प्रेम म्हणजे प्रेम असत,
पण तुमचं आमचं वेगळं असतं…
तुमचं प्रेम बुलेट, bmw वर असतं,
तर माझं प्रेम Btwin, Trek वर असतं…
तुमचं प्रेम मॅक डी तल्या बर्गर वर असतं,
तर माझं प्रेम सब वे तल्या सॅलड वर असत…
तुमचं प्रेम इंस्टाग्राम वर असतं,
तर माझं प्रेम Strava वर असतं…
तुमचं प्रेम मोची नि H &M वर असतं,
तर माझं प्रेम Decathlon वर असतं…
तुमचं प्रेम सिल्क आणि कॉटन वर असतं,
तर माझं प्रेम ब्रीदेबल जर्सी वर असतं…
तुमचं प्रेम INOX, सिनेपोलिस वर असतं,
तर माझं प्रेम BRM, RAAM वर असतं…
तुमचं प्रेम मॉर्निंग वॉक वर असतं,
तर माझं प्रेम मॉर्निंग राईडवर असतं…
तुमचं प्रेम बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड वर असतं,
तर माझं प्रेम माझ्या सायकलवर असतं..
तुमचं प्रेम छानच असतं
पण माझं प्रेम वेगळंच असतं…
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
पण तुमचं आमचं वेगळं पण असतं…
–धनश्रीनिवास
प्रतिक्रिया
16 Sep 2020 - 6:14 pm | अन्या बुद्धे
तुमचं आमचं सेम असत!