटेटस" मध्ये गेलो पोटभर जेवूनही बिल १७००/- आले.
आता लक्षात आले की त्यांची गर्दी कमी का झाली. एक बैठकीत एकट्याने रु. १२००/- चे खाणारी माणसे किती असतील. मुंबईत हे पैसे परवडणारी माणसे भरपूर आहेत पण भारतीय माणूस हा पैशाचे मूल्य जाणणारा आहे.

सुनील's picture

18 Jan 2016 - 9:58 am | सुनील

ह्यांची एक शाखा नुकतीच घोडबंदर रोडवरही सुरू झालेली आहे.

त्यांचे दर हे शाकाहारी-मांसाहारी, दिवस-रात्र आणि विविध वार यांच्याप्रमाणे बदलतात. सोमवार-मंगळवारचे, दुपारच्या शाकाहारी जेवणाचे ५६० रुपयांपासून ते रविवारी संध्याकाळच्या मांसाहारी जेवणाचे ९९१ रुपयांपर्यंत विविध आहेत!!

दरांप्रमाणे जेवणाची प्रत बदलले किंवा कसे, हे ठाऊक नाही!

सहमत आहे डाॅ खरे. कमी खाणारे तर लागोपाठ येणारे खाद्यपदार्थ बघुनसुध्दा गांगरतात! इतकं खाऊ शकतच नाही.व्हॅल्यू फाॅर मनी नाहीच अशा लोकांसाठी.
त्यात तिथे माझ्यासारख्या शाकाहारी लोकांना एक प्राॅब्लेम जाणवतो.शेजारी मांसाहारी मित्रमंडळी असतील तर ते ग्रील करत असलेल्या मांसाचा वास आणि धूर तिथे कोंडला जातो.मागच्या एका अशाच पार्टीला मी शेवटी थोड्या थोड्या वेळाने बाहेर उठून जाऊन श्वास घेत होते!

ते सोडून आम्ही "पॉपटेटस" मध्ये गेलो

ये हुई नं बात. उत्कृष्ट निर्णय. पॉपटेट्स इज ब्यियाँड ऑल.

रेवती's picture

18 Jan 2016 - 6:59 pm | रेवती

बाबौ! मग मी जाणार नाहीच. तसंही या धाग्यावरील उपहारगृहांमधील पदार्थांचे दर पाहून जायलाच नको वाटते. त्यातून आपण खाणार्‍यातले नसलो तर नकोच! आणखीही मनात बरेच प्रश्न सतत असतात. अशी उपहारगृहे स्वत:ची जाहिरात करताना काहीवेळा पाहण्यात येते की शांत परिसर, हायवेलगत, डोंगरात वगैरे शब्द वापरले की या जागी आधी कोणाची शेती असेल? मग आता तो मनुष्य काय करत असेल? या व्यवहारात कोणाला जिवाला मुकावे लागले असेल का? हे कधी बोलून दाखवले गेले नाहीत कारण सगळे हसतात व फार विचार न करण्याबद्दल नेहमीचे सल्ले देतात.
पॉपटेटसचे नाव वाचून गविंचीच आठवण आली व त्यांचा प्रतिसादही आला होता. त्यांचे आवडते ठिकाण, जिथून कट्ट्याचे समालोचन होत होते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2016 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण धन्याला उद्देशुन लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्या मत मांडेलच पण धन्या त्याच्या मतावर ठाम आहे. मित्रांसाठी आणि मित्रांच्या आनंदासाठी धन्या बार बे क्यु नेशनला आला होता एवढेच सांगू इच्छितो. :)

पण, संक्षीसेठ खरं सांगतो आम्हाला तुमची प्रत्येक क्षणाला आठवण येत होती अगदी बुकींग पासून तुम्हीच आमच्या स्मरणात होता. पायनपल भट्टीतून काढल्याबरोबर काट्या चमच्यांना तुम्हीच लगडलेला होता. कोणी तरी असंही म्हणालं की विवेक ठाकूर या आयडीत संक्षीचा लिहिण्याचा फील येत नाही. कोणी तरी असंही म्हणालं की संजय क्षीरसागर या आयडीत एक खास पंच होता. कोणी तरी असंही म्हणालं की संजय क्षीरसागर हा आयडी त्यांना परत दिला आहे तर त्यांनी त्याच आयडीने लिहिलं पाहिजे. पण लोकांना का वाट्तं की विठा हे संक्षी आहेत म्हणुन. ;) [ह्लकेच घ्या हं]

