अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा
नमस्कार मंडळी.
पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या. नंतर 'एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला, आणि त्याची पहिली पायरी म्हणून लगेचच ताज्या फळांचा रस प्राशन करते झालो.