शी क्षण
आज पुन्हा भंडारदरा परिसरात भटकंती होती. पाऊस पडतोय छान... ओलावा जसा मुरायला लागला, तसा एका शाळेत शिरलो.. जि. प. शाळा, सहा वर्गखोल्यांसाठी पाच इमारत. त्यातल्या दोन वापरण्यास अयोग्य अशा अवस्थेतल्या. शाळेला शिक्षक चार, एका शिक्षिकेची गाडी चुकल्यामुळे त्या थोड्याश्या उशिरा येणार होत्या.(खिक) मुख्याध्यापक मिटिंगसाठी केंद्र शाळेत गेलेले