मदत हवी आहे… एक number वनराज होण्यासाठी...

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
27 Aug 2013 - 12:55 pm
गाभा: 

नमस्कार समस्त मिपाकर,

आमचे चिरंजीव वयवर्ष दिड, हल्ली playgroup मध्ये जातात. तिथे मुलांच्या fun activities साठी नाना उपक्रम राबवले जातात. आज घोडा draw करून आणा तर उद्या आणखीन काही… अस्साच एक उपक्रम म्हणजे fancy dress competition.. तर सांगायचा मुद्दा हा की
आमच्या चिरंजीवाना "सिंह" बनवायचं असं त्याच्या mam नि ठरवलं असून विकतचे ड्रेस न आणता cardboard किवा अन्य घरगुती साधने उपयोगात आणायची आहेत. मुलांचे हे उपक्रम म्हंजे पालकांच्या डोक्याला ताप… त्यात आमचे drawing म्हंजे सगळाच आनंद… तरी ह्या संस्थळावरील सर्व मिपाकरांना आवाहन करतो कि आपापली creativity वापरून घरच्या घरी सिंह सोप्या पध्दतीने कस्सा बनवायचा ह्याची idea दिलीत तर उपकृत होयीन… आपल्या कडे फक्त एकच दिवस आहे…

प्रतिक्रिया

कार्यानुभव,चित्रकला इ. विषयात आमचा वावर म्हणजे पेंटागॉनमध्ये चोरीसाठी वेशांतर करून गेलेल्या भुरट्या चोरासारखा लपूनछपून असे. त्यामुळे लोकांचं creative डोकं कसं चालतं हे पाहण्याची उत्सुकता आहे. :)

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2013 - 1:35 pm | पिलीयन रायडर

एका मोठ्या कागदावर शिंहाच्या चेहर्‍याची ब्लॅक & व्हाईट प्रिंट घ्या. त्या वर मुळ चित्रा प्रमाणे रंग द्या.. आयाळ वगैरे अजुन एखादा कागद वापरुन / झिरमाळ्या बनवुन तयार करता येईल. त्याने ३डी पण वाटेल.. त्याल दोरा बांधा आणि लावा तोंडाला. मागे एक शेपूट लावुन द्या...
झाला सिंह..!!!

हाय काय न नाय काय...

नानबा's picture

27 Aug 2013 - 1:37 pm | नानबा

आता कसं??

कपिलमुनी's picture

27 Aug 2013 - 1:51 pm | कपिलमुनी

अशा वेषांतरासोबत सिंघम चे डायलॉक म्हणायला सांगा

विजुभाऊ's picture

29 Aug 2013 - 5:05 am | विजुभाऊ

अशा वेषांतरासोबत सिंघम चे डायलॉक म्हणायला सांगा

इमॅजीन करतोय. सिंहाच्या वेशात कोणी " आता माझी सटकली " असे म्हणतोय.

-विकतचा ड्रेस आणून त्याची शिवण काही ठिकाणी उसवून हाताने परत घाला. ती हातशिवण जरा ओबडधोबड दिसू दे.
- त्या ड्रेसवर (आधीची शेपूट असल्यास ती उपटून) बेगडी वाटणारी कार्डबोर्डची ताठ शेपूट लावा. त्या शेपटीच्या टोकाशी झिरमिळ्यांचा बेगडी गोंडा लावा.

वरुन चिकटवलेला बेगडीपणा पुरेश्या क्वांटिटीत दिसला की ड्रेस घरीच बनवला असं सांगून चिरंजीवांना त्या ड्रेससहित बिंदास पाठवा. वाहवाच मिळेल.

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 3:37 pm | स्पंदना

:)) :))

बॅटमॅन's picture

27 Aug 2013 - 5:34 pm | बॅटमॅन

ते शिवण उसवून परत शिवून वरिजनल बद्दल वाहवा मिळवण्याबद्दल +१११११११११११११११११.

ग्राफिक्सच्या शिटा लै व्हायच्या तेव्हा सरळ जीटी मारून मग उगीच खाडाखोड करून वरिजिनल बनवायचो त्याची आठवण होऊन अं.ह. झालो.

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 5:43 pm | दादा कोंडके

सहमत. किंवा केमिस्ट्रीच्या टायट्रेशन मध्ये क्वापी केलेल्या पर्फेक्ट अंकाच्या इकडे तिकडे रिडींग्झ घेउन दाखवायचे.
समटाइम्स यु गोट्टा अर टू प्रुव्ह द्याट यु आर अ ह्युमन.

बॅटमॅन's picture

27 Aug 2013 - 6:26 pm | बॅटमॅन

हाहाहा अगदी अगदी :D

दिपक.कुवेत's picture

27 Aug 2013 - 3:14 pm | दिपक.कुवेत

ठिक आहे पण एक नंबरचा अट्टाहास का आणि कशासाठि? असं असेल तर मुलावर तुम्हि आत्त्तापासुनच नंबरात येण्यासाठि दबाव टाकताय. फेरविचार करा बरं!

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 3:30 pm | बाळ सप्रे

"Lion Cartoon" गूगल सर्च करा.. त्यातील एखाद्या चांगल्या कार्टूनची प्रिंट काढा.. A4 size..
डोळयांच्याजागी भोकं पाडा.. एक ईलास्टीक लावा .. मास्क तयार..
पिवळे/केशरी कपडे घाला. शेपुट म्हणून पिवळी दोरी अडकवा चड्डीत.. आणि सिंहाचा आवाज काढायला शिकवा चिरंजीवांना.. हा का ना का

नुसती आयाळ लावा चेहर्‍याभोवती. जरा चेहर्‍याला रंग लावा, काळे डोळे, काळे ओठ.
अन शेपुट तर अगदी मस्ट!
अजिबात तू पहिला येणार, फर्स्ट येणार म्हणु नका.

आनन्दा's picture

27 Aug 2013 - 5:07 pm | आनन्दा

आणि प्लेग्रूप?

धमाल मुलगा's picture

27 Aug 2013 - 5:58 pm | धमाल मुलगा

आमच्या सुबोधकाकांनी इतकं जीव तोडून लिहिलं ते का ह्याचा परत साक्षात्कारच झाला राव.

चिगो's picture

29 Aug 2013 - 10:11 pm | चिगो

अरे, जरा जगू द्या की पोराला.. :-(

असो, पोतराज संबधि प्रोत्साहन उपलब्ध्द असल्याचे इथे निरीक्षण आहे पण वनराज...? नो वे. खरतर तुम्हाला बहुदा प्रवेश नसलेल्या गल्लिचा हा विषय असल्याने इथेच प्रकट करावा लागला कि काय अशि उगा शंका आलि.

धमाल मुलगा's picture

27 Aug 2013 - 5:59 pm | धमाल मुलगा

हैदराबादेत वगैरे मोहर्रमला वाघा/सिंहाचं सोंग काढतात त्याचे युट्युबवर व्हिडिओ पहा...घरच्या घरी सिंह करण्याचा तो एक भारी आप्शन है. :)

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2013 - 10:54 pm | श्रीगुरुजी

मनमोहन "सिंह" यांच्या चेहर्‍याचा मुखवटा वापरा. जबरदस्त प्रभाव पडेल.

संजय क्षीरसागर's picture

27 Aug 2013 - 10:58 pm | संजय क्षीरसागर

म्हणावं, तिकडे काय वाट्टेल ते करा, आमचा मुलगा एक number यायला पायजेल.

मुलाची आई खुष. त्यात पुन्हा तिला `आतली स्टोरी' कळली की घरात, एक सोडून दोन सिंह तयार झाल्याचं लक्षात येईल.
मुलगा मोठा झाला की त्याला, किरकोळ गोष्टींच्या फंदात न पडता डायरेक्ट मुद्यालाच हात कसा घालायचा ते समजेल.
मॅमला, भारतात प्रत्येक गोष्टीला पोटेंशियल आहे हे कळेल.
आणि तुमची काय सगळीकडून मज्जाच मज्जा.

हो, आणि रिझल्ट कळवा!

आदूबाळ's picture

27 Aug 2013 - 11:12 pm | आदूबाळ

:))

उदय के'सागर's picture

28 Aug 2013 - 10:30 am | उदय के'सागर

दीड वर्षाचं पोर आणि 'प्ले-ग्रूप' ?... आणि स्पर्धेसाठी तयारी, ह्या वयात?

संजय क्षीरसागर's picture

28 Aug 2013 - 1:29 pm | संजय क्षीरसागर

जमलं का? आणि शेवटी काय केलं?

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 1:44 pm | पिलीयन रायडर

प्ले ग्रुप आणि स्पर्धा ह्यावर लिहित आहेत म्हणुन माझेही काही प्रश्न..
१. माझाही मुलगा साधारण ह्याच वयाचा आहे. तो आज काल घरात कंटाळुन जातो. दिवसभर तो त्याच्या आजी सोबत असतो. त्याही दमुन जातात त्याला घेउन घेउन.. मग टि.व्ही लावल्या जातोच. पोरगा बटनांशी खेळायचं म्हणुन पार टि.व्ही ला नाक लावुन बसतो. आता आपण दिवसभर घरात नसल्याने, आपली पोरं सांभळणार्‍या आजी आजोबांचा एकमेव विरंगुळा (टि.व्ही) तर बंद करु शकत नाही. त्याच्या खेळण्यांकडे तो आता बघतही नाही. सहज म्हणुन मी कंपनीतल्या पाळणाघराची चौकशी केली तर दिवसभर मुलांकडुन त्यांच्या वयानुसार खेळ घेतले जातात. तिथे पोरं आपल्या वयाच्या मुलां सोबत असल्याने खुश असतात. खुप खेळणी असतात. गाणे-बिणे शिकवतात. किंवा बागेत नेतात. हातांचे ठसे, भाज्यांचे ठसे असलं काय काय शिकवतात. शिवाय ह्या सगळ्याचे एक रुटिन असते त्यामुळे मुलांना पण त्याची सवय लागते. विचार केला तर माझा मुलगा दिवसभर घरी राहुन जे करतो त्या पेक्षा हे छान आहे.आता तो हट्टी होत चालला आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही तर आरडाओरडा करणे, खूपच रडणे प्रकार वाढत चालले आहेत. हे आई म्हणुन मी सहन करेनही. पण मला जास्त चिंता ह्या गोष्टीची वाटते की त्याच्या वाढत्या बुद्धीला पुरेसे खाद्य आम्ही नाही देऊ शकत आहोत का? रोज तेच ते पाहुन , करुन तो अजुन काय शिकणारे? टी.व्ही पहाण्यापेक्षा प्ले ग्रुप मध्ये जाणं चांगलं नाही का?
२. स्पर्धा म्हणली की आपण चढाओढ, मुलांवरचा ताण असा विचार करतो. पण त्या तयारी मध्ये जो आनंद असतो त्यांच काय? उद्या माझ्या मुला साठी मला सिंह बनवायचा असेल तर मी डोकं लावेल, ४ कलाकुसरीच्या गोष्टी आणेन, चित्र काढेन, रंग वापरेन.. हे आपण कितीसं करतो आयुष्यात? मुलासाठी पण नवीन असेल हे सगळं. तोही काही तरी शिकेल. चार चौघात जाऊन २ शब्द बोलुन येईल..काय वाईट आहे ह्यात? रोज घरी बसुन किरकिरण्या पेक्षा तरी हे चांगलय न? आणि मी जर सिंह बनवणार आहे, तर माझ्या मुलासाठी मी १००% भारीच काही तरी करायचा आपोआपच प्रयत्न करेन.. ह्यात गैर काय? लेखकाला "१ नंबर" ह्या अर्थी वापरायचा असावा (प्रथम क्रमांक ह्या अर्थाने नव्हे).. आपण फक्त आप्लच पोरगं पहिलं यावा असला फालतु अट्टाहास ठेवायचा नाही..

उपास's picture

29 Aug 2013 - 12:03 am | उपास

पिलियन, इथेच देतो रीप्लाय तिथे दुसर्‍या धाग्यावर देण्यापेक्षा..
>>टी.व्ही पहाण्यापेक्षा प्ले ग्रुप मध्ये जाणं चांगलं नाही का?
दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्या हे लक्षात घ्यायला हवं. घरी राहायचं की प्ले ग्रुप हा प्रश्न पडू शकतो, टीव्ही हा पूर्ण वेगळा प्रश्न आहे! मुलाच्या वयानुसार आणि प्रकृतिनुसार गोष्टी ठरवायला हव्यात. लहान मुलांची प्रतिकारशक्ति कमि असते, त्यामुळे सर्दी, खोकला (अगदी खाज आणि उवा सुद्धा) त्यातून ताप अशा गोष्टींचा मुलाला आणि पर्यायाने पालकांना सामना करण्याची वेळ डे - केअर मुळे येऊ शकते. शिवाय, सर्दी/खोकला/ ताप असेल तर डे केअर मध्ये मुलाला पाठवता येत नाही (त्याच्या तसेच इतर मुलांच्या भल्यासाठी) त्यामुळे पर्यायी व्यवस्था हवीच. तसेच डे केअर मधे त्याच्याकडे पुरेसे लक्ष राहील ह्याची गॅरेंटी नाही (चार ते सहा मुलांपाठी एक बाई..) तसच इतकं लहान मूल पॉटी ट्रेन नसल्याने त्याची कुचंबणा होऊ शकते.
तात्पर्य - डे केअर हे थोड्या मोठ्या मुलांसाठी योग्य असेल पण लहानांसाठी तो विश्वासार्ह पर्याय ठरु शकत नाही. तसेच तुमच्या जवळचे डे केअर कसे आहे आणि तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे ह्यावर बरंच काही अवलंबून. शेवटी मुलाला मोठं झाल्यावर मिसळायचच आहे चार मुलांत, त्याची घाई करण्याचे काहीच प्रयोजन नाही.

नंबर वन या शब्दाची एक धास्ती नवीन पिढीच्या आईबाबांच्या मनात बसली आहे. अनेक मुलांनी जबरदस्त तणावाखाली आत्महत्या करुन ही भीती आणखीन वाढवली आणि जागत ठेवली आहे. पहिला नंबर किंवा अमुक टक्के नाही मिळाले तरी चालेल पोरगं हातचं जायला नको अशी तीव्र धास्ती मनात घेऊन आता कॉम्पिटिशनच नको असा दुसर्‍या टोकाचा अ‍ॅटिट्यूड बनतो आहे. (सर्वत्र नाही पण वाढत्या संख्येने).

कॉम्पिटिशन हा आयुष्याचा अत्यंत महत्वाचा आणि वेगळा न काढता येणारा भाग आहे. लहान पोराला जन्माच्या दिवसापासून कशाशीतरी संघर्ष करायला लागतच असतो. त्याचं प्रमाण आपण कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करतो.

पण पुढे त्याच्याशी संवाद सुरु झाला की कॉम्पिटिशन या प्रकारातली पॉझिटिव्ह बाजू त्याला दाखवलीच पाहिजे. इनफॅक्ट बरीच वर्षं त्याला या जगापासून आणि स्पर्धेपासून इन्शुलेट करुन एकदम दहावीच्या वर्षी थेट युद्धावर पाठवल्याचं फीलिंग आणण्यापेक्षा कॉम्पिटिशन या प्रकाराची सकारात्मक आवड लहानपणापासून सौम्यपणे विभागूनच लावली पाहिजे.

आपल्या बरोबरीच्या सर्व इतर स्पर्धकांवर मात करुन पहिलं येण्यातला आनंद आणि कष्टाचं चीज या प्रकारच्या भावनेशी त्याची ओळख हवीच.

चूक कुठे होते तर अपयशाबद्दल अतितीव्र दबाव तयार करणं किंवा होऊ देणं किंवा तो होताना न दिसणं आणि पालक म्हणून तो वेळेवर कमी न करणं.

यश मिळणं ही आयुष्यात सुख समाधान देणारी गोष्टच आहे.. आणि अगदी पहिला नंबरही उत्तमच असतो. सर्वोत्तम असतो. पण तो नसला किंवा दहावा आला तर आयुष्यातला अर्थ शून्यवत होत नाही. इट्स ऑल इन द गेम.. आयुष्यातला आनंद हा या सर्वाशी संबंधित नसतो. कॉम्पिटिशनसाठी श्रम करणं हे आनंदाचं असलं पाहिजे. ओझ्याखाली दबून ते केलं की अपयश पचवताच येत नाही आणि आनंद निघून जातो.

आता असं होताना दिसतंय की ते अव्वल नंबर किंवा यश नकोच.. तू तुला वाटेल ते कर आणि जमेल ते कर.

असं नसतं. आईबापांनी मुलांना शक्य तितक्या सर्व बाबतीतलं एक्स्पोजर दिलंच पाहिजे, अगदी एक वर्ष वयापासूनसुद्धा.

नंतर मूल त्यातलं काय पिक अप करतंय ते नीट पाहून त्यात पुढे सद्य काळात आयुष्य उभं राहील का याचा विचार करुन वाटही दाखवली पाहिजे. प्रसंगी जागरणं करुन आणि शारिरीक मानसिक ताण सहन करुनही स्पर्धा करायची ताकद , यश मिळालं तर काय चांगलं होईल याची स्वप्नं आणि त्यापेक्षाही जास्त अपयश आलं तर तू बरबाद होणार नाहीस, आम्ही तरीही तुझ्यासाठी तेच गुड ओल्ड आईबाबा आहोत हा भरवसा त्याच्या मनात ठेवणं हा मार्ग योग्य आहे.

यश कुणाला नकोय? पण ते काँपिटिटीव स्पिरिटनं मिळवणं मुलाला सतत टेंशन खाली ठेवतं. नजर सतत दुसर्‍यावर राहते आणि यशाचे मापदंड इतरेजन ठरवतात. त्यातनं पुन्हा जेलसी निर्माण होते.

मुलाला नेहमी `त्याला कशात आनंद वाटतो ते' करायला उद्युक्त करा. प्रत्येक मूल त्याच्या नव्या संकल्पना घेऊन येतं, स्वतःच्या अविष्कारावर त्याची स्वतःची मोहोर असते. अशा वेळी गुणवत्तेचे निर्वैयक्तिक निकष (उदा. चित्रकलेत बॅलन्स, प्रपोर्शन आणि परस्पेक्टीव; नृत्यात डौल आणि समेचं भान, संगीतात गोडवा, लय आणि तालाचं सौंदर्य) त्याला सांगणं पालकांच काम आहे. या गोष्टींची आपल्याला कल्पना नसेल तर तज्ज्ञांच मार्गदर्शन घेणं योग्य ठरतं.

जे मूल स्वतःला आवडेल आणि आनंद देईल ते समरसून करतं त्याला दुसर्‍याचे उत्तम गुण अनिवार्यपणे भावतात. ते मूल दुसर्‍याच्या यशात नेहमी आनंद मानतं कारण त्यातनं त्याला नवं शिकायची संधी मिळालेली असते. असं मूल कधीही जेलस होत नाही आणि उत्तरोत्तर प्रगतीच करत राहतं.

तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. योग्यही आणि उत्कृष्टही. फक्त थोडीशी अ‍ॅडिशन अशी की "बेस्ट ऑफ यू" हेच शेवटी प्रत्येक मनुष्याला Transcend करायला आवश्यक तत्व असलं तरी लहानपणापासून, विशेषतः मूल अद्याप एका दिशेला वळलेलं नसताना आणि इतर मुलांमधे एकत्रित शिक्षण / वर्धन असं घडत असताना इतरांशी स्पर्धा करण्याची आणि ती सहनच नव्हे तर सहजपणे करण्याची क्षमता मुलामुलींत डेव्हलप होऊ दिलीच पाहिजे. फक्त अपयशाने गाळात जाऊ नये इतकंच शिकवायचं.

नंतर एकदा कमीजास्त वयोगटात पोर मॅच्युअरली एका दिशेला पकडून स्वतःचं स्वत्व नीट दाखवतंय याची खात्री झाली की मग जगाशी कॉम्पिटिशनची गरजच उरत नाही. मग राहते ती स्वतःच्याच आधीच्या पायरीच्या आणखी जास्त वरची किंवा पुढची (पर्सिव्ह्ड) पायरी गाठण्याची आपोआप घडणारी प्रक्रिया. असे लोक मग लेजंड समजले जातात.

पण प्रत्येकाबाबत हे होईलच असं नव्हे. प्रत्येकजण त्याला जे आवडतं त्यात पुढे जाऊ शकेलच असं नव्हे.. कारण जे आवडतंय असं वाटतं ते प्रत्यक्षात किती काळ आणि किती पॅशनने करता येईल आणि त्यात सुरुवातीला काय "फळ" मिळेल याविषयीचा भ्रमनिरास अशा गोष्टींनी मूल आपल्या त्या क्षेत्रात पुढे जात राहीलच असं नसतं.

पण सध्या ज्या स्टेजच्या पोरांचा विचार चालू आहे त्यांना आणि पालकांना इतरांशी कॉम्पिटिशन करण्याची भीती बसू नये इतकंच म्हणायचंय. इतरांशी कॉम्पिटिशन ही सुद्धा एक हेल्थी प्रक्रिया आहे आणि ती टाकाऊ नाही. तिच्यातूनच पुढे मनुष्य त्याच स्पर्धेच्या पार पोहोचतो.

इतरांशी कॉम्पिटिशन ही सुद्धा एक हेल्थी प्रक्रिया आहे आणि ती टाकाऊ नाही.

मला वाटतं अप्रोच मधे फरक आहे. दुसर्‍याच्या यशातून शिकणं वेगळं आणि त्याच्याशी स्पर्धा करणं वेगळं. कारण एकदा स्पर्धा म्हटली की हे ओघानं आलंच :

इतरांशी स्पर्धा करण्याची आणि ती सहनच नव्हे तर सहजपणे करण्याची क्षमता मुलामुलींत डेव्हलप होऊ दिलीच पाहिजे. फक्त अपयशाने गाळात जाऊ नये इतकंच शिकवायचं.

तू कधी हिंदी हास्यकवी संमेलन पाहा. एवरी वन इज गुड अँड ट्राइंग टू गीव हिज बेस्ट. स्टील नो वन इज ट्राइंग टू शो हिमसेल्फ अवव्ह दि अदर. ते फक्त उत्तरोत्तर माहौल खुलवत नेतात. अँड दॅट्स द अप्रोच. प्रत्येक जण बिन्धास्त सादरीकरण करतो, मग त्याचा विषय काहीही असो. प्रत्येक चांगल्या गोष्टीला प्रत्येक जण दाद देतो आणि अंतरंगी बहुदा, प्रत्येक जण दुसर्‍याचं चांगलं वेचत जातो.

मूल लहान आहे की मोठं हा प्रश्न नाही. आता, या क्षणी तुमच्या मनात काय आहे (स्पर्धा की एक्सलन्स) आणि त्याला तुम्ही काय शिकवतायं ते निर्णायक आहे. आणि तो निर्णयच कायम महत्त्वाचा आहे, क्षण हा असो की कोणताही.

यसवायजी's picture

28 Aug 2013 - 10:51 pm | यसवायजी

All that we need is a little edge. The winning horse in the races wins 5-to-1 or 10-to-1. Do you think he is five or ten times faster than the other horses? Of course not. He may only be faster by a fraction, by a nose, but the rewards are five or ten times greater.
Is it fair? Who cares? It doesn't matter. Those are the rules of the game. That is the way the game is played. The same is true in our lives. Successful people are not ten times smarter than the people who fail. They may be better by a nose, but the rewards are ten times bigger.
----------
यावर काय विचार आहेत?

संजय क्षीरसागर's picture

28 Aug 2013 - 11:28 pm | संजय क्षीरसागर

And the life is not about winning, it is Enjoying. One may loose & still learn. The other may Win & still have to prepare for the next win.

I don't say Winning is not satisfying, I say How one Wins that decides everything.

Have you ever thought this way - the Looser has given the Winner an opportunity to Win. So the winner has to be grateful to him. Without an opponent how could he Win?

And I would always want to be a winner who has given all the chance to the opponent, never tried to play on his week points and thanked him for the fight he gave to bring my skills to the peak. Of course, even when I loose, I have learned something new, I can still improvise. What else one wants in a game? May it be game or life, how does it matter? In the end, and of course every time, the basic thing is... Have you Enjoyed it?

I think, the human approach needs a radical change.

यसवायजी's picture

29 Aug 2013 - 12:09 am | यसवायजी

@The other may Win & still have to prepare for the next win.
तेच तर पायजेल हाय ना..
--------
@Looser has given the Winner an opportunity to Win. So the winner has to be grateful to him.Without an opponent how could he Win?

--> Malinga has given Kohli an opportunity to score. so kohli has to be greateful to him. without malinga, how could he do it? (हे पहा )
--------
@Have you Enjoyed it?
>> I am not happy because I am not content. समाधान जर फक्त 'मानण्यात' असतं तर, स्पर्धेत भाग न घेता (प्रेक्षकात बसुन) ही so called Enjoy करता येतच की.. (आनी शीकाया बी भेटल)..
--------
@human approach needs a radical change!!
>> नो कमेंन्त्स..

संजय क्षीरसागर's picture

29 Aug 2013 - 12:32 am | संजय क्षीरसागर

टाइमलाईनवर विन (किंवा लूज) हा सिंगल पॉइंट आहे आणि गेम ही फुल लेंग्थ आहे.
रिझल्ट प्रोसेसची मजा ठरवू शकत नाही पण प्रोसेस आनंदाची असेल तर रिझल्ट दुय्यम होतो हे नक्की.
बाकी तुमचा अप्रोच आहे.
आणि प्रेक्षक होऊन गेम एंजॉय करणं हे विन किंवा लूजशी असंबंधित आहे.

अर्धवटराव's picture

29 Aug 2013 - 10:32 am | अर्धवटराव

कुठल्याही दोन विरुद्ध गोष्टी कुठेतरी एका समान धाग्यावर मिळतातच. कॉम्पीटीशन आणि एक्सलंस (मनाच्या कौलाने घेणं म्हणुया हवं तर) हि जी दोन विरुद्ध टोकं आपल्याला दिसतात ते देखील एकाच धाग्याने बांधील आहेत... तो धागा म्हणजे शक्ती. माणसाला शक्ती वाढवत न्यायची उपजत हौस असते (शारीरीक, मानसीक, बौद्धीक... बाकी न बोललेलं बरं). या हौसेला खतपाणी घालत राहाणे व प्राप्त झालेली शक्ती कशी वापरायची याचं तारतम्य शिकवणं हा पालकांचा प्राथमीक अजेण्डा असावा. (यालाच कदाचीत संस्कार म्हणतात. आईबापाकडुनच हि शिकवण मिळणं अत्युत्तम). एकदाका मुलाला या शक्ती नामक घोड्यावर स्वार व्हायची सवय लागली कि पुढे आयुष्यभराचं टेन्शन मिटलं. शक्तीच्या जाणिवेतुन येणारा कॉन्फीडन्स अपयश पचवायला मदत करतो, तसच यश प्राप्तीसाठी कुठे-किती प्रयत्न हवेत याचे सच्चे आराखडे बांधयला देखील. आपलं कॉम्पीटीशनचं मैदान नेमकं उमगणं, हुडकणं आणि त्यात सर्व यशापयश पचवुन केवळ खेळाण्यात म्हणुन आनंद उपभोगणं यासाठी बळाचं एक्झीक्युशन कसं असतं याचे संस्कार मनावर होणं अत्यावश्यक असतं.

दिडवर्षाच्या मुलावर अत्याचार करता म्हणून तुमच्यावर + त्या प्लेग्रुप वर खरेतर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे..
तुम्ही दिड वर्षाचे होते तेव्हा काय करत होता मालक ?

येथे ठणाणाठणाणा शेकड्यांनी प्रतिसाद देणार्‍या लोकांनी दीड वर्ष हा शब्द गाळलेला पाहून खरच 'नवल' वाटले!

संजय क्षीरसागर's picture

29 Aug 2013 - 12:33 am | संजय क्षीरसागर

हे बहुदा तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही.

निस्त प्रोसेस एंजॉय करायचा उन्माद वास्तवाशी आलेली फारकत उमजुच देत नाही ना.

दिड वर्षे हा खरच महत्वाचा मुद्दा आहे अन विचार काय तर ...?

रिझल्ट प्रोसेसची मजा ठरवू शकत नाही पण प्रोसेस आनंदाची असेल तर रिझल्ट दुय्यम होतो हे नक्की.

म्हणजे काय समजावताय जे दिडवर्षाचा जिवाला आधिच माहित नाहिये ? दिडवर्षाचा जिव मुळातच रिझल्टचा विचार करतो, का प्रोसेसमग्न असतो ?

वास्तवाशी आलेली फारकत किती विरोधाभासी विचार करायला लावते बघा हा... उदा.

आणि प्रेक्षक होऊन गेम एंजॉय करणं हे विन किंवा लूजशी असंबंधित आहे.

म्हणजे वेळिच बाजुला होउन उडवुन दिलेला धुरळ्यात इतरांना लोळताना गंमत बघत राहणे याची मज्याच वेगळि, असं करणं हे विन किंवा लूजशी असंबंधित आहे,असा अर्थ काढायच्या फंदात न पडता इतकच म्हणेन जेव्हडे प्रेक्षक जास्त तयार होतिल तेव्ह्डी स्पर्धा जिवघेणी व अपप्रवृत्ति वाढत जाणारी बनेल. तुम्हि तर निकोपतेच्या मुळावरच उठलात की ? कहर.

संजय क्षीरसागर's picture

29 Aug 2013 - 7:11 am | संजय क्षीरसागर

बालकांसाठी नाही.

तस्मात :

दिडवर्षाचा जिव मुळातच रिझल्टचा विचार करतो, का प्रोसेसमग्न असतो ?

...इथपासून पुढे सर्व चुकत गेलंय

जरा शांत व्हा. श्वास घ्या व प्रोसेसानंदोन्मादातुन बाहेर या, मग पुन्हा सहजपणे (हे फार महत्वाच) आतमधे डोकावुन विचार करा... तुम्हि इथे मांडलेले विचार जिवघेणी स्पर्धा वाढवायला पुरक आहेत असे जाणवत नाहि काय ?

संजय क्षीरसागर's picture

29 Aug 2013 - 4:16 pm | संजय क्षीरसागर

कारण माझा प्रतिसाद तुम्हाला समजलेला नाही.
प्रथम चर्चेचा विषय समजावून घ्या :

मदत हवी आहे… एक number वनराज होण्यासाठी...

प्रत्येकाला नंबर वन व्हायचंय आणि त्याही पुढे जाऊन सतत `नंबरवन'च राहायचंय

तेच तर पायजेल हाय ना..

आणि हे वेड पालक मुलांना इतक्या लहान वयात शिकवतायंत!

मजा म्हणजे एक्सलन्ससाठी प्रोसेस महत्त्वाचीये हे तुमच्या गावीही नाही!

जर प्रोसेस महत्त्वाची आहे हे कळलं तर पुढे प्रोसेस मधलं सातत्य टिकण्यासाठी तुम्हाला (किंवा मुलाला) `प्रोसेसमधे' रस हवा हे लक्षात येईल.

ते जर लक्षात आलं तर

The Question is not how to Win, it is What to Start!

हे लक्षात येईल

आणि मग तावतावनं (तुम्हि तर निकोपतेच्या मुळावरच उठलात की ? कहर...प्रोसेसानंदोन्मादातुन बाहेर या.... वगैरे) प्रतिसाद ठोकण्यापूर्वी, त्या प्रतिसादात मी काय म्हणतोयं ते कळेल.

साधी गोष्ट आहे (आणि पुढचा प्रतिसाद देण्यापूर्वी नीट वाचाल अशी अपेक्षा आहे) : जर प्रोसेस इंटरेस्टींग वाटली तरच सातत्य टिकेल, त्यातनं एक्सलन्स येईल आणि मग विजयाची शक्यता वाढेल. अश्या वेळी हार सुद्धा विजेत्याकडून काही तरी शिकवून जाईल (कारण त्यानं प्रोसेसच रिफाईन केलीये) आणि नैराश्य कधीही येणार नाही.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2013 - 4:26 pm | पिलीयन रायडर

तुम्ही ३ इडियटस मध्ये आमिर ने जे म्हणलय तेच सांगताय का?

"बच्चा काबिल बनो काबिल.. कामयाबी तो साली झक मारके पिछे भागेगी"

मला तर ते तेव्हाच पटलय... जे करताय ते मनापासुन करा मग (तुम्हाला रिझल्ट मध्ये रस नसला तरी) रिझल्ट चांगला येण्याची शक्यता निश्चित वाढते. रिझल्ट साठी काम केलत तर काम करण्याची मजा यायची शक्यता कमी होते...

आमिरचा डायलॉग ज्याने लिहीला त्याच्याशी सहमत..

संजय क्षीरसागर's picture

29 Aug 2013 - 4:47 pm | संजय क्षीरसागर

सहमत तुम्ही डायलॉगवाल्याशी झालात काय की माझ्याशी अर्थ एकच.

पालकांचं कसं आहे ना, पिक्चर बघायला भारी वाटतं, डायलॉग्ज लक्षात राहतात. पण तो विचार आचरणात आणायचा म्हटला की `असं कुठे असतं का? ते पिक्चरमधे ठीक आहे' म्हटलं की पालक मोकळे!

आणि एखादा `जगतो तेच लिहीतो' म्हणणारा मनःपूर्वक सांगतोय तरी....इथे आलेले प्रतिसाद बघा म्हणजे झालं!

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 12:24 am | अग्निकोल्हा

नशीब माझं, तुम्हाला प्रतिसाद कळला!

यामधे त्यांच्या नशिबाला जास्त क्रेडिट द्यावे हि विनंती.

असो..

प्रत्येकाला नंबर वन व्हायचंय आणि त्याही पुढे जाऊन सतत `नंबरवन'च राहायचंय

मग एक्सलन्स म्हणजे यापेक्षा काहि वेगळ असते काय ? एक्सलन्स हाच मुळात "१ नंबर" च्या काँटेक्स्ट मधिल शब्द आहे. थोडक्यात १नंबर असणे हि एक्सलन्सचि गॅरंटी न्हवे पण एक्सलन्स असणे हिच मुळात "१ नंबर" गोश्ट आहे.

आणि हे वेड पालक मुलांना इतक्या लहान वयात शिकवतायंत!

ते फक्त एक्सलन्स कमवायला शिकवत आहेत, मग विरोध कशाला ?

मजा म्हणजे एक्सलन्ससाठी प्रोसेस महत्त्वाचीये हे तुमच्या गावीही नाही!

मज्या म्हणजे प्रोसेस एक्सलंन्सचि खात्रि देउ शकत नाही तर "प्ले सेफ" वा चाकरमानि वृत्ति शिकवते ज्याचा एक्सलन्स घडवण्याशि कसलाच संबंध नाहि. उदा लेवल फाय वगैरे प्रोसेस बेस्ड कंपन्या.. जिथे निव्वळ हमालि चालतेय. फेस्बुक गुगलला कधि पाहिल आहे काय असलि मानांकने मिळवलेली ? येट दे आर अ‍ॅट एक्सलन्स.. थोडक्या प्रोसेस तोडता येणे महत्वाचे.

जर प्रोसेस महत्त्वाची आहे हे कळलं तर पुढे प्रोसेस मधलं सातत्य टिकण्यासाठी तुम्हाला (किंवा मुलाला) `प्रोसेसमधे' रस हवा हे लक्षात येईल.

आता जर प्रोसेस का महत्त्वाची नाहि हे कळलं कि पुढे प्रोसेस मधला बंदिवास तोडण्यासाठी तुम्हाला (किंवा मुलिला) `प्रोसेसमधे' बदल करत राहण्यात रस हवा हे आपोआप लक्षात येईल. आणि

ते जर लक्षात आलं तर

The Question is not how to Win, but how to start!

हे लक्षात येईल.

आणि मग गंडलेल्या प्रोसेसानंदात (शांत तुम्हाला व्हायला लागणार आहे) प्रतिसाद ठोकण्यापूर्वी, त्या प्रतिसादात मी काय म्हणतोयं ते उमजेल.(आणि हा प्रतिसाद नीट वाचण्यासोबत समजुन घ्याल अशी अपेक्षा आहे)

साधी गोष्ट आहे : जर प्रोसेस इंटरेस्टींग वाटली तरच सातत्य टिकेल, म्हणु त्यात सतत सुधार आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अभिप्रेत असलेला "एक्सलन्स" हा माकडचाळा होय.

तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल.

ते फक्त एक्सलन्स कमवायला शिकवत आहेत, मग विरोध कशाला ?

लिहीण्यापूर्वी ज्यावर प्रतिसाद देतोय त्या लेखाचं किमान शीर्षक तरी वाचत जा हो! `मदत हवी आहे… एक number वनराज होण्यासाठी...

तुम्हाला अभिप्रेत असलेला "एक्सलन्स" हा माकडचाळा होय.

तुम्हाला काहीही माहिती नाही तरी प्रतिसाद द्यायची घाई करतायं.

जर प्रोसेस इंटरेस्टींग वाटली तरच सातत्य टिकेल, म्हणु त्यात सतत सुधार आवश्यक आहे

ज्या गोष्टीत रस आहे ती कुणीही सातत्यानं करतं आणि सातत्य, प्रोसेस रिफाईन करून एक्सलन्सची शक्यता निर्माण करतं. तुम्ही उगीच माझी शब्द रचना वापरून नवं काही तरी मांडल्याचा आव आणू नका.

मज्या म्हणजे प्रोसेस एक्सलंन्सचि खात्रि देउ शकत नाही तर "प्ले सेफ" वा चाकरमानि वृत्ति शिकवते ज्याचा एक्सलन्स घडवण्याशि कसलाच संबंध नाहि.... आणि मग गंडलेल्या प्रोसेसानंदात?

तुमची मानसिकता गंडली आहे हे लक्षात येईल तेव्हा खरं! प्रोसेस हाच आनंद आहे आणि फलनिष्पत्ती त्याचा क्लायमॅक्स आहे.

हे पु. लं. सारख्या दिग्गजाचं पत्र पाहा :

१० जुलै १९५७,
प्रिय चंदू

हवेत विरणार्‍या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.

आणि तुमचे विचार पाहा :

थोडक्यात १नंबर असणे हि एक्सलन्सचि गॅरंटी न्हवे पण एक्सलन्स असणे हिच मुळात "१ नंबर" गोश्ट आहे.

नंबरवन म्हणजे एक्सलन्सचि गॅरंटी न्हवे? मग नंबरवन कशाला हवा? काय लिहीताय ते वाचलंय तरी का ?

`पण एक्सलन्स असणे हिच मुळात "१ नंबर" गोश्ट आहे'!

तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं तितकं कमी आहे... मग इतका वेळ मी काय सांगतोयं?

नशीब माझं, तुम्हाला प्रतिसाद कळला!

यामधे त्यांच्या नशिबाला जास्त क्रेडिट द्यावे हि विनंती.

हे मात्र एकदम बरोब्बर!

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 2:30 pm | अग्निकोल्हा

तुम्ही प्रथम प्रतिसादाची भाषा शिकाल तर तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल.

तुमच्या आवडि निवडी सांभाळायला मी तुमचा गुलाम नाही, तुम्हाला जे लिखाण हवेय ते मि नाही तर तुम्हि लिहायचे आहे, आणी इथुनच पुढचा तुमचा प्रतिसाद चुकत गेलाय. तो सुधारा म्हणजे व्यवस्थित उत्तर देतो. सुधरता येत नसेल तर नेहमीप्रमाणे पळ काढा.

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 2:39 pm | अग्निकोल्हा

तुमचे फंडे निव्वळ जिवघेणी स्पर्धा वाढवायलाच पुरक आहेत, व ते फॉलो केल्यास कुर्‍हाडिचा दांडा गोतास काळ यानियमाने दोन चार अपवाद सोडले तर उर्वरित समजाचा घात करण्यास पुरेसे आहेत. जर का खरच ओपन माइंडेड असाल तरच पुढिल चर्चा मुद्देसुद करा व प्रतिसाद द्या अन्यथा तुम्हाला फाट्यावरच मारेन. (इट इज जस्ट अ मेटाफोर, उगा प्रतिसाद समजुन न घेता मारण्याची वगैरे भाषा करतोय बरळण सुरु करु नका अता).

उगीच कोल्हे कुई चालू आहे. तस्मात माझ्याकडून चर्चा थांबवतो

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 4:20 pm | अग्निकोल्हा

स्वतंत्र विचार नाही म्हणजे मांडलेला विचार योग्य विचार नाही हा जावै शोध कशाला ? केवळ तुमच्या विचारांशी तिव्र असहमत आहे म्हणून माझे विचार समग्रपणे समजुन घेण्याआधिच ति संधिच मला न देता फक्त स्वतःचा विचार दामटणे व त्याच्याशि असहमत असल्यास तुमच्याकडे हे नाही ते नाहि यांव अन त्यांव करुन आरोपिच्या पिंजर्‍यात उभे करुन स्वतःच्या शहाणपणाचा टेंभा मिरवणे यापलिकडे तुमच्या प्रतिसादात वाचणे सारखे या धाग्यावर काय आहे ? प्रश्न तुम्हि चर्चा का थांबवलित हा उपस्थित होतच नाही मुळी.. प्रश्न हा आहे कि ति तशी सुरु का केलित ?

एन स्सार, मेले-केळगे नोडल्ला.. भरी 'नवल-नवल' अंद्रे एन आगुत्ते? येल्ला नोडी एन नडदिदे..
निमगे पर्टीसिपेट मडोदिदरे माडी इल्लादरे बिट्ट बिडी.. (just kidding ह.घ्या.)

यत्तक पार्टिसिपेट माडतीरी नीवु ? यारु हुली आगतारे, यारु कत्ति आगतारे, इदु येन नडदद वट्ट तिळंगिल्लरी....शिक्षकरिगे होडिबेक नोडी, मन्श्या इद्दारे मन्श्या हंग इरबेक अंत ;) इवागं सण्ण हुडगुरिगे भाऽळ केलसा इरतावं पा.

यसवायजी's picture

29 Aug 2013 - 9:47 pm | यसवायजी

शिक्षकरिगे होडिबेक नोडी>>
यावाग होगोण?? ना रेडी.

विजुभाऊ's picture

29 Aug 2013 - 5:29 am | विजुभाऊ

ओ संस्थळ मर्‍हाठी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2013 - 10:17 am | प्रभाकर पेठकर

पण ब्येळ्ळगावातूनही दिसतं.

इरसाल's picture

29 Aug 2013 - 10:16 am | इरसाल

शिया कोनाले दिउ र्‍हायले तुमी ?
इजुभोशी सह्म्त.

कपिलमुनी's picture

29 Aug 2013 - 2:33 pm | कपिलमुनी

रिकामा पत्र्याचा डबा घ्या त्यात काही दगड, गोट्या टाका ..आणि वाजवा ...

कन्नड बरतद् !

बॅटमॅन's picture

29 Aug 2013 - 2:38 pm | बॅटमॅन

डिसलाईक चा ऑप्शन द्या रे कुणीतरी.

(रक्तातील मराठी आणि कन्नडिग ची टक्केवारी वेगळी काढता न आलेला) बॅटमॅन.

क्या बात है कपिलमुनी!
काहीही कंट्रिब्यूट करता येत नाही (आणि अ‍ॅसिडिटी स्वस्थही बसू देत नाही!) म्हटल्यावर, लोक काय करतात याचं अत्यंत समर्पक वर्णन.

यसवायजी's picture

29 Aug 2013 - 9:55 pm | यसवायजी

:D Malinga has given Kohli an opportunity to score :D
---------------------------------------------------
Looser has given the Winner an opportunity to Win. So the winner has to be grateful to him.
असला ला़ख मोलाचा सल्ला मिळाला दुनियेला.. अजुन काय पाहीजे? इतरांच्या कंट्रिब्यूशनची काय गरज म्हंतो मी..
तुमचं चालु द्या..
a

यसवायजी's picture

29 Aug 2013 - 3:08 pm | यसवायजी

यसवायबॅटमनजी :D
गोल्-गोल अक्षर शिवी बराबर.. (काला अक्षर भैंस बराबर च्या तालावर..)
;)

कवितानागेश's picture

30 Aug 2013 - 3:09 pm | कवितानागेश

झाली का स्पर्धा?
आम्हालापण बघुदेत की फोटो.