आभाळ माझे जवळी
मजवर बरसेल खात्री
अलगद धावे मृगजळी
थेंब पाझरे रिक्त गात्री
गच्च धरले उराजवळी
मुक्त होते स्वप्नरात्री
शोधत माती कोवळी
थांगपत्ता नाही नेत्री
आभाळसर गर्द निळी
झेपावली नदी पात्री
भेटेल सागर जळी
पूर्णत्व मागे सहयात्री.
-सरीवर सरी
प्रतिक्रिया
5 Oct 2020 - 2:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरी आवडल्या. लिहिते राहा. शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
23 Oct 2020 - 1:55 pm | Geeta Bhoir
सरीवर सरी "आभाळसर गर्द निळी", खुप सुंदर ओळ
27 Oct 2020 - 10:35 am | प्राची अश्विनी
छान!