आठवणी १ - प्रस्तावना
पूर्वी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी मला आठवणीत रमणे जमायचेच नाही. असं वाटायचं की गेला तो काळ, आता काय रमायचं आहे त्यात! पण दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. वेगात धावणाऱ्या आयुष्याला जाणीवपूर्वक एक ब्रेक लावला. आणि ह्या लॉकडाऊनने तर आयुष्य अजूनच संथ झालं. घरातले सगळेच त्यामानाने निवांत असल्याने, बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशातच मिसळपावने गणेश लेख मालेअंतर्गत 'आठवणी' हा विषय दिला आणि मी आठवणींमध्ये कधी रमले ते कळलंच नाही.