टकाटक
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी.
घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात.
कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा.
गमभन लिऊन झालं की पाडे.
लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत.
तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर.
मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर.
गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला.
रोजला तेच.
म्या पेंगाया लाग्ली.
मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”.
शिवाजीम्हाराज समजतेय सोताला.