आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
18 Sep 2020 - 9:19 pm

“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

धोरणमांडणीवावरवाङ्मयकथाप्रकटनविचारलेख

सोनगड

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
18 Sep 2020 - 1:06 pm

  "राज्याचे सार ते दुर्ग" असे अज्ञापत्रात सांगितले आहे. अर्थात दुर्ग हे मुलतः संरक्षणाची वास्तु म्हणून उभारले गेले. लष्करी ठाणी हा बहुतांश किल्ल्यांचा प्राथमिक उद्देश असला तरी काही किल्ल्यांचा इतरही कामासाठी उपयोग झालेला दिसतो. महाडजवळच्या आणि रायगडाच्या घेर्‍यातील सोनगडाचा मुख्यतः वापर कारागृह म्हणून झाला. अर्थात सोनगडाने युध्द पाहीली नाहीत असा मात्र याचा अर्थ नव्हे. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली.

अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2020 - 9:04 am
समाजजीवनमानविचारअनुभव

व्यथा

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
17 Sep 2020 - 8:10 pm

'अंतरात खोल काही दाटले आहे'
'वाहवा! काय सुंदर मांडले आहे!'

वृक्ष काय वृद्ध रे होती कधीही?
म्हणती, हे झाड छान वाढले आहे

कसे आज अचानक सुटले कोडे?
जाणीवेने क्षणास या गाठले आहे

राहू दे ठिगळ, आणखी धागा-सुई
व्यर्थ धडपड आभाळ फाटले आहे

कितीक वर्षे, अजून ही जखम ओली
पाहीन वाट, अन्य उत्तर कोठले आहे?

आताशा उचकीही येत नाही मला
वाटते कुणी नवे तुला भेटले आहे

-अनुप

गझल

प्रेम म्हणजे प्रेम असत!

मालविका's picture
मालविका in जे न देखे रवी...
16 Sep 2020 - 5:27 pm

प्रेम म्हणजे प्रेम असत,
पण तुमचं आमचं वेगळं असतं…

तुमचं प्रेम बुलेट, bmw वर असतं,
तर माझं प्रेम Btwin, Trek वर असतं…

तुमचं प्रेम मॅक डी तल्या बर्गर वर असतं,
तर माझं प्रेम सब वे तल्या सॅलड वर असत…

तुमचं प्रेम इंस्टाग्राम वर असतं,
तर माझं प्रेम Strava वर असतं…

तुमचं प्रेम मोची नि H &M वर असतं,
तर माझं प्रेम Decathlon वर असतं…

तुमचं प्रेम सिल्क आणि कॉटन वर असतं,
तर माझं प्रेम ब्रीदेबल जर्सी वर असतं…

तुमचं प्रेम INOX, सिनेपोलिस वर असतं,
तर माझं प्रेम BRM, RAAM वर असतं…

मुक्तक

वर्षादूत

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
16 Sep 2020 - 9:11 am

काळ्या झालरीची नक्षी
नभी लोलक विजांचे
वाजे चौघडा नगारे
वाऱ्यासंगे हे ढगांचे

आला,आला म्हणताना
दारी येउनी ठाकला
वर्षातला नवा ऋतु
माझ्या डोळ्यात साठला

किती किती त्याचा दंगा
किती रूपे, किती रंग
काळ्या फत्तराला देई
एक ओलसर अंग

त्याचे थेंब, त्याच्या सरी
येती धावून धावून
आर्त तापल्या भुईला
भेटी कवेत घेऊन

कोसळल्या धरेवरी
जशा धारांवर धारा
काळी माय झाली सर्द
बिलगून लेकराला

मग धावले बाहेरी
तिच्या अंतरीचे काही
वाहे भरून भरून
जाऊ दश दिशा पाही

कविता

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
16 Sep 2020 - 3:48 am

p {
text-align: justify;
font-size: 17px;
}

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील.

मांडणीराजकारणविचारलेखमत

स्मायली / Emoji

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
15 Sep 2020 - 8:53 pm

नमस्कार मिपाकरांनो,

सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो.

#ALAN WALKER #MUSIC

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
15 Sep 2020 - 6:38 pm

#ALAN WALKER #MUSIC

Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे.

Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की,

१. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात.

संगीत