माहिती

भारतिय वंशाचा बाबुशा पोर्तुगालचा पंतप्रधान !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
27 Nov 2015 - 11:25 pm

भारतिय वंशाचे अंतोनिओ लुई सान्तोस दा कोस्टा हे २६ नोव्हेंबर २०१५ पासून पोर्तुगाल या देशाचे पंतप्रधान झाले आहेत.

सप्टेंबर २०१४ मध्ये ते सोशियालिस्ट पार्टी या पोर्तुगालच्या मुख्य विरोधी पक्षाचे सेक्रेटरी जनरल बनले. ते लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीचे मेयर (२००७ ते २०१५) होते. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर (१९९७ ते १९९९), मिनिस्टर ऑफ जस्टिस (१९९९-२००२) व मिनिस्टर ऑफ स्टेट अँड इंटर्नल अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन (२००५ ते २००७) या पदांवर काम केलेले आहे.

भूगोलराजकारणबातमीमाहिती

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
27 Nov 2015 - 5:07 pm

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड

धोरणमाध्यमवेधबातमीमाहिती

पावडर कथेला विलंब

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 9:30 pm

नमस्कार,

गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो.

धोरणमाध्यमवेधमाहिती

धडा

इडली डोसा's picture
इडली डोसा in जनातलं, मनातलं
22 Nov 2015 - 2:10 pm

नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

जीवनमानkathaaप्रवासमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीविरंगुळा

चहावाल्याचे पंख.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
19 Nov 2015 - 9:24 pm

चहावाल्याचे पंख.....
काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानप्रवासभूगोलअर्थव्यवहारचित्रपटप्रकटनविचारप्रतिसादअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधमाहितीसंदर्भविरंगुळा

बोर्डरूम ड्रामा...

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
18 Nov 2015 - 2:24 pm

हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात.

समाजजीवनमानराहणीअर्थव्यवहारआस्वादमाहिती

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर...

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 1:12 am

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर..

आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली.

...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्‍याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या. मात्र 'त्या गोष्टी घडल्या' हे ही वाचकांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक वाटत असल्याने हा वेगळा धागा काढत आहे.
या घटना अर्थातच मूळ लेखाशी संबंधित असल्या तरी येथे येताना विस्कळीतपणे येणे अपरिहार्य आहे.

इतिहासवाङ्मयसमाजजीवनमानराजकारणप्रकटनआस्वादमाहितीसंदर्भ

२२-११-२०१५.....नुलकरां बरोबर ओरिगामी कट्टा...पुणे...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
14 Nov 2015 - 5:00 pm

प्रिय मिपाकरांनो,

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे.

वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५.

काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही.

प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.

समाजजीवनमानतंत्रराहणीविज्ञानशिक्षणमौजमजामाहितीविरंगुळा

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
14 Nov 2015 - 2:15 pm

*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

महानायक अमिताभ : कधी न विझणारा प्रकाश

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
8 Nov 2015 - 9:32 pm

अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ आक्टोबरला अलाहाबाद उत्तरप्रदेश मध्ये हिंदू कायस्थ परिवारा मध्ये झाला. त्यांचे वडिल डाॅ. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी व आई तेजी बच्चन कराची मधील शिख कुंटुबातील होती.

डाॅ. हरिवंशराय बच्चन यांना दोन मुले, मोठा अमिताभ व लहान अजिताभ. सुरवातीला अमिताभ यांचे नाव इन्कलाब होते पण नंतर त्यांचे नाव अमिताभ ठेवले. अमिताभ चा अर्थ "कधी न विझणारा प्रकाश". अमिताभ यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण नंतर त्यांच्या वडिलांनी बच्चन आडनाव लावले. अमिताभ यांनी दोन ठिकाणाहून एम.ए. ची डिग्री घेतली.

चित्रपटमाहिती