गडकिल्ले / डोंगर भटकंती धागे संग्रह.

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
6 Oct 2020 - 2:41 pm

गडकिल्ले/ डोंगर भटकंती धागे
आता हळूहळू लॉकडाऊन संपून व्यवस्था पूर्वीसारखी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वजनिक वाहने सुरू होऊन प्रवासाचे निर्बंध उठल्यावर भटकंती करता येईल. तोपर्यंत वाचनासाठी.

वेळणेश्वर २०२०

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
6 Oct 2020 - 12:49 am

गेल्या काही महिन्यांपासून घरात बसून खुपच कंटाळा आलेला होता. मुलीचेही ऑफिसचे काम घरूनच सुरु आहे. अशातच १ तारखेला माझ्या लग्न झालेल्या मोठ्या मुलीचा ठाण्याहून फोन आला. आम्हा दोघांना तीन दिवसांची सुट्टी आहे. कुठे फिरायला जायला मिळेल का. तुम्ही आणि आणखी कोणी येत असेल तर जाऊ सगळे मिळून. आमच्या शेजाऱ्यांना व मैत्रिणीला विचारले तर तेही लगेच तयार झाले. १० मोठे व एक छोटी मुलगी अशी अकरा जणांची टीम तयार झाली.

(...मारीला म्यां डोळा ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 12:10 pm

पेरणा http://misalpav.com/node/47605

अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली

म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडरोमांचकारी.कविताइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

...पाहिले म्यां डोळा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 11:10 am

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

मुक्त कवितामुक्तक

आभाळ

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 12:07 am

आभाळ माझे जवळी
मजवर बरसेल खात्री
अलगद धावे मृगजळी
थेंब पाझरे रिक्त गात्री

गच्च धरले उराजवळी
मुक्त होते स्वप्नरात्री
शोधत माती कोवळी
थांगपत्ता नाही नेत्री

आभाळसर गर्द निळी
झेपावली नदी पात्री
भेटेल सागर जळी
पूर्णत्व मागे सहयात्री.
-सरीवर सरी

मुक्तक

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
2 Oct 2020 - 1:11 pm

अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं!
शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही. विररसाने ओतप्रोत भरलेले स्वधर्म आणि स्वदेशाभिमान, तसेच स्वातंत्र्य प्रेरणेने प्रेरित होऊन, शीर हातावर घेऊन प्राणपणाने लढणारे लढवय्ये, तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून जास्तीत जास्त पराक्रम करून प्रचंड मोठा विजय मिळविणे हे चमत्कार ठायी ठायी पहावयास मिळतात.

इतिहाससमीक्षामाहितीसंदर्भ

पन्हाळघरदुर्ग ( Panhalghar Fort)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
2 Oct 2020 - 11:58 am

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडच का निवडला ह्यामागे अनेक भौगोलिक कारणं आहेत. रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, दौलतगड पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची प्रभावळ असल्याने युध्दशास्त्राच्या दृष्टीने रायगड अधिकच बळकट झाला होता. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. रायगडाभोवती उभा केलेले किल्ल्यांचे कडे नीट अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल कि मानगड ते दौलतगड या दरम्यान कोणता गड दिसत नाही.