-दिलीप बिरुटे

संक्षींचं म्हणणं असं होतं की जगण्याचा एक वेगळा नजरीया आहे. जवळच्या जवळचं ठिकाण, बेहतहाशा अँबियन्स, प्रिय व्यक्तीचा सहवास, वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत, अनिर्बंध वेळ या सगळ्या गोष्टी जमल्यातर बीबीक्यू जन्नत आहे. आणि एखादेवेळी पैश्याकडे न पाहता असा आनंदोत्सव साजरा करण्यात मजा आहे. तुम्हाला तो आनंद गवसला याचं कारण तुम्ही ओपन मांइडेडली तिथे गेलात आणि ती दोस्तांची मैफिल होती, इतक्या आनंदात बील ही गोष्ट दुय्यम होते हे कुणीही मान्य करेल.

मला व्यक्तिशः लोकांच्या पैश्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं कायम नवल वाटत आलं आहे. बर्फाच्या घरात झोपण्यासारख्या विक्षिप्त कल्पनेसासाठी एखादा लाखो रुपये खर्च करतो आणि लोकांना ते ग्रेट वाटतं. हजारो मैलांचा प्रवास, कमालीचं विपरित हवामान, अत्यंत काँप्लिकेटेड व्यवस्था, त्यात कुठे काही चुकलं तर नाहक जीवावर बेतण्याची शक्यता, खाण्यापिण्याच्या गैरसोयी ... आणि मजा म्हणजे शेवटी आनंद तोच ! पण असं म्हटलं की लोक म्हणतात वडापाव आणि कटींग चहामधे आम्हाला मजा येते कशाला हवा तो बीबीक्यू ! लोकांची विचारसरणी एक्स्ट्रीम वाटते.

असाच अनुभव मला स्प्लेंडर कंट्रीच्या लेखावर आला. लोक पर्यटनासाठी किंवा दुर्गम तिर्थक्षेत्री जायला, कितीही हजार खर्च करतील, काहीही खातील, अशक्य वणवण करतील पण एखाद्या जवळच्या लोकेशनला, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन-चार दिवस रमायचं म्हटलं तर हॉटेलचं टॅरीफ बघतील !

संक्षींसारख्या माणसाचे विचार हाणून पाडायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याला अहंकारी ठरवायचं, तो स्वतःला शहाणा समजतो अशी आवई उठवून द्यायची आणि प्रस्थापित विचारसरणीवर पुन्हा चालू पडायचं की काम झालं.... पण त्यांच्या लेखनाची कुणाला न कुणाला केंव्हा न केंव्हा खूणगाठ पटेल आणि तुमच्यासारखी दिलदार व्यक्ती तो धागा परत वर आणेल. या धाग्याला वर यायला एक वर्ष लागलं. इतर धागेही असेच कुठे तरी, कुणाला तरी अनुभव आला की वर येत राहातील. आयडी असला किंवा नसला... काही फरक पडत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2016 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षीसेठ, आपला प्रतिसाद आवडला. आपल्या प्रतिसादावर माझं लव आहेच. बाकी, महाग आहे म्हणून जात नाही वगैरे हे या धाग्यातील प्रतिसाद मलाही पटत नाहीत. अनपेक्षित खर्च आपला कुठे होत नाही ? अचानक कुठलं बाहेरचं पाणी पिण्यात येतं. अंगात ताप भरतो, सर्दी, खोकला, लूज मोशन झाले की हजार रूपयाची वाट लागुन जाते. सालं मित्रांनी खर्च केलेला असला तरी मला जेवनाचा आनंद खुपच झाला. साहित्य संमेलनापेक्षा मला जेवनाचाच आनन्द जास्त झाला. तुम्ही म्हणता तसं पुढच्या वेळी मी आणि माझी प्रिय मैत्रीण फक्त. संक्षीसेठ मला आनंद जास्त होतोय का ?

प्रचेतस, धन्या, प्रशांत आपल्याकडे खुप मागनं नाही फक्त तिकडे आलो की तिथे जेवू घालत जा ब्वा ! ;)

-दिलीप बिरुटे

येस सर ! मग बघा काय धमाल येतेयं ती.

संक्षीसेठ मला आनंद जास्त होतोय का ?

