झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर.
लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या
ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले
चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना
स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा
वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा
खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा...
निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा
सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा..
टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे
जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा..
दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी
हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...
मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे
ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे...
हम्माऽऽऽ ...
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी !
आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे ||
भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ?
धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि ||
जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे |
पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?
मनात ढेकूण ठेवा लपवून घट्टच ढाकण दाबुनिया |
ऐकुया संगीत राहुया धुंदीत जीवन रंगीत पेल्यासम ||
फेका ती खड्ड्यात गंजली हत्यारं रंगवुनि मृत वाघनखं |
जळो इतिहास होऊदेत र्हास कुणास पत्रास समष्टीची ||
पायाखालची वीट दे....!
पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे
दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे
हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे
पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे
संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे
वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे
गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !!
राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे
एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !!
तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे
वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !!
नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा
गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !!
लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे
फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !!
मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला
कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!
आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे
विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे
कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे
कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली होऊन
डोई पाखरू बसणे
कठीण दैवासी हासणे
आई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे
ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
गोड मानून घ्या मंडळी ... _/\_
**************************************************
किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता
नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता
पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता
जमला मेळा संतसज्जनांचा
जमला मेळा संतसज्जनांचा
पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू||
हाती घेवूनीया विणा आणि टाळ
भजनात विसरती काळवेळ
हरपली तहानभुक हरपले देहभान
जमला मेळा...||1||
नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री
आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी
माऊलीच्या घरी आलो माहेराला
जमला मेळा... ||2||
विठूरायाचे सावळे मुख
पाहूनिया झाले सर्वसुख
ओलांडला पर्वत यातनांचा
जमला मेळा...||3||
- पाषाणभेद