हसू

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
19 Apr 2013 - 11:29 am

शाळेत पावणे आलते.
कशाला कायकी.

आमाला कायबाय इचारलं.
धडा वाचाया लावला, पाडे इचारले.
अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ.
त्यास्नी समदं येतं.
माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय.
आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”.
गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!

मला विचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम.
कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड.
आवाज खोल हिरीतून आला.

पावणे हसले. गुर्जीबी हसले.
समदी हसली. म्याबी हसली.

पावणे गेले.
गुर्जी आले.
माजे केस वढत एक ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक.

रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी”
“बक्षीSस” ते म्हणले.

समदी पुन्ना हसली.
म्या रडतच व्हती.
तरीबी हसली.

*शतशब्दकथा

कथासमाजशिक्षणआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

19 Apr 2013 - 11:36 am | यशोधरा

आई गं.. :( किती दुष्ट गुर्जी :(

किसन शिंदे's picture

19 Apr 2013 - 11:37 am | किसन शिंदे

काय की या वेळेला जरा कळाली नाही कथा.

आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”.
गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!

याबद्दल कोणी मला विस्कटून सांगेल काय?

अद्द्या's picture

19 Apr 2013 - 11:55 am | अद्द्या

अण्णा म्हणतात डोक्याला भोक आहे एक

काहीही ऐकलेलं / सांगितलेलं/ समजावलेलं डोक्यात राहत नाही . .
त्या भोकातून बाहेर जातं . .

(एका वाक्यात . . अक्कल नाही )

आता ते भोक बंद करायला काही तरी प्याच वर्क केलं पैजे ना .

मग वरून एक फडकं बांधेन म्हणतीये ती मुलगी .
म्हणजे भोक बंद होईल

काहीही ऐकलेलं / सांगितलेलं / समजावलेलं त्या भोकातून बाहेर पडणार नाही

(एका वाक्यात . काही विसरणार नाही )

हुश्श . . .
बहुदा समजेल एवढ्याने .
नाही . तर तुम्ही पण एक फडकं बांधून घ्या

अभ्या..'s picture

19 Apr 2013 - 2:40 pm | अभ्या..

=)) =)) =)) =))
बाकी शतशब्दकथा आवडली. सुरेख.

अद्द्या's picture

19 Apr 2013 - 4:13 pm | अद्द्या

हसायला काय झालं रे अभ्या
किती मेहनतीनं मी ते समजावून सांगितलं होतं :( :|

(जोक/कविता समजावून सांगायला लागणे . . य़ पेक्षा वाईट गोष्ट दुसरी नाही ):P

अभ्या..'s picture

19 Apr 2013 - 5:23 pm | अभ्या..

मी चाळणीचा विचार करत होतो.
=)) =)) =)) =))

अद्द्या's picture

19 Apr 2013 - 5:26 pm | अद्द्या

हाहाहा =)) =))

आतिवास's picture

19 Apr 2013 - 7:59 pm | आतिवास

आभारी आहे राव साहेब.

अग्निकोल्हा's picture

19 Apr 2013 - 11:45 am | अग्निकोल्हा

समदी पुन्ना हसली.
म्या रडतच व्हती.
तरीबी हसली.

_/\_ अतिशय संवेदनशिल शेवट. छान माडणी आहे.

अद्द्या's picture

19 Apr 2013 - 11:57 am | अद्द्या

कविता बेस्ट हो

आतिवास's picture

20 Apr 2013 - 7:43 am | आतिवास

या कथेची रचना छोट्या वाक्यांत असल्याने 'पाहताना' ती कविता दिसतेय खरी; पण ही कविता नाही.
निदान लिहिताना तरी मला 'कविता' अभिप्रेत नव्हती.

कदाचित एका विशिष्ट पद्धतीने ती म्हटली/वाचली तर ती कविता वाटण्याची शक्यता आहे हे मात्र खरं :-)

अद्द्या's picture

20 Apr 2013 - 8:33 am | अद्द्या

अच्छा . .
मला हा प्रकार फार माहित नवता . .

पण जे काही आहे ते मस्त आहे .
आवडलं एवढ खरं

युन्द्या अजून :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2013 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोराच्या वाट्याला नशीब आणि त्याचं दुर्दैव.
छान मांडणी.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

19 Apr 2013 - 12:02 pm | तिमा

वर्गात स्वतंत्र विभाग असता तर समदी हंसली नसती.

बॅटमॅन's picture

19 Apr 2013 - 12:30 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

बाकी कथा मस्त जमलीये हेवेसांनल. या प्रकारावर लेखिकेची पकड मस्तच बसलीय!

माणुसघाणे काका म्हणुन तर मुलींच्या शाळा निघाल्या :)
हे असे ।हसतात म्हणुनच वेगळे विभाग हवेत :-/

स्पंदना's picture

19 Apr 2013 - 12:32 pm | स्पंदना

काहीजणांच आयुष्य! दुसरे हसताहेत म्हणुन हसतच संपत.
फार वाईट वाटल. चटका लागला जीवाला.

तुमचा अभिषेक's picture

19 Apr 2013 - 12:41 pm | तुमचा अभिषेक

अगदी अगदी
आधी हे वाचले होते, पुन्हा वाचले, पुन्हा आवडले..

पैसा's picture

19 Apr 2013 - 4:10 pm | पैसा

खूपच छान लिहिताय!

शुचि's picture

19 Apr 2013 - 5:07 pm | शुचि

च च!!! ती लहान मुलगी :(

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 5:31 pm | प्यारे१

करुण कथा! आवडली.

स्मिता.'s picture

19 Apr 2013 - 5:43 pm | स्मिता.

१०० शब्दांत मनाला भिडणारं काही लिहीणं सोपं नाही, लेखिकेत ते कौशल्य आहे.

ही कथा वाचून फार वाईट वाटलं. 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' हे लॉजिक माझ्या आकलनापलिकडचं आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2013 - 12:20 am | बिपिन कार्यकर्ते

लिहिताय सुंदर... चटका लागतोच! :(

लाल टोपी's picture

20 Apr 2013 - 12:34 am | लाल टोपी

नेहमीप्रमाणेच थोडक्यात पण उत्तम..

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2013 - 12:34 am | श्रीरंग_जोशी

लघुकथा आवडली. शेवट मात्र चटका लावून गेला.

उपास's picture

20 Apr 2013 - 1:38 am | उपास

'तरीबी हसली...' हा शेवट अत्युच्च! भारी लिहिलेय.

रेवती's picture

20 Apr 2013 - 3:42 am | रेवती

वाईट वाटले.

मनीषा's picture

20 Apr 2013 - 5:26 am | मनीषा

चूक नक्की काय झाली हे न सांगताच शिक्षा देणे हा अतिशय क्रूरपणा आहे...
पण आपल्या समाजात तो सर्वमान्य आहे.

शतशब्द कथा हा लेखन प्रकार खूपच प्रभावी आहे. काही हजार शब्दांत अथवा पानात (पुस्तकांच्या) जे कदाचित सांगता येणार नाही, ते अचूक पणे सामोरे येते.

सस्नेह's picture

20 Apr 2013 - 1:48 pm | सस्नेह

दोन येण्या घातलेली तोंडात बोट घातलेली शाळकरी पोर डोळ्यासमोर उभी राहिली..!

प्यारे१'s picture

20 Apr 2013 - 5:09 pm | प्यारे१

+१

आठ-दहा दिवसांपूर्वी चप्प तेल लावून घातलेल्या दोन वेण्या नि त्यांना बांधलेल्या लाल रिबीन्स. त्या देखील आता मळलेल्या. सकाळी खोपटात पाणी नसल्यानं आंघोळ न करता तशीच तोंड धुवून. केसात गवताच्या एक दोन बारीक काड्या.गारठ्यामुळं थोडं नाक वाहतंय. सुरसुर करत वर ओढायचा अयशस्वी प्रयत्न.

मोठ्या भावाचा मापाला मोठाच होणारा कधीतरी पांढरा असलेला,ज्याचा खिसा अर्धवट फाटलेला, दोन बटनं तुटलेली नि कुठंतरी मधेच फाटलेला शर्ट. अर्धवट खोवलाय डार्क निळ्या (नेव्ही ब्ल्यू) स्कर्टमध्ये... हा तर एक दोन महिने धुतलाच नाहीये. दोन हुकांच्या ह्या स्कर्टला एक बक्कल लाल नि दुसरं पांढर्‍या दोर्‍यात शिवलेलं.

पायावर मळ साठलेला. 'शिल्पर' पर्वाच तुटली म्हणून तशीच अनवाणी आलेली.
कानाखाली बसल्यानं झिणझिण्या आलेल्या एक हात गालाशी नि दुसरा स्कर्टाच्या टोकाशी चाळा करत, पायाच्या अंगठ्यानं वर्गातली जमीन उकरत, डोळ्यात पाणी आलेलं नि तोंडानं ओशाळवाणं हसणारी यत्ता ४-५ वी तली मुलगी.

आतिवास's picture

20 Apr 2013 - 8:43 pm | आतिवास

वर्णन आवडलं - चित्रमय झालं आहे :-)

शिल्पा ब's picture

21 Apr 2013 - 12:06 am | शिल्पा ब

आपल्याकडची शिक्षक जमात पोरांना फक्त शिक्षा करण्याचंच काम करायचं असतं अशा समजुतीत असते. त्यामुळे हे असले लोकं अज्जिब्बात आवडत नैत. भिकारचोटपणा नुसता.

बॅटमॅन's picture

21 Apr 2013 - 12:48 am | बॅटमॅन

+१११११११११११११११११.

असे काही दारुडे अन मारकुटे शिक्षक पाहिल्याने सहमत आहे.

आतिवास's picture

21 Apr 2013 - 9:16 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

नगरीनिरंजन's picture

22 Apr 2013 - 1:37 pm | नगरीनिरंजन

वाचून कळवळलो हो!
असल्या शाळांनी आणि असल्या मास्तरड्यांनी किती मुलांचा स्वाभिमान नष्ट केला असेल देव जाणे.

कवितानागेश's picture

22 Apr 2013 - 1:51 pm | कवितानागेश

खरंच वाईट वाटतं..
पण हे सगळं असं १०० शब्दात बसवणं फारच कठीण आहे. छानच लिहिताय तुम्ही.

सोत्रि's picture

22 Apr 2013 - 10:48 pm | सोत्रि

मस्त चटका लावणारे लिखाण!

-(मारकुट्या मास्तरांचा मुलगा) सोकाजी

चिगो's picture

23 Apr 2013 - 9:13 am | चिगो

चटका लावणारी कथा.. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त लिहीता तुम्ही. चिंधी बांधायची आयड्या आवडली..:-)
(डोक्याला भोक असलेला) चिगो