नमस्कार,
गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो.
वर्षभरात बरेच काही नेटवरती घडले. कुठेतरी नेट साक्षरता, सुरक्षीतता ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या लेखनाला हात घातला. मात्र अशा लेखनाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या लेखनाला चाप बसली आहे. खाली काही बातम्यांची कात्रणे देतो आहे. मी कथेचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही.
डार्कनेट विषयी पुढे लिहीण्या आधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, इंग्रजी तसेच अन्य बर्याच भाषांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या धोक्याची ओळख आणि प्रगल्भता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या लिखाणामागे होते आणि राहतील.
कथेचा आत्मा सोडून किंवा बदलून लिखाण करण्यात मला स्वारस्य नाही आणि वाचकांची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे लिखाण करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
24 Nov 2015 - 9:38 pm | मांत्रिक
डार्कनेट वाईटच आहे. जर ते चुकीच्या हातात पडले तर सत्यानाशच आहे. तुमचा निर्णय योग्य वाटतो. हे ज्ञान चुकीच्या हातात नको पडायला!!! सहमत पराण्णा!!!
24 Nov 2015 - 11:51 pm | पीके
आणि योग्य हातात पडले तर काय कल्याण होइल?.
मुळात अश्या गोष्टी निर्माण कोण करतो आणि का? याचा विचार करा!
24 Nov 2015 - 9:39 pm | पैसा
मिपा बरेच जण वाचत असतात. कालच एका सदस्याकडे श्री आणि सौ च्या संपादकांनी मिपावर प्रसिद्ध लेखाची मागणी केली असे कळले. बर्याच जणांचे मिपावर प्रसिद्ध झालेले लेख बाहेर दिवाळी अंकांमधे येऊन गेले आहेत, येत आहेत. त्यामुळे मिपावर कथा येताच असे लिखाण दोन दिवसात पेपरांमधे आले यात काही नवल वाटले नाही. यामागे बरीच कारणे असू शकतात. मात्र डार्कनेटबद्दल नेमके काय लिहिले तर ते प्रसार स्वरूपाचे समजले जाईल याबद्दल कोणा तज्ञ माणासाने सांगावे. सायबर क्राईमशी संबंधित, वकील लोक सांगू शकतील.
24 Nov 2015 - 9:46 pm | मांत्रिक
डार्कनेट मुख्यतः ऑनियन अॅप आहे. युजरचा ट्रेस न लागू देणे हे वैशिष्ट्य. चुकीचे ठरू शकते हे. चुकीचेच आहे.
कायद्याप्रमाणे यूजर आयडेंटिटी हिडन राहणे हे बेकायदेशीरच कृत्य आहे. डार्कनेट त्यालाच पाठिंबा देते हे दुर्दैव!!!
24 Nov 2015 - 9:41 pm | स्वाती दिनेश
डार्कनेटबद्दल नेमके काय लिहिले तर ते प्रसार स्वरूपाचे समजले जाईल याबद्दल कोणा तज्ञ माणासाने सांगावे. सायबर क्राईमशी संबंधित, वकील लोक सांगू शकतील.
ज्यो शी सहमत.
स्वाती
24 Nov 2015 - 9:53 pm | जेपी
आमाला अजुन नेट च कळत नै,तर डार्कनेट कुठुन कळणार.
असो याबाबतीत काहितरी सकारात्मक घडो ही भावी संपादक पदी प्रार्थना..
24 Nov 2015 - 10:34 pm | संदीप डांगे
निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन. बिटकॉइनच्या संदर्भात डार्कनेटबद्दल दोन वर्षांआधीच इत्थंभूत अभ्यास केला असल्याने याबद्दल अज्ञानी किंवा उत्सूक लोकांना उगाच माहिती होणे त्यांच्यासाठीच घातक ठरू शकते हे माहित आहे. जसे अंडरवर्ल्ड सामान्यांपासून दूर राहणे आवश्यक, नाहीतर त्याचा 'रेगे' होतो, तसंच हेही आहे.
आपल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! इच्छुक आपल्या जबाबदारीवर अधिक संशोधन करू शकतात.
24 Nov 2015 - 11:01 pm | रेवती
तुला योग्य वाटेल तेंव्हा पावडर लिही पण अधेमधे दुसरं काहीतरी लिही की!
25 Nov 2015 - 5:22 am | अत्रुप्त आत्मा
+१
25 Nov 2015 - 1:58 pm | चिंतामणी
पण अधेमधे दुसरं काहीतरी लिही की!
