घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे.