झोप उडवणारा 'उडता पंजाब'
(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे)
वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको!
निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या!