#ALAN WALKER #MUSIC

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
15 Sep 2020 - 6:38 pm

#ALAN WALKER #MUSIC

Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे.

Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की,

१. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात.

२. नंतर काही वर्षांनी AW संस्कृतीचे अवशेष असलेले Time capsule पुन्हा सापडते हे All Falls Down ह्या गाण्यात दाखविले आहे.

३. Darkside गाण्यात Walker black team आणि Walker white team पुन्हा भेटतात आणि Walker संस्कृतीचे dron शोधतात.

४.Alone या गाण्यात जगभरातील all walkers अनुयायी पुन्हा जॉईन/एकत्र होतात हे दाखविले आहे.

५.मग येते on my way हे सर्वात लोकप्रिय गाणे.यामध्ये मालिकेतील नायिकेचा प्रवास लुप्त झालेल्या संस्कृती शोधाचा plot दाखविला आहे.गाण्यासाठी Sabrina Carpenter चा आवाज चारचांद आहे.

६.Alone Part 2 गाण्यामध्ये गोष्टपुढे सरकते नायिकेला AW संस्कृतीच्या च्या खुणा एका cave मध्ये सापडतात.

७.या मिनिफिल्म मधले शेवटचे गाणे आहे Heading home …last part of triology हे तर अप्रतिमच गाण आहे.यामध्ये नायिकेला तिच्या गतजन्माची वा time travel ची गोष्ट अभ्यासादरम्यान डोळ्यासमोर तराळते.पूर्वी तिने पाहिलेले उल्कापाताचे भाकीत यात दाखविले आहे.मग या संस्कृतीचे मुख्य गुरु व इतर अनुयायी त्यांच्या रहस्यमय गोष्टीं असलेल्या capsule चे दफन करतात आणि सर्व walkers एकत्रित एका विहिरीत उडी मारून जगाचा निरोप घेतात.

या गाण्यातील उत्कृष्ट line आहे “ nobody sees me now I’m a one man show …I will do this on my own…..Guess I’m heading home now.”

अशा प्रकारे alan walker आणी इतर कलाकारांच्या कलाविष्काराची सुंदर गाणी आहेत.

टीप:हे सर्व मी माझ्या आकलनानुसार लिहिले आहे.तरी यामध्ये सुधारणा सुचवू शकता.

धन्यवाद.

-भक्ती

संगीत

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

17 Sep 2020 - 6:53 pm | दुर्गविहारी

काहीतरी वेगळंच समजलं. ऐकायचा प्रयत्न करतो धन्यवाद !

Bhakti's picture

17 Sep 2020 - 7:27 pm | Bhakti

एकदम भारीये!!
आणि कोणतं जास्त आवडलं ते सांगा नक्की!

Bhakti's picture

17 Sep 2020 - 7:26 pm | Bhakti
Bhakti's picture

17 Sep 2020 - 7:26 pm | Bhakti
आंबट चिंच's picture

17 Sep 2020 - 8:50 pm | आंबट चिंच

तुम्ही क्रमवार अशा लिंक तर द्या त्या गाण्याच्या मग आम्ही पण ऐकतो.

Bhakti's picture

18 Sep 2020 - 1:26 pm | Bhakti

नक्की

शा वि कु's picture

17 Sep 2020 - 8:53 pm | शा वि कु

फेडेड ऐकलंय. गाणं छान आहे, पण एका मित्राची कॉलर ट्यून आहे, आणि तो लौकर फोन उचलत नाही. त्यामुळे गाण्याची ऍलर्जी झाली आहे :)
बाकीची ऐकतो.

सगळे जण पहिले हेच गाणं ऐकतात ..हा हा

डीप डाईव्हर's picture

18 Sep 2020 - 12:24 am | डीप डाईव्हर

>>>हे सर्व मी माझ्या आकलनानुसार लिहिले आहे.तरी यामध्ये सुधारणा सुचवू शकता.>>>
भक्ती ताई youtube वर यांची बरीच गाणी दिसत आहेत. जर लेखात त्या त्या video चा दुवा किंवा video च embed केले असते तर बघणे सोयीचे झाले असते. आत्ताच पहिला Tired या गाण्याचा video पहिला चित्रण आवडले पण गाणे पकाऊ वाटले. बाकीचे video नंतर बघतो.

Bhakti's picture

18 Sep 2020 - 1:25 pm | Bhakti

ओके:)

Bhakti's picture

18 Sep 2020 - 1:24 pm | Bhakti

अरे वाह! आपण दिलेल्या प्रतिक्रियांसाठी खुप खुप धन्यवाद!!
मी खूप शोधाशोध करून हे लिहल होत.एका ठिकाणी द्यायचा होता लेख!पण तिकडे अप्रुव्ह नाही केलं.. म्हणाले कळलं नाही..तेच तर मला सांगायचं होतं की अलेन वाकरचा हा मास्टरपीस आहे.मराठीत या विषयावर कुठच वाचायला मिळालं नाही.तेव्हा ही गोष्ट मराठीतून सोप्या भाषेत सांगावी.
त्याच्या गाण्यांचे behind scene पण पहा.. चित्रीकरण अप्रतिम आहे.https://youtu.be/DmOzgcX3OGo
हा एक नमुना..

मदनबाण's picture

18 Sep 2020 - 7:41 pm | मदनबाण

#ALAN WALKER हे नाव वाचताच मला Faded आठवले ! बाकी मिनी फिल्म बद्धल ठावूक नव्हते, वेळ मिळताच पाहण्याचा प्रयत्न करावा म्हणतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू