“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली.
त्ये काय असतंय बगाया लगी साळत.
पोलिसमामाबी व्हते.
राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत.
मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार.
मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी.
मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत.
आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून.
म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.”
आण्णा म्हन्ले, “जा घरी.”
बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.”
बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!”
आण्णा लटलट कापत व्हते.
मला वराडले, “जा मुकाट घरी."
आण्णांना बापूकाकांचं भ्यावं वाटलं?
मद्दान लई वंगाळ.
* शतशब्दकथा
प्रतिक्रिया
10 Apr 2014 - 9:35 pm | यशोधरा
सहीये! अचूक. अगदी असंच होतही असणार.
10 Apr 2014 - 9:37 pm | शुचि
मस्त!!! सुपर्ब!!!
10 Apr 2014 - 9:53 pm | आत्मशून्य
म्तदान. खिक्क.
10 Apr 2014 - 9:57 pm | आदूबाळ
आन्जी इज ब्याक!
कोणी प्रकाशकाने आन्जी-कथांचं एक कॉफी टेबल बुक काढावं. दोन पानांवर एक कथा. डाव्या पानावर कथेची रेखाचित्रं, उजव्या पानावर डोकावून बघणार्या खट्याळ डोळ्यांच्या झिपर्या आन्जीचा वॉटरमार्क आणि त्यावर इंपोज केलेली शतशब्दकथा. शक्यतोवर शाळकरी हस्ताक्षरात.
मजा आ जायेगा.
मी पहिला कष्टंबर.
10 Apr 2014 - 10:07 pm | यशोधरा
ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा. :D
10 Apr 2014 - 10:08 pm | आदूबाळ
मी ऐड्या दिली ना, मग मी पयला ;)
17 Apr 2014 - 1:01 am | सखी
मस्तच आहे कल्पना! आन्जी रॉक्स!
10 Apr 2014 - 11:41 pm | आतिवास
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे तुम्ही आदूबाळ :-)
चित्र अगदी डोळ्यांसमोर उभं केलंत.
कधी ते वास्तवात येऊ शकलं तर ही तुमची आयडिया नक्की वापरेन.
अर्थात तुम्हाला श्रेय देऊन ...
(शोधायला सोयीचं जावं म्हणून हा प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर नेऊन ठेवावा म्हणतेय - अर्थात तुमची हरकत नसेल तरच!)
10 Apr 2014 - 11:43 pm | शुचि
ये हुई ना बात!!! आदूबाळ यांचेही कौतुक अन आपले स्वप्न साकार होवो ही शुभकामना. :)
11 Apr 2014 - 10:04 am | आदूबाळ
अगदी जरूर ठेवा.
अशी स्वप्नं बघत रहायला हवीत ....
14 Apr 2014 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
१०० नंबरी आयड्या !
10 Apr 2014 - 10:17 pm | अनुप ढेरे
मस्तं !
10 Apr 2014 - 10:58 pm | खेडूत
प्रसंग समोर उभा केलात!. . . :)
10 Apr 2014 - 11:14 pm | खटपट्या
मस्त ! आदुबाळ चि आयडीया चान्गली आहे.
10 Apr 2014 - 11:23 pm | मधुरा देशपांडे
आन्जी च्या इतर कथांप्रमाणेच हीसुद्धा आवडली.
11 Apr 2014 - 12:08 am | राही
ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या लघुकथा आठवल्या. त्यात अर्थात मिस्किल आंजी नाही. पण मिताक्षरी आणि अर्थबहुल.
वर आदूबाळ यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर ह्या कथांचे पुस्तक व्हावे. उषा मेहता यांनी अनुवादलेल्या किचन कवितांप्रमाणे छोटेखानी पण आशयघन. लंपन, गोट्या या व्यक्तिचित्रांप्रमाणे ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.
11 Apr 2014 - 10:35 am | आनन्दा
अनुमोदन
17 Apr 2014 - 8:55 am | आतिवास
पी. मानसी यांचं लेखन मी अजिबात वाचलेलं नाही - आता मिळवून वाचते! अर्थात आंग्ल अनुवाद - बहुधा साहित्य अकादमीत मिळावीत त्यांची पुस्तकं. वाचायला काहीतरी नवं सुचवल्याबद्दल आभार.
11 Apr 2014 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा
मास्टरनी की मास्टरी को (फिर से)सलाम!
11 Apr 2014 - 12:27 am | मुक्त विहारि
उत्तम
कथा आवडली.
11 Apr 2014 - 2:56 am | बहुगुणी
राही वर म्हणतात त्याप्रमाणे 'मिताक्षरी आणि अर्थबहुल'!
ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.
+१०००11 Apr 2014 - 5:24 am | नगरीनिरंजन
मस्तच.
आदूबाळची कल्पनाही आवडली.
11 Apr 2014 - 6:54 am | स्पंदना
कडमडली पुन्हा आन्जी!
काय मस्त ग अतिवास! अगदी गावाकडची शाळा, ते मतदानाला उभे लोक, सगळ सगळ डोळ्यासमोर आलं.
आदूबाळ __/\__!!
11 Apr 2014 - 8:43 am | प्रीत-मोहर
आन्जी च्या सगळ्याच गोश्टी आवडतात :)
आतिवास पुस्तकाच मनावर घ्याच!!!
11 Apr 2014 - 8:49 am | किसन शिंदे
काय पन ना आन्ना, टाक्लं अस्त यखादं मत आन्जीनं त काय आबाळ कोसळ्ळं अस्तं का. वरून पाश्शेची नोट मिळाली नस्ती का मग.
कॉफी टेबल बूकची उत्सूकता आहे.
17 Apr 2014 - 8:57 am | आतिवास
"पाश्शेची नोट"!! :-)
11 Apr 2014 - 9:27 am | प्रमोद देर्देकर
आवडेश
╱╱┏╮╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱
╱╱┃┃╱╱╱┳╱┓┳╭┫┳┓╱
▉━╯┗━╮╱┃╱┃┣┻╮┣╱╱
▉┈┈┈┈┃╱┻┛┛┻╱┻┻┛╱
11 Apr 2014 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार
अंजी रॉक्स,
11 Apr 2014 - 10:00 am | राजो
ही पण कथा मस्त जमून आली आहे. आंजी रॉक्स.. खरंच!
11 Apr 2014 - 10:04 am | अजया
केसाच्या झिप्र्या आवरत ,गावभर फिरणारी आंजी दिसली.अगदी सपष्ट!
11 Apr 2014 - 10:10 am | सुहास झेले
मस्त :)
11 Apr 2014 - 2:14 pm | सिफ़र
:( असो
11 Apr 2014 - 2:25 pm | सविता००१
मस्त
11 Apr 2014 - 2:28 pm | बॅटमॅन
हा हा हा, एकच नंबर!!!!!!
आदूबाळ म्हंटात ते अगदी खरंय. तसं एखादं बुक्क निघावं अन अखिल म्हाराष्ट्रात पापिलवार होऊन जावं. लै मजा यील तेच्यायला.
11 Apr 2014 - 3:43 pm | कवितानागेश
हेहेहे. मस्तय मद्दान.
पन लहान मुले मद्दान नाई केले तरी हौशीनी शाई लावून घेतात आणि मिरवतात, हे मात्र पाहिलय. :)
11 Apr 2014 - 8:00 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आभार.
आन्जीच्या मिपावर येण्याला प्रोत्साहन देणा-या सर्व प्रतिसादकांचे आभार.
12 Apr 2014 - 10:54 pm | पैसा
म्या पन आज बोटाला शै लावून आली की! लै मज्जा.
13 Apr 2014 - 12:54 am | आयुर्हित
बोटाला शै लावून आल्याबद्दल आपले आणि व आन्जी चे ही अभिनंदन!
आन्जी रॉक्स!
13 Apr 2014 - 11:28 am | योगी९००
आन्जे केल्लेस्स गं मद्दान...
आवडेश.....
(होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” - हे एकदम राष्ट्रवादी स्टाईल वाटते..)..
17 Apr 2014 - 8:52 am | आतिवास
राष्ट्रवादी शैली ही (आधीच्या) काँग्रेस शैलीशी मिळतीजुळती आहे ना? का वेगळी आहे बरीच?
13 Apr 2014 - 1:09 pm | चौथा कोनाडा
छान ! निरागसपणा, राजकारण, करड्या शिस्तीचे अण्णा : ऑल इन वन ! झकास कथा आवडली !
13 Apr 2014 - 8:47 pm | शुचि
अण्णानचे पात्रही खूप छान आहे.
13 Apr 2014 - 9:13 pm | प्यारे१
मद्दान करन्यायेवडी 'शानी' आन्जी कधी हुनार ?
14 Apr 2014 - 10:49 pm | सुधीर
मला वाटलं आन्जीला इसरलात की काय मद्दानाच्या पूर्वतयारीत?
+१ टू आदुबाळ.
15 Apr 2014 - 2:35 pm | drsunilahirrao
मस्त ! :)
16 Apr 2014 - 4:10 pm | जयनीत
ह्या मोठया मान्साईच असंच -ह्यायते. आता हेच बगा थे मोठ मोठे हिरो हिरोइना टीव्हीवर दिन रात ठणाण बोंबलते लोकाईवो मद्दान करा मद्दान करा म्हनुन अन आन्जी करायले गेली तवा अण्णा नाय म्हनाले.
आन्जी सोबत नेहमी असंच होतं. ती बिच्चारी गरीब गाय! तिच्यावर सारेच वरडतात शाळेमंधी गुर्जी अन घरी आण्णा. फक्त एक मोत्याच हाय जो तिचं ऐकतो तिनं काय बी म्हटलं तर झोकात शेपूट हलवतो 'गपचिप'.
17 Apr 2014 - 8:58 am | आतिवास
हे बरीक खरं :-)
17 Apr 2014 - 4:17 am | चाणक्य
एकदम कडक
17 Apr 2014 - 6:08 pm | गब्रिएल
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी ल्हान्पनी मद्दान न्हाय करु दिलं. आता साय्बान्नी आयड्या दिली त्या टाय्मापासून्चा सग्ळा अनुशेश भरून काडायला. सायबांचा लईच इजय आसो.
30 Apr 2019 - 5:34 pm | देशपांडेमामा
पुन्हा एकदा मतदान
पुन्हा एकदा आंजी :-)
देश
1 May 2019 - 4:36 pm | शब्दसखी
तुमच्या आंजीच्या सगळ्या कथा एक नंबर आहेत. आंजीची पंखा झाले आहे..
अजून कथांच्या प्रतीक्षेत....