आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
18 Sep 2020 - 9:19 pm

“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल….. यासाठी तुम्हांला कुणीतरी प्रेरणास्थान निवडावं लागेल….. ज्याने त्या प्रतिकूल परिस्थितून मात करत प्रगती साधली….. आपल्या सगळ्या प्रयत्नांना नैतिकीतेचं अधिष्ठान दयावं लागेल….. तुमची कोणत्याही त्यागाला सामोरं जाण्याची तयारी असायला हवी….. तुमच्या ध्येयापासून दूर नेणा-या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याज्य कराव्या लागतील…..” तिथं त्या हॉलमध्ये जमलेली सगळी तरुण मुलं-मुली त्यांच्या त्या भाषणाला जोरदार प्रतिसाद देत होते. यांच भाषणाचा व्हिडिओ बनवत तो युटयूबवर टाकला. आता हे भाषण सगळीकडे पसरलं. व्हायरल झालं…..आणि…

पोलीस स्टेशन मधल्या कॉम्प्युटरवर युटयूबवरच्या सगळ्यात जास्त व्हूज मिळालेल्या त्यांच्या व्हिडिओज इंन्सपेक्टर रमेश सांरग वांरवार बघत होते…..शहरातील आजच्या घडीचा तो सगळ्यात प्रसिदध असा मोटिवेशनल स्पीकर….डाँ. प्रकाश थोरात…..

तो प्रत्येक भाषण आवेशपूर्ण करायचा.

“आजकाल धंदा झालाय तो….. काही विशेष भांडवल लागत नाही,….. तरुण पोर जमवा आणि ठोकत चला भाषण….” रमेश सांरगच्या बाजूला उभा असलेला साथीदार बोलला. आता दुसरा व्हिडीओ प्ले केला गेला.

“जग त्या सगळया शक्यतांनी भरलेले आहे ज्याची तुम्ही कल्पना करता…..म्हणून स्वप्न बघा…. ती सत्यात उतरण्याची क्षमता निश्चितच आहे….. त्याशिवाय तुम्ही जिंवत का आहात इथें….. उदयावर कोणतीही गोष्ट ढकलून देऊ नका….. एक नियोजनबदध आयुष्य जगण्याची तयारी करा….. हे एकच जग या अंखड ब्रम्हांडात आहे जिथें आपण जिंवत असल्याचं कळतयं त्यामुळे सध्यातरी जो क्षण गेला तो पुन्हा येणे नाही….. सध्या विज्ञान इतकं प्रगत नाही त्यामुळे तो ‘आज’ ‘उदया’ नाही आणि ‘उदया’ असेल यांची ‘आज’ शाश्वती नाही, त्यामुळे जे काही प्रयत्न करायचे ते या क्षणापासंनूच…. कोठेही चाचपडत, भिती वाटून स्वतःला रोखून धरु नका….. जेव्हा जेव्हा असं वाटेल तेव्हा एकदा डोळ्यासमोर अंधा-या रात्रीचं निळंभोर आकाश आठवा आणि त्या लाखो लुकलुकणा-या ग्रह-ता-यांसमोर आपण किती क्षुल्लक आहोत यांचा विचार करा…. आणि अजिबात कचरु नका अनाेळखी वाट चाचपडायला….काय होईल….पडाल…. धडपडाल… पुन्हा उभे राहाल….यावेळी सावध असाल…..शिकाल….का कोण जाणे… कदाचित अख्खं नवीन जग तुमची वाट बघत असेल….” हयाही व्हिडीओला भरघोस प्रतिसाद होता. पण रमेश यांच्या चेह-यावर काडीचहीं समाधान दिसत नव्हतं. पण असा विषय काय होता की डाँ. प्रकाश थोरात यांचे व्हिडीओ इतक्या बारकाईने पोलीस स्टेशनमध्ये बघितले जात होते?….. तिथं बसल्या बाकासमोर थोरातांनी लिहिलेली काही पुस्तक होती त्यापैकीं एक रमेश यांनी हातात घेतलं.