हे जास्त महत्वाचे.
25 Nov 2015 - 2:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती दिवस खरडवह्या भरवणार लोकांच्या.
-दिलीप बिरुटे
24 Nov 2015 - 11:05 pm | महेश हतोळकर
निर्णय पटला.
पण मग बाकिच्या अर्धवट लिखाणाचं काय? निदान भन्नाट तरी पूर्ण कराच.
24 Nov 2015 - 11:17 pm | pacificready
हल्लीचे वार्ताहर आळशी झाले असल्यानं असं झालं असावं असा प्राथमिक कयास आहे. इकडचं तिकडचं उचलतात आणि छापतात. इस्पिकचा एक्का यांची व्हिएटनाम सिरीज आली त्यानंतर थोड़याच दिवसात मटा की सकाळ मध्ये जवळपास त्याच माहितीसह लेख आला होता.
त्यामुळे त्याबाबत फार विचार करु नये असं वाटतं. बाकी लेख कथा पूर्ण करण्यासाठी याचा फ़क्त पार्श्वभूमी म्हणून विचार करायला हरकत नाही.
25 Nov 2015 - 12:49 am | सागरकदम
हल्लीचे वार्ताहर?
अहो सगळे नाही पण बर्यापैकी हेच करतात
25 Nov 2015 - 1:49 am | महासंग्राम
विएतनाम च्या धाग्याची लिंक असेल तर नक्की द्या
25 Nov 2015 - 1:03 am | होबासराव
ह्यावर एक छान मालिका येवुन गेलीय सोनी टिव्हि वर.
25 Nov 2015 - 7:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दूसरा भाग मला व्य नि कर.मी कोणालाच सांगणार नाही.
लोक डार्कनेट कड़े वळुन गुन्हेगारी जगता कड़े वळु नये हा विचार पटला.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
25 Nov 2015 - 7:58 am | चाणक्य
डेंजर दिसतय. पराला अनुमोदन.
25 Nov 2015 - 8:34 am | नाखु
अखिल मिपा "क्रमशः सांगून मध्येच लटकविलेल्या कथा मालीकांचा , अर्धवट ठेवलेल्या लेखांचा" वाचक-आस्वादक संघाकडून जोरदार मागणी
25 Nov 2015 - 9:23 am | प्रसाद१९७१
परा साहेब - टोरंट हा ह्या डार्क नेट मधलाच एक प्रकार आहे का? अगदी खूप धोकादायक नसेल कदाचित पण डार्कनेट मधे कॅटेगराइझ करता येइल का टोरंट ला?
25 Nov 2015 - 9:30 am | असंका
काय हे! श्या...
:(
25 Nov 2015 - 11:00 am | असंका
सोरी हां साहेब!! निराशाच तेवढी व्यक्त झाली...
आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद..!
25 Nov 2015 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार
पावडर वाचताना माझ्या मनात अभद्र शंका डोकावुन गेली होती की परा बदलला तर नाहीये ना?
पण नाही परा उतला नाही, मातला नाही, कथा मालिका अर्धवट ठेवण्याचा वसा पराने सोडला नाही
त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे या वेळेला त्याच्या कडे काहीतरी कारण आहे कथा अर्धवट ठेवण्याचे.
पराशेठ आपण आपल्या वाचकांना कारण कळवण्याच्या घेतलेल्या या तसदी बद्दल समस्त समस्त वाचकवर्ग आपला आजन्म ऋणी राहिल.
पैजारबुवा,
25 Nov 2015 - 10:12 am | अद्द्या
आता परत लिखाण चालू केलाच आहे तर बाकी उरलेलं पूर्ण करा कि राव तोपर्यंत
25 Nov 2015 - 1:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असं करा, ती कथा लिहून पूर्ण करा आणि व्यनि करा सगळ्यांना.. हा हा हा...
25 Nov 2015 - 1:29 pm | चाणक्य
पराला तुरूंगात डांबण्याचा तुमचा हेतू कळला.
25 Nov 2015 - 1:29 pm | चाणक्य
पराला तुरूंगात डांबण्याचा तुमचा हेतू कळला.
25 Nov 2015 - 1:40 pm | आतिवास
प्रत्यक्ष वापर आणि काल्पनिक लिखाण - या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
क्रिएटिव रायटिंगला नियम लावायचा म्हटलं तर किमान ५० टक्के चित्रपटांवर बंदी घालावी लागेल.
असो.
