म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत.
आज सांजच्याला आले तवा हासत व्हते.
म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!”
ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत.
“तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली.
आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”.
बाबौ! आता कायबी कराया येतंय.
कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा.
पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु.
अब्यास कर, सुद्द बोल,
भांडू नको, श्या दिऊ नको,
पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड.
गंपतीचं भजन म्हन.
घरात आय, साळंत हे. हैतच.
पोरपोरी हस्त्येत.
रडू रडू होतंय मला.
येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय.
“द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान!
*शतशब्दकथा
प्रतिक्रिया
23 Jul 2013 - 3:13 pm | बिपिन कार्यकर्ते
हेहेहे! ही चिमणी भारीये हां... आय टेल यु!
23 Jul 2013 - 3:31 pm | कपिलमुनी
भारी लिहिता ..
'ओ हेन्री' च्या कथांची आठवण होते ..
23 Jul 2013 - 3:45 pm | सस्नेह
मारुतीराया पाव रे बाबा हिच्या नवसाला !
23 Jul 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. नवसाला पाव नै तर पूर्णपणे पूर्ण कर ;)
23 Jul 2013 - 4:06 pm | अग्निकोल्हा
अंतर्मुख बनवते.
23 Jul 2013 - 4:17 pm | यशोधरा
:)
23 Jul 2013 - 4:29 pm | सुधीर
ह्या छोटीची लेखमाला खूप छान आहे.
23 Jul 2013 - 4:54 pm | नि३सोलपुरकर
आवडले.
खूप छान आहे.
23 Jul 2013 - 5:37 pm | निवांत पोपट
‘आंजी’चं दुखणं मला कळलं.. :)
पहिली,दुसरीत असताना पिताश्रीच एन्स्पेक्शनला आले होते,त्यावेळेचं छातीतलं थाड,थाड,आणि कानकोंडं होणं अजून लक्षात आहे.
23 Jul 2013 - 6:12 pm | आतिवास
पण ते पाहुणे वायले :-)
नाहीतर आण्णा "गुर्जी" आहेत हे आन्जीला माहिती असलं असतं की आधीच!
पण एकूण गुर्जीच - ते पाहुणे आणि आण्णाही :-)
23 Jul 2013 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून एक शब्दशतक ! अभिनंदन !!
24 Jul 2013 - 11:53 am | मन१
उत्तम
24 Jul 2013 - 12:05 pm | कोमल
लैच ग्वाड हाय ही आन्जी..
:)
24 Jul 2013 - 12:59 pm | किसन शिंदे
एवढी भिडली नाही आधीच्या शतशब्दकथांपेक्षा.
24 Jul 2013 - 7:50 pm | कवितानागेश
गमतीदार. :)
24 Jul 2013 - 11:30 pm | स्फिंक्स५
उत्तम
25 Jul 2013 - 8:56 am | स्पंदना
द्वाड कुठली!
पोरगी म्हणावी का काय?
25 Jul 2013 - 1:52 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
25 Jul 2013 - 2:14 pm | मदनबाण
ओकीटोकी... :)
25 Jul 2013 - 4:37 pm | अभ्या..
मस्त एकदम
25 Jul 2013 - 5:28 pm | अद्द्या
हिहीहाहाहा
मस्त मस्त .
मागे पण आपल्या काही शतशब्दकथा वाचल्या होत्या .
आवडेश :D
25 Jul 2013 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडेश.
-दिलीप बिरुटे
27 Jul 2013 - 8:58 am | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही..ह्हा..ह्हा.. :-D
लै..लै.. भारी वाटलया वाचतांना! :)
6 Aug 2013 - 6:01 pm | पैसा
मस्त! माझे आईवडील आणि काका काकू पण माझ्या शाळेत होते. ६ वर्षं!!
6 Aug 2013 - 7:35 pm | आतिवास
सहा वर्ष!
आणि एक नाही, दोन नाही तर चारजण!!
तुम्ही शुद्ध लिहिता यात काय नवल मग? :-)
6 Aug 2013 - 9:31 pm | पैसा
म्हणून तर मिपावर डु आयडी घेणं अजिबात शक्य नाही! ;)
7 Aug 2013 - 8:38 am | मनीषा
घरचेच लोक, बाहेर सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवणार म्हणजे छ्ळच आहे.
आणि तिला आशा आहे, मारूतीरायाला नवस केला तर तो काहीतरी करेल म्हणून...
तिचा नवस पूर्ण होऊ दे हीच सदिच्छा !
7 Aug 2013 - 8:57 am | चित्रगुप्त
मस्त. पन येक पराब्लिम हाये:
आण्णा आदिच मारुतीला धा रुपयाचा नवस बोलून आल्यातः
द्येवा, ह्ये धा रुपे घे, अन माजी आन्जाक्का अब्यास करु दे, सुद्द बोलू दे. पाडे म्हनू दे, अकशर चांगलं कहाडू दे, गंपतीचं भजन म्हनू दे. आनि तिले भांडन तंटा नको करु द्येउ, श्या त अज्याबात नको दिऊ दिऊ रे मारुतिराया.
आता आन्जाक्काला म्हनाव, पंदरा रुपेचा नौस बोलावा लागीन, मंगच ऐकते मारुती.
8 Aug 2013 - 7:26 pm | आतिवास
काही खरं नाही हो आमच्या आन्जाक्काचं :-)