संक्षी असते तर म्हणाले असते : आनंदात जगणं म्हणजे पब्लिकला अपराध वाटतो म्हणून लोक संभाळून संभाळून जगतात. तुम्ही आपले तुमच्या नेहेमीच्या स्टाइलनं बिनधास्त जगा.

सुबोध खरे's picture

19 Jan 2016 - 12:18 pm | सुबोध खरे

ठाकूर साहेब
या गोष्टीचा एक वेगळा पैलू पण आहे. मी माझ्या कुटुंबा बरोबर( बायको मुलगा १८ वर्षे आणि मुलगी २१ वर्षे) गेलो होतो. मुलांना केवळ एखाद्या ठिकाणी गेलो आहोत आणि भीड पडते म्हणून पैसे खर्च करून यायचे हे न सांगता आपल्या पैशाचे पूर्ण मूल्य कसे मिळवता येईल हेही शिकवणे आवश्यक आहे. "भीड भिकेची बहिण" असे आमची आई म्हणते. विशेषतः पंचतारांकित ठिकाणी "इंग्रजी बोलता येणार्या माणसांसमोर नाही कसे म्हणायचे" हि भीड बाळगून ते म्हणतील ते पैसे वळते करून यायचे हे करण्यापेक्षा अशा ठिकाणी स्पष्ट नकार देत आला पाहिजे हि शिकवण मुलांना देत यावी हा त्यातील हेतू होता. विचार सरणी स्पष्ट असावी हे माझे मत मुलांच्या मनात रुजवावे हि त्या मागची विचारधारा आहे.
अवांतर -- हॉटेलात हजारो रुपये खर्च करणारे लोक जेंव्हा भाजीवाल्याशी पाच रुपयांसाठी हुज्जत घालताना पाहतो तेंव्हा जरूर वाईट वाटते.

मलाही मुलगा आहे आणि पैश्याचं मूल्य त्याला कळावं अशी इतर पालकांप्रमाणे अपेक्षा असतेच. तरीही आपण आणि आपली अर्धांगिनी हे एक वेगळं नातं आहे, ती एक वेगळीच दुनिया आहे. तिच्या बरोबर एकांतात घालवलेला वेळ आणि सर्व कुटुंबाबरोबर साजरे केलेले प्रसंग यात फरक आहे हे तुम्हालाही मान्य होईल.

तुम्ही वेगळ्या प्रसंगात होतात आणि तुमच्या जागी मी असतो तरी तसाच पर्याय निवडला असता.

या लेखात पत्नीनं प्रपोजल दिलं होतं आणि तो केवळ दोघातला सोहळा होता. शिवाय मुंबईतलं बीबीक्यू आणि सयाजीचं बीबीक्यू यात अँबियन्सचा फरक आहे. कधी पुण्याला, फक्त पत्नी बरोबर येणार असाल तर नक्की बघा, तुम्ही दोघं खूष व्हाल .

सुबोध खरे's picture

19 Jan 2016 - 6:12 pm | सुबोध खरे

ठाकूर साहेब
माझा एक जुना लेख वाचा. ( जाहिरात नाही)
चौदहवी कि रात

विवेक ठाकूर's picture

19 Jan 2016 - 11:36 pm | विवेक ठाकूर

अत्यंत सुरेख लेख आहे. तुम्हा दोघांच्या रसिकतेला दाद देतो. तुम्ही म्हटलंय :

यासाठी लग्नानंतर प्रत्येक थोड्या फार कालावधी नंतर प्रत्येक युगुलाने स्वतःसाठी थोडासा वेळ काढून ठेवला पाहिजे. आपल्यातील या प्रियकराला किंवा अवखळ प्रेयसीला वर आणले पाहिजे आणी आपल्या फिकट होत चाललेल्या चित्रात नवे रंग भरले पाहिजेत.

संक्षींचा हा लेख तेच तर सांगतोयं!

व्यक्तीश: विचाराल तर मला प्रत्येक दिवसच हनिमून असल्यासारखा वाटतो, फक्त संधी मिळण्याचा आवकाश ! कारण सारं तारुण्य मी ओशोंना आत्मसात करण्यात घालवलं आणि जीवनाचा उत्सव करायला शिकलो, आय हॅव फिनिश्ड विथ टुमारो.