अवांतर - अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-)
25 Nov 2015 - 2:02 pm | रुस्तम
+१ अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-)
25 Nov 2015 - 2:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> अवांतर - अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल. ;-)
हाहाहा क्या सॉलीड मारा. परा म्हटला असता अशा लोकांना अरबी समुद्रात बुडवलं पाहिजे.
वगैरे कै तरी, पण त्या लेखकाला नक्की चावलाच असता बाकी, मस्त प्रश्न हं. लाईक.
-दिलीप बिरुटे
25 Nov 2015 - 2:18 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =)) क्या मारा क्या मारा =)) =))
25 Nov 2015 - 2:23 pm | संदीप डांगे
हा पण यान्गल विचारात घेण्यासारखा आहे.
25 Nov 2015 - 3:23 pm | आदिजोशी
अन्य कुणी अशाच एका विषयावरील लेखमाला अशाच कारणांसाठी थांबवल्याची नोंद मिपाच्या इतिहास आहे. त्याबाबत, पुणेकर असूनही पराने मतप्रदर्शन केले नव्हते हे ही आमच्या ध्यानात आहे :)
25 Nov 2015 - 4:07 pm | आदूबाळ
लोल!
"क्रिएटिव रायटिंगला नियम लावायचा म्हटलं तर ..." याच्याशी सहमत आहे.
"पावडर"बाबत फार उत्सुकता होती. असो.
25 Nov 2015 - 10:07 pm | परिकथेतील राजकुमार
मी प्रतिसाद दिलाच नसता हे नक्की.
मुख्य म्हणजे मी माझ्या लेखनात नमूद केले आहे :-
हे लेखन बहूदा नीलकांत ही वाचत असेल. त्याची परवानगी असेल, तर मी पुढील लेखनाला नक्की तयार आहे. माझी सुरक्षा मी बरोब्बर करेनच. आपला मामाच बसलाय मुख्यमंत्री पदावर. ;)
25 Nov 2015 - 2:32 pm | आदिजोशी
ह्या कारणामुळे लेखन थांबवत असल्याने काही प्रॉब्लेम नाही.
पण लोकांनी वर सांगितल्याप्रमाणे बाकीचं बरंच लिखाण लटकलेलं आहे, ते पूर्ण करायचं मनावर घ्या.
25 Nov 2015 - 6:17 pm | उगा काहितरीच
"काल्पनिक" असा शिक्का मारलेले सत्याच्या जवळपास जाणारे लेखन बहुधा कायद्याच्या कचाट्यात सापडत नसावे . तरीही योग्य शहनिशा करूनच लेखन प्रकाशीत करावे . उगाच आम्हाला वाचनाची मेजवानी देण्याच्या नादात तुम्हाला वैयक्तिकरित्या काही नुकसान होऊ नये असे वाटते .
तरी शक्य असल्यास (आपल्याला कुठलाही त्रास न होता) पुढील भाग प्रकाशीत करावेत . ही नम्र विनंती .
26 Nov 2015 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते
क्रमशः वर मी काही बोलणं म्हणजे माझ्यावरच उलटण्याचा धोका आहे खरा... पण बोलतोच...
परा, बात कुछ जम्या नै भौ!
26 Nov 2015 - 5:29 pm | चिगो
पटलं, पराशेठ.. मग एकच विनंती आहे. जरा ते 'भन्नाट', 'गुलजार नार' कडे लक्ष द्या की..
26 Nov 2015 - 7:52 pm | DEADPOOL
परा साहेब त्या 'भन्नाट' ला पूर्ण करा ना!!!
26 Nov 2015 - 7:55 pm | DEADPOOL
ते torbot, torbrowser, tornet, एल्लिगल असेल तर गूगलच्या खेळाच्या दुकानातून काढायला पाहिजे, नाही का?
26 Nov 2015 - 8:14 pm | आनंदी गोपाळ
गोष्ट लिहायला हरकत अजिबात नाही. अॅक्च्युअल कोणते ब्राऊजर्स वापरावेत. ते कसे वापरावेत. ते वापरून शोध कसा घ्यावा याबद्दल माहिती न देता, तिसरेच शब्द [उदा. कांदा. ;) ] वापरून कथा पूर्ण करता येईल.
27 Nov 2015 - 12:09 am | एक एकटा एकटाच
तुमच्या निर्णयाला अनुमोदन
पण एक चांगली सुरुवात झालेली कथा पुर्ण होणार नाही ह्याबाबत हळहळ वाटते