ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....
सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे.
रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात.
आधीच्या पदाधिकार्यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती.
सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे.
तर आता हा त्रास कमी कसा करता येईल?
सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे.
आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे.
येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच.