गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
25 Sep 2020 - 8:18 pm

श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले.

सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत.

त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील.

एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे. त्यांच्या गाण्यांद्वारेच ते आता आपल्यात असतील. आपणही आपली आवडती एसपींनी गायलेली गाणी सांगावीत.

एस.पी बालसुब्रहमण्यम् यांना भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_
----------------------------------------------------

मैंने प्यार किया ज्युकबॉक्स
https://youtu.be/--d2EItUX_0

हम आपके हैं कौन ज्युकबॉक्स
https://youtu.be/d8kZ8yWV-ck

अप्पु राजा ज्युकबॉक्स
https://youtu.be/1mOk290iuhA

एक दुजे के लिए ज्युकबॉक्स
https://youtu.be/moVxfltTU_E

बागी(जुना) ज्युकबॉक्स
https://youtu.be/eUMqFPGlArs

साजन ज्युकबॉक्स
https://youtu.be/1KZ84n_UMSw

पत्थर के फुल
https://youtu.be/c1KwNvGGlhs

साथिया तुने क्या किया
https://youtu.be/MZKZsYk2jJg

प्रेमिका ने प्यार से (उदीत नारायण यांच्यासमवेत)
https://youtu.be/eFO3y_Q7i_Q

आ के तेरी बाहों में
https://youtu.be/JmlxiAOwEJU

सच मेरे यार है
https://youtu.be/LPa1kbl-uoM

युं ही गाते रहो
https://youtu.be/Q76F-OZukrQ

अो मारीया
https://youtu.be/laHiSZBw-yY

पागल दिल मेरा
https://youtu.be/UrQyjkGKw38

सुन बेलिया
https://youtu.be/AWs7LqmdM8U

रुप सुहाना लगता है
https://youtu.be/9TjXVIR4Fgg

सुंदरमो सुमधुरमो
https://youtu.be/RX09OhbAGww

पोधुवाग एम्मनुष तंगो
https://youtu.be/7SoPNpeJLog

इदय नीला (नीले नीले अंबर पे तमिळमधे)
https://youtu.be/AsN_9uXAoNE

आकाशदिंदा धलेगिरिद रंबे
https://youtu.be/OTG_yrz9Pkg

मनिल इध कादलींद्री
https://youtu.be/yHm8VhgO9p4

गितांजली
https://youtu.be/56ul0WJ15TY

जोतेयली जोतेयली
https://youtu.be/4XvW1CjmReU

जोतेयागी हितेवागी
https://youtu.be/9oVXKiHfcP4

नगुवा नयना (आयडिया सेल्युलर आठवलं का? : ) )
https://youtu.be/Dajcwrykmf8

मेग दीपम
https://youtu.be/IsrOlrFubgs

नानदान टाप्पु
https://youtu.be/Hum-RFf3k7g

चिन्नमणी कोईले
https://youtu.be/kYp6EtQbiSc

मन्रम वंद
https://youtu.be/PS6xcEsCkZM

कलासंगीतसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

25 Sep 2020 - 9:15 pm | अर्धवटराव

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

भावपूर्ण श्रद्धांजली

माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली..

S. P. च्या अनेक सुरेल गाण्यांनी कायम मनावर अधिराज्य गाजवले..
त्याची काही गाणी तर माझ्या आयुष्यात अनेक मोहक रंग घेऊन आली.. thanks S.P.

संध्याकाळी काम संपवून आलो आणि बायकोने माझा आवडीचा गायक म्हणुन S.p. गेले सांगितले.. अतिशय वाईट वाटले..

Will miss you S.P.

वामन देशमुख's picture

25 Sep 2020 - 9:47 pm | वामन देशमुख

एसपींना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

जेव्हा पासून ऐकलं तेव्हा पासूनच सर्वात आवडतं ,, सुंदर शब्द,संगीत , जुगलबंदी चित्रा आणि एस.पी.."साथिया तुने क्या किया"..On loop... आत्म्यास सद्गती लाभो.

नीलस्वप्निल's picture

25 Sep 2020 - 11:02 pm | नीलस्वप्निल

माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली.

https://youtu.be/AWs7LqmdM8U

Gk's picture

26 Sep 2020 - 7:27 am | Gk

मैने प्यार किया
माय फेवरेट

एस पी ना भावपूर्ण श्रद्धांजली!

एक गाणे खूप आवडते. रवींद्र जैन आणि एस पी हे दुर्मिळ कॉम्बिनेशन. प्रतिघात (१९८७) चे गीत.. जानम यहा कोई नहीं.

https://youtu.be/rBXDnSsc7LY

चौथा कोनाडा's picture

27 Sep 2020 - 12:05 pm | चौथा कोनाडा

+१
सुरेख गाणं आहे हे ! यातला हळूवार रोमॅन्टीसिझम संस्मरणीय !