डाँ प्रकाश थोरात, वय बत्तीस. नुकतीच बाजारात उपलब्ध झालेल्या आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामधील मजकूर.

  • पैसा ही मानवनिर्मित गोष्ट असून फक्त तिच्यासाठीच सकाळी उठणं बंद करा, तो तुम्ही ही निर्माण करु शकता कारण तुम्हीदेखील मानव आहात, इथं जर पुढे अंनतकाळ माणसाचं केवळ जगणं शाश्वत असणार आहे तर मग तुमच्या इथल्या नश्वर देहानंतरही सतत चर्चा करणारी, भोवतालावर परिणाम साधणारी व्यक्तीसंपदा तयार करावी लागेल…..
  • जर हे जग करोंडाे लाेकांनी पसरलेले असेल तर तुम्ही त्या करोडोंना ज्ञात असणारं बनायला हवेत…. पर्वा नसावी कश्याचीहीं….. कारणं तर बिलकुलच नसावी….. तुम्ही ईथे आहात इथंच सगळं आलं!….आम्हाला सिदध करावं लागेल परिस्थिती काही असेल जिंवत आहात हे बसं झालं…..चला सिदध करा स्वतःला…..
  • तुमची स्पर्धा स्वतःशी असायला हवी, इतरं हे तुमच्यासारखे कधीच असू शकत नाही, करायचीच असेल तर स्वतःशीच करा, असं स्वतःला घडवा की अपंरपार बदलून जा, लोक तुमच्यात ते न बनलेलं बघतीलं….लोकाचं तुम्ही खरं झालेलं स्वप्न बना…. कुठेचं म्हणजे कुठेचं छोटा विचार करु नका…. आपलं अन्न तो सूर्य बनवतो…..तो म्हणजे तुम्ही… तेवढी ताकद बना….
  • स्वतःला कुठल्याच भाषिक, प्रांतिक वादात कैद करुन घेवू नका, हे जग किती मोठं आहे त्यांचा अवाका समजावून घ्या, निर्सगाबदलचं कुतूहूल समजून घ्या उगाचच त्यांच्यात दैववाद शोधत बसू नका….
  • सातत्यासाठी कसून सराव करा, एका रात्रीत तरबेज होता येत नाही, आपल्या श्रमाचें गोडवे सांगत बसू नका,
  • सन्मान राखा, मिळवा.

पुस्तकाचीं पान मिटत आली पण रमेश यांना काही ठोस गावतच नव्हतं. शेवटी त्यांनी थोरात यांचा हल्लीचा…हो लेटेस्ट…. व्हिडोओ चालू केला. तशीच तुफान लोक जमली होती, हल्ली लोकं कार्यशाळा हाऊसफुल करुन टाकत…..त्यादिवशी ही तशीच झाली…..तशेच आवेशपूर्ण बोलले “कधीही यशाला सुरवात करु शकता, वय, पद यांची कधीही तमा करु नका, तुमच्या अपु-या प्रयत्नांपायी एका अख्या नव्या जगाच्या विधाताला तुम्ही मारुन टाकत असता….एवढे कष्ट घ्या की ताण, भूक, वेळ, काळ संगळ काही विसरुन जा, हे जग….. हया जगाचे नियम….. हे आपण बनवलेले असतात…..नैतिकता राखत ते तोडण्याची धमक बाळगा…. आणि जग जगतयं म्हणून अजिबातच जगू नका… दिवसरात्र घाम गाळत बसणं म्हणजे कष्ट करणं नव्हे….बेस्टातलं बेस्ट आजमवायला शिका….सतत स्वतःला बदलत्या जगात अपडेट ठेवा…”

************************

त्या दिवशी हेच भाषण संपल आणि ते घरी आले, ते अविवाहित होते, पुढे दोन दिवस कार्यशाळा नसल्यामुळे विशेष कोणी फोनही नाही केला आणि…. मागचे दोन दिवस त्यांच्या खोलीतून वास येऊ लागला….. आणि काय पोलिसांनी रुम उघडली……पंख्याला लटकून…. त्यांनी आत्महत्या केली होती…. चिठठी ही नाही सापडली…. आज आलेले पोस्टमोर्टम रिपोर्ट तेच सांगत होते. जगाला इन्सपायरं करणारा स्वतः आतून का कोसळला होता? की हा काही घातपात? पोलीस लावतील शोध काय तो…..

त्यांच्या घराबाहेर आता प्रंचड लोक जमली होती, पोलीसच्या गाडया लागल्या होत्या, मिडियाच्या व्हॅन आल्या, बाहेरचा निम्मा पब्लिक हातात मोबाईल घेवून तयारच होता, ही इतकी लोकं जमतील यांची पोलीसांना कल्पना नव्हती, अजून प्रेत घराबाहेर काढलं नव्हतं.

************************

त्यानें मघासपासून चाळलेली थोरात यांची पुस्तकं, प्रोत्साहनपर भाषणाच्या नेटवरच्या व्हिडीओ यांमुळे त्यांचा विश्वास बसत नव्हता, तो असा सहजासहजी निष्कर्ष काढू शकत नव्हता, पण सत्य कितीवेळ टाळणार, आजूबाजूचे सगळे पुरावे हेच सांगत होते. डाँ. प्रकाश थोरातने आत्महत्या केली !. मिडियाने आपल्या कहाण्या सुरु केल्या, त्याचें आई-वडील पार तिकडे इंदोरला राहतात…. ते आले…. त्यांच्यासाठी धक्का होता…बिचारे… बाकी त्याचें कार्यक्रम आयोजित करणारे, इतर सगळी लोकं यांची ही चौकशी सुरु केली… पण अदयाप काही हाती लागलं नाही…. तुम्हाला काय वाटतं थोरात खोटं बोलत भाषण करायचे, त्यांची पुस्तक त्यांतले ते विचार सगळेच खोटे का…….?

आणि आता मी सांगतो खंर…. खंर…. हो डाँ. प्रकाश थोरात यांनी आत्महत्याच केली….शू! ते कारण विचारु नका….तुमच्या मेंदूत एक किडा सोडलाय….वाटतयं ना झक मारलं आणि वाचलं….आता त्या हजारों शक्यता तुमच्या आजूबाजूला डोकावतील… पैशामुळे केली असेल का की काही खाजगी गोष्टीमुळे, कोण्या बाईमुळे केली असेल का, की कुणी खरचं शिताफीने खून करुन आत्महत्या भासवली असेल…..मला काय त्याचं….??????

-लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

धोरणमांडणीवावरवाङ्मयकथाप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2020 - 1:13 pm | चौथा कोनाडा

Nehamee pramanech jabardast !
Preranadayi. vichar khup bhari ahet.
Pudhil utsukata wadhaliy.
Lavakar taka Pudhil bhaag.

Gk's picture

19 Sep 2020 - 5:24 pm | Gk

छान

शशिकांत ओक's picture

19 Sep 2020 - 6:55 pm | शशिकांत ओक

तुमच्या मेंदूत एक किडा सोडलाय….वाटतयं ना झक मारलं आणि वाचलं….

हे मात्र खरे आहे!

उपयोजक's picture

20 Sep 2020 - 12:32 pm | उपयोजक

भारी लिहिलंय!

शा वि कु's picture

21 Sep 2020 - 10:41 am | शा वि कु

कल्पना खूपच भारी आहे कथेमागची.
सर्व बंध तोडून जगा सांगणाऱ्या व्यक्तीनेच बंधात अडकून आत्महत्या केली, तर त्या त्याच्या चाहत्यांच्या मनात काय विचार येणार ?