त्यात तुम्ही म्हटलंय तो फिटनेस तर आहेच. आणि त्याच्या जोडीला संगीत, योगा आणि प्राणायाम, बेभान व्हावं असा खेळ, जोडीला मदीरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळच वेळ आहे ! माझ्या दृष्टीनं सारं जीवन म्हणजे प्रत्येक पैलूत प्रणय शोधण्याची किमया आहे. भोजन हा कडाडून लागलेली भूक आणि एकसोएक पदार्थांचा समागम आहे. खेळ हा विश्राम आणि विहार यांचा प्रणय आहे. संगीत हा शांतता आणि स्वर यांचा मिलनोत्सव आहे. मदीरा ही सजगता आणि बेहोशी यांची जुगलबंदी आहे. आणि इतकं जगल्यावर प्रियेशी प्रणय म्हणजे तिला आपल्या आनंदात सामिल करून घेण्याचा एक उत्कट बहाणा आहे.

मला फँटसी वाचायला खूप आवडतात.
बाकी प्रत्येक दिवस हनीमून कल्पना छान आहे.आमच्याकडे प्रत्येक दिवशी दूधवाला पेपरवाला कचर्याची घंटा गाडी कामवाली किराणा भाजीपाला आणणे अशीही कामं असतात.
आम्ही सामान्य आहोत.बाई आली की जीवनाचा उत्सव साजरा करतो. टुमाॅरो फिनिश करताच येत नाही.टुमाॅरोची भाजीची तयारी करावी लागते.

तुमच्यासारख्या दुत्त, अरसिक मिपाकरांमुळेच तर सरे प्रॉब्लेम्स होताहेत! ह्या अरसिक वृत्तीमुळेच तुमाला जीवनाचे सौंदर्य कळत नाई अज्जिबात! :D

ते जीवनाचे आरस्पानी सौंदर्य का? तेही आम्हाला नीट दिसत नाही.आरशाला टिकलीचे डाग पडले आहेत.

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 10:06 am | यशोधरा

तुम्ही फकत अरसिकच नाई तर अस्वच्चही आहात! आरसासुद्धा स्वच्च ठेवत नाई!

अजया's picture

20 Jan 2016 - 10:26 am | अजया

खूप कामं असतात हो.नवरा फॅन्टसीमग्न मग बायकोला टिकली आरशाला लावून कचरा गाडीला डबा द्यायला जावे लागते:(
सामान्य अरसिकांच्या सामान्य व्यथा.तुम्ही युटोपियात रहाणारे काय जाणणार?

आमाला सामान्य काईच समजत नै. तुम्हांला इतके सुद्दा कळू नये ह्याचे वैषम्य वाटू लागलेय. ह्यामुळेच तुमच्या आयुष्यरुपी आरशाचा पारा उडून जातो आहे, त्याला डाग पडत आहेत.. पण असू द्या. डाग अच्छे हैं असं कोणतीशी झ्यायरात सांगते खरी.

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 10:39 am | सस्नेह

एका 'असामान्य' पत्नीची मुलाखत घ्यायची आहे. काय करू ?

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 10:42 am | यशोधरा

आधी आरशाचे डाग साफ करा, मग आरशाला टिकली न लावण्याची प्रॅक्टीस करा. हे जमले की पुढचे सांगू. =))

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 10:51 am | सस्नेह

आम्हाला ते जमले असते तर मुलाखत कशाला घ्यावी लागली असती ? =))

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 10:59 am | यशोधरा

थोडक्यात तुमाला अस्वच्चच रहायचे आहे तर. अशानेच पुढे समश्या निर्माण होतात, नव्हे, नव्हे तुमीच त्या निर्माण करता आणि मग जगाला बोल लावता. तुमाला जगात यत्र तत्र असलेला आनंद या अस्वच्चतेमुळेच दिसत नाई.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मौसम बहुत सर्द है ए दिल.......

चलो कुछ अस्वच्छते को आग लगाते है...!!

-दिलीप बिरुटे

साध्या मराठीत बोला बरं सर. मी असामान्य नसल्याने मला साधीच भाषा समजते, काय करु?

ये 'खुदसे' मोहब्बत भी आग जैसी है ..
लग जाये तो बुझती नही..और…बुझ जाये तो..जलन होती है…!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कभी हमसे भी पूँछ लो हाल-ए-दिल जनाब.
कभी हम भी कह सकें दुआ है आपकी.

-दिलीप बिरटे

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 11:35 am | यशोधरा

-दिलीप बिरटे >> ये क्या हाल बनाके रख्खा हय? कुछ लेते क्याँ नहीं? नाम भी बदल लिये!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुझे "बेपनाह मोहब्बत के सिवा कुछ नहीं आता"
चाहो तो मेरी "साँसो की तलाशी ले लो...!!!

-दिलीप बिरुटे

बेतहाशा मुहब्बत करते है जो खुदसे..
क्या जाने लगन अपनोंकी आग लगाये किस हदसे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला शेर.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 11:55 am | सस्नेह

आदाब !

बरं पण मी काय म्ह्णते आधी माय जगवा ना, मग मौशीकडे पाहू.

बाकी तुम्ही बार्बेक्यू नेशनमध्ये कट्टा केल्याने खाली म्हटल्याप्रमाणे परिस्थिती सगळ्यांना समजली हे उत्तम! की,

संहारवाते प्रचंडे |पाडती प्रळयांतीची सालडे | तव कल्पादीची जुबाडे | पाल्हेजती ||

अजया's picture

20 Jan 2016 - 12:36 pm | अजया

ओ माय माय!

मीता's picture

20 Jan 2016 - 12:43 pm | मीता

हसवून जीव घ्याल का आता ?

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 12:45 pm | यशोधरा

आली ना मायची आठवण? बघा! :)

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 12:54 pm | सस्नेह

मायपण वाचली अन मौशीपण !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 1:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या उजव्या विचारसरणीला बारिकसा हातभार....

तुमच्या उजव्या विचारसरणीला बारिकसा हातभार.

तुमच्या उजव्या विचारसरणीला बारिकसा हातभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या विषयावर प्रतिसाद लिहित होतो आपण ?

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 1:24 pm | यशोधरा

अरेरे! मिपावर असा प्रश्न विचारण्यात यावा ना? लेखाच्या विषयाचा आणि प्रतिसादांचा काय संबंध? ओं?

अमित मुंबईचा's picture

20 Jan 2016 - 10:29 pm | अमित मुंबईचा

खरच मिपा इतक **** झालाय का?

**** याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या प्रमाणे लावावा.

पैसा's picture

20 Jan 2016 - 12:49 pm | पैसा

>>>चाहो तो मेरी "साँसो की तलाशी ले लो...!!!

पोलीस बोलवा.
Breathalyzer आणतील ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादक बोलवा. व्यक्तिगत चारित्र्याबद्दल संशय निर्माण करणारं इंस्ट्रूमेंटची चर्चा नको असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मितान's picture

20 Jan 2016 - 9:46 am | मितान

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2016 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षी असते तर मी म्हणालो असतो की अवांतराकड़े लक्ष देऊ नका. एकदा संक्षी गमावले आता विठा नाय गमवायचा म्हणून हा प्रपंच. आणि इतर अवांतरवर उपप्रतिसादही लिहू नका. बाकी आपण पुढील वेळी कट्टा करू ते आपल्या आवडत्या बार बे क्यू नेशनलाच.

-दिलीप बिरुट

प्रचेतस's picture

20 Jan 2016 - 11:19 am | प्रचेतस

संक्षींसह कट्टा करायला नक्कीच आवडेल.

आनंदी गोपाळ's picture

20 Jan 2016 - 11:23 pm | आनंदी गोपाळ

या प्रतिसादावरून संक्षी=विठा हे सिद्ध होते.

मालोजीराव's picture

19 Jan 2016 - 2:41 pm | मालोजीराव

1000 कशाला 2000 घ्या पण फूड 'व्हॅल्यू फॉर मनी' असावं हीच अपेक्षा असते. त्यामुळे कधी कधी असंही होतं कि एखाद्या स्वस्त ठिकाणीही अपेक्षा पूर्ण होत नाही (जेवणाचा दर्जा इ. मुळे )
बऱ्याचदा जास्त पैसे मोजून किंवा पर्यायाने महागड्या ठिकाणी जेवून सुद्धा चांगल्या,वैविध्यपूर्ण पदार्थांचं समाधान मिळतं ( उदा. मलाका स्पाइस, आर्थर्स थीम, ताज विवांता- लॅटिट्यूड )

मलाका स्पाईसला तब्बल माणाशी हजार रूपडे मोजूनही निराशा झाली. आवडले नाही.

