अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 2

Primary tabs

नयना माबदी's picture
नयना माबदी in भटकंती
25 Sep 2020 - 5:54 pm

22 जुन 2012
गाडीने वेग पकडला व आम्ही जम्मु कडे प्रस्थान केले. मुंबई ते जम्मु हे अंतर 1950 कि.मी आहे ते पार करण्यासाठी स्वराज एक्सप्रेस 30 तास घेते. आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. मजा येत होती. 22 जुन चा संपूर्ण दिवस गाडीमधेच गेला. मुंबई-सुरत-रतलाम-कोटा-मथुरा-दिल्ली-अंबाला-जालंधर-पठानकोट असे करत आम्ही 23 जुन ला दुपारी 3 वाजता जम्मु ला पोहोचलो.

23 जुन 2012
काश्मीरला जातोय म्ह्टल्यावर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छदीत डोंगर , खुप थंडी.
आम्हाला ही असेच वाटले होते पण जम्मुला उतरताच आमची भ्रमनिराशा झाली. जुन महीना असल्याकारणाने जम्मुला खुप उकडत होते. आम्हाला वाटले आता एखाद्या हॊटेलमधे जाऊ ,आराम करु आणी उद्या सकाळी बालताल साठी निघु. पण स्टेशन वरुन बाहेर येताच काकांनी सांगितल की आता आपली बस येईल व आपण बालताल साठी निघणार आहोत. आमचा तेव्हा मुड ऒफ झाला थोडा कारण 30 तासांच्या प्रवासाने आम्ही आधीच दमलो होतो. दोन दिवस आंघोळ केली नव्ह्ती व आता अजुन 10-12 तासांचा प्रवास आम्हाला बसने करायचा होता. पण आम्हाला 25 जुन ची तारीख दर्शनासाठी दिलेली होती त्यामुळे आम्हाला आज निघावच लागणार होते.

5 वाजता आमची बस आली व आम्ही बालतालच्या दिशेने निघालो. जम्मु ते बालताल अंतर 400 कि.मी आहे ते पार करण्यासाठी बसने 10 ते 12 तास लागतात. जसजसे आम्ही जम्मुपासुन पुढे जाऊ लागलो वातावरण बदलु लागले.
हवेमधे गारवा वाढु लागला. रात्री 9-10 च्या सुमारास आम्ही एके ठिकाणी जेवणासाठी थांबलो. इतका वेळ आम्ही बंद खिड्क्यांच्या बसमधे होतो त्यामुळे आम्हाला बाहेरच्या थंडीचा अंदाज आला नाही. आम्ही असेच स्वेटर न घालता बसमधुन उतरलो. जसे उतरलो त्याच्या दुप्पट वेगाने पुन्हा बस मधे शिरलो. बाहेर खुप थंडी होती. आम्ही शाल,स्वेटर,कानटोपी, हातमोजे असा सर्व लवाजमा अंगावर चढवुन मग उतरलो.

अमरनाथ यात्रेकरुंसाठी जागोजागी भंडारे असतात जेथे आपण मोफत स्वादिष्ट जेवणाचा लाभ घेऊ शकता. बालताल इथेही सर्व भंडारे असतात. जास्तीत जास्त भंडारे हे पंजाबमधील असतात. हे लोक 15 कोटीहुन ही जास्त खर्च करुन शिवभक्तांची सेवा करतात. आपण जाताच हे लोक भोले भोले म्हणुन आपले स्वागत करतात. विविध भाज्या , भातांचे विभिन्न प्रकार, मिठाया , चहा , कॊफी, गरम दुध अशा सर्व पदार्थांची रेलचेल असते. हे लोक आपल्याला राह्ण्यासाठी खोल्या ही देतात. आपण आपल्या इच्छेनुसार त्यांना पैसे देउ शकतो. भंडारामधे जेवण करुन आम्ही पुढे निघालो.

24 जुन 2012
जम्मु-उधमपुर-कुद-पट्नीटॊप-रामबाण-बनिहाल-अनंतनाग-श्रीनगर असे करत आम्ही सकाळी 7 च्या सुमारास सोनमर्ग ला पोहोचलो. गाड्यांची मोठी रांग लागली होती.कारण पुढे गेट लागला होता. सतत होणा-या दह्शतवादी कारवायांमुळे सर्व गाड्यांची कसुन तपासणी करण्यात येत होती.आमच्या गाडीचा नंबर यायला वेळ लागणार होता. मग तोपर्यंत आम्ही बसमधुन उतरुन जवळच असलेल्या हॊटेलात जाउन जरा ब्रश वगैरे करुन चहा-नाश्ता केला व जरा आसपास फिरलो.

शेवटी एक तासाने गेट उघडले व आम्ही मार्गस्थ झालो. 9 वाजता आम्ही बालताल इथे पोहोचलो. इथे आपल्याला खुप सिक्युरिटी चेकींग मधुन जावे लागते. आपण सर्वांनी बस मधुन उतरायच. बसची सामानासकट चेकींग होते. महीला व पुरुषांसाठी वेगवेगळे चेकींग बुथ असतात तेथे आपण आपला दर्शनासाठी असलेला पास घेउन जायच. शेवटी सर्व सोप्स्कार आटपुन आम्ही बालताल येथे प्रवेश केला.

आमची बस पार्किंग मधे निघुन गेली. आम्ही 2 दिवसांसाठी लागणार सामान सोबत घेतल होत बाकी सामान बसमधेच ठेवल होत. ज्या काकांसोबत आम्ही आलो होतो ते पंजाब येथील मलोट गावचे होते आणि त्यांचा हि इथे दरवर्षी भंडारा असतो. आम्ही तिथेच 2 दिवस राहणार होतो. आम्ही गेल्या गेल्या त्यांनी भोले भोले म्ह्णत आमचे स्वागत केले व आम्हाला चहा- नाश्ता आणुन दिला.

बम बम भोले..!

क्रमश:

प्रतिक्रिया

डीप डाईव्हर's picture

28 Sep 2020 - 5:35 pm | डीप डाईव्हर

चांगल लिहिताय. पुढचे भाग लवकर टाका.
बम बम भोले..! 🙏

नयना माबदी's picture

29 Sep 2020 - 10:55 am | नयना माबदी

धन्यवाद !

अर्धवटराव's picture

29 Sep 2020 - 3:06 am | अर्धवटराव

थोडं जास्तच आटोपशीर झाल्यासारखं वाटला हा भाग.

एकीकडे निसर्गाची आल्हादकारक रुपं, भावीकांची सेववृत्ती मन प्रसन्न करते, पण सुरक्षेच्या कारणांची बोचही जाणवते.
कधि संपेल हे दुष्टचक्र तो महादेवच जाणे.

बम बम भोले _/\_ _/\_

नयना माबदी's picture

29 Sep 2020 - 10:54 am | नयना माबदी

धन्यवाद ! पहिल्यांदाच लिहीत आहे, 2012 ची गोष्ट आहे. जे जे आठ्वतय लिहितेय. सांभाळुन घ्या. मराठी टायपिंगची सवय नाहीये

श्वेता२४'s picture

29 Sep 2020 - 1:32 pm | श्वेता२४

पु.भा.प्र.

नयना माबदी's picture

30 Sep 2020 - 10:26 am | नयना माबदी

धन्यवाद !

प्रसाद_१९८२'s picture

29 Sep 2020 - 1:33 pm | प्रसाद_१९८२

छान लिहिलेय.

नयना माबदी's picture

30 Sep 2020 - 10:26 am | नयना माबदी

धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

29 Sep 2020 - 2:00 pm | टर्मीनेटर

वाचतोय... चांगलं लिहिताय 👍
नयनाजी भाग थोडे मोठे लिहिलेत तरी चालेल असे सुचवावेसे वाटतंय.

नयना माबदी's picture

30 Sep 2020 - 10:26 am | नयना माबदी

धन्यवाद !. तुमच्या इजिप्त सहलीचा लेख खुप आवडला. दोनदा वाचुन झाला.

वाचतोय... चांगल चालल आहे... थोडे मोठे भाग टाका.

नयना माबदी's picture

30 Sep 2020 - 10:26 am | नयना माबदी

धन्यवाद !