म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास.
गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत".
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.”
आयनं हसून श्येंगदानं दिलं.
आज्जीनं गूळ दिला हातात.
आण्णा पेन देनार हायेत.
गावभर हिंडून दारात बसली.
मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली.
आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी.
कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत.
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.
पन सोताला शाने समजत्येत जादा.
म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!”
राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!”
म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
प्रतिक्रिया
15 May 2014 - 3:04 am | संग्राम
आन्जी ब्याक!
>>म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? ..... निरागस प्रश्न :)
15 May 2014 - 3:17 am | आत्मशून्य
:)
15 May 2014 - 4:02 am | स्पंदना
:))
आंन्जे ग कसं सांगायच तुला!
15 May 2014 - 6:03 am | यशोधरा
एकदम मस्त! आंजे ग आंजे! *dance4*
15 May 2014 - 6:31 am | रेवती
आन्जी भारीच्चे!
15 May 2014 - 7:34 am | जेपी
आवडली कथा.
15 May 2014 - 7:49 am | श्रीरंग_जोशी
खासंच आहे कथा. खूप आवडली.
15 May 2014 - 2:34 pm | बालगंधर्व
अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि अहे. पण मणाला बिहिडली. मला माज बालपण आथवला. अजुन येउ दे.
15 May 2014 - 3:43 pm | टवाळ कार्टा
कय स्तमिन अहे असे लिहिन्यच
15 May 2014 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित सन्गा.
कोण म्हणतोय रे की, या बेशुद्ध कोलांट्या उड्या आता विनोदी न वाटता लक्ष वेधण्याचा करूण प्रयत्न वाटत आहेत म्हणून ?
16 May 2014 - 1:44 am | विजुभाऊ
ह्या गण्ढर्व्हाणा त्येन्च्यी स्व्हाक्सरी त्यवडी सूध्द म्हराटीत ल्हिता येत्ये.
16 May 2014 - 7:37 pm | आदूबाळ
ति चोप्य पस्ते आहे
16 May 2014 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त अहे"*. तेम्च इन्गलिश सपेलिन्ग पन ब्यकार अस्नार्च.
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)
18 May 2014 - 2:20 pm | बॅटमॅन
तुम्हांला मॅसोकिझम म्हणायचं असावं बहुधा.
18 May 2014 - 4:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाय, नाय !
ही निर्बुद्ध टायपिंग करताना "स्वपीडन" करून घेऊन नंतर "स्वतःचे हसे" आणि "दुसर्याचे पीडन" करण्यात आनंद समजणारी चोम्प्लिचतेद च्रोनिच "ट्रीप्पल व्हॅम्मी" केस आहे ;) =))
18 May 2014 - 8:34 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
15 May 2014 - 8:09 am | सस्नेह
या आंजीच्या व्यथाच वेगळ्या !
15 May 2014 - 8:45 am | अत्रुप्त आत्मा
:D आंजी जिंदाबाद! :D
15 May 2014 - 10:35 am | मदनबाण
यकदम ब्येस्ट लिवलय बघा... :)
15 May 2014 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे
आंजीच्या पराब्लेम्वर माज्याकडं येक आयड्या हाय !
आंजी लई डोस्केबाज हाय. दुस्री-तिस्रि येका वर्सात करून तिला फुडच्या वर्शि यकदम तिस्रीत टाका की वो, अतिवास मॅडम. मंग आंजीला राम्या-मुक्या-सुर्कीला ठेंगा दाकवता यील :)
16 May 2014 - 1:46 am | विजुभाऊ
आजून ये उपाय हाय. रम्या मुक्या सुर्कीला यका वर्सात दोन वर्स ठीवा
16 May 2014 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे
कुर्पया "यकदम तिस्रीत टाका" आयवजी "यकदम चौतीत टाका" आसं वाचा. गलतिशे मिस्टेक व्हुवा भाय ;)
15 May 2014 - 10:54 am | चिगो
आन्जे आन्जे.. अगं किती गं दुखः ते तुझं?
आतिवास ताईंच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक सुंदर निरागस आन्जीकथा..
15 May 2014 - 11:08 am | चाणक्य
काय मस्त आहे ही पोरगी. आन्जी राॅक्स.
15 May 2014 - 11:11 am | धर्मराजमुटके
म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
त्या लहान मुलीचं सोडून द्या हो. पण यालाच प्राक्तन म्हणतात. मी पैलीतून दुस्त्रीत गेलो हयाचा आनंद न मानता तो तिस्त्रीत गेला म्हणून दु:खी होणार्यांची संख्या जगात कमी नाहीये.
15 May 2014 - 11:22 am | एस
आमच्याकडून आंजीला फूल...
15 May 2014 - 3:26 pm | सूड
माताय !! ह्या डबल डिलाईटचं रोप होतं घरी. फोटो पाह्यला नी आठवलं.
15 May 2014 - 11:31 am | पैसा
सकाळीच वाचलं. आजचा दिवस मस्त जाणार!
15 May 2014 - 11:44 am | ऋषिकेश
:)
15 May 2014 - 11:54 am | बॅटमॅन
आंजी द ग्रेट =))
15 May 2014 - 1:49 pm | अजया
आंजी फास झाली !! ब्येस झालं.ते फुडं गेल्याले नाफास झालं की तुझ्याच बरोबर गं !
15 May 2014 - 2:19 pm | मृत्युन्जय
हाहाहा.मस्तच. सुरुवातीला शतशब्दकथा एक फ्याड वाटले होते. पण सगळ्या कथा एक नंबर भारी आहेत. याचे एक पुस्तक आलेच पाहिजे.
15 May 2014 - 2:27 pm | तुमचा अभिषेक
हा हा हा .. सहीये .. साधा सरळ विचार, आंजीस्टाईलने धमाल आणली :)
15 May 2014 - 2:43 pm | इशा१२३
आंजी भारीच आहे...सुरेख..
15 May 2014 - 3:13 pm | नित्य नुतन
एक्दम हल्क फुल्क... खुपच छाण ...
15 May 2014 - 3:24 pm | सूड
>>म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
हे मस्त !!
15 May 2014 - 3:42 pm | टवाळ कार्टा
=))
15 May 2014 - 3:49 pm | प्यारे१
ऐला!
खासच.
बाकी 'शरेत' सोत्ताशीच लाव म्हना आन्जीला.
15 May 2014 - 4:10 pm | बबन ताम्बे
आवडली आंजीचा निरागसपणा.
"त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.पन सोताला शाने समजत्येत जादा."
आमच्यावानी कधी कधी साळंला बुट्टी पण मारते. :-)
15 May 2014 - 4:26 pm | हाडक्या
हे बाकी शाश्वत सत्य बोलली बघा.. कितीही ठरवलं तरी तिस्रीतल्या लोकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण केलं तरी ते आपल्याकडे करतील असं सांगता येत नाही. थोडक्यात हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही..
15 May 2014 - 4:44 pm | कवितानागेश
शी यार... मला पण हेच दु:ख व्हायचं दरवर्षी. दादा कायम १ वर्ष पुढे! :( ;)
15 May 2014 - 5:57 pm | राजेश घासकडवी
आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस. त्येंच्या मागं हायेस ते फकस्त आधी जलमले म्हनून. राम्या, मुक्या, सुर्कीपेक्षाबी लय जोर मारून अभ्यास केलास तर ते ज्यवा त्येंच्या आयला 'मॉं मै बीए पास होगया' म्हनून पेढं देऊन कायतरी न्वाकरी करायला लागतील, त्यवा तू तुजं कायतरी वेगळं चालू ठ्यव. नक्की फु़डं जाशील बग. कारण तेच्यानंतर बी लय अंतर बाकी आस्तं.
15 May 2014 - 6:33 pm | मधुरा देशपांडे
किती गोड आहे आंजीचा निरागसपणा. मस्तच.
16 May 2014 - 8:50 pm | सखी
किती गोड आहे आंजीचा निरागसपणा. मस्तच. हेच म्हणते
16 May 2014 - 4:03 am | जयनीत
आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन कसं जमनार?