मालोजीराव's picture

19 Jan 2016 - 3:15 pm | मालोजीराव

आवो अन्ना व्हयचंच कवा कवा :)
मी मटण चॉप्स, ग्रील्ड डक आणि कसलीशी कंबोडियन डिश घेतलेली...इनोव्हेटिव्ह आणि वेगळ्या चवीचं होतं

प्रचेतस's picture

20 Jan 2016 - 11:22 am | प्रचेतस

अरे कुठली तरी hat नामक पदार्थ घेतला होता तर त्यात कसल्यातरी टोपलीत आली उकडलेली मटकी आणि तत्सम कडधान्य,थाई करीबरोबर भात नाही, तो वेगळा घ्यावा लागतो.

हेमंत लाटकर's picture

20 Jan 2016 - 7:26 pm | हेमंत लाटकर

हॉटेलात हजारो रुपये खर्च करणारे लोक जेंव्हा भाजीवाल्याशी पाच रुपयांसाठी हुज्जत घालताना पाहतो तेंव्हा जरूर वाईट वाटते..

100% खरी गोष्ट

पैसा's picture

19 Jan 2016 - 1:19 pm | पैसा

सर, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत खुश रहायचं तर तुम्हाला नेहमी फक्त खर्च करूनच आनंद मिळतो का लाईट नाही, गॅस नाही, नोकर नाहीत अशा झोपडीतही तुम्ही तेवढेच आनंदात राहू शकता?

होबासराव's picture

19 Jan 2016 - 1:24 pm | होबासराव

___/\___

पिलीयन रायडर's picture

19 Jan 2016 - 1:26 pm | पिलीयन रायडर

Hechch!

+१११११११

आणि एखादेवेळी पैश्याकडे न पाहता असा आनंदोत्सव साजरा करण्यात मजा आहे.

पैसा's picture

19 Jan 2016 - 2:11 pm | पैसा

वाचला आहे, तरी तेच विचारते. कोणत्याही गोष्टीचा अभाव असतानाही तुम्ही आनंदात राहू शकता का?

पण तुम्ही दुसर्‍यांदा विचारतायं आणि प्रश्न सुद्धा व्यक्तिगत आहे, तरीही उत्तर देतो.

कोणत्याही गोष्टीचा अभाव असतानाही तुम्ही आनंदात राहू शकता का

आनंदाचा अर्थ स्वतःची स्वतःशी कनेक्टीविटी आहे. निर्माण झालेली परिस्थिती जर व्यक्तीचं अवधान संपूर्णपणे खेचून घेऊ शकली तर ही कनेक्टीविटी तुटते, त्याला आपण दु:ख म्हणतो. तस्मात, वस्तुचा आभाव गैरसोय निर्माण करेल पण आनंद हिरावू शकणार नाही कारण आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा माझा अनुभव आहे. आणि स्थिती संगीतातल्या समेसारखी आहे, कायम अविचल. त्यामुळे आभावानं गैरसोय होईल आणि ती दूर करण्याचा प्रयत्न होईल पण दु:ख होणं अशक्य आहे.

स्रुजा's picture

20 Jan 2016 - 12:44 am | स्रुजा

तिने तुम्हाला विचारलं की तुम्ही आनंदात रहाल का? तुम्ही समजावुन सांगताय की आनंद म्हणजे काय. अस्थानी आणि अवेळी ज्ञानामृत पाजणे हे विद्वत्तेचे लक्षण नाही.

विवेक ठाकूर's picture

20 Jan 2016 - 10:43 am | विवेक ठाकूर

आनंद होणारा हा आनंदा पासून वेगळा काढता येत नाही. तस्मात, एकदा आनंद म्हणजे काय हे समजल्यावर व्यक्ती सदैव आनंदी राहू शकते. घटना आणि परिस्थिती व्यक्तीला स्वतःपासून दुरावू शकत नाहीत. कदाचित व्यक्तिगत शेरेबाजीपूर्वी तुम्ही थोडं शांततेनं वाचलं तर तुम्हाला ही मुद्दा कळू शकेल.

नूतन सावंत's picture

20 Jan 2016 - 10:50 am | नूतन सावंत

दुःख याचा विरुद्ध अर्थ सुख असा असला तरी दुःख होणे अशक्य आहे याचा अर्थ सुखी असणे असा होऊ शकत नाही.

