एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
26 Aug 2016 - 10:21 pm

मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले.
मुखपृष्ठ :
.

माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते. एवढ्या वर्षाअंनंतर ही जाहिराती बघून उलगडा झाला:
.

"राजेरजवाडे, सरदारदरकदार या लोकात पुष्कळच खप" असलेल्या 'बादशाही याकुती' ची ही जाहिरात वाचा:
.

"मेंदूचे काम विशेष पडणारे" वकील, कारकून, बॅरिस्टरवगैरेंना उत्तम फायदा देणाऱ्या 'व्हिगोराईन' ची जाहिरात:
.

"डॉक्टर्स, ग्राजुएट्स, जजीस, मॅजिस्ट्रेट्स, आफिसर्स वगैरेंनी गौरवलेले 'रंजन' मलम मागवण्याबरोबरच अर्ध्या आण्याचे तिकीट पाठवून 'विशेष खुलाश्याचे हँडबिल' देखील मागवण्यास विसरू नका:
.

"पुष्कळ नामांकित डॉक्टरांनी व सद्गृहस्थानीं सर्वोत्कृष्ट ठरविलेले, दु:खग्रस्तांचा एकच इलाज" असलेले स्वदेशी 'अमृतांजन:
.

गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः
.

परंतु अश्या प्रकारच्या "वर्तमानपत्रातील तिखट मीठ लावून फुगवून लिहिलेल्या मोठमोठया जाहिराती" वाचून औषधे मागवून पैश्यापारी पैसा आणि शरीरप्रकृतीही बिघडवून घेणाऱ्या लोकांना डॉ. ग.पां. काळोखे, ए. ए. एम. एस.यांची ही जाहिरात दिलासा देत असेल:
.

बाह्य भपक्यावर न भुलता "पक्क्या बुंदीपासून यांत्रिक शक्तीने भाजून हस्तस्पर्शाशिवाय दळून ताजी डब्यात भरलेली 'अस्सल काफी' घेण्याचा आग्रह करणारी ही जाहिरात:
.

"एकदाच लाविले असता जणुकाय ताज्या फुलांचा घमघमाट सुटला आहे" असा भास करवून देणारे 'दिल्ली दरबार हेयर ऑईल :
.

नाशिकचे सखाराम वामन जोशी 'खलीपाच्या अद्भुत गोष्टी' आणि 'पोलादि अडकित्ते' एकत्रच जाहिरातवतात :
.

भाषासाहित्यिकसमाजजीवनमानराहणीऔषधोपचारअर्थकारणराजकारणमौजमजाप्रकटनआस्वादमाध्यमवेधलेखबातमीअनुभवसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

26 Aug 2016 - 10:30 pm | पगला गजोधर

ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी
वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 4:44 pm | चित्रगुप्त

पृथ्वीवर बसलेल्या लेडीचे चित्र पारशी फॅशनचे कपडे घातलेल्या स्त्रीचे आहे, बघा:
.

विनोद१८'s picture

21 Oct 2018 - 3:04 pm | विनोद१८

....भारतमाता नाही. ती आहे पृथ्वीवरची "अखंड्भारतमाता".

वामन देशमुख's picture

26 Aug 2016 - 10:32 pm | वामन देशमुख

हे वाचोनी, मौजहीच वाटे भारी!

पैसा's picture

26 Aug 2016 - 10:33 pm | पैसा

हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

पैसा's picture

26 Aug 2016 - 11:01 pm | पैसा

माझ्याकडे अंक आहे त्यात एकही जाहिरात नाही. हा अंक पुन्हा कधी प्रिंट झाला होता का?

पैसा's picture

26 Aug 2016 - 11:21 pm | पैसा

अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

पैसा's picture

27 Aug 2016 - 2:19 pm | पैसा

हळूहळू स्कॅन करून काही पाने टाकते आज उद्या.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 3:30 pm | चित्रगुप्त

छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Aug 2016 - 10:35 pm | माम्लेदारचा पन्खा

काय त्या जाहिराती.... अलभ्य लाभ ! धाग्याबद्दल आभारी आहे...

शि बि आय's picture

26 Aug 2016 - 10:39 pm | शि बि आय

सहीच.... वाचून मजा आली.

शि बि आय's picture

26 Aug 2016 - 10:40 pm | शि बि आय

सहीच.... वाचून मजा आली.

जव्हेरगंज's picture

26 Aug 2016 - 10:48 pm | जव्हेरगंज

कडक!!

अजून काही जुने पुराणे येऊ द्या!!

अभ्या..'s picture

26 Aug 2016 - 11:07 pm | अभ्या..

आहहह, जबरदस्त ठेवा.
धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात.
जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Aug 2016 - 11:25 pm | माम्लेदारचा पन्खा

अनेकांनी गौरवलेले असे छापले की झाले... साधे सरळ लिखाण... झाली जाहिरात....!

हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Aug 2016 - 3:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा .
पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी .
सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Aug 2016 - 3:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा .
पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी .
सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2016 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

और आंदो !

हे गजकर्ण, डोळ्यांत फूल पडणे वगैरे रोग हल्ली गेले का?

संदीप डांगे's picture

27 Aug 2016 - 12:52 am | संदीप डांगे

नै हो, नावे बदलली फक्त,

जुने वाचायला मजा येते. किंमत १० रुपये म्हण्जे तेव्हा फार असेल नाहि.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 1:08 am | चित्रगुप्त

समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला :
.

गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत..
.

लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे:
.

जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?)
.

सुरैय्या आणि नूरजहान:

.

लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः

.
सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का?
.

आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी !
..

छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी:
...

तुषार काळभोर's picture

27 Aug 2016 - 7:29 am | तुषार काळभोर

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय
कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि
गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ...

मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

कुर्ला स्पिनिंग अँड वीव्हिंग कं. असे आहेसे कळते.

हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 7:59 am | कैलासवासी सोन्याबापु

"पुलगम" आठवले बे!

परफेक्त बापू. पुलगम, गांगजी, कोल्हापुरे, क्षीरसागर, चिलका हे सगळे सोलापूरची शान आहेत.

बोका-ए-आझम's picture

27 Aug 2016 - 9:22 am | बोका-ए-आझम

ती हीच का?

शिवकरण बिडी बंद झाली, संभाजी आणि भिकूसा बिडी अजून चालू आहे.

आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

अरे वा! १९११ मधला अंक? फारच छान जपून ठेवला आहे तुमच्या स्नेह्यांनी!

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 1:39 am | चित्रगुप्त

माझ्या लहानपणापासूनचा अमृतांजनचा एक डबा अजून माझ्याकडे आहे:
...

माझ्या वडलांकडे असा एक आहे...

.

.

अभ्या..'s picture

27 Aug 2016 - 12:48 pm | अभ्या..

बहुतेक दिनानाथ दलाल.

एकदम प्लीजंट कॉम्पोझीशन.

असंका's picture

27 Aug 2016 - 12:52 pm | असंका

सही असेल का? शोधावं का चित्रावर? बघतोच..

असंका's picture

27 Aug 2016 - 12:55 pm | असंका

मला तरी दिसली नाही... :(

पण चित्र खरंच भारी आहे..! नक्कीच आपण म्हणता तेच असतील चित्रकार!
धन्यवाद!

एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

कहर नॉलेज आहे राव तुम्हाला!!

पण सॉरी मला असंही काही सापडलं नाही.

नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे.
ebay

असंका's picture

27 Aug 2016 - 2:03 pm | असंका

हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले.

पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 3:35 pm | चित्रगुप्त

सीतेच्या हात-पाय मुरडण्याच्या पद्धतीवरून हे चित्र मुळगावकरांचे वाटते.

पद्मावति's picture

27 Aug 2016 - 2:02 am | पद्मावति

वाह, मस्तं.

मयुरा गुप्ते's picture

27 Aug 2016 - 2:39 am | मयुरा गुप्ते

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे.
तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे.
धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर...
बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे.

"गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली.

--मयुरा

कंजूस's picture

27 Aug 2016 - 5:57 am | कंजूस

खरंच मनोरंजन!

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2016 - 6:33 am | पिलीयन रायडर

एक से बढकर एक!!!

सामान्य वाचक's picture

27 Aug 2016 - 7:33 am | सामान्य वाचक

आजचे अंक आपण जपून ठेवावेत कि काय ?
3र्या 4थ्या पिढी ला याची मौज वाटेल

यशोधरा's picture

27 Aug 2016 - 7:53 am | यशोधरा

मस्त.खजिना :)

मुक्त विहारि's picture

27 Aug 2016 - 9:03 am | मुक्त विहारि

वाखूसा

विवेकपटाईत's picture

27 Aug 2016 - 9:16 am | विवेकपटाईत

मस्तच.वाचून मजा आली.

ओम शतानन्द's picture

27 Aug 2016 - 9:24 am | ओम शतानन्द

पन्डित रन्जन मलम अजुनही मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळते , खरच गुणकारी मलम आहे

दिवाळी अंक ही परंपरा त्यांनीच सुरु केली आणि मला वाटतं, खास स्त्री लेखिकांसाठी वेगळा विभाग त्यांनी ठेवला होता.

प्रचेतस's picture

27 Aug 2016 - 9:27 am | प्रचेतस

भारी.

बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची.

प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा's picture

27 Aug 2016 - 9:58 am | चौकटराजा

साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 3:47 pm | चित्रगुप्त

गुजरा हुवा जमान्यातील एक अतिप्रसिद्ध प्रसंग
.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 6:52 pm | चित्रगुप्त

पूर्वी मुंबईत सर्वत्र 'झारापकर शिलाई मशीन' आणि टेलरिंग कोर्सच्या मोठमोठ्या जाहिराती दिसायच्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Aug 2016 - 10:04 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते.

अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता?

एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय.

मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का?

पैजारबुवा,

म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असाच त्याचा अर्थ आहे

नंदन's picture

27 Aug 2016 - 12:58 pm | नंदन

एक नंबर!

इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या
http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html
कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती
" अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?"
खुरदरे पदार्थ....
आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली
असो.

एस's picture

27 Aug 2016 - 1:49 pm | एस

मजेदार!

तुषार काळभोर's picture

27 Aug 2016 - 3:40 pm | तुषार काळभोर

0

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 3:49 pm | चित्रगुप्त

.

श्रीनिवास टिळक's picture

27 Aug 2016 - 8:03 pm | श्रीनिवास टिळक

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

रविकिरण फडके's picture

27 Aug 2016 - 9:05 pm | रविकिरण फडके

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो.
Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)

चित्रगुप्त's picture

19 Oct 2018 - 9:43 pm | चित्रगुप्त

.