म्हन त्या शाईन्या पोट्टे लोकाईले का ह्या टायामाले म्या फक्त पास झाली,
पुढच्या टायमाले वरपास होउन दाखवीन तवाच नावाची आन्जी!
कसं?
16 May 2014 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त,
अंजी रॉक्स
16 May 2014 - 7:32 pm | मराठे
चिंटू प्रमाणेआन्जींसुद्धा आता मूर्त रूप घेऊ लागली आहे.
16 May 2014 - 8:33 pm | मुक्त विहारि
झक्कास...
17 May 2014 - 11:10 pm | नगरीनिरंजन
आंजी लई ग्वाड हाये; पन तिच्या वरच्या यत्तेत नापासगड्डे पोरं नायत जनू.
18 May 2014 - 9:54 am | खेडूत
ही कथा पण नेहेमीप्रमाणेच आवडली.
पु.क.प्र.
:)
18 May 2014 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला अंजीचा निरागसपणा !
-दिलीप बिरुटे
18 May 2014 - 7:03 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आभार.
प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार.
18 May 2014 - 7:15 pm | शुचि
:)
28 May 2014 - 7:04 pm | एस
ही आन्जी मस्त डोक्यात भरून राहिलीय. एरवी धुरळा उडवत स्कोर सेटल करण्यात धन्यता मानणार्या लेखांच्या गदारोळात असं काही पुनःपुन्हा वाचावंसं वाटणारं आंतरजालावर कमीच भेटतं. वाचनखूण लावली आहेच. अजून येऊद्यात. सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. :-)
30 May 2014 - 12:17 pm | आतिवास
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल.
मी कसली चित्र काढतेय? मला चित्रकलेत नापास व्हायची नेहमीच भीती असायची :-)
मिपाकर मीता यांनी एक प्रयत्न केला आहे. मी खरडवही वापरत नाही पण माझ्या 'खव'त तुम्हाला मीता यांनी केलेलं रेखाटन दिसेल. कदाचित ते मीता यांच्या 'खव'तही असेल - मला खात्री नाही.
29 May 2014 - 1:24 am | प्रभाकर पेठकर
सुंदर शब्दचित्र. आन्जीचा निरागसपणा मनाला भिडतो.
30 May 2014 - 11:32 am | म्हैस
लय भारी.
आम्ही पयलीत गेलो कि बाई रागवताना म्हणायच्या लहान आहात का बालवाडीतल्या मुलांसारख करताय ते .. दुसरीत गेलो कि म्हणायच्या पहिलीत आहात का? तिसरीत गेलो कि म्हणायच्या अक्कल नाही का पहिली दुसरीच्या पोरांसारखा वागताय ... :-(
अतिवास तुमच्या अजून कविता आहेत का? सगळ्या एकत्र कुठे मिळतील ?
30 May 2014 - 12:22 pm | आतिवास
धन्यवाद.
हे लेखन कविता नसून 'शतशब्दकथा' (म्हणजे शंभर शब्दांतली कथा) आहे.
मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील.
त्यातल्या नेमक्या शतशब्दकथा कोणत्या आहेत त्याचा दुवा बहुधा देता येणार नाही - मला तरी देता येणार नाही!
30 May 2014 - 9:44 pm | सखी
मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. -खरतर असे केले तर तुमचे लेख आणि प्रतिसादही दिसतात. फक्त तुमचं लेखनच बघायच असेल तर इथे जा
http://www.misalpav.com/user/13089/authored
यातल्या जनातलं, मनातलं मधल्या शिर्षकांवर टिचकी मारली तर बहुतेक सर्व तुमच्या शतशब्दकथा आहेत. आणि अतिवासताई ते पुस्तकाचे खरच मनावर घ्या इथे तुमचे खुप फॅन, ऐसी आहेत :)
30 May 2014 - 9:58 pm | आदूबाळ
हेच (कधीपासून) म्हणतोय...
11 Jun 2015 - 1:07 am | रुपी
ही वाचायची राहून गेली होती बहुतेक.
11 Jun 2015 - 1:36 am | स्रुजा
झकास ! आन्जी लय भारी बघा :)