आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही
तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे
त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.
शेवटी मला 'अोहर टेक ' करणे भाग होते.मी पुढे जावुन (नेहमीप्रमाणे ) सुप्रसिद्ध खड्डयाला मिठी मारली.
या भरतभेटिनंतर पुढे जाताच माझा मागे बसलेला मित्र अोरडु लागला तेव्हा कळाले की आम्ही आल्याच्या खुशित त्या खड्डयाने मागच्या एका गाडीचा जलाभिशेक केला होता. मी ती व्यक्ती माझे आभार मानायला येत असल्याचे पाहिले.
दुर्देवाने ती व्यक्ती एक मुलगी होती.याचा घटनेचा सरळ सरळ अर्थ काढण्यात आला आणि अभिषेकासाथी आमच्या कुळाचा उद्धार होण्याचा आशिर्वाद मिळाला. अर्थात पुजेचे मानकरी आम्ही असल्याने तो प्रसाद स्विकारणे भाग पडले.
पण एका गोष्टीचे वाईट वाटले की त्या व्यक्तीने ही घडनेकडे 'माझ्यावर का उडवले' यापेक्ष्ा 'माझ्यासारख्या मुलीवर पाणि का उडवले ' असे पाहिले.
'महिया पुरुष समान आहेत' यासारखे विरोधाभासी वाक्य नसेल. आपण यातुन ते समान नाहीत आणि आपण ते आणत आहोत असा अर्थ निघतो असे मला तरी वाटते
लहान असल्यापासुन जेव्हा हा फरक ठसवला जातो तेव्हाच गडबड होते. जेव्हा पुरुष महिलांचे वेगवेगळे रुप पाहतो त्यांच्यासोबत काम करतो तेव्हाच तो फक्त सगळीकडे समान नजरेने पाहु शकतो. बहिणीसोबत , मैत्र्िणीसोबत राहिलेला माणुस महिलांमधली पुरुषांसारखी माणुस असल्याची समानता अनुभवतो तेव्हा ती त्या शिकवावी लागणार नाही. तेव्हाच एकमेकांबद्दलची अशी अढी मनातुन काढता येईल.
प्रतिक्रिया
10 May 2015 - 4:01 am | NIVRUTTI
झक्कास
10 May 2015 - 4:01 am | NIVRUTTI
झक्कास
10 May 2015 - 5:55 am | नगरीनिरंजन
जाऊ द्या, फार लावून घेऊ नका मनाला. समानता ही सोयीस्कर ठिकाणी आठवायची असते.
10 May 2015 - 8:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. फायदा तेथे समानता. नुकसान, त्रास अश्या गोष्टी दिसल्या की मला बै नै जमायचं हे. तेवढं करशील का माझ्यासाठी प्लीssSSSssज असं. (सगळ्याचं असं नाही वागतं पण मेजॉरिटी अशीच आहे.) (पॉपकॉर्न)