आंबट चिंच's picture

26 Sep 2020 - 8:05 am | आंबट चिंच

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रसाद_१९८२'s picture

26 Sep 2020 - 9:48 am | प्रसाद_१९८२

एस.पीं. चे 'सच मेरे यार है, बाकि बेकार है' हे सागर चित्रपटातील, कमल हासनसाठी गायलेले गाणे मला खूप आवडते.

विनिता००२'s picture

26 Sep 2020 - 10:13 am | विनिता००२

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__

सलमानचा आवाज म्हणून मी आधी त्यांना ओळखू लागले. एक से एक गाणी! तरल आवाज :(

महासंग्राम's picture

26 Sep 2020 - 11:01 am | महासंग्राम

गर्दीश मधलं
हम ना समझे थे बात इतनीसी थी
ख्वाब शिशें के दुनिया पत्थर कि

जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा नकळत डोळे भरून येतात. या कोरोनाने ९०'s वाल्यांच्या आयुष्यातलं खूप काही हिरावून नेलंय

Gk's picture

26 Sep 2020 - 11:32 am | Gk

https://youtu.be/7PHrz5nEbKY

एक चतुर नार चा ओरिजिनल साऊथ अवतार , टकलूची भूमिका एस पी बालसुबायमण्यमने केली आहे , आवाजही त्यांचाच आहे

चांदणे संदीप's picture

26 Sep 2020 - 12:43 pm | चांदणे संदीप

अतिशय दु:खद बातमी.

काल जेव्हा एकाने ही बातमी एका व्हाट्सअ‍ॅप ग्रूपवर पाठवली तेव्हा त्याच क्षणी मनातून अशी प्रार्थना निघाली की ही बातमी खोटी निघावी. लगेच ऑनलाईन जाऊन चेक केलं तर दुर्दैवाने बातमी खरी निघाली. पुन्हा मनात असंही वाटतं की अशी माणसे मर्त्य नसतातच. ती कायम राहतात त्यांच्या कलाकृतीमधून आणि आठवणींमधून.

कितीतरी आठवणी आहेत एसपींच्या गाण्यांच्या.

सं - दी - प

एस पी - भावपूर्ण श्रद्धांजली
एकदम वेगळाच सुमधुर आवाज, एस पी कायम मनात राहतील.
त्यांचा मुलगा चरण याच्या आवाजाचा पोतसुध्दा एस पी यांच्यासारखाच आहे.

मदनबाण's picture

27 Sep 2020 - 11:29 am | मदनबाण

माझ्या आवडत्या गायकास भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांचा कोव्हिड झाल्या नंतर त्यांनीच रेकॉर्ड केलेला व्हिडियो पाहण्यात आला होता... आय एम फाईन, आय विल बी फाईन हे त्यांचे त्या व्हिडियोतील शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे झाले नाहीत. :(

प्रसाद भागवत १९८७'s picture

27 Sep 2020 - 12:57 pm | प्रसाद भागवत १९८७

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली

उपयोजक's picture

27 Sep 2020 - 2:42 pm | उपयोजक

SPB

सिरुसेरि's picture

30 Sep 2020 - 11:04 pm | सिरुसेरि

एस.पी . यांना भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांची काही लक्षात राहिलेली गाणी .

सुवी सुवी -- https://www.youtube.com/watch?v=RsuOontkJH4
आया है राजा -- https://www.youtube.com/watch?v=FJiE6X4xF6I
अतिनदोम -- https://www.youtube.com/watch?v=ZaoR3bu3GBA
देवुडा देवुडा -- https://www.youtube.com/watch?v=OjpNsyM6rkM
सिपि इरुकुडु -- https://www.youtube.com/watch?v=JiW8qxUrzZ8
अंजली पुष्पांजली -- https://www.youtube.com/watch?v=1RmDri1Brc4
बंगारु कोडी पेट्टा -- https://www.youtube.com/watch?v=hxvUiz6s4Gk

Gk's picture

2 Oct 2020 - 8:46 pm | Gk

सुरसंगम चा साऊथ अवतार शंकराभरणम

सहज म्हणून ऐकले , तर गायक चक्क एस पी निघाला.

https://youtu.be/iZACVIMSbOM

मेघ रागातील आलाप तर अगदी शास्त्रीय पंडितासारखे आहेत

Gk's picture

2 Oct 2020 - 8:50 pm | Gk

हा त्याचा हिंदी अवतार हे शिवशंकर
https://youtu.be/eEBc8LFI-GE