आणि दु:खाचा आभाव म्हणजेच आनंद. आनंद म्हणजे एकसंध चित्तदशा, एक सततचा लाइट मूड. म्हणून तर म्हटलंय जर घटना किंवा परिस्थिती तुमची संपूर्ण जाणीव वेधून घेऊ शकले नाहीत तर तुम्ही स्वतःशी कनेक्टेड राहाता आणि तुमचा लाइट मूड कायम राहातो, तुम्ही आनंदी राहाता.

मितान's picture

20 Jan 2016 - 12:14 pm | मितान

खरं आहे.
त्या लाईटच्या लाईटमध्ये सगळं मिपा झगमगतंय ! :))

पैसा's picture

20 Jan 2016 - 1:16 pm | पैसा

बरं बरं.

प्रश्न सुद्धा व्यक्तिगत आहे,

मुळात लेख व्यक्तिगत अनुभवाबद्दल असल्याने चर्चा वैयक्तिक मुद्द्यांवर होणारच. उलट कोणतीही गोष्ट जेवढी वैयक्तिक होत जाते तेवढी ती वैश्विक होत जाते.

त्यामुळे आभावानं गैरसोय होईल आणि ती दूर करण्याचा प्रयत्न होईल पण दु:ख होणं अशक्य आहे.

अभावाने गैरसोय होईल हे गृहीतक बरोबर आहे का? त्यातही मजा असते. ज्या माणसाला आनंद आपल्या आतच आहे हे समजते तो कोणत्याही गोष्टींसह किंवा गोष्टींशिवाय, तसेच कोणी सोबत असो किंवा नसो आनंदात राहू शकतो. तो त्याचा चॉईस असतो.

दुसरी गोष्ट, दु:ख नाही म्हणजे सुख किंवा आनंद असेलच असेही आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

खेडूत's picture

20 Jan 2016 - 9:23 am | खेडूत
खटपट्या's picture

21 Jan 2016 - 6:19 am | खटपट्या

या गाण्यातली झोपडी (बैठे घर/चाळीतले घर/गरीबीतले घर) ३ बीएचके पेक्षा मोठी दीसतेय.

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 12:21 pm | संदीप डांगे

ते घर विनोद मेहराचे असते, जितेंद्रचे नाही असे स्मरते.

अगम्य's picture

20 Jan 2016 - 2:21 pm | अगम्य

क्षीरसागर साहेबांनी त्यांना आलेला एक आनंददायी अनुभव शब्दबध्द केला आहे. त्यावर असा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन समजले नाही. मग पैसा ताई , तुम्हाला असं विचारले तर, की पंचातारांकित, आल्हाद दायक वातावरणात अतिशय चविष्ट असे वैविध्यपपूर्ण खाद्यपदार्थ अगत्याने आणि आदबीने आणून दिले जात असताना आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर त्यांचा आस्वाद घेण्यात तुम्हाला आनंद मिळेल की नाही?

पैसा's picture

20 Jan 2016 - 2:57 pm | पैसा

का नाही मिळणार? पण ते सगळे आहे म्हणून मला आनंद मिळतो आहे अशी परिस्थिती असू नये. दुसरी बाजू आहे, एखाद्या माणसासोबत अमूक एका परिस्थितीत मला आनंद मिळतो आहे असे कोणीतरी सांगितले तर त्या दुसर्‍या माणसाला तेवढाच आनंद मिळतो आहे का "मजबुरी का नाम अटलबिहारी" अशी परिस्थिती आहे ते आपल्याला कधी कळते का? कदाचित त्या पहिल्या माणसालाही कळत नसेल.

उदाहरण सांगते. समजा, मला मित्रमैत्रिणींसोबत रायगडावर जायचे आहे, किंवा साहित्य संमेलनाला जायचे आहे. अशा वेळी जर माझा नवरा मला जबरदस्तीने बार बे क्यु नेशनला घेऊन गेला तर भले माझ्या जिभेला जेवणाचे सुख मिळेल पण मला त्यात आनंद मिळणार नाही. माझा नवरा भले स्वर्गात आहोत असे समजेल पण मला आतून जाम वैताग आलेला असू शकतो.

अगम्य's picture

20 Jan 2016 - 3:17 pm | अगम्य

त्यांनी लेखाच्या पहिल्याच वाक्यात लिहिलंय, "काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो"