टकाटक

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 10:46 pm

परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी.
घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात.
कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा.

गमभन लिऊन झालं की पाडे.
लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत.
तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर.
मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर.
गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला.
रोजला तेच.

म्या पेंगाया लाग्ली.
मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”.
शिवाजीम्हाराज समजतेय सोताला.

मंगली वराडली, “साहा रे”
म्या हळूच “आटाचा” बोल्ली.
कुणाला कायबी नाय समजलं.
मंगली, “येकावर चार”
म्या, “पंचेईस”

समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय – फकस्त हळू म्हनायचं.

म्या जागीच झाली.
टकाटक.

*शतशब्दकथा*

कथाशिक्षणआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

खेडूत's picture

21 Oct 2013 - 11:00 pm | खेडूत

लईच भारी . . :)
आमची शाळा आटवली !

धर्मराजमुटके's picture

21 Oct 2013 - 11:05 pm | धर्मराजमुटके

शतशब्दकथा बास जाली की ताई ! म्ह्जी तुमी पायवाट दावली. बाकीचे त्यावरुन चालतील आणी रस्ता बनलं.
आता नवीन कायतरी फारम्यॉट आणा की ! जमलं तर ते पयल्यासारखे सबेचे रपट लिवा की ! लै ग्वाडं लागतात वाचाया !

आतिवास's picture

22 Oct 2013 - 1:58 pm | आतिवास

:-)

– फकस्त हळू म्हनायचं.

सुपर वाक्य आहे...

शाळा ते कामगार सभा कुठेही हा फंडा वापरा...

शाळा ते कामगार सभा कुठेही हा फंडा वापरा...
हं! हे नव्हतं लक्षात आलं माझ्या कधी :-)

रेवती's picture

21 Oct 2013 - 11:38 pm | रेवती

लेखन आवडले.

अग्निकोल्हा's picture

22 Oct 2013 - 12:21 am | अग्निकोल्हा

.

अभिजीतराव's picture

22 Oct 2013 - 12:27 am | अभिजीतराव

अप्रतिम लेखन ताई......

स्पंदना's picture

22 Oct 2013 - 4:22 am | स्पंदना

त्याच अस हाय बगा, ह्या आंजीन शिकशनाची बराबर नसच पकडल्या बगा, म्हंजे साळत कशासाटन जायाच? शान व्हाया, एव्हार कळाया म्हनुनच कनी? मग आता ही शानी बी व्हाल्या, आन एव्हारबी कळतोया. एकून साळा जे शिकवायच त्ये शिकवाया लागली तर.

अतिवासताई त्या आंजीचा माज्याकडन एक गालगुच्चा घ्ये ग!

आतिवास's picture

22 Oct 2013 - 2:01 pm | आतिवास

अपर्णाताई, बघते तुमचं काम करायला जमतंय का ते :-)
बाकी 'शाळा जे शिकवायं ते शिकवायला लागली तर' या भावनेशी सहमती.

समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय – फकस्त हळू म्हनायचं.

हे भारी

जेपी's picture

22 Oct 2013 - 7:13 am | जेपी

आवडल .

चतुरंग's picture

22 Oct 2013 - 11:30 am | चतुरंग

एकदम टकाटक लेखन!

-रंगा

जे.पी.मॉर्गन's picture

30 Oct 2013 - 11:56 am | जे.पी.मॉर्गन

"टकाटक" लेखन!

"म्या जागीच झाली.
टकाटक"

आंजीला साळंत जागं र्‍हान्याचं इंगितच गावलं !

जे पी

मदनबाण's picture

22 Oct 2013 - 11:38 am | मदनबाण

मस्त ! :)

(टकाटक) ;)

टकाटक हा शब्द थोडासा वेगळा वाटला ह्या शतशब्दकथेतला, पण कथा नेहमीप्रमाणेच खूप गोंडस आहे आन्जीसारखीच :)

'टकाटक' या शब्दाचा प्रचलित किंवा/आणि आंतरजालीय अर्थ काय आहे याविषयी मी अनभिज्ञ आहे :-)
पण तुमच्या प्रतिसादावरुन हा शब्द आंजीच्या निरागसतेला न शोभणारा आहे असं तुम्हाला वाटलं हे स्पष्ट होतंय.

समर्थन नाही. पण कदाचित आंजीने हा शब्द 'झोप सगळी उडून गेली (नवी गंमत कळल्याने)' - इतक्याच मर्यादित अर्थाने वापरला असावा इथं :-)

तिमा's picture

22 Oct 2013 - 12:16 pm | तिमा

आन्जीचा इनोसन्स आवडला.

आतिवास's picture

28 Oct 2013 - 1:17 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

पैसा's picture

28 Oct 2013 - 4:07 pm | पैसा

मस्तच!

* वर "टकाटक" या शब्दाबद्दल चर्चा जरा वाचली. "टक्क जागी झाली" किंवा "टकटकीत जागी झाली" असा शब्दप्रयोग माहित आहे.

आतिवास's picture

29 Oct 2013 - 4:37 pm | आतिवास

आज "टकाटक" शब्द प्रत्यक्ष ऐकला (पुन्हा एकदा).
अनोळखी भागात दुचाकी पंक्चर झाली. मग समोर दिसलेल्या दुकानात गेले. त्याने अर्धा तास काही काम केलं. निघताना मी म्हटलं, "व्यवस्थित केलं आहे ना सगळं?" त्यावर तो माणूस म्हणाला, "एकदम टकाटक झालंय, काळजीचं काम नाही काही ...." :-)

तुम्ही ते आगरी कोळ्यांच गाणं ऎकलं असतं तर अर्थ आधीच कळाला असता. :-)

गवि's picture

29 Oct 2013 - 4:59 pm | गवि

जस्ट टू अ‍ॅड टू द लिस्ट.. तव्यावर केलेल्या ठराविक रेसिपीजना टकाटक म्हणतात. मुंबईत तर या रेसिपीज फेमस आहेत. खडा पावभाजीसदृश.

उदा. तवा सीफूड टकाटक, तवा सब्जी टकाटक, तवा पनीर टकाटक

नमुना इथे

आतिवास's picture

29 Oct 2013 - 7:55 pm | आतिवास

पुढच्या मुंबई भेटीत "तवा सब्जी टकाटक" असं म्हणून बघेन एखाद्या वेटरला; पाहू काय प्रतिक्रिया येतेय ते :-)

दत्तगुरु आज असते तर त्यांचे किती गुरु झाले असते? आधीचे २४ नि हल्लीचे.... ???

कवितानागेश's picture

29 Oct 2013 - 1:11 am | कवितानागेश

आवडली कथा.
अश्या 'रोजला तेच' शिकवणार्‍या शाळा आहेत तर... पेंगणारच पोरं.

किसन शिंदे's picture

29 Oct 2013 - 4:49 pm | किसन शिंदे

टकाटक आहे कथा आणि लिहण्याची पध्दतही. शेवटचं वाक्य एकच